साधारण सप्टेंबर महिना आला की, काही रिअॅलिटी शोज आपले लक्ष वेधून घेतात. मराठीत बिग बॉस सुरु झाल्यापासून अनेकांना हा शो आवडू लागला आहे. आतापर्यंत या रिअॅलिटी शोचे दोन सीझन चांगलेच गाजले आहेत. पण यंदा कोरोनामुळे सगळ्या मालिकांचे शूटिंग कसेबसे सुरु झाले असताना हा रिअॅलिटी शो यंदाच्या वर्षी काही पाहायला मिळणार नाही असा अंदाज अनेकांना होता. पण आता कलर्स मराठीकडूच बिग बॉसचा एक टीझर शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांना नव्या सीझनची घोषणा झाल्याचे समाधान मिळाले आहे. हिंदीनेही नुकतीच बिग बॉसची घोषणा केली आहे. पण खरंच या कोरोनाच्या काळात नवे सीझन येणार का अशी शंकाही येऊ लागली आहे.
रतन राजपूतचे पुनरागमन, संतोषी मातेच्या अंश रूपात मालिकेत येणार परत
पुन्हा होणार राडा आणि कल्ला
सेलिब्रिटींमध्ये होणारी भांडण आणि एकाच घरात राहून रात्रंदिवस रंगणारे टास्क यामुळे बिग बॉस कायमच चर्चेत असतो. पण आता कुठे मालिकांचे नवे भाग सुरु झाले असताना बिग बॉस ही स्पर्धा कशी काय सुरु होऊ शकेल यावर अनेकांना शंका होती. पण या नव्या टीझरने अनेकांची उत्सुकता वाढवली आहे. आता येणारा नवा सीझन हा कसा धमाकेदार असणार आणि यामध्ये नेमकं कोण असणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली आहे. पण अर्थातच या टीझरमधून फार काही उलगडा होताना दिसत नाही. उलट या टीझरने आणखीनच गोंधळ वाढवला आहे. कारण जर हा सीझन 3 असता तर त्या संदर्भातील हॅशटॅग हे या व्हिडिओखाली देण्यात आलेले नाही. त्यामुळे हा नवा सीझन आहे की, जुनेच एपिसोड दाखवणार आहे असा गोंधळ सध्या सुरु आहे.
नवा सीझन असेल तर कसा असेल
हा नवा सीझन की, जुने एपिसोड असा गोंधळ असला तरीही अनेकांनी याचा नवा सीझन येणार असल्याचे म्हटले आहे. आता हा नवा सीझन असेल तर यामध्ये सोशल डिस्टसिंगचे पालन कसे केले जाईल. याचा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण अनेकदा टास्क करताना एकमेकांच्या जवळ राहणे फारच गरजेचे असते. त्यामुळे घरात कुटुंबाव्यतिरिक्त इतर लोकांसोबत राहताना मास्क आणि ग्लोव्हजचा कसा वापर केला जाईल. शिवाय कशा पद्धतीने याचे नियोजन केले जाईल असा प्रश्न अनेकांना पडला आहे. शिवाय या नव्या सीझनमध्ये कोणते सेलिब्रिटी असतील या नावाचीही जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
नेहा कक्करला पु्न्हा लागले आहेत लग्नाचे वेध, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
मराठीतील दोन्ही सीझन झाले हिट
गेल्या कित्येक वर्षांपासून बिग बॉस हिंदीमध्ये सुरु आहे. हिंदी बिग बॉस कायम वादातित राहिला आहे. यामधील स्पर्धक त्यांची भांडण अनेकांना इतकी स्क्रिप्टेट वाटली की, हिंदी बिग बॉसवर अनेकांना ताशेरेही ओढले. पण मराठीमध्ये बिग बॉस आल्यानंतर मराठी प्रेक्षकांनाही मराठी बिग बॉस आवडले होते. बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनची विजेता मेधा धाडे झाली होती. तर दुसऱ्या सीझनचा विजेता शिव ठाकरे झाला होता. आता या नव्या सीझनचा नवे चेहरे कोण असतील या साठी थोडे थांबावे लागेल.
आता तुम्ही जर बिग बॉस 3 सीझनची प्रतिक्षा करत असाल तर थोडावेळा थांबा म्हणजे यामागचे खरे काय आहे ते कळेल.
Masaba Masaba Review:नीना गुप्ता आणि मसाबाचे खासगी आयुष्य उलगडणारी सीरिज