बिग बॉस 13 वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. सिद्धार्थ डे या शो मधून नुकताच बाहेर पडला. पण आता या रिअॅलिटी शोमध्ये तीन नव्या चेहऱ्यांची एन्ट्री होणार आहे. यामध्ये विकास पाठक, तहसीन पुनावाला, भोजपुरी स्टार खेसारी लाल यांच्या नावाचा समावेश आहे. वाईल्ड कार्ड एन्ट्रीमध्ये यांची नावे समोर आली आहेत. सिद्धार्थ डे घराच्या बाहेर गेल्यानंतर आता या घरात ‘कांटा लगा’ फेम अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. तिच्या येण्याने तिच्या गाण्याच्या अनेक आठवणी समोर आल्या आहेत.
अमिताभ बच्चन यांच्या #Diwalipartyला सेलिब्रिटींची मांदियाळी
कोण आहे ही ‘कांटा लगा’ गर्ल
शेफाली झरीवाला असे या अभिनेत्रीचे नाव असून तिची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. बिग बॉस 13 च्या घरात आधीच हाय वोल्टेज ड्रामा सुरु आहे. त्यात वेगवेगळे ट्विस्ट दिवसेंदिवस येत आहे. त्यातच होणाऱ्या एविक्शनमुळे घरी तणावाचे वातावरण आहे. पण आता शेफालीच्या एन्ट्रीमुळे आता घरात नवा काय ट्विस्ट येईल ते देखील पाहावे लागणार आहे.
सलमानने करुन दिली ओळख
यंदा बिग बॉस 13 खास आहे कारण याचे नियम इतर सीझनपेक्षा फारच वेगळे आहेत. चारच आठवड्यात यावेळी बिग बॉसचा निकाल लागणार आहे. गा निकाल कसा लागणार असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असताना प्रत्येक आठवड्याला दोन जण या घरातून बाहेर पडत आहेत. आतापर्यंत या घरातून 6 जण बाहेर पडली आहेत पण आता या घरात 3 नवीन जणांची एन्ट्री होणार आहे.
शेफालीवर झाली होती टीका
आता घरात शेफाली झरीवाला जाणार म्हटल्यावर तिच्याबद्दल जाणून घेणेही तितकेच आवश्यक आहे. 90 च्या दशकात ज्यावेळी रिमिक्स गाण्यांची क्रेझ होती. त्यावेळी शेफालीन केलेला ‘काटा लगा’ या गाण्यावर डान्स केला होता. त्यावेळी तिच्या गाण्यावर तिच्या डान्सवर प्रचंड टीका झाली होती.तिने केलेला डान्स अश्लील असल्याचे त्यावेळी म्हटले गेले होते. त्यानंतर शेफाली एक ते दोन गाण्यांमध्ये दिसली. अनेक रिअॅलिटी शोजमध्ये ती आतापर्यंत दिसली आहे. याशिवाय तिने चित्रपटांमध्येही काम केले आहे.
कॉपी’ सिनेमाचा दिमाखदार ट्रेलर लाँच सोहळा
बिग बॉसमुळे मिळेल नवी ओळख
आता फारशा प्रसिद्धीत नसलेल्या शेफालीला बिग बॉसच्या घरात जाऊन प्रसिद्धी तर मिळेलच. पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे तिला या नव्या संधीमुळे नवीन ओळख मिळण्यास नक्कीच मदत होईल.
असे बदलले शेफालीचे आयुष्य
‘काटा लगा’ या म्युझिक व्हिडिओसाठी शेफालीची निवड कशी झाली हे तुम्हाला माहीत आहे का? तर वाचा एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या शेफालीचे कॉलेज आयुष्य चांगले सुरु होते. पण म्युझिक अल्बमच्या दिग्दर्शकाने शेफालीला पाहिले आणि तिला या गाण्यात काम करशील का अशी ऑफर दिली. पैशांचा विचार करुन तिने या गाण्यात काम करायला होकार दिला. इंजिनीअरींग पूर्ण करुन एमबीए करण्याची शेफालीची इच्छा होती. पण या एक व्हिडिओनंतर तिचे आयुष्य बदलून गेले.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.