ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
#VFX च्या मदतीने पहिल्यांदाच होणार 100 मराठी लघुपटांची निर्मिती

#VFX च्या मदतीने पहिल्यांदाच होणार 100 मराठी लघुपटांची निर्मिती

सध्या बच्चेकंपनी आणि मोठ्यांचीही पसंती मिळवत आहेत #animationmovie आणि #vfx असलेले चित्रपट. मग तो नुकताच आलेला #Bahubali असो वा #LionKing असो. चित्रपटसृष्टीमध्ये सध्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर प्रगती होताना आपण पाहत आहोत. वेगवेगळ्या कथा, संगीतातील नवनवीन प्रयोग, अभिनय कौशल्य या सर्व बाबी तर आहेतच. पण आता सर्वात जास्त बारकाईने लक्ष दिले जाते ते “VFX” कडे. व्हिएफएक्स हे एक असे तंत्रज्ञान आहे की, जे ठराविक दृश्याला जिवंत करते आणि त्यामुळे चित्र अधिक उठावदार दिसते. मराठीत चित्रपटांना सध्या चांगले दिवस आलेले आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण आपल्या प्रेक्षकांना नक्की काय हवं आहे, हे सिनेमा उद्योजकांनी चांगलंच ओळखलेलं आहे. अशीच एक ऍनिमेशन जगातील नामवंत कंपनी म्हणजे “आयरिऍलिटीज”. जी आता मराठीत कधीही न झालेला प्रयोग करण्यासाठी सज्ज आहे.

हॉलीवूड, बॉलीवूडनंतर आता मराठी चित्रपटांकडे कूच

आयरिऍलिटीज ऍनिमेशन कंपनीने मागच्या दशकापासून अद्यावत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बॉलीवूड तसेच हॉलीवूडमध्ये अनेक यशस्वी प्रयोग करून आपलं नावलौकिक मिळवलं आहे. त्यानंतर आता त्यांनी आपला मोर्चा मराठी सिनेसृष्टीकडे वळवला आहे. हॉरर आणि सस्पेंस या दोन सर्वात ताकदीच्या पण तेवढ्याच आव्हानात्मक विषयांवर तब्बल 100 लघुपटांची निर्मिती ही कंपनी करणार आहे. हा मराठी सिनेसृष्टीतील पहिलावहिला प्रयोग असल्याने सर्वांचे लक्ष या अनोख्या प्रयोगाकडे वेधलेलं आहे.

मराठीत यशाचा झेंडा रोवण्यासाठी उत्सुक

आयरिऍलिटीज ऍनिमेशन कंपनीने #100crore च्या क्लब मध्ये जाणारी पहिली भारतीय ऍनिमेटेड फिल्म “Chaar Sahibzaade” ची निर्मिती केली आहे. तसंच सध्या चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध क्रिकेटपटू ‘विराट कोहली’ च्या “सुपर व्ही” या ऍनिमेशन पटावरदेखील काम चालू आहे. आयरिऍलिटीज कंपनीचे सीईओ प्रसाद अजगांवकर गेली अनेक वर्ष ऍनिमेशन क्षेत्रात कमालीची कामगिरी करत असून आता बॉलिवूड आणि हॉलिवूडनंतर ते मराठीतदेखील आपला यशाचा झेंडा रोवण्यासाठी उत्सुक आहेत. या प्रसंगी निर्माते प्रसाद अजगांवकर यांनी सांगितलं की, “आम्हाला सांगताना अभिमान वाटतो की, आयरिऍलिटीज सध्या हॉलिवूड तसेच बॉलिवूड ऍनिमेशन क्षेत्रात कमालीची कामगिरी बजावत आहेत आणि आता त्याच जोशात आम्ही मराठी सिनेक्षेत्रात झेप घेत आहोत. 100 लघुपटांचे आव्हान जितके मोठे आहे तितकंच आयरिऍलिटीजसाठी सोपं. कारण त्यांचा स्वतःचा स्वतंत्र व्हिएफएक्स स्टुडिओ असल्यामुळे भविष्यात चित्रपट संकलन करणे सोईस्कर जाणार आहे.”

ADVERTISEMENT

एकाच वेळी अनेक प्रोजेक्ट्स

सध्या ही कंपनी काही नामवंत टेलीव्हिजन चॅनेल तसंच 3 मोठ्या ऍनिमेशन सिनेमांवर काम करत आहे. मराठीत या 100 चित्रपटांची क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून अभिनेत्री रीना अगरवाल कार्यरत होणार आहे. या प्रोजेक्टची क्रिएटिव्ह बाजू सांभाळणारी अभिनेत्री रीना अगरवाल सांगते की,”रुपेरी पडद्यावर आजवर मी काम केले. आता या पडद्यामागे काम करण्याची संधी मला प्रसाद आणि आयरिऍलिटीज कंपनीने दिली आहे. यासाठी त्यांचे मनापासून आभार मानते.’आयरिऍलिटीज’ मराठीत हा आगळावेगळा प्रयोग करत आहे आणि आपण त्याचा एक महत्वाचा भाग आहोत. ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.

बेस्ट ऑफ लक टू टीम iRealities.

P.S : POPxo सादर करत आहे #POPxoEverydayBeauty – POPxo Shop’s चं नवं कलेक्शन. त्वचा, केसांसाठी असलेली ही सौंदर्यप्रसाधने अतिशय परिणामकारक असून वापरण्यासाठी अगदी सोपी आहेत. शिवाय या सर्व उत्पादनांवर तुम्हाला 25% ची घवघवीत सुूटदेखील आहे. तुम्ही ही उत्पादने POPxo.com/beautyshop खरेदी करू शकता. तेव्हा POPxo Shop ची ही सौंदर्य उत्पादने खरेदी करा आणि तुमचं सौंदर्य आणखी खुलवा.

हेही वाचा –

ADVERTISEMENT

असे मराठी चित्रपट जे तुम्ही हमखास पाहायलाच हवे

सर्वाधिक मानधन घेणारे मराठी कलाकार

मराठी चित्रपटसृष्टीतल्या ‘10’ हॉट (Hot) आणि बोल्ड अभिनेत्री

16 Sep 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT