काजोल आणि शाहरूख खानची जोडीही बॉलीवूडमधील बेस्ट ऑनस्क्रीन जोडी आहे. या दोघांनीही आतापर्यंत अनेक चित्रपटात एकत्र काम केलं असून प्रेक्षकांचं मन जिकलं आहे. या दोघांचीही ऑनस्क्रीन केमिस्ट्री त्यांच्या फॅन्सना मोठ्या पडद्यावर पाहायला आवडते. रिअल लाईफमध्येही त्यांची मैत्री खूप चांगली आहे.
काजोल आणि शाहरूखचं लग्न
नुकतंच काजोलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या फॅन्ससोबत क्वेश्चन आणि आन्सर सेशन ठेवलं होतं आणि तिने फॅन्सच्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्याचं प्रॉमिस केलं होतं. प्रोमिस केल्याप्रमाणे काजोलने बिनधास्त उत्तरही दिली काजोलच्या एका फॅनने विचारलं की, जर ती अजय देवगणला भेटली नसती तर तिने शाहरूखशी लग्न केलं असतं का? या प्रश्नावर काजोलने उत्तर दिलं की, त्याने प्रपोज तर करायला हवं ना. यानंतर दुसरा प्रश्न असा विचारण्यात आला की, ती शाहरूख खानसोबत पुन्हा काम कधी करणार. यावरही काजोलने उत्तर दिलं की, शाहरूखला विचारा.
शाहरूख-काजोलची जोडी
बाजीगर, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, माई नेम इज खान, आणि दिलवाले सारख्या अनेक सुपरहिट आणि हिट चित्रपट दिले आहेत. आजही त्यांचा एकत्र चित्रपट यावा असं फॅन्सना वाटतं. शाहरूख खान आणि काजोलने पहिल्यांदा बाजीगर चित्रपटात काम केलं होतं. ज्यामध्ये शाहरूखने अँटी हिरोची भूमिका केली होती. या दोघांनी ऑल टाईम फेव्हरेट असलेल्या दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटातही काम केलं. शाहरूख आणि काजोलचा शेवटचा चित्रपट दिलवाले होता. ज्याचं दिग्दर्शन रोहित शेट्टीने केलं होतं.
काजोलचा पहिला क्रश
काजोलच्या एका फॅनने हेही विचारलं की, तिचा पहिला क्रश कोण होता? यावरही काजोलने मस्त उत्तर दिलं की, मी माझ्या पहिल्या क्रशशीचं लग्न केलं. या सेशनमध्ये काजोलला अजयचा आवडता सिनेमा कोणता असं विचारल्यावर तिने जख्म हा चित्रपट असल्याचं सांगितलं.
तानाजीमध्ये अजय-काजोलची जोडी
वर्कफ्रंटबाबत बोलायचं झाल्यास अजय देवगण निर्मित ‘तानाजी: अनसंग वॉरियर’ काजोलही झळकणार आहे. या चित्रपटात ती अजय देवगण म्हणजेच तानाजीच्या म्हणजेच सावित्रीबाई मालुसरेंच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात व्हिलनच्या भूमिकेत सैफ अली खान असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शरद केळकर दिसणार आहे. हा चित्रपट नवीन वर्षात 10 जानेवारीला रिलीज होणार आहे. याशिवाय काजोल त्रिभंगा नावाच्या नेटफ्लिक्स ओरिजिनलमध्ये मराठी अभिनेता वैभव तत्त्ववादीसोबत दिसणार आहे. याचं दिग्दर्शन रेणुका शहाणे करत असून निर्मिती अजय देवगणची आहे.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
हेही वाचा –
काजोल झाली लेखिका, श्रीदेवीच्या बायोग्राफीसाठी लिहिली प्रस्तावना