घरात आल्या आल्या सुंदर सुगंध दरवळल्यावर आपला थकवा लगेच नाहीसा होतो आणि फ्रेश वाटतं. दिवसभर असलेला वाईट मूडही बदलतो. त्यामुळे चांगल्या सुगंधाचा परिणाम तुम्हाला लगेच कळला असेलच.हीच पद्धती अरोमा थेरपीमध्ये वापरली जाते. अरोमा थेरपी ही आता चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. पर्यायी उपचार पद्धती म्हणून काही मानसिक आणि शारिरीक व्याधींवर वापरली जाते. अरोमा थेरपीतील प्रभावी घटकांचा वापर करून बनवलेली प्रोडक्ट्स रेंज आणली आहे पुण्याच्या प्रकृती सूत्राने. या नावावरूनच तुम्हाला कल्पना आली असेल.
‘प्रकृती सूत्र’चं वैशिष्ट्यं
या अरोमाथेरपी बेस्ड नैसर्गिक उत्पादनांची निर्मिती केली आहे पुण्याच्या प्रियांका पवार यांनी. प्रकृती सूत्रात अरोमाथेरपीतील अनेक इसेंशियल ऑईल्सचा वापर केला जातो. ज्याच्या वापराने आपले अनेक आजार दूर होऊ शकतात आणि आपल्याला पुन्हा फ्रेश वाटते. हे खरं आहे. आपल्या वसुंधरेकडून अन्न आणि पाणी मिळतंच पण त्यासोबतच विविध झाडंही आपल्याला निर्सगाकडून मिळाली आहेत. ज्यांच्या फक्त सुगंधानेही आपल्या अनेक शारिरीक आणि मानसिक समस्या दूर होऊ शकतात. नेमका हाच विचार प्रकृती सूत्राने मांडला आहे.
#POPxoLucky2020: खास राशींचंं कलेक्शन
प्रकृती सूत्राची उत्पादनं
प्रकृती सूत्राच्या उत्पादनांची नावंही अगदी अर्थपूर्ण आहेत. ज्यापैकी काही उत्पादनं प्रकृती सूत्राने #POPxoMarathi साठी खास पाठवली होती. त्यापैकी काही उत्पादनांचा आम्हाला आलेला छान अनुभव इथे देत आहोत.
धरणी सोय कँडल (Scented candles)
सोयाबीनपासून बनवलेल्या मेणाची ही धरणी कँडल. ज्यामागील प्रेरणा आहे मातीचा सुगंध. या कँडलमध्ये पचौली, तुळस, लिंबू आणि संत्र्यांच्या सुगंधाचा सुंदर मेळ साधण्यात आला आहे. तसंच यात गुलाबाच्या आणि ऑर्किडच्या पाकळ्यांचा मंद सुगंधही आहे. प्रत्येक कँडल ही 100% नैसर्गिक आहे. किंमत – 100 रूपये फक्त.
नैसर्गिक फुलांची पोटप्युरी (Room freshner)
या पोटप्युरीचा वास अगदी आल्हाददायक आणि वेड लावणारा आहे. यामध्ये आहेत नैसर्गिकरित्या सुकवलेल्या फुलांच्या पाकळ्या. ज्यामध्ये झेंडू, गुलाब, ऑर्किड, क्रायसॅन्थेमम या फुलांच्या पाकळ्या आणि हिरवी पानं तसंच जायफळ, वेलची आणि दालचिनी यांचाही समावेश आहे. यासोबतच इसेंशियल ऑईल्स तुळस, संत्र, द्राक्षं आणि लिंब यांचंही मिश्रण आहे. ही पोटप्युरी तुम्ही वरीलप्रमाणे छान तुमच्या घरातल्या टीपॉयवर ठेवून मंद सुगंधाने घर सुगंधित करू शकता. किंमत – 200/- रूपये फक्त.
लिपबाम (Lipbalm)
प्रकृती सूत्राचा लिपबाम हा अगदी नैसर्गिक घटकांपासून बनवलेला असून ओठांसाठी उत्तम आहे. हा लावल्यावर तुम्हाला अगदी नारळाचं तेल ओठांना लावल्यासारखं जाणवेल. इतका नैसर्गिक याचा स्पर्श आहे. कोणत्याही अनैसर्गिक घटक आणि केमिकल्सयुक्त लिपबामपेक्षा हा लिपबाम नक्कीच चांगला आहे. जो पोटात गेल्यानेही तुम्हाला अपाय होणार नाही. किंमत – 120 रूपये फक्त.
केसांना निरोगी ठेवण्यासाठी वापरा सल्फेट-फ्री शँपू
बॉडी पॉलिशिंग पावडर (Body Polishing Powder)
प्रकृती सूत्राची ही बॉडी पॉलिशिंग पावडर तुम्हाला अगदी उटणं लावल्यासारखा आभास देते. कारण या पावडरचा सुवास अगदी उटण्यासारखा आहे. त्यामुळे सौंदर्यासाठी केमिकलयुक्त बॉडी पॉलिशिंग वापरण्यापेक्षा अशी नैसर्गिक बॉडी पॉलिशिंग पावडर वापरणं कधीही उत्तम. किंमत – 170 रूपये फक्त.
जर तुम्हीही अशाच नैसर्गिक घटकांपासून बनवण्यात आलेल्या सौंदर्यप्रसाधनांच्या शोधात असाल तर प्रकृती सूत्राच्या सोशल मीडियापेजेसवर नक्की भेट द्या आणि या सुगंधी उत्पादनांचा लाभ नक्की घ्या.
हेही वाचा – तुमच्या त्वचेसाठी बेस्ट आहेत हे नवे प्रोडक्ट,नक्की वापरुन पाहा