ADVERTISEMENT
home / आरोग्य
co-relation-between-summer-and-menstruation-information-in-marathi

उन्हाळा आणि मासिक पाळी यांच्यातील परस्परसंबंध

तापमानाचा वाढता पारा,  सततच्या घामामुळे होणारे डिहायड्रेशन आणि याचा परिणाम मासिक पाळीवर होतो. तुम्हाला माहीत आहे का? तुमच्या मनःस्थितीप्रमाणेच, बदलते हवामान देखील तुमच्या मासिक पाळीवर परिणाम करू शकते. हवामान उष्ण आणि दमट असताना बहुतेक स्त्रियांना मासिक पाळीत बदल जाणवू शकतात. याबाबत अधिक माहिती आम्ही घेतली आहे, डॉ. मीता नाखरे, स्त्रीरोग तज्ज्ञ, लोकमान्य हॉस्पिटल पुणे यांच्याकडून. 

मासिक पाळीशी नक्की काय संबंध  

ऋतुबदलाचा तुमच्या मासिक पाळीशी संबंध असल्याचे ज्ञात आहे. उन्हाळ्यात, मासिक पाळी दीर्घ काळ राहू शकते. पौगंडावस्थेतील मुली आणि पेरी-मेनोपॉज अवस्थेतील महिलांना हार्मोन्स (Hormone) अस्थिर असल्यामुळे जास्त त्रास होतो. संशोधनानुसार, जास्त सूर्यप्रकाशामुळे मासिक पाळीच्या कालावधीत बदल होऊ शकतात. त्याचप्रमाणे, जर तुम्ही नवीन ठिकाणी जाल जेथे हवामान गरम किंवा थंड असेल तर तुमच्या शरीराला तापमानाशी जुळवून घेण्यात अडचण येईल. त्यामुळे, तुमच्या मासिक पाळीची लांबी बदलू शकते. विविध अभ्यास नुसार असे स्पष्ट झाले आहे की व्हिटॅमिन डी (Vitamin D) शरीराला फॉलिकल-उत्तेजक संप्रेरक तयार करण्यास मदत करते, जे पुनरुत्पादक कार्ये नियंत्रित करते. उष्ण वातावरणात राहणाऱ्या महिला शरीर झाकणारे कपडे घालतात. त्यामुळे व्हिटॅमिन डी ची कमतरता निर्माण होते. व्हिटॅमिन डी च्या कमी पातळीचा डिम्बग्रंथि रिझर्व्हशी परस्पर संबंध आहे.

काय होतो परिणाम 

  • उपलब्ध पुराव्यांनुसार, तापमान मासिक पाळीवर परिणाम करू शकत नाही, परंतु यामुळे थकवा, तणाव, पुरळ आणि अगदी अस्वस्थता यांसारखी विविध चिंताजनक लक्षणे उद्भवू शकतात जी मासिक पाळीच्या वेळी दिसतात
  • बहुसंख्य महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान यीस्ट संसर्गाचा त्रास होतो कारण गरम आणि दमट वातावरणात जीवाणूंची झपाट्याने वाढ होते. शिवाय, उन्हाळ्यात योनिमार्गात होणारे संक्रमण हे देखील अनियमित मासिक पाळीच्या कारणांपैकी एक असू शकते. जास्त घाम येणे उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइट असंतुलन, त्वचेला खाज सुटणे आणि यीस्ट इन्फेक्शन होऊ शकते
  • उन्हाळ्यात तुमच्या खाण्याच्या सवयींचाही मासिक पाळीवर परिणाम होऊ शकतो. आंबा, पपई किंवा अननस यांसारखे उष्ण पदार्थ खाल्ल्याने तुमची मासिक पाळी लवकर येते, कारण त्यामुळे ओटीपोटात उष्णता निर्माण होते आणि गर्भाशय आकुंचन पावते. तणाव देखील मासिक पाळीवर परिणाम करू शकतो
  • उन्हाळ्यात नियमित व्यायाम केल्याने तुमची सायकल एक किंवा दोन दिवसांनी लांबू शकते.
  • मासिक पाळी दरम्यान हार्मोनल चढ-उतारांमुळे तुमच्या शरीरात नेहमीपेक्षा जास्त पाणी आणि मीठ टिकून राहते. मासिक पाळीत तुमचे पोट फुगलेले दिसेल. अति उष्णतेमुळे निर्जलीकरण आणि मासिक पाळीच्या दरम्यान अस्वस्थतादेखील होते

यासाठी काय करणे आहे आवश्यक 

  • दिवसभरात पुरेसे पाणी पिणे अत्यावश्यक आहे. जे तुम्हाला निर्जलीकरण आणि डोकेदुखीचे व्यवस्थापन करण्यास मदत करू शकते
  • खारट पदार्थांचे सेवन टाळण्याचा प्रयत्न करा 
  • फळे आणि सॅलड्सची निवड करा, जंक फूड, मसालेदार, तेलकट आणि हवाबंद डब्यातील  पदार्थांचे सेवन कमी करा 
  • तणावमुक्त आणि निरोगी राहण्यासाठी दररोज व्यायाम करा
  • चांगली वैयक्तिक स्वच्छता ठेवा 
  • सैल सुती कपडे/अंतर्वस्त्र घाला, वारंवार आंघोळ करा आणि यीस्ट संसर्ग अर्थात यीस्ट इन्फेक्शन टाळण्यासाठी तुमचे सॅनिटरी पॅड किंवा टॅम्पोन्सनस वेळोवेळी बदला. व्हजायनल स्वच्छता महत्त्वाची आहे

ही माहिती प्रत्येक महिलेला असायला हवी. यासाठी काय करणे महत्वाचे आहे आणि काय टाळायला हवे हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्हीही ही माहिती जाणून घ्यायलाच हवी.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
27 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT