कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) या दोन्ही बॉलीवूड अभिनेत्यांनी नुकतीच राजस्थानमधील जोधपूर येथे लग्नगाठ बांधली. मीडिया आणि सर्व लोकांपासून लपून या दोघांनी डेस्टिनेशन वेडिंग (Destination Wedding) केले. लग्न झाल्यानंतर स्वतः कतरिना आणि विकीने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले. मात्र सर्वात जास्त सध्या चर्चा आहे ती म्हणजे कतरिनाच्या अंगठी आणि मंगळसूत्राची. कोणत्याही महिलेसाठी मंगळसूत्र आणि साखरपुड्याची अंगठी हा नक्कीच जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळेच कतरिनाच्या मंगळसूत्र आणि अंगठीचीही चर्चा तिच्या लग्नाइतकीच रंगली आहे. विशेषतः महिलांमध्ये तिच्या या दागिन्यांची नक्की किंमत किती असेल याचा अंदाज लावला जात आहे. मात्र याची किंमत ऐकल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
अधिक वाचा – Year Ender: 2021 मध्ये गाजली या सेलिब्रिटींची लग्ने
कतरिनाची सफायर डायमंड रिंग (Sapphire Diamond Ring)
आतापर्यंत अनेक अभिनेत्रींनी लग्नामध्ये लाखो आणि करोडो रूपयांच्या अंगठी घातल्या होत्या. मात्र कतरिनाची साखरपुड्याची अंगठी मात्र यापेक्षा नक्कीच वेगळी असल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. कतरिनाची साखरपुड्याची अंगठी ही हिऱ्याची असून त्यामध्ये एक नीलम खडा बसविण्यात आला आहे. टिफनी अँड कंपनी (Tiffany and Company) ची ही अंगठी असल्याचे हे सांगण्यात येत आहे. कतरिना कैफच्या या अंगठीची किंमत ही साधारण 7,40,735 रूपये इतकी आहे. नीलम हा खडा अत्यंत महाग असतो. त्यातही तो हिऱ्याच्या अंगठीमध्ये बसविण्यात आल्यामुळे या अंगठीची किंमत इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे. असाच नीलमचा खडा हा प्रिन्सेस डायनाच्या हातातदेखील होता असेही म्हटले जाते. मात्र आपल्याकडे सहसा ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊनच या खड्याचा वापर करण्यात येतो असं म्हटलं जातं.
अधिक वाचा – रॉयल डेस्टिनेशन वेडिंगनंतर विकी-कतरिना या ठिकाणी जाणार हनिमूनला
कतरिनाचे नाजूक मंगळसूत्र
कतरिनाच्या अंगठीप्रमाणेच तिच्या मंगळसूत्राचीही सध्या चर्चा होत आहे. विकी कौशलसह कतरिनाने पंजाबी पद्धतीने विवाह केला. तर तिच्या गळ्यात विकीने सब्यासाची (Sabyasachi) मंगळसूत्र घातले असल्याचेही सांगण्यात येत आहे. या मंगळसूत्रामध्ये दोन लहान ड्रॉप डाऊन हिरे असून काळे मणी आणि सोन्याची आणि मोत्याची चैनचे डिझाईन करण्यात आले आहे. तसंच हे मंगळसूत्र डिझाईन अत्यंत नाजूक आणि दिसायला आकर्षक आणि सुंदर असल्याचेही दिसून येत आहे. कतरिनाने आपल्या लग्नात सब्यासाचीचे (Sabyasachi Bride) दागिने घातले होते. इतकंच नाही तर कपडेही सब्यासाचीने डिझाईन केलेले होते. लाल रंगाचे डिझाईनर लेहंगा आणि अन्य सोहळ्यांनादेखील कतरिनाने सब्यासाचीने डिझाईन केलेले कपडे घातले होते. विकी आणि कतरिना हे जोडपे लग्नात अगदी नजर लागण्यासारखेच दिसत होते. सध्या कतरिना आणि विकी दोघेही आपल्या सोशल मीडियावर सर्व सोहळ्यांचे फोटो शेअर करत आहेत. तर त्यांचे चाहते आणि मित्रमैत्रिणीही त्यांच्या लग्नानंतर भरभरून शुभेच्छा देत आहेत. दरम्यान आता या दोघांच्या रिसेप्शनकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
नुकतेच कतरिनाना आपल्या लग्नातील फुलांची चादर बहीण घेऊन जात असाताना फोटो पोस्ट केला आणइ तो व्हायरल झाला आहे. आपल्या बहिणींची आपल्या आयुष्यात असणारी जागा कतरिनाने सर्वांनाच दाखवून दिली आणि कतरिनाच्या या निर्णयामुळे तिचे कौतुकही होत आहे. आता मुंबईत कतरिना आणि विकी कधी रिसेप्शन देणार आणि रिसेप्शनला नक्की कोण कोण हजर राहणार याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
अधिक वाचा – 2022 मध्ये लग्न मुहूर्तांचा धमाका, वेळीच ठरवा तारीख