प्रियांका चोप्रा जोनस सध्या एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत असते. तिने काही केलं किंवा ती काही बोलली तर त्याची लगेचच हेडलाईन केली जाते. पण या वेळी होणारी चर्चा थोडी वेगळी आहे कारण ही चर्चा देशाशी निगडीत आहे. युनिसेफसाठी काम करणाऱ्या देसी गर्लला पाकिस्तानी मुलीने असा काय टोमणा मारला की, तिने या पाकिस्तानी मुलीला सडेतोड उत्तर दिले होते. एक विधायक कार्य करत असताना विदेसी गर्ल झालेल्या प्रियांकाला देश किती महत्वाचा आहे ते तिने या उत्तरात म्हटले होते. या घटनेला काही काळ लोटल्यानंतर आता पाकिस्तानने प्रियांकाला युनिसेफचा चेहरा म्हणून काढून टाकण्याची मागणी केली आहे. पण तिला सबंध बॉलीवूडचा पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे तिने हे काम करत राहावे असेच देशालाही वाटत आहे.
Happy vadapav day :मुंबईची शान असलेला वडापाव खायचाय, तर ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या
नेमकं प्रकरण काय?
बालाकोटच्या हल्ल्यानंतर देशाने दिलेल्या चोख प्रत्युत्तरानंतर एका कार्यक्रमादरम्यान प्रियांकाला एका पाकिस्तानी मुलीने या हल्ल्यासंदर्भात तिला म्हणाली, पाकिस्तानविरोधात न्युक्लिअर हल्ला करायला तू चालना देत आहेस. हे म्हणण्यामागे प्रियांकाचे एक ट्विट होते. या हल्ल्यानंतर तिने jai hind #IndianArmedForces असं ट्विट केलं होतं. त्यावरुनच तिला हा प्रश्न या मुलीने विचारला होता. त्यावेळी प्रियांकाने त्या मुलीला पाकिस्तानमध्ये माझ्या बऱ्याच मैत्रिणी असल्याचे सांगितले. मी भारताची असून पाकिस्तानातही माझे चांगले संबंध आहे. मी युद्धाच्या विरोधात आहे. पण मला माझ्या देशाचा अभिमान आहे.
पाकिस्तानचे लक्ष नको तिथे
आता युनिसेफचा Goodwill चेहरा असलेल्या प्रियांकाला त्वरीत काढून टाका अशी मागणी पाकिस्तानच्या मानवाधिकारी मंत्री शिरीन माझरी यांनी केली आहे. युनिसेफला चक्क पत्र लिहीत त्यांनी ही मागणी केली आहे. अशा देशाच्या नागरिकाचा चेहरा चांगल्या कामासाठी नको असे त्यात म्हणण्यात आले आहे. सध्या पाकिस्तानसोबत आपले संबंध तणावाचे झाले आहे. 370 रद्द करत जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतला आहे. शिवाय लेह-लडाखला स्वतंत्र राज्य म्हणून घोषित केले आहे. या सगळ्या गोष्टींचा थेट परिणाम काही अंशी पाकिस्तानवर झाला आहे.
नेटफ्लिक्सवर ‘नया है यह’…आवर्जून पाहावे असे चित्रपट
बॉलीवूडकरांची मिळाली साथ
प्रियांकावर पाकिस्तानची सडकून टीका होत असताना देसी गर्लची बाजू घ्यायला पाकिस्तान उभे ठाकले. मधूर भांडारकर, अली अब्बास, अनुराग कश्यप, कंगना रनौत या सगळ्यांनी तिला पाठिंबा दिला आहे. पाकिस्तानचे असे वागणे म्हणजे एक धक्काच आहे. अशा प्रकारचे विधान आणि वागणे पाकिस्तानी मानवाधिकारी मंत्र्याकडून अजिबात शोभत नाही. प्रियांका जे काम करते ते एक विधायक काम आहे. त्यामुळे यात देशाचा काहीच संबंध येत नाही, असे म्हणत तिला पाठिंबा दिला आहे. जावेद अख्तर यांनी देखील तीव्र प्रतिक्रिया देत प्रियांकाने पाकिस्तानकडे लक्ष देण्यापेक्षा कामाकडेच लक्ष द्यावे असे म्हटले आहे.
वरूण धवन नोव्हेंबरमध्ये करणार डेस्टिनेशन वेडिंग
प्रियांकाने दिली नाही प्रतिक्रिया
प्रियांकाने याबाबत काहीही बोलणे टाळले आहे. तिने ट्विटर किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून प्रतिक्रिया दिली नाही. आता या वर प्रियांका काय बोलेल ते पाहावे लागेल.
प्रियांका परदेसी गर्ल झाली असली तरी सुद्धा तिला देशाचा अभिमान आहे. विधायक काम करणे तिचे काम आहे. त्यामुळे उत्तराला प्रत्युत्तर देणे तिने टाळले तरच उत्तम