पावसाळ्यात जेव्हा कलाकारांनाही आवरता येत नाही भजीचा मोह

पावसाळ्यात जेव्हा कलाकारांनाही आवरता येत नाही भजीचा मोह

मुसळधार पाऊस, हवेतला गारवा, वाफाळता चहा आणि गरमागरम भजी… काय मस्त बेत आहे ना. घरात असताना असा पाऊस पडला की हा बेत नेहमीचाच. मात्र एखाद्याला कामावर असताना अथवा कलाकारांना शूटिंग दरम्यान हा बेत आखावासा वाटला तर. पावसाळ्यात तासनतास शूटिंग मध्ये अडकलेले कलाकार बऱ्याचदा सेटवरच भजी पार्टीचा असा बेत आखातात. नुकतंच फुलपाखरूच्या सेटवर अशी पावसाळी भजी पार्टी करण्यात आली. फुलपाखरू मालिकेतील तुमच्या सर्वांच्या लाडक्या ह्रता दुर्गुळे आणि यशोमान आपटे यांनी स्वतः भजी करण्यात पुढाकार घेतला. मालिकेतील या कलाकारांनी मग त्यांचं नेहमीचं रूटीन डाएट, फिटनेस सारं काही विसरून या भजी पार्टीचा आनंद लुटला. आम्ही फुलपाखरूच्या टीमचे हे भजीपार्टीचे फोटो तुमच्यासोबत शेअर करत आहोत. या भजीपार्टीचा आनंद लुटताना ह्रता आणि यशोमान फारच आनंदी दिसत आहेत. ह्रताने या फोटोंमध्ये पिवळ्या रंगाचं टी-शर्ट घातलं आहे तर यशोमानने लाल रंगाचे चेक्स असलेलं शर्ट घातलं आहे. ह्रता कढईमध्ये भजी तेलात सोडत आहे तर यशोमान भजी तळताना दिसत आहे. फुलपाखरूची संपूर्ण टीम या गरमागरम आणि कुरकुरीत भजीचा आनंद लुटताना दिसत  आहे. भजी हा सर्वांचाच विक पॉईंट असतो. त्यामुळे तासनतास काम केल्यावर असा भजी आणि चहाचा ब्रेक मिळाला तर कोणाला आनंद नाही होणार.

फुलपाखरू मालिका टेलीव्हिजनवर आहे लोकप्रिय

टेलीव्हिजन मालिका आणि प्रेक्षकांचं एक अतूट नातं असतं. मालिकांमधील कलाकार हळूहळू त्यांच्या मनात असं घर करतात की ते जणू त्यांना आपल्या घरीतील सदस्यच मानू लागतात. ‘फुलपाखरू’ ही मालिकादेखील यापैकीच एक मालिका आहे. फार कमी कालावधीत या मालिकेला चांगलंच यश मिळालं आहे. या मालिकेतील ‘मानस’ म्हणजेच यशोमान आपटे आणि ‘वैदेही’ म्हणजेच ह्रता दुर्गुळे चाहत्यांचे आवडते कलाकार आहेत. या दोघांचाही खूप मोठा चाहता वर्ग आहे. या मालिकेतील मानस आणि वैदेहीची लव्हस्टोरी नेहमीच तरूणवर्गाला भुरळ घालत आली आहे. त्यांच्यावर चित्रीत करणाऱ्यात आलेली गाणी असो किंवा कविता अथवा या दोघांमधील एखादा रोमॅंटिक सीन प्रेक्षकांना ते नेहमीच आवडतात. या मालिकेतील या दोघांची ऑनस्क्रिन केमिस्ट्रीच या मालिकेत प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. आता तर या दोन्ही कलाकारांनी घरातील सदस्याप्रमाणे सेटवरच भजीपार्टी केली होती. त्यामुळे ही बातमी त्यांच्या चाहत्यांसाठी नक्कीच आकर्षक असणार आहे. 

कलाकार जेव्हा सेटलाच मानतात आपलं घर

कलाकारांना नेहमीच शूटिंगसाठी तासनतास, काही दिवस, काही महिने घरापासून दूर राहावं लागतं. घरापासून दूर असले तरी या कलाकारांना पावसाळ्यात अशा भजी पार्टीचा मोह आवरता येत नाही. घर आणि कुटुंबापासून दूर असलेले हे कलाकार मग मालिका अथवा चित्रपटाच्या सेटलाच आपलं घर करतात. अशा वेळी मग त्यांना त्यांच्या कामाच्या ताणातून थोडासा विरंगुळा अथवा एक छोटासा ब्रेक मिळतो. कलाकार आणि निर्माते, तंत्रज्ञाची टीम एकत्र आणि मौजमजा करते. कधी सेटवर एखाद्याचा वाढदिवस साजरा केला जातो तर कधी अशा एखादी भजी पार्टी. विशेष म्हणजे अशावेळी मग हे कलाकार त्यांचं नेहमीच डाएट विसरून भजीवर ताव मारतात. बऱ्याचदा मराठी कलाकार सेटवरच त्यांच्या आवडीचे हे पदार्थ तयार करण्यासाठी स्वतः पुढाकार घेतात. 

 

अधिक वाचा

संजीवनी मालिका सतरा वर्षांनी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

Pregnant समीरा रेड्डीचं अंडरवॉटर हॉट फोटोशूट, फोटो व्हायरल

टेलीव्हिजनवर पुन्हा सुरू होणार ‘हम पांच’ हिंदी मालिका