Valentine Day : जर विकी कौशल तुमचा बॉयफ्रेंड असता तर...

Valentine Day : जर विकी कौशल तुमचा बॉयफ्रेंड असता तर...

आयुष्य किती विचित्र आहे ना. काही जणांना अगदी अनपेक्षित प्रेम मिळतं. आश्चर्य म्हणजे मलाही ते मिळालं, एका tall, dark आणि handsome मुलाच्या डोळ्यात. तो मुलगा म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही... आपला आवडता आणि बॉलीवूडचा न्यू हार्टथ्रोब विकी कौशल. विकीने साकारलेला ‘राजी’मधला इक्बाल सय्यद पाहताच मी त्याच्या प्रेमात पडले होते. तो चित्रपट मी चक्क चारवेळा थिएटरमध्ये जाऊन पाहिला... फक्त विकीसाठी. ‘राजी’वरच न थांबता मी विकीचे तोपर्यंत आलेले सर्व चित्रपट अगदी त्याचे ‘पडेल’ चित्रपटही झपाटल्यासारखे एका पाठोपाठ एक पाहिले. ‘मसान’ जेव्हा पहिल्यांदा पाहिला होता, तेव्हा माहीत नाही का मी त्याला नोटीसच केलं नव्हतं. पण यावेळी ‘मसान’ पाहताना फक्त त्याला पाहतच राहिले. आयसिंग ऑन द टॉप म्हणजे नुकताच त्याचा आलेला चित्रपट ‘उरी- द सर्जिकल स्ट्राइक’. हाही फर्स्ट डे फर्स्ट शो जाऊन बघितला आणि बॉस.. आपल्या मनातलं त्याचं स्थान एकदम ध्रुव ताऱ्यासारखं अढळ झालं. हे प्रेम फक्त त्याच्यासाठीच नाहीतर अगदी त्याची कथित गर्लफ्रेंड हरलीन सेठीसाठीही आहे. हे प्रेम शाहरूखच्या ‘डर’वालं नाही. तर शाहरूखच्या ‘कल हो ना हो’ टाईप्स आहे. असो तर एका दुपारी जेव्हा मी त्याचं स्वप्न पाहत होते, तेव्हा मला विकी एक बॉयफ्रेंड मटेरिअल म्हणून कसा परफेक्ट आहे, याची कारण समोर आली. तुम्हाला ही आवडतो का विकी कौशल. मग नक्की जाणून घ्या की, विकी कौशल एक परफेक्ट बॉयफ्रेंड कसा आहे ते.
 

 

 


View this post on Instagram


 

 

IAM#WHATSNEXT . GraziaCoolList2018


A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on
1. जुल्मी ते डोळे गडे... विकीचे डोळे. त्याच्या डोळ्यात पाहिलं ना की, पाहत राहावंस वाटतं. तो एवढा उंच असला तरी त्याच्या डोळ्यात बघणं फारसं कठीण जात नाही.

2. तो नेहमीच प्रत्येक भूमिका जगतो. फक्त अभिनय करता त्याची प्रत्येक भूमिकाही तो समरसून जगतो. त्याने एका मुलाखतीत ही सांगितलं होतं की, भूमिकेच्या लांबीपेक्षा त्याच्यासाठी भूमिका किती महत्त्वाची आहे हे तो बघतो. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे संजू आणि मनमर्झिया. जर स्वतःच्या भूमिकेबद्दल तो एवढा डेडीकेटेड असेल तर खऱ्या आयुष्यातील नात्याविषयी काय म्हणावं.
 

 

 


View this post on Instagram


 

 

#paradise


A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on
3. आईचा लाडका विकी कौशल. किती गोड !!! कारण आईचा प्रत्येक लाडका मुलगा हा चांगला बॉयफ्रेंडही नक्कीच होऊ शकतो.
 

 

 


View this post on Instagram


 

 

इस्माईल प्लीज...


A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on
4. एका साधारण कुटुंबातून आलेल्या विकीने स्वःताचे करिअर हे मेहनत आणि हुशारीने बनवलं आहे. त्यामुळे अशा माणसाच्या डोक्यात कधीच यशाची नशा जात नाही. मग बघा असा बॉयफ्रेंड असेल तर तो गर्लफ्रेंडची किती काळजी घेईल नाही का?
 

 

 


View this post on Instagram


 

 

🤗🙌🏽


A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on
5. 'राजी'मधील इक्बालची भूमिका घेताना त्याच्या मनात थोडी शंका आली नसेल का? कारण खरंतर हा चित्रपट पूर्णपणे आलियाचा होता. म्हणजे बघा त्याला दुसऱ्याच्या किंवा एका हिरोईनच्या यशाचं काही वावगं वाटलं नाही. तो त्याच्या होणाऱ्या गर्लफ्रेंड किंवा बायकोच्या यशाचं किती कौतुक करेल आणि स्वतःच्या यशाप्रमाणे सेलिब्रेटही करेल.
 

 

 


View this post on Instagram


 

 

✌🏽 @pauldavidmartinphotography @stylingbyvictor @playmakeovers


A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on
6. विकी हा पक्का खवय्या आहे आणि त्याला आलू पराठे आणि पाणीपुरी भयंकर आवडते. मग विचार करा डेटवर गेल्यावर किती मजा येईल ना.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Mood: Candid (not) Pose: ‘Dolaa Re’ Shot by: @abheetgidwani For: @mansworldindia


A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on
7. आता चांगला अभिनेता आहे म्हंटल्यावर कोणत्याही रोलमध्ये तो फिट बसणारच ना. मग बॉयफ्रेंडचा रोल तर किती चांगला प्ले करेल.
 

 

 


View this post on Instagram


 

 

🏊🏽‍♂️🌤


A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on
मग तुमचाही व्हॅलेंटाईनचा प्लॅन झाला नसेल तर अपना विकी आहे ना. विकीचे सर्व चित्रपट मस्त पॉपकॉर्नसोबत एन्जॉय करा.


हेही वाचा -


राकेश शर्मा बायोपिकसाठी लागू शकते विकी कौशलची वर्णी