ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
सलमान खानचा ‘भारत’ ठरला सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट

सलमान खानचा ‘भारत’ ठरला सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट

सलमान खानच्या नुकत्याच रिलीज झालेल्या फिल्म ‘भारत’ला तिकीट खिडकीवर चांगला प्रतिसाद मिळाला. सलमान आणि कतरिनाच्या केमिस्ट्रीने सजलेला हा चित्रपट प्रेक्षकांनी पसंत केला. स्कोर ट्रेंड्स इंडियानुसार ही फिल्म यंदाच्या सहामाहीतली सर्वाधिक लोकप्रिय फिल्म ठरलीयं. अमेरिकेन स्कोर ट्रेंड्स इंडिया या मीडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारितही लिस्ट जाहीर केली आहे. 

भाईजानचा ‘भारत’ अव्वल

स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या आकडेवारीनुसार, ‘भारत’ चित्रपटाने व्हायरल न्यूज, न्यूजप्रिंट आणि डिजीटल श्रेणींमध्ये सर्वाधिक म्हणजेच 100 गुण मिळाले आहेत. ज्यामध्ये सोशल प्लेटफॉर्म आणि वेबसाईट्सही सामील आहेत. भारतची कहाणी आणि गाणी दोन्ही प्रेक्षकांना फारच आवडली असून भाईजानच्या आगामी ‘इन्शाअल्लाह’ या चित्रपटांबद्दलही लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.  

‘कलंक’ही लोकप्रिय

‘भारत’ सिनेमानंतर स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्ट्सवर दुस-या स्थानावर करण जोहरचा मल्टीस्टारर चित्रपट ‘कलंक’ आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर काही खास करामत करता आली नव्हती. पण आश्चर्यकारकरित्या 22.78 गुणांसह ही फिल्म चार्टमध्ये दुस-या क्रमांकावर आहे. 42.6 गुणांसह कलंकने डिजीटल (सोशल प्लेटफॉर्म आणि वेबसाईट)मध्ये जास्त स्कोर केला आहे. तर न्यूज प्रिंटमध्ये 22.56 आणि व्हायरल न्यूज श्रेणीत 10.09 गुण मिळवले आहेत.

ADVERTISEMENT

‘उरी’ची आकडेवारीत सर्जिकल स्टाईक

विकी कौशलची ब्लॉकबस्टर फिल्म ‘उरी – द सर्जिकल स्ट्राईक’ स्कोर ट्रेंड्सच्या चार्टवर तिस-या क्रमांकावर आहे. सर्जिकल स्ट्राईकवर असलेल्या या चित्रपटाने सर्व कॅटेगरीत एकत्रितपणे 22.35 गुण मिळवले आहेत. उरीने 40.30 गुणांसह डिजीटल आणि 28.66 गुणांसह न्यूज प्रिंटमध्ये चांगला स्कोर केला आहे. उरीमुळे विकी कौशलच्या करिअरला आता चांगलाच वेग आला आहे. उरीनंतर विकी कौशल आता उधमसिंग आणि सॅम मनेक शॉ या चित्रपटातही दिसणार आहे. तसंच तो करण जोहरच्या भूत या चित्रपटातही हटके भूमिकेत दिसणार आहे. 

अमिताभ यांचा ‘बदला’ चौथ्या क्रमांकावर

महानायक अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नूच्या दमदार अभिनयाने सजलेला चित्रपट ‘बदला’ सर्व श्रेणींमध्ये 17.53 गुणांसह चार्टवर चौथ्या स्थानी आहे. तर अक्षय कुमारचा ‘केसरी’ एकुण 16.18 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. या रेटींगबाबत स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल यांनी सांगितलं की, “सलमान खान बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीचा ‘अनडिस्प्युटेड सुपरस्टार’ आहे आणि त्याचे चित्रपट चार्ट्सवर नेहमीच वर्चस्व गाजवताना दिसतात. मात्र आश्चर्यजनकरित्या ‘मणिकर्णिका’सारखा चित्रपट सहाव्या क्रमांकावर, ‘ठाकरे’ सातव्या क्रमांकावर, ‘गली बॉय’ आठव्या क्रमांकावर आणि ‘टोटल धमाल’ नवव्या क्रमांकावर आहे.“

तर यंदाच्या दुस-या सहामाहीची सुरूवात ‘कबीर सिंह’ या सिनेमाने उत्तम करून दिलीयं. स्कोर ट्रेंड्सच्या चार्टवर सध्या ही फिल्म दहाव्या क्रमांकावर आहे आणि लवकरच वर्षाच्या रँकिंगमध्ये ही फिल्म बाकी चित्रपटांना मागे टाकत पुढे जाईल,असं अनुमान आहे. “

हे रेटींग 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करून ठरवलं जातं. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजीटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक अल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते आणि बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग्स ठरवता येतात.

ADVERTISEMENT

हेही वाचा –

शाहीदच्या ‘कबीर सिंह’ने दबंग खानलाही टाकलं मागे

सलमानच्या फॅनने ‘भारत’साठी बुक केलं संपूर्ण थिएटर

Saaho मध्ये करणार का सलमान खान कॅमिओ

ADVERTISEMENT
08 Jul 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT