10 कारणांमुळे साऊथचा हिंदी रिमेक 'कबीर सिंह' वाटतोय *Intresting

10 कारणांमुळे साऊथचा हिंदी रिमेक 'कबीर सिंह' वाटतोय *Intresting

चला शाहीद कपूरच्या कबीर सिंह अवतारातील ट्रेलर फायनली रिलीज झाला आहे. साऊथच्या ‘अर्जून रेड्डी’ या चित्रपटाचा रिमेक असलेला हा चित्रपट आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अगदी काहीच तासात या चित्रपटाच्या चाहत्यांनी या ट्रेलरवर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. तेलुगुमध्ये विजय देवरकोंडाने हा रोल साकारला होता. हा चित्रपट तेथे सुपरडुपर हिट झाला होता. हा चित्रपट कधीतरी हिंदी डब केला जाईल असे वाटत असतानाच या चित्रपटाचा हिंदी रिमेक येत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात प्रमुख भूमिका शाहीद कपूर साकारतोय. आता या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर आम्हाला ही 10 प्रमुख कारणं वाटतात ज्यामुळे हा रिमेक अधिक Intresting वाटतोय. तुम्हालाही ही कारण पटतायत का ?


kabir singh pic


  1. शाहीद कपूरचा लुक... रिमेक म्हटल्यावर सगळ्याच गोष्टींची तुलना केली जाते. त्यातील पहिली गोष्ट आहे ती म्हणजे लुक…कबीर सिंहच्या कॉलेजच्या दिवसापासून ते त्याच्या ब्रेकअपनंतरच्या बदलेला लुक ट्रेलरमध्ये पाहायला मिळतोय. तो शाहीदने चांगला कॅरी केला आहे.

  2. रागीटपणा … कबीर सिंह हे कॅरेक्टर फक्त आग ओकणारे आहे. तो रागीटपणा चॉकलेटबॉयची भूमिका साकारणाऱ्या शाहीदने अगदी आरामात साकारली आहे. शाहीदच्या अभिनयात इतका सहजपणा आहे की, सबकुछ शाहीदमय झाले आहे.

  3. ट्रेलरची सुरुवात तेलुगु ट्रेलरप्रमाणे नसली तरी या चित्रपटातील महत्वाच्या घटना या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आल्या आहेत. ज्यामुळे उत्सुकता वाढते.

  4. किआरा अडवाणीने यात प्रीतीची भूमिका साकारली आहे. शांत आणि घरातल्यांच्या धाकात वाढलेली कियारा यामध्ये चांगली वाटत आहे. या चित्रपटासाठी ती परफेक्ट चॉईस आहे असे वाटत आहे.


हिंदीमध्ये शाहीद साकारतोय साऊथचा अर्जुन रेड्डी


shahid kissing


  1. इंटिमेट सीन्सनी भरला होता अर्जुन रेड्डी.. आता या चित्रपटातही असे काही सीन्स असतील अशी अपेक्षा आहे. ट्रेलरमध्ये त्यांचा बाईक अॅक्सिडंट आणि त्यानंतर त्यांनी केलेलं लीप टू लीप किस… पाहायला मिळत आहे

  2. शाहीदच्या प्रेमाची हळवी बाजू देखील दाखवण्यात आली आहे. I  like the way you breath हे वाक्य तेलुगुमध्येही प्रेमात पाडायला भाग पाडतं आणि हिंदीतसुद्धा

  3. शाहीदने यामध्ये आणखी काय व्हरायटी आणली असेल का? याची उत्सुकताही ट्रेलर पाहिल्यानंतर वाटते.

  4. ट्रेलरमध्ये जे गाणं वापरण्यात आले आहे ते चांगले असल्यामुळे चित्रपटातील इतर गाणीही चांगली असतीलच असा विश्वास वाटत आहे.

  5. कॉमेडीचा कडक सेन्स… ट्रेलरमधील त्याच्या रागासोबतच त्याच्या कॉमेडीचा कडक टाईमही पाहायला मिळत आहे. म्हणजे असे काही सीन्स आहेत ज्यामुळे कॉमेडी आपसुकच होत आहे.

  6. शाहीद कपूर हिंदीमधील असा चेहरा आहे जो आजही अगदी कोणत्याही रोलमध्ये फिट होऊ शकतो. 38 वर्षांचा शाहीद या चित्रपटात कॉलेजबॉयची भूमिका करतोय. पण त्या लुकमध्येही तो तितकाच तरुण आणि फ्रेश वाटत आहे.


केंद्रीय मंत्र्यांना रितेशचं सणसणीत उत्तर..वाचा काय म्हणाला रितेश देशमुख


पाहा या चित्रपटाचा ट्रेलर

Subscribe to POPxoTV

ही 10 कारणं आहेत ज्यामुळे कबीर सिंहचा ट्रेलर आम्हाला *Intresting वाटत आहे. आता कबीर सिंहची जादू हिंदी प्रेक्षकांना भुरळ पाडेल का यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. पण एक नक्की शाहीदने पद्मावत नंतर एक वेगळा प्रयोग करुन पाहिला आहे. त्याची इमेज बदलणारा असा हा चित्रपट असून  हा चित्रपट 21 जून रोजी रिलीज होणार आहे.


जय आणि माहीच्या घरी येणार नवा पाहुणा


(सौजन्य- Instagram)