ADVERTISEMENT
home / त्वचेची काळजी
खास समारंभासाठी करुन घ्या बॉडी पॉलिशिंग मिळेल इन्स्टंट ग्लो

खास समारंभासाठी करुन घ्या बॉडी पॉलिशिंग मिळेल इन्स्टंट ग्लो

 काही समारंभासाठी आपल्याला अगदी टॉप टू बॉटम नटायला आवडते. पण टॉप टू बॉटम  तयारी करणे म्हणजे काय?  खास समारंभासाठी निवडलेले कपडे अनेकदा बॅकलेस किंवा  स्लिट कट अशा प्रकारामध्ये असतात. अशावेळी तुमच्या शरीराचा प्रत्येक अवयव उठून दिसणे गरजेचे असते. अशावेळी त्वचा चमकवण्याचा उत्तम पर्याय म्हणजे ‘बॉडी पॉलिशिंग’ या पूर्वी तुम्ही कधीही बॉडी पॉलिशिंग केले नसेल तर आज आपण या विषयी अधिक माहिती घेऊया. म्हणजे तुम्हाला नेमकं बॉडी पॉलिशिंग कधी करायचे ते कळेल.

बॉडी पॉलिशिंग म्हणजे काय?

बॉडी पॉलिशिंग करताना

Instagram

बॉडी पॉलिशिंगमध्ये तुमच्या प्रत्येक अवयवाला आवश्यक असलेला ग्लो देण्यासाठी स्क्रबिंग आणि मॉश्चरायईज केले जाते. क्लिनिंग (Cleaning), स्क्रबिंग (Scrubing), मॉश्चरायझिंग (Moisturizing) आणि रिलॅक्स (Relax) केले जाते.  त्यामुळे त्वचा चमकण्यास मदत होते.  या शिवाय तुमचा रक्तपुरवठा सुरळीत होण्यासही मदत मिळते . त्यामुळे बॉडी पॉलिशिंग हा स्पाचा एक अॅडव्हान्स प्रकार आहे असे म्हणण्यास काहीच हरकत नाही. 

ADVERTISEMENT

त्वचा टोन्ड करण्याचे काम करतात हे फेस मसाजर, नक्की वापरुन पाहा

असे केले जाते बॉडी पॉलिशिंग

  • बॉडी पॉलिशिंगसाठी एक खास रिलॅक्सिंग रुम तयार केली जाते. ( अशी सोय नसेल तर तुम्ही अशा ठिकाणी बॉडी पॉलिशिंग करु नका. शिवाय या खोलीमध्ये शॉवर आहे की नाही ते देखील पाहून घ्या) 
  • बॉडी पॉलिशिंगचे वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्ही तुमच्या बजेटनुसार आणि गरजेनुसार त्याची निवड करा. 
  • बॉडी पॉलिशिंग हे रिलॅक्सिंग करण्याचे काम आहे. त्यामुळे तुम्ही कोणाकडून हे करुन घेत आहात हे देखील जाणून घ्या. 
  • बॉडी पॉलिशिंग दरम्यान तुम्हाला एक्सपर्ट समोर कपडे काढावे लागतात. पण एक- एक भागाचे पॉलिशिंग करताना तितकाच अवयवावरुन टॉवेल काढला जातो. 
  • सगळ्यात आधीची पायरी असते तुमचे शरीर क्लिन्झ करुन घेणे. त्वचेला सूट होणारा क्लिन्झर वापरली जाते. 
  • त्यानंतर स्क्रबचा वापर करुन त्वचेवरील मृत त्वचा (Dead Skin) काढून टाकण्यास मदत करते. 
  • स्क्रबनंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे मसाजची. हा मसाज फक्त रिलॅक्सिंग मसाज असतो. यामध्ये तुमच्या प्रेशर पॉईंटचा विचार जास्त केला जात नाही. तर तुम्हाला फक्त रिलॅक्स करण्याचे काम केले जाते. 
  • बॉडी मास्क हा यामधील सगळ्यात महत्वाचा घटक आहे. कारण या मास्कमुळेच तुम्हाला आणखी ग्लो मिळण्यास मदत होते. 

पिंपल्समुळे चेहरा काळवंडला असेल तर अशी घ्या काळजी

बॉडी पॉलिशिंगची निवड

वेगवेगळ्या प्रकारचे बॉडी पॉलिशिंग असतात. तुमची त्वचा कोरडी, काळवंडलेली किंवा त्वचेसंदर्भातील कोणतीही तक्रार असेल तर त्यानुसार तुम्ही पॉलिशिंगची निवड करायला हवी.

बॉडी पॉलिशिंगचा खर्च

बॉडीपॉलिशिंग करताना

ADVERTISEMENT

Instagram

जर तुम्हाला खास कार्यक्रमासाठी नाही तर मेंटेन्ससाठी बॉडी पॉलिशिंग करायचे असेल तर तुम्ही महिन्यातून एकदा करायला हरकत नाही. तुम्हाला अगदी बेसिक बॉडी पॉलिशिंग करायचा खर्च 2 हजार इतका आहे. तुम्ही त्यामध्ये जितकी व्हरायटी घ्याल तितका खर्च हा वाढत जातो. अगदी महागडे बॉडी पॉलिशिंग देखील उपलब्ध आहेत. 


आता बॉडी पॉलिशिंग करण्यापूर्वी या सगळ्या गोष्टींचा विचारही करा. 

Relaxationसाठी महिलांनी करायलाच हवे Body spa

ADVERTISEMENT

बॉडी पॉलिशिंगनंतर तुम्हाला त्वचा चांगली ठेवायची असेल तर तुम्ही माय ग्लॅमचे हे प्रोडक्ट नक्की ट्राय करु शकता. 

04 Oct 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT