टीव्ही मालिकांमधून अभिनयाला सुरूवात करणारी यामी गौतम पाहता पाहता बॉलीवूडची स्टार झाली. बॉलीवूडच्या अनेक चित्रपटात काम करताना यामीने अनेकांना तिच्या लुक्स आणि अदांनी चाहत्यांना अक्षरशः घायाळ केलं. यामी आजही तिचे निरनिराळे लुक्स आणि फॅशनसाठी लोकप्रिय आहे. यामीच्या गालावर पडणारी खळी अनेकांना भुरळ घालते. असं म्हणतात की, ज्या स्त्रीच्या गालावर खळी पडते तिचे सौंदर्य नेहमीच मनमोहक असतं. मात्र यामीने नुकतंच तिच्या सौंदर्याबाबत एक मोठा खुलासा केला आहे. यामीच्या गालावर पडणारी खळी नैसर्गिक नसून एका अपघातात पडलेला खड्डा आहे. जाणून घ्या काय आहे यामागचं सत्य
Bigg Boss Marathi: विशालला झालंय तरी काय, खेळावर होतोय परिणाम
काय आहे यामीच्या गालावरील खळीमागचं रहस्य
यामी गौतमीने दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या सौंदर्याचे हे एक खूप मोठे रहस्य चाहत्यांसोबत उघड केलं आहे. या मुलाखतीत यामीला विचारण्यात आलं होतं की, तुझ्या आयुष्यात असा एखादा क्षण आहे का जेव्हा अचानक वीज गेली होती ? यावर यामीने दिलेलं उत्तर तिच्या आयुष्यातील एक सिक्रेट उघड करणारं होतं. यामीने शेअर केलं की, होय, मी लहानपणी एकदा झोपण्यासाठी गेले होते. माझ्या गालावर पूर्वी फक्त एकाच गालावर खळी होती, पण दुसरी खळी ही खळी नसून एका अपघातात पडलेला खड्डा आहे. झालं असं की मी झोपण्यापूर्वी माझ्या बेडवर उड्या मारत होती आणि अचानक वीज गेली. मला अगदी नीट आठवत नाही की त्यावेळी वीज गेली होती की कुणी स्वीच ऑफ केलं होतं. पण तेव्हा मी बेडवरून उडी मारली आणि बेडचा कॉर्नर मला लागला. ज्यामुळे माझ्या गालावर एक नाही दोन खळ्या दिसू लागल्या. यातील एक नैसर्गिक आहे आणि दुसरी या अपघातात पडलेला खड्डा आहे. पण ही गोष्ट नक्कीच कोणाला माहीत नाही. दुसरी खळी मिळाल्यामुळे मी पडून देखील आनंदाने नाचली होती. थोडं विचित्र वाचेल पण त्यामुळे मला गालावर दोन दोन खळ्या पडल्या आहेत. “
संजय लीला भन्सालीच्या ‘बैजू बावरा’मध्ये अजय देवगण साकारणार तानसेन
यामीचे आगामी प्रोजेक्ट
यामी गौतमने आदित्य धर सोबत लग्न केल्यानंतर ती भूत पुलिस या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आली होती. ज्यामध्ये यामीसोबत अर्जून कपूर, सैफ अली खान, जॅकलीन फर्नांडिस यांच्या मुख्य भूमिका होत्या. आता लवकरच यामी गौतम दसवी, ए थर्सडे, लॉस्ट आणि ओ माय गॉड 2 मधून प्रेक्षकांसमोर येणार आहे.
Bigg Boss 15: मराठी स्पर्धकांचा यावर्षी आहे पगडा, प्रेक्षकही खूष