किसीके सामने झुकने का नही….हा आलियाचा म्हणजे गंगुबाईचा डायलॉग सगळ्यांना आवडला होता. या डायलॉगबरोबरच आलियाही सगळ्यांना आवडली होती. एखादा चित्रपट आल्यानंतर त्यानिमित्ताने अनेक ट्रेंड येतात. आता गंगुबाई काठियावाडी ही कामाठीपुरातील खरी खुरी डॉन कम सगळे काही तिचा फॅशनसेन्स त्यावेळी कसा होता हे माहीत नाही. पण आलियाला पाहिल्यानंतर तिची फॅशन नक्की फॉलो करावी अशी आहे. विशेषत: गंगुबाईचे ब्लाऊज आणि साडी. पांढऱ्या रंगाची साडी आणि पांढरे ब्लाऊज अशा कॉम्बिनेशनचा विचार यापूर्वी तुम्ही कधीही केला नसेल तर या ब्लाऊजच्या डिझाईन्स तुम्ही नक्की ट्राय करा.
व्हिनेक प्लंज नेक ब्लाऊज
आलियाचे सगळेच ब्लाऊज तसे सुंदर आहेत. पण त्यातील एक साधासुधा पण तितकाच स्टायलिश वाटेल असा हा ब्लाऊज आहे. कॉटन मटेरिअलमध्ये असलेला हा प्रकार दिसायला खूपच सुंदर दिसतो. ब्लाऊज तसा बघायला गेला तर साधा आहे. कारण याचा सगळा शो हा गळ्यावर आहे. तुम्ही जर छान चिकनचा कपडा घेतला तर तुम्हाला त्या ब्लाऊजचा लांब हाताचा ब्लाऊज शिवता येईल. जर तुम्ही थोडा ट्रान्सफरंट कपडा घेतला तर तुम्ही हाताला अस्तर लावू नका. तिथे क्लिअर ठेवा त्यामुळे तुमच्या ब्लाऊजचा शो अजून जास्त वाढेल.
हार्टनेक ब्लाऊज
आलियाचे ज्यावेळी चित्रपटात इन्ट्रोडक्शन सुरु होते. त्यावेळी आलियाने जो ब्लाऊज घातला आहे तो ब्लाऊजही खूपच सुंदर आहे. पांढऱ्या रंगाचा हा ब्लाऊज असून त्याच्या पुढच्या भागाला हार्टचा आकार देण्यात आला आहे. म्हणजे हा ब्लाऊज आहे तर बोटनेक. पण तरीदेखील त्याला अधिक छान बनवण्यासाठी बरचा भाग पारदर्शक ठेवून त्यातून हार्टशेप दिसेल असा ठेवण्यात आला आहे. हा एक बंद गळ्याच्या ब्लाऊजचा प्रकार आहे जो दिसायला खूपच सुंदर दिसतो. तुम्ही कोणत्याही रंगामध्ये असा ब्लाऊज शिवू शकता. पांढऱ्यासोबत काळ्या रंगामध्ये तुम्ही हा ब्लाऊज शिवला तर तो जास्त चांगला दिसेल.
पानशेप थ्री फोर्थ हाताचा ब्लाऊज
आलिया ज्यावेळी आपल्या आयुष्यातील महत्वाच्या घटना अधोरेखित करत असते. त्यावेळी तिची स्टाईल बदलेली नक्कीच दिसते. तिच्या कोठ्यावर ज्यावेळी रेड पडते त्यावेळी तिने घातलेला एक ब्लाऊजही खूपच जास्त सुंदर दिसतो. हा ब्लाऊज थोडा डीपनेक आहे. या ब्लाऊजची खासियत म्हणजे याचे हात आणि त्याचा गळा. तुम्हाला मोठा गळा आवडत असेल तर तुम्हाला असा ब्लाऊज शिवायला काहीच हरकत नाही. या ब्लाऊजचा गळा पानशेप आहे. त्यामुळे साहजिकच यात क्लिव्हेज लाईन दिसू शकते. याचा मागचा गळा तुम्हाला बंद केला तरी चालू शकतो. कारण तो अधिक चांगला दिसतो.
बंद गळ्याचा चिकनकारी ब्लाऊज
गंगुबाईला चिकनकारीमध्ये जास्तीत जास्त लुक देण्यात आले आहेत. यातलाच एक ब्लाऊज म्हणजे पूर्ण बंद गळ्यचा ब्लाऊज. आपल्याला असे ब्लाऊज कसे दिसतील असा विचार पडला असेल तर एकदा आलियाला बघा. आलियाने घातलेला हा ब्लाऊज दिसायला एकदम फॅन्सी दिसतो. चिकनकारी मटेरिअलमध्ये तुम्ही राऊंडनेक असा पूर्वणबंद गळ्याचा ब्लाऊज शिवू शकता. याला पुढे तुम्ही पूर्ण बटणं दिली तर तो ब्लाऊज अधिक चांगला दिसतो. या अशा ब्लाऊजवर तुम्हाला मस्त हातावर सोडून साडी घेता येईल.
आता आलियाचे हे स्टायलिश ब्लाऊज तुम्ही नक्की निवडू शकता.