परिणीतीआधी श्रद्धा कपूर साकारणार होती सायना, या कारणांमुळे सोडावी लागली संधी

परिणीतीआधी श्रद्धा कपूर साकारणार होती सायना, या  कारणांमुळे सोडावी लागली संधी

सायना नेहवालची बायोपिक सायना लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरनेच सध्या धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला मिळणारा प्रतिसाद पाहता हा चित्रपट बॉक्सऑफिसवर हिट होणार हे नक्की. या चित्रपटात परिणीतीने सायना नेहवालची भूमिका साकारलेली आहे. ट्रेलरमधला  परिणीतीचा सायना लुक नक्कीच जबरदस्त झाला आहे. मात्र हा ट्रेलर पाहून काही लोकांना मात्र यात श्रद्धा कपूरची कमतरता भासत आहे. कारण परिणीतीआधी श्रद्धा कपूरला सायनाची भूमिका ऑफर करण्यात आली होती. चित्रपटाचं शूटिंगदेखील सुरू झालं होतं. मात्र असं काही घडलं की यातून श्रद्धा कपूरचा पत्ता कट झाला आणि तिच्याजागी परिणीति चोप्राला ही भूमिका मिळाली. 

काय कारण होतं की श्रद्धाला सोडावा लागला सायना चित्रपट

सायना चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल गुप्ते यांच्या मते श्रद्धा सायनाच्या भूमिकेसाठी अगदी परफेक्ट होती. श्रद्धानेही मोठ्या पडद्यावर सायना साकारण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. या चित्रपटाचे काम पाच वर्ष पुर्वीपासून सुरू करण्यात आलेलं आहे. जेव्हा श्रद्धाला या चित्रपटासाठी कास्ट करण्यात आलं होतं. तेव्हा श्रद्धाने सायना साकारण्यासाठी लागणारी सर्व तयारी केली होती. प्रचंड मेहनत केल्यामुळे ती एका खेळाडूप्रमाणे फिट दिसू लागली होती. सायनासाठी ती दिवसरात्र प्रॅक्टिस करत होती आणि तिचा अभिनयही छान झाला होता. तिच्यासोबत सायना चित्रपटाचे काही सीन्सही शूट करण्यात आले होते. मात्र अचानक श्रद्धाला डेंग्यू झाला. ज्यामुळे तिच्या अंगातील शक्ती कमी झाली. ती खूपच अशक्त दिसू लागली. जवळजवळ एक महिना ती अंथरूणावरून उठली नाही. ती पुन्हा बरी होऊन सेटवर येईल अशी सर्वांना आशा वाटत होती. श्रद्धानेही सर्वांना ती दहा दिवसांमध्ये पुन्हा प्रक्टिस सुरू करणार असं प्रॉमिस केलं होतं. मात्र तिच्या शरीराने तिला हवी तशी साथ दिली नाही. पुढे शूटिंग जास्त वेळ लांबणीवर टाकता आलं नाही आणि श्रद्धाच्या जागी परिणीतिला कास्ट करावं लागलं.

श्रद्धाने स्वतःच सोडली ही भूमिका

सायना चित्रपटातून श्रद्धा आऊट होण्यामागे कोणतेही मतभेद नसून तिचं बिघडलेलं आरोग्य आहे हे लोकांनी समजून घ्यायला हवं. कारण हा सायना हा काही एखादा ड्रामा चित्रपट नव्हता तो एक स्पोर्ट्स चित्रपट असल्यामुळे त्यातील मुख्य अभिनेत्रीने फिट असणं चित्रपटाची गरज होती.  या चित्रपटात काम करण्यासाठी श्रद्धाला कमीत कमी बारा ते चौदा तास सातत्याने काम करणार लागणार होतं. सतत प्रॅक्टिस करावी लागणार होती. शिवाय ती बरी झाल्यावर तिच्य छिछोरे चित्रपटाच्या शूटिंगचं शेड्यूल फिक्स होतं. दोन्ही चित्रपटांसाठी ती एकाच वेळी वेळ देणं कठीणच नाही तर अशक्य होतं. तो चित्रपट पूर्ण होताच तिला स्ट्रीट डान्सरची तयारी करायची होती. ज्यामुळे श्रद्धाला सायनामधून काढता पाय घ्यावा लागला.

सायनाचा ट्रेलर पाहिला का

सायनाचा ट्रेलर सध्या चाहत्यांमध्ये चित्रपटाविषयी उत्सुकता वाढवत आहे. यात सुरूवातीलाच सायनाला बॅडमिंटन स्टार होण्याचं स्वप्न दाखवण्याऱ्या तिच्या आईचे हरयाणवी संवाद आहे. शिवाय पुढे हे स्वप्न साकारण्यासाठी सायनाला करावा लागणाऱ्या संघर्षाच झलकही यात पाहायला मिळते. सायना साकारण्यासाठी परिणीतीला खूप आव्हानांना सामोरं जावं लागलं असणार. कारण मुळातच परिणीती बबली स्वभावाची आहे पण पडद्यावर साधीभोळी सायना साकारताना तिच्याविषयी खूप अभ्यास तिला करावा लागला असेल. परिणीतीच्या मते, सायना सारख्या व्यक्तिमत्त्वाला पडद्यावर साकारणं ही एक खूप मोठी जबाबदारी आहे. कारण ती एक लिंजेड आहे त्यामुळे आता लोकांच्या काय प्रतिक्रिया असतील ते पाहणं उत्सुकता वाढवणारं आहे.