ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
benefits of washing face with ice water

बर्फाच्या पाण्याने धुवा चेहरा, जाणून घ्या फायदे

आजकाल धुळ, माती, प्रदूषण, मेकअपचा अती वापर, अचानक झालेले वातावरणातील बदल, अयोग्य आहार या सर्व गोष्टींचा परिणाम त्वचेवर होताना दिसतो. यासाठीच त्वचेची योग्य निगा राखणं गरजेचं आहे. त्वचेची निगा राखायची म्हणजे नियमित स्कीन रूटिन फॉलो करायचं. त्वचा क्लिन, टोन आणि मॉईस्चराईझ करायची. मात्र स्कीन रुटिन फॉलो करताना तुम्ही जर गरम पाण्याने चेहरा धुत असाल तर मात्र तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. कारण  गरम पाण्याने त्वचेचं अतोनात नुकसान होऊ शकतं. त्याऐवजी थंड पाण्याने चेहरा धुणं नेहमीच योग्य आहे. यासाठी जाणून घ्या बर्फाच्या पाण्याने  चेहरा धुण्याचे फायदे

चेहरा का धुवावा बर्फाच्या पाण्याने

गरम पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचेवरील नैसर्गिक तेल कमी होतं. ज्यामुळे त्वचा कोरडी दिसते. यासाठी जाणून घ्या  बर्फाच्या पाण्याने चेहरा धुण्याचे फायदे

चेहऱ्यावरील पफीनेस कमी होतो

सकाळी उठल्यावर जर तुमचा  चेहरा सुजलेला दिसत  असेल तर हा पफीनेस कमी करण्यासाठी तुम्ही चेहरा थंड पाण्याने धुवू शकता. यासाठी सकाळी उठल्यावर पाण्यात थोडे बर्फाचे तुकडे टाका आणि थंड पाणी चेहऱ्यावर शिंपडत चेहरा धुवा. जरी थंड पाण्याने चेहरा धुणे गारव्यामुळे तुम्हाला शक्य नसेल तरी साध्या पाण्याने चेहरा धुवा आणि बर्फाचं पाणी फक्त चेहऱ्यावर शिंपडा. सकाळी उठल्यावर चेहरा दिसत असेल सूजलेला तर करा हे उपाय

त्वचा मऊ होते

गरम पाण्याने चेहरा धुतल्यामुळे चेहरा अती प्रमाणात कोरडा  होतो. ज्यामुळे त्वचेतील मऊपणा जातो आणि त्वचा निस्तेज दिसते. पण त्याऐवजी तुम्ही चेहरा थंड पाण्याने धुतला तर त्वचा मऊ  आणि मुलायम राहण्यास मदत होते. त्वचेतील नैसर्गिक तेल निघून न गेल्यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक मिळते. चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी फॉलो करा हे ‘मॉर्निंग ब्युटी केअर रूटीन’ (Morning Skin Care Routine In Marathi)

ADVERTISEMENT

त्वचेचे पोअर्स बंद होतात

काही जणींच्या त्वचेची छिद्रे म्हणजेच पोअर्स अती  क्लिझिंग अथवा अती वाफ घेण्यामुळे मोठी होतात. असे पोअर्स पु्न्हा पूर्ववत करण्याचा सोपा मार्ग म्हणजे चेहऱ्यावर थंड पाण्याचे थबके देणं. थंड पाणी त्वचेवर लावण्यामुळे ओपन पोअर्स बंद होतात आणि धुळ, माती, प्रदूषण आणि इतर केमिकल्सपासून त्वचेचं संरक्षण होतं. थंड पाण्याने आंघोळ करण्याचे ‘5’ फायदे (Benefits Of Cold Water Bath)

त्वचेचा दाह कमी होतो

जर तुमची त्वचा अती संवेदनशील असेल अथवा त्वचेवर पुरळ, पिंपल्स असतील तर त्वचेत एकप्रकारचा दाह जाणवतो. हा दाह कमी करण्यासाठी  तुम्ही थंड पाणी चेहऱ्यावर वापरू शकता. ज्यामुळे काही काळासाठी त्वचेला थंडावा मिळतो आणि त्वचेची जळजळ कमी होते. 

या कारणांसाठी नियमित बर्फाच्या पाण्यानेच धुवा चेहरा… तुम्हाला जर बर्फाचं पाणी सहन होत नसेल तर तुम्ही थंड अथवा साधे पाणी चेहरा धुण्यासाठी वापरू शकता. मात्र चुकूनही गरम पाण्याने चेहरा कधीच धुवू नका.

08 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT