ADVERTISEMENT
home / आरोग्य
birth defects and disorders

गर्भामध्ये बर्थ डिफेक्ट किंवा डिसऑर्डर येऊ नयेत म्हणून या गोष्टी पाळा

महिलांना गर्भधारणेदरम्यान अतिरिक्त सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. जेव्हा एखाद्या स्त्री च्या उदरात एक जीव वाढत असतो तेव्हा त्या स्त्रीचे आरोग्य व त्या बाळाचे आरोग्य देखील नाजूक असते. जेव्हा पोटात बाळाची वाढ होत असते तेव्हा स्त्रीने आपल्या आहार-विहाराच्या सवयींकडे डोळ्यांत तेल घालून लक्ष दिले पाहिजे. कारण एक छोटीशी चूक देखील बाळाच्या व स्त्रीच्या आरोग्यासाठी महागात पडू शकते. या काळात जर स्त्रीने निष्काळजीपणा दाखवला तर बाळामध्ये जन्मजात दोष किंवा विकार होण्याची शक्यता खूप प्रमाणात वाढते. जन्म दोष ही एक गुंतागुंत आहे जी गर्भधारणेदरम्यान बाळामध्ये उद्भवते आणि काहीवेळा बाळाच्या मृत्यूस कारणीभूत ठरते. सर्व जन्मजात दोष टाळता येत नसले तरी गर्भधारणेपूर्वी आणि गर्भधारणेदरम्यान काही गोष्टी लक्षात ठेवून स्त्री तिच्या बाळाच्या आरोग्याची काळजी घेऊ शकते. बाळामध्ये जन्मजात दोष होण्याची शक्यता कमी करण्यासाठी पुढील गोष्टींचे पालन केले पाहिजे. 

दररोज फॉलीक ऍसिडचे सेवन करा 

जर तुम्ही गर्भधारणेची योजना आखत असाल तर दररोज ठराविक प्रमाणात फॉलिक ऍसिड घेण्यास सुरूवात  करा. पण स्वतःहून आपल्याच मनाने कोणतेही औषध घेऊ नका. तुम्ही बाळासाठी प्रयत्न करणार असाल तर प्रथम स्त्रीरोगतज्ज्ञांना भेटा.  डॉक्टर तुम्हाला योग्य सप्लिमेंट्स आणि औषधे घेण्याचा सल्ला देतील तसेच आहाराविषयी देखील मार्गदर्शन करतील. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की गरोदरपणाच्या किमान एक महिना आधी घेतलेल्या फॉलिक ऍसिड सप्लिमेंट्स गर्भधारणेदरम्यान बाळांमध्ये काही मोठे जन्म दोष टाळण्यास मदत करतात.

Avoid Birth Defect in Child

गर्भधारणेचे नियोजन करा

बहुतेक जन्म दोष हे गर्भधारणेच्या पहिल्या तिमाहीत विकसित होतात असे म्हटले जाते. म्हणूनच, गर्भधारणेसाठी प्रत्येक संभाव्य मार्गाने आपण आपले शरीर तयार करणे महत्वाचे आहे. गरोदर होण्यापूर्वी काही महिने तोंडी गर्भनिरोधक घेणे थांबवा आणि त्याऐवजी फिजिकल गर्भनिरोधक निवडा. तसेच, धूम्रपान आणि मद्यपान अशा वाईट सवयी सोडून द्या. 

Avoid Birth Defect in Child
Avoid Birth Defect in Child

आहाराकडे जातीने लक्ष द्या

गर्भवती महिलेने संतुलित आणि पौष्टिक आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. एवढेच नाही तर तुमचे वजन जास्त असेल तर गर्भधारणेमध्ये त्रास होऊ शकतो. म्हणूनच गरोदर होण्याच्या आधी तुमचे वजन थोडे कमी करण्याचा प्रयत्न करणे योग्य आहे. वास्तविक, जास्त वजनामुळे गरोदरपणातही गुंतागुंत होऊ शकते आणि त्यामुळे बाळाच्या जन्मावर परिणाम होण्याची शक्यताही वाढते. म्हणूनच संतुलित व पौष्टिक आहार व डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य व्यायाम करण्यावर भर द्या. 

ADVERTISEMENT
Avoid Birth Defect in Child
Avoid Birth Defect in Child

दारूचे सेवन अजिबात करू नका 

तुम्हाला बाळ हवे आहे हे तुमचे ठरल्यावर त्याच क्षणापासून दारू पिणे पूर्णपणे बंद करा. गर्भवती महिलेवर अल्कोहोलचा थेट परिणाम सिद्ध झालेला नसला तरी, ते टाळणे चांगले आहे. वास्तविक, जेव्हा तुम्ही अल्कोहोल पिता तेव्हा अल्कोहोल प्लेसेंटामधून बाळाकडे जाते आणि त्याचा बाळाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. 

Avoid Birth Defect in Child
Avoid Birth Defect in Child

धुम्रपानापासून लांब राहा 

अनेक अभ्यासांतून हे सिद्ध झाले आहे की धूम्रपानाचा गर्भावर वाईट परिणाम होतो आणि अनेक जन्मजात दोष जसे की फाटलेले ओठ किंवा टाळू, मृत अर्भक जन्माला येणे आणि अकाली जन्म हे धूम्रपानामुळे होते. गर्भवती होण्यापूर्वीच धूम्रपान सोडणे चांगले. पण जर तुम्ही आधीच गरोदर असाल तर तुम्हाला गोड बातमी कळता क्षणीच तुम्ही धूम्रपान सोडून द्या आणि तुमच्या बाळाला अनेक समस्यांपासून वाचवा. 

Avoid Birth Defect in Child
Avoid Birth Defect in Child

डॉक्टरांचा सल्ला घ्या

तुमचे वय 35 वर्षांपेक्षा जास्त असल्यास किंवा तुमच्या कुटुंबात जन्मजात दोषांचा इतिहास असल्यास, गर्भधारणेपूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तसेच काही प्रकारचे इन्फेक्शन्स  तुमच्यासाठी आणि तुमच्या पोटातल्या बाळासाठी हानिकारक असू शकतात. त्यामुळे जागरूक रहा आणि त्यांच्याबद्दल माहिती मिळवा. काळजी घेतल्यास आपण हे इन्फेक्शन्स टाळू शकतो. 

अशा प्रकारे तुम्ही गर्भामध्ये बर्थ डिफेक्ट किंवा डिसऑर्डर होऊ नये म्हणून काळजी घेऊ शकता. 

ADVERTISEMENT

Photo Credit – istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा  MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

15 Jun 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT