अक्षयकुमारच्या फायर स्टंटनंतर ट्विंकलची जीवे मारण्याची धमकी

अक्षयकुमारच्या फायर स्टंटनंतर ट्विंकलची जीवे मारण्याची धमकी

अक्षय कुमार नुकताच एका कॉन्सर्टमध्ये गेला होता. या ठिकाणी अक्षयने पुन्हा  एकदा आपला वेगळा अंदाज दाखवून दिला. या कॉन्सर्टमध्ये अक्षयने फायर स्टंट केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अक्षय आगीच्या लोळामध्ये रँप वॉक करताना दिसत आहे. अक्षयकुमारला असं बघून सगळेच हैराण झाले आहेत. अक्षयने हे स्टंट स्वतःच्या अधिकृत अकाऊंटवरून शेअर केले आहेत. त्यानंतर मात्र त्याची पत्नी ट्विंकल खन्नाने भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. ट्विंकलने हा स्टंट पाहिल्यानंतर अक्षयला सोशल मीडियावरच रागाने जीवे मारण्याची धमकी दिली. पण आपल्या पत्नीचा राग शांत करण्यासाठी लगेचच अक्षयने तिला ट्विटरवरच उत्तर दिलं आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

And we’re off to a fiery start with @primevideoIn’s THE END (working title)🔥🔥🔥 @abundantiaent


A post shared by Akshay Kumar (@akshaykumar) on
ट्विंकलने जाहीर केला राग
ट्विंकलने ट्विटरवरच आपला पती अक्षय याच्यावर राग जाहीर केला. तिने म्हटलं, ‘बकवास! हे बघून मला कळलं की तू स्वतःला असं आग लावून घेतली आहेस. आता घरी ये...पुन्हा असं केलंस तर मीच मारून टाकेन तुला. देवा प्लीज माझी मदत कर’. वास्तविक अक्षयला असं बघितल्यावर त्याच्या चाहत्यांचाही श्वास थांबला होता असं म्हणावं लागेल. त्यामुळे ट्विंकलने नाराज होणं तर योग्यच आहे. पण हे असं असलं तरीही ट्विंकलने हे मस्करीमध्ये म्हटलं आहे. वास्तविक अमेझॉन प्राईम व्हिडिओने सुपरस्टार अक्षय कुमारला आपल्या पुढील वेबसिरीज ‘द एंड’साठी आपला मुख्य अभिनेता म्हणून घोषित केलं आहे. अॅक्शन थ्रिलर असणाऱ्या ‘द एंड’या वेबसिरीजमधून वेबसिरीजमध्ये पदार्पण करत आहे.


आगामी ‘सूर्यवंशी’चा फर्स्ट लुक नुकताच प्रदर्शितआगामी ‘सूर्यवंशी’चा फर्स्ट लुक नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्यांदाच अक्षयकुमार आणि रोहित शेट्टी एकत्र काम करत आहेत. या चित्रपटातही अक्षयकुमार प्रेक्षकांना आणि चाहत्यांना अॅक्शनपॅक्ड स्वरूपातच दिसणार आहे. या चित्रपटाच्या पोस्टरनंतर अनेक कमेंट्स आणि लाईक्स अक्षयकुमारला मिळाल्या असून या चित्रपटासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक असल्याचं दिसत आहे. याशिवाय या महिन्यामध्ये ‘केसरी’ हा अक्षयचा महत्त्वपूर्ण चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचं ट्रेलर पाहूनदेखील प्रेक्षकांनी अक्षयला चांगलाच प्रतिसाद दिला आहे.


अक्षय कुमारचं 'बिझी' शेड्युल


अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेल्या धर्मा प्रॉडक्शनचा ‘केसरी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे अक्षय या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. केसरीमध्ये तो सीख योद्धाची नेहमीपेक्षा वेगळी आणि ऐतिहासिक भूमिका साकारत आहे. शिवाय त्यानंतर तो करिनासोबत ‘गुडन्यूज’च्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे. या चित्रपटाममध्ये अक्षय आणि करिनासोबतच दिलजीत दोसांझ आणि कियारा अडवाणीदेखील दिसणार आहेत. मे मध्ये अक्षयचा ‘हाऊसफुल 4 हा चित्रपट येत आहे. शिवाय ‘मिशन मंगल’ देखील ऑगस्ट - सप्टेंबरदरम्यान प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.या वर्षअखेरीस तो हेराफेरी 3 च्या शूटिंगला सुरूवात करणार अशी चर्चा आहे. या  चित्रपटात अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनिल शेट्टी पुन्हा एकदा एकत्र दिसणार असल्याने चाहते खूपच खूश आहेत. अक्की एकाच वेळी अनेक चित्रपटात काम करत असल्यामुळे तो सध्या शूटिंगमध्ये बिझी आहे हे मात्र नक्की.


फोटो सौजन्य - Instagram, Tweeter


हेदेखील वाचा -


अक्षय कुमारचा 'सुर्यवंशी'मधील फर्स्ट लुक रिलीज


जयडीची नवी सुरुवात, बाबांच्या अनोख्या राजकन्येचा प्रवास होतोय सुरू


अमिताभ बच्चन यांनी विकली त्यांची आलिशान कार