ADVERTISEMENT
home / आरोग्य
Correct Posture During Pregnancy

गर्भावस्थेत बाळाच्या निकोप वाढीसाठी बॉडी पोश्चर सांभाळणे खूप महत्वाचे 

गरोदरपणात प्रत्येक स्त्रीने तिच्या खाण्यापिण्यासोबतच तिच्या शरीराची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे कारण आईच्या प्रत्येक हालचालीचा तिच्या गर्भातील बाळाच्या स्थितीवर परिणाम होतो. त्यामध्ये गर्भावस्थेत तुमचे बसणे, उठणे आणि झोपणे या क्रियांकडे आवर्जून लक्ष द्या. जरी गर्भधारणेच्या पहिल्या तिमाहीत पोट वाढलेले नसते त्यामुळे बसायला-उठायला फार त्रास होत नाहीत, परंतु नंतरच्या तिमाहीत, जेव्हा तुमचे बाळ तुमच्या ओटीपोटात फिरते, अशा परिस्थितीत, तुम्ही सतत वाकून बसल्यास, यामुळे तुमचे पेल्वीस मागे झुकते. यामुळे तुमचे बाळ ऑक्सिपिटो — पोस्टरियर पोझिशन नावाच्या स्थितीत जाऊ शकते. अशा परिस्थितीत, प्रसूतीत गुंतागुंत होऊ शकते. अगदी सी-सेक्शनची देखील गरज भासू शकते. या लेखात आपण बघूया की गरोदरपणात योग्य पोश्चर कसे मेन्टेन करावे जेणे करून प्रसूतीमध्ये गुंतागुंत होणार नाही व बाळाची वाढ व्यवस्थित होईल.  

ऑक्सिपिटो- पोस्टरियर पोझिशन म्हणजे काय 

ऑक्सिपिटो- पोस्टरियर पोझिशन या स्थितीत, बाळाचे डोके खाली असते, परंतु त्याचा चेहरा आईच्या मणक्याऐवजी पोटाकडे असतो. या स्थितीत बाळाचा मणका वाकण्याऐवजी विस्तारला जातो. अशा परिस्थितीत, बाळाच्या डोक्याचा वरचा भाग प्रथम पेल्वीसमध्ये  प्रवेश करतो. प्रसूतीदरम्यान या स्थितीमुळे पाठीचा कणा आणि सॅक्रमवर दबाव वाढतो, ज्यामुळे प्रसूती दीर्घ आणि वेदनादायक होते. या सर्व समस्या टाळण्यासाठी गर्भधारणेदरम्यान तुम्ही योग्य पोश्चर राखणे महत्वाचे आहे जेणेकरून बाळाला गर्भाशयात योग्य स्थितीत येण्यासाठी जागा मिळेल!

Correct Posture For Pregnant Women
Correct Posture For Pregnant Women

गर्भधारणेदरम्यान कसे बसावे  

गरोदरपणात बसताना तुमची पाठ सरळ असायला हवी व तुमचे खांदे मागे झुकले पाहिजेत. बसताना तुमच्या नितंबांचा खुर्चीच्या मागील बाजूस स्पर्श झाला पाहिजे. तुम्ही या स्थितीत बसाल तेव्हा तुमचे पाय जमिनीपर्यंत पोचले पाहिजेत याची काळजी घ्या. व तुमच्या गुडघे आणि नितंबांमध्ये 90 अंशांचा कोन असावा. तुमचे पेल्वीस थोडेसे पुढे झुकलेले असावे, तुमचे कान, खांदे आणि नितंब एका समांतर रेषेत असावेत. तुम्ही बैठे काम करत असाल तर ऑफिसमध्ये डेस्कवर बसताना तुमच्या खुर्चीची उंची टेबलानुसार ठेवा. नेहमी तुमच्या डेस्कच्या जवळ बसा जेणेकरून काम करताना तुम्ही तुमचे हात आणि कोपर आरामात टेबलावर ठेवू शकाल. यामुळे तुमच्या खांद्यांना आराम मिळेल. तसेच जेव्हाही तुम्ही खुर्चीवर बसाल तेव्हा तिच्या मागच्या काठावर बसा. नंतर स्वतःला वर उचलताना कंबर व पाठ शक्य तितकी सरळ करा. अशा प्रकारे बसल्यावर शरीराचे वजन तुमच्या दोन्ही नितंबांवर समान असावे. गर्भावस्थेच्या तिसऱ्या तिमाहीत बसण्यासाठी बॅलन्स बॉल वापरा. तुमच्या उंचीनुसार एक बॅलन्स बॉल खरेदी करा. यामुळे प्रसूतीसाठी तुमचे पेल्वीस तयार होण्यास तसेच बाळाला योग्य स्थितीत ठेवण्यास मदत होईल. गरोदरपणात जर तुम्ही जमिनीवर खाली बसणार असाल तर बद्धकोणासनात बसण्याचा प्रयत्न करा. गरोदरपणात कधीही पाय क्रॉस करून बसू नका. यामुळे रक्ताभिसरण बिघडू शकते. 

Correct Posture For Pregnant Women
Correct Posture For Pregnant Women

गरोदरपणात असे उभे राहावे 

गरोदरपणात उभे असताना मान वाकवू नका. डोके सरळ ठेवा.उभे राहताना आपली छाती बाहेर आणि खांदे किंचित मागे ठेवण्याचा प्रयत्न करा. गरोदरपणात आपले गुडघे सरळ आणि लॉक करून उभे राहणे टाळा. उभे राहताना आपले पेल्वीस पुढे आणि मागे वाकवू नका. आपल्या पायाची बोटे एका दिशेने ठेवा आणि दोन्ही पायांवर समप्रमाणात वजन ठेवून उभे राहा.  गर्भधारणेदरम्यान पायांची योग्य स्थिती राखण्यासाठी सपाट चप्पल किंवा शूज घाला. गरोदरपणात शक्यतोवर सतत जास्त वेळ उभे राहू नका.

ADVERTISEMENT

गरोदरपणात स्वतःला सकारात्मक वातावरणात आणि तणावमुक्त ठेवा, चांगली झोप घ्या आणि दिवसभर काहीतरी ऍक्टिव्हिटी करत राहा. 

Photo Credit – freepik

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

30 Jun 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT