ADVERTISEMENT
home / Age Care
तारूण्यपूर्ण त्वचेसाठी रेड वाईन फेशियल (Wine Facial For Skin In Marathi)

तारूण्यपूर्ण त्वचेसाठी रेड वाईन फेशियल (Wine Facial For Skin In Marathi)

आधुनिक लाईफस्टाईलमध्ये आजच्या महिलांवर दुहेरी जबाबदारी असते. ती म्हणजे घरंही सांभाळा आणि बाहेर पडून आर्थिक मदतही करा. या जबाबदाऱ्यांसोबतच प्रत्येकीला निरोगी आणि सुंदरही दिसायचं असतंत. त्यामुळे आजकालच्या महिला या आरोग्यासोबतच त्यांच्या सौंदर्याबाबतही सतर्क आहेत. सध्या त्वचेबाबत रोज नवे नवे ट्रेंड येत आहेत. त्यातील एक ट्रेंड म्हणजे अल्कोहोल फेशियल्सचा ट्रेंड. ज्यामुळे तुम्हाला मिळतो इस्टंट ग्लो. फेशियलमुळे तुमच्या त्वचेला चांगला मसाज मिळतो आणि चेहऱ्याला उर्जा मिळते. तसंच तुमच्या स्नायूंनाही लवचिकताही मिळते. याच ट्रेंडमधील एक फेशियलचा प्रकार म्हणजे वाईन फेशियल. मुख्यतः रेड वाईन फेशियलबाबत संपूर्ण माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत. 

त्वचेसाठी वाईनचे फायदे (Skin Benefits of Wine In Marathi)

त्वचेसाठी वाईनचे फायदे - Skin Benefits of Wine In Marathi

Shutterstock

ADVERTISEMENT

रेड वाईन ही जशी आपल्या आरोग्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी चांगली आहे तसंच आपल्या चेहऱ्यासाठीही उपयुक्त आहे. रेड वाईन ही तुमच्या चेहऱ्यावर एंटी एजिंग, त्वचा उजळवणे आणि एक्नेसुद्धा दूर करते. रेड वाईन म्हणजे जणू काही जादूच आहे. जी तुमच्या संपूर्ण शरीरासाठी उपयुक्त आहे. जाणून घेऊया रेड वाईनचे चेहऱ्यासाठी फायदे.

चिरतरूण दिसण्यासाठी वाईन (Wine Makes You Look Young)

वाईनमध्ये मुख्यतः रेड वाईन ही आपल्या त्वचेला थोराड किंवा चेहऱ्यावरील वाढत्या वयाच्या खुणा रोखण्यास मदत करते. संशोधनानुसार, रेड वाईन ही फक्त त्वचेसाठी चांगली आहे, असं नाहीतर ती अँटी एजिंगसुद्धा आहे. वाईनमधील अँटीऑक्सीडंट्स ज्यामध्ये रिर्सव्हट्रोल फ्लेवनॉईड आणि टॅनिन असतात. ते आपल्या चेहऱ्यावरील वाढत्या वयाच्या खुणा रोखतं. तसंच चेहऱ्यावरील सॅगिंगसुद्धा थांबवतं. रक्ताभिसरणाला चालना देऊन चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करतं.

त्वचा उजळवण्यासाठी (Wine Improves Complexion)

निस्तेज त्वचेला ताजंतवान करण्याचं काम करते वाईन. तुमच्या त्वचेचा थकवा घालवून त्वचेला तुकतुकीतपणा देण्यास वाईन उपयुक्त आहे. एक ते दोन चमचे वाईन घेऊन त्यात इंसेशियल ऑईल्स मिक्स करा आणि मग चेहऱ्याला लावा. दहा मिनिटं मसाज करा आणि चेहरा थंड पाण्याने धुवून टाका. तुमच्या त्वचेवर लगेच ग्लो जाणवेल.

एक्ने होतील दूर (Wine Prevents Acne)

वाईनमध्ये असलेल्या अँटीसेप्टिक आणि अँटीइंफ्लमेट्री घटकांमुळे तुम्ही चेहऱ्याच्या क्लीनअपसाठी वाईनचा वापर करू शकता. ज्यामुळे चेहऱ्यावर नव्याने येणारे पिंपल्स रोखले जातील. लक्षात घ्या रेड वाईन ही चेहऱ्यासाठी चांगली मानली जाते. पण कोणतीही वाईन चेहऱ्यावर थेट लावू नका. एक कॉटन बॉल आणि त्यावर गुलाबपाणी आणि रेड वाईन मिक्स करून घ्या आणि ते चेहऱ्याला लावून 15 ते 20 मिनिटं तसंच ठेवा आणि पिंपल्सना बाय बाय करा.

ADVERTISEMENT

त्वचेच्या तजेलदारपणासाठी (Wine Improves Skin Radiance)

रेड वाईन तुमचं वय जणू काही थांबवते. तज्ज्ञांनुसार, रेड वाईन फक्त त्वचेसाठीच चांगली आहे असं नाहीतर चेहऱ्यावरील वाढत्या वयाच्या खुणाही रोखते. यातील भरपूर अँटिऑक्सीडंट्समुळे तुमच्या चेहऱ्यावरील लवचिकपणा कायम राहतो. रेड वाईन तुमच्या चेहऱ्यावरील सँगिंगला रोखून रक्ताभिसरणाला चालना देते. ज्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि फाईन लाईन्स कमी होतात.

कोरड्या त्वचेसाठी वाईन (Wine For Dry Skin)

कोरड्या त्वचेसाठी वाईन उत्तम मानली जाते. पण कोरड्या त्वचेसाठी स्वीट व्हाईट वाईन वापरली जाते. ज्यामध्ये अल्फा हायड्रॉक्सी एसिड्स असतात. जी यातील पाणाच्या घटकांमुळे कोरड्या त्वचेसाठी फायदेशीर ठरते.

तेलकट त्वचेसाठी वाईन (Wine For Oily Skin)

तेलकट त्वचेसाठीही रेड वाईन फेशियल उत्तम असल्याचं सांगतात. कारण ही वाईन चेहऱ्यावरील एक्नेजवर प्रभावी ठरते. यातील पॉलीफेनॉल रिर्सव्हट्रॉल घटकांमुळे चेहऱ्यावरचा लालसरपणाही कमी होतो.

जाणून घ्या रेड वाईनचे आरोग्यदायी फायदे

ADVERTISEMENT

वाईन फेशियल घरच्या घरी कसं कराल (How To Do Wine Facial At Home)

घरच्या घरी करा वाईन फेशियल

Shutterstock

आजकाल सर्व पार्लरमध्ये वाईन फेशियल उपलब्ध आहे. पण जर तुम्हाला घरच्या घरी वाईन फेशियल करायचं असल्यास खालील माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. सर्वात आधी व्यवस्थित CTM म्हणजेच क्लीजिंग, टोनिंग आणि मॉईश्चरायजिंगसाठी तुम्ही वाईनचा वापर सल्ला घेऊन रोजही करू शकता.

ADVERTISEMENT

क्लिजिंग (Cleansing)
कापसाच्या बोळ्यावर वाईन घेऊन त्याने चेहरा पुसा, यामुळे तुमची त्वचा मॉईश्चराईज होईल आणि चेहऱ्यावरील घाण निघून जाईल. दिवसातून एकदा असं करा आणि मग चेहरा पाण्याने धुवून टाका. 

स्क्रबिंग (Scrubbing) 
स्क्रबसाठी तुम्ही रेड वाईनमध्ये टर्बिंडो साखर, मध, नारळाचं तेल मिक्स करून त्याने चेहरा स्क्रब करू शकता. नंतर चेहऱ्यावर टॉवेलच्या मदतीने पाच मिनिटांसाठी वाफ घ्या. ज्यामुळे चेहऱ्यावरील पोर्स मोकळे होतील.

मसाज (Massaging)
त्यानंतर मसाजसाठी वाईनमध्ये एसेंशियल ऑईल्स मिक्स करा. तुम्ही हे मिश्रण अजून प्रभावी करण्यासाठी या हर्ब्ससुद्धा घालू शकता. आता हे मिश्रण चेहऱ्यावर लावून हळूवार मसाज करा

टीप: चेहऱ्यासाठी कोणतीही वाईन किंवा इसेंशियल ऑईल निवडण्याआधी तुमच्या त्वचेचा प्रकार ओळखून मगच त्याचा वापर करा.

ADVERTISEMENT

घरच्या घरी कसं करावं फेशियल, जाणून घ्या फेशियलबाबत सर्व माहिती

रेड वाईन फेसपॅक (Red Wine Face Pack)

रेड वाईन फेसपॅक

Shutterstock

उजळ त्वचेसाठी रेड वाईन फेसपॅक :

ADVERTISEMENT

साहित्य – एक ग्रीन टी बॅग, अर्धा कप गरम पाणी, एक चमचा योगहर्ट, दोन चमचे रेड वाईन

अर्धा कप गरम पाण्यात ग्रीन टी बॅग 3-5 मिनिटं ठेवा. नंतर त्यात योगहर्ट घाला आणि रेड वाईन घाला आणि घट्ट पेस्ट बनवा. आता चेहऱ्यावर हळूवार मसाज करून ही पेस्ट लावा. किमान 10-15 मिनिटं ही पेस्ट राहू द्या. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. 

या फेसपॅकने तुमच्या चेहऱ्यावर सुंदर ग्लो येईल आणमि त्वचा उजळेल.

त्वचेच्या मॉईश्चरायजिंगसाठी फेसपॅक :

ADVERTISEMENT

साहित्य – दोन चमचे रेड वाईन, एक चमचा कोको पावडर, दोन-तीन थेंब ऑलिव्ह ऑईल

एका बाऊलमध्ये सर्व घटक एकत्र करून मिक्स करा. नंतर चेहरा आणि मानेवर हळूवार लावून किमान 10-15 मिनिटं ठेवा. नंतर थंड पाण्याने धुवून टाका. 

आठवड्यातून एकदा जरी हा फेसपॅक लावल्यास तुमचा चेहऱ्याला उत्तम मॉईश्चरायजिंग मिळेल.

वाईनबाबतच्या या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का

ADVERTISEMENT

वाईन फेसमास्क कसा बनवावा (How To Make Wine Face Mask In Marathi)

वाईन फेसमास्क - How To Make Wine Face Mask In Marathi

Shutterstock

वाईन फेसमास्कसाठी मुख्यतः रेड वाईनचा वापर केला जातो. जाणून घ्या घरच्या घरी तुम्हाला वाईन फेसमास्क कसा बनवता येईल.

ADVERTISEMENT

कोरड्या त्वचेसाठी वाईन फेसमास्क (Wine Face Pack For Dry Skin)

तीन चमचे स्वीट रेड वाईन किंवा व्हाईट वाईनमध्ये अर्धा चमचा कोरफड जेल आणि मध घाला. नंतर त्यात लव्हेंडर एसेंशियल ऑईल घालून व्यवस्थित मिक्स करा. आता हे मिश्रण चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. सुकल्यानंतर पाण्याने धुवून टाका.

एक्नेप्रोन त्वचेसाठी वाईन फेसमास्क (Wine For Acne Prone Skin)

3 चमचे रेडवाईनमध्ये योगहर्ट आणि काही थेंब टी ट्री ऑईल टाका. चांगल मिक्स करून मग चेहऱ्यावर लावा. 20 मिनिटं तसंच ठेवा आणि मग चेहरा धुवून टाका.

नाशिकमधील 10 बेस्ट वाईनयार्ड्स आणि वाईनरीज

ADVERTISEMENT

वाईन फेशियलबाबत प्रश्न आणि उत्तरं (FAQs)

वाईन फेशियल

Shutterstock

फेशियल वाईन सुचल्यावर बरेच जणींच्या मनात प्रश्न येऊ शकतात की, नेमकं कोणती वाईन वापरायची किंवा वाईनने नक्की फायदा होतो का, तुमच्याही मनात असे प्रश्न असतील तर वाचा.

वाईन फेशियल तेलकट त्वचेसाठी चांगलं असतं का?

जर तुमची त्वचा तेलकट आणि एक्ने-प्रोन असेल तर रेड वाईन फेशियल तुमच्यासाठी उत्तम आहे. या वाईनमधील जास्त प्रमाणात असलेलं पॉलीफेनॉल रिर्सव्हट्रोल (polyphenol resveratrol) या केमिकलमुळे चेहऱ्याची जळजळ कमी होते.

ADVERTISEMENT

फेशियलसाठी कोणती वाईन वापरली जाते?

फेशियलसाठी मुख्यतः रेड वाईन वापरली जाते. यामध्ये सुला रसा (Shiraz) आणि इंडस कॅब्रनेट सॉविजन (Cabernet Sauvignon) या वाईन्स वापरल्या जातात.

वाईनमुळे खरंच त्वचा चमकदार दिसते का?

वाईनमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सीडंड्स असतात. उदा. फ्लेवनॉईड, रिर्सव्हटॉल आणि टॅनिन. जे तुमची त्वचा तारूण्यपूर्ण ठेवण्यास मदत करते. वाईन तुमच्या त्वचेतील कॉलेजनचं जतन करते आणि त्वचेला तुकतुकीतपणा देते. रेड वाईनमधील पॉलीफेनल्स हे तुमच्या त्वचेला उजळवतात आणि अमिनो एसिड तुमच्या त्वचा तजेलदार करतात. ज्यामुळे आपोआपच तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येतो.

रेड वाईन थेट चेहऱ्यावर लावू शकतो का?

रेड वाईन कधीही थेट चेहऱ्यावर लावू नका. कारण यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे वाईन थेट लावण्याऐवजी तुम्ही त्याचा फेसमास्क किंवा फेसपॅक बनवून लावू शकता किंवा वाईनमध्ये गुलाबजल किंवा पाणी मिक्स करून मगचं लावा. तसंच रेड वाईन चेहऱ्यावर लावण्याआधी हातावर पॅच टेस्ट नक्की घ्या किंवा तुमच्या स्कीन स्पेशलिस्टचा याबाबत सल्ला घ्या.

30 Apr 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT