ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
करिना कपूर आणि सैफ अली खानची ‘लव्हस्टोरी’

करिना कपूर आणि सैफ अली खानची ‘लव्हस्टोरी’

‘सैफिना’च्या लग्नाला आता जवळ जवळ सात वर्षे पूर्ण झाली आहेत. आज करिना कपूर आणि सैफ अली खान फिल्म इंडस्ट्रीमधील एक हॉट कपल आहे. या दोघांच्या अफेअर, लग्नाच्या चर्चा फारच रंगल्या होत्या. कारण करिनाने तिच्या करिअरच्या टॉपवर असताना दोन मुलं असलेल्या सैफशी लग्न करण्याचा निर्णय घेतला  होता. करिना आणि सैफ अली खानमधलं वयातलं अंतरही फार होतं. सहाजिकच त्यामुळे या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अभिनेत्री करिना कपूर तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत कोणतीच गोष्ट कधीच लपवत नाही. तिच्या बिनधास्त स्वभावामुळे ती मीडियामध्ये नेहमीच चर्चेत असते. तिचं पहिलं प्रेमप्रकरण असो अथवा तिचं करिअर, सैफसोबत लग्नाचा निर्णय असो अथवा तैमुरचं संगोपन ती सर्वच गोष्टी उघडपणे जाहीर करते. नुकतंच करिनाने तिच्या एका इंन्स्टा अकाऊंटवर तिच्या आणि सैफच्या नात्याबद्दल काही गोष्टींचा खुलासा केला आहे.

Kareena Kapoor on her Love Live With Saif 3

करिनाचं करिअर

करिनाला अभिनयक्षेत्रात येण्याची प्रेरणा तिची बहीण करिष्मा कपूरकडून मिळाली. करिष्मा कपूरने जेव्हा अभिनय क्षेत्रात प्रवेश केला तेव्हा करिना शिक्षण घेत होती. करिष्माला पाहून करिनानेदेखील याच क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे करिनाच्या करिअरमध्ये करिष्माचा फार मोठा हात आहे. मात्र करिअरच्या एका टप्प्यावर पोहचल्यावर अचानक असं काही घडलं की करिनाला तिचं करिअर संपलंय असं वाटू लागलं. जवळजवळ एक वर्ष तिच्याकडे कोणतंच काम नव्हतं. त्यावेळेस करिनाने स्वतःला रिइन्वेन्ट करण्याचा निर्णय घेतला. ‘टशन’ चित्रपटात झिरो फिगर करून तिने पुन्हा तिच्या करिअरमध्ये एक उंची गाठली. बाळंतपणानंतरही करिनाने तिचं करिअर अगदी छान पद्धतीने सुरू ठेवलं. ‘विरे दी वेडिंग’मधील तिच्या कामाची प्रंशसा झाली. लवकरच ती अक्षय कुमारसोबत ‘गुडन्यूज’मध्ये दिसणार आहे. शिवाय ‘दबंग 3’ मध्ये करिनाचे एक आयटम सॉंगदेखील असणार आहे.

Kareena Kapoor on her Love Live With Saif 1

ADVERTISEMENT

असे पडले बेबो आणि सैफ प्रेमात

करिनाच्या मते जीवनात वाईट काळ असताना तिला अनेक चांगल्या लोकांची साथ मिळाली आहे. करिअरमध्ये कठीण काळ सुरू असताना तिच्या जीवनात सैफ अली खानची एन्ट्री झाली. टशन चित्रपटाच्या दरम्यान सैफ आणि करिना एकमेकांच्या जवळ आले. त्यावेळी सैफ अली खान तिच्यापेक्षा दहा वर्षाने मोठा होता शिवाय त्याला दोन मुलंही होती. मात्र करिना आणि सैफ एकमेकांच्या प्रेमात इतके बुडाले होते की त्यांनी लिव्ह इन मध्ये राहण्याचा निर्णय घेतला. डेट करता करता एक दिवस असा आला की सैफने करिनाला सांगितलं की “मी पंचवीस वर्षांचा तरूण नाही की तुला ड्रॉप करण्यासाठी रोज रात्री तुझ्या घरी येईन.” त्यानंतर सैफने बबीताला म्हणजेच करिनाच्या आईला याबाबत सांगितलं आणि त्या दोघांनी लग्न केलं. शिवाय आता तैमूरच्या येण्याने त्या दोघांचं जीवन आनंदीच झालं आहे. याबाबत खुद्द करिना कपूरनेच तिच्या एका इन्स्टा अकाऊंटवरून खुलासा केला आहे.

कतरिना कैफ साकारणार ‘पी.टी. उषा’

अंकिता लोखंडेने केलं आपल्या बॉयफ्रेंडला किस, व्हिडिओ व्हायरल

पाहा कोण दिसणार दयाबेनच्या भूमिकेत

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

25 Apr 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT