ADVERTISEMENT
home / आरोग्य
गरोदरपणात महिलांना जोडीदाराच्या सहकार्याची का असते जास्त गरज 

गरोदरपणात महिलांना जोडीदाराच्या सहकार्याची का असते जास्त गरज 

गरोदरपणात स्त्रीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यात अनेक बदल होतात. जर ती पहिल्यांदा आई होणार असेल तर सर्व काही नवं असतं. बऱ्याचदा दोन बाळंतपणंही वेगवेगळ्या प्रकारची असू शकतात. शरीरात होणाऱ्या हॉर्मोनल बदलांचा नकळत मनावर परिणाम होत असतो. ज्यामुळे सतत मूड स्विंग अथवा नकारात्मकता मनात घर करते. अशा वेळी तिला सर्वात जवळचा असतो तिचा नवरा.. म्हणूनच या काळात गरोदर स्त्रीच्या पतीकडून काही माफक अपेक्षा असतात. जाणून घेऊ या कोणत्या…

गरोदरपणात पतीकडून या असतात महिलांच्या अपेक्षा

गरोदरपणाचा काळ अतिशय नाजूक आणि अविस्मरणीय असतो. यासाठीच या काळात दोघांनाही एकमेकांच्या साथीची गरज असते.

बाळाची चाहूल लागताच…

गर्भधारणा झाल्याापासून बाळाचा जन्म होईपर्यंत गरोदर स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होत जातात. जाणून घ्या गरोदरपणात बाळाची वाढ कशी होते (Stages Of Pregnancy In Marathi) हे सर्व बदल नव्याने माता पिता होणाऱ्या दोघांचे काही अविस्मरणीय क्षण असतात. सहाजिकच बाळाची लागलेली पहिली चाहुल दोघांनी एकत्र अनुभवावी असं स्त्रीला वाटत असतं. अशा काळात हे गोड क्षण अनुभवण्यासाठी पतीने तिच्यासोबत कायम असावं असं वाटणं स्वाभाविक आहे.

गर्भारपणातील तिचं रूप

स्त्रीच्या रूपाचं कौतुक सर्वात जास्त पतीला असतं. कारण ती नेहमी त्याच्यासाठी सुंदर दिसण्याचा प्रयत्न करत असते. मात्र स्त्री सर्वात जास्त सुंदर दिसते ती गर्भारपणात. कारण गर्भधारणेचं तेज तिच्या चेहऱ्यावर या काळात दिसतं. म्हणूनच हा बदल तिच्या पतीने अनुभवावा आणि तिचं कौतुक करावं असं तिला मनोमन वाटत असतं. गरोदरपणाचा काळ हा अतिशय भावनिक असतो. ज्यामुळे या काळात पतीकडून लाड करून घेणं हा तिचा हक्कच असतो. 

ADVERTISEMENT

बाळाशी संवाद

गर्भधारणा झाल्यापासून गर्भावर योग्य संस्कार करणं गरजेचं असतं. यासाठी या काळात  गर्भसंस्कार कौर्सेस आणि गर्भसंस्कारावर आधारित पुस्तकांचे वाचन करायला हवे. जाणून घ्या गर्भसंस्कार कसे करावे (Garbh Sanskar In Marathi) मात्र हे संस्कार फक्त मातेनेच नाही तर पित्यानेही करायला हवेत. यासाठी गर्भधारणा झाल्यापासून मातापिता दोघांनीही बाळाशी गर्भात असताना संवाद साधायला हवा. असं केल्याने पतीपत्नीच्या नात्यातील गोडवा वाढतोच शिवाय बाळाशी असलेली नाळ अधिक दृढ होते. 

डॉक्टरशी चर्चा

गर्भधारणा आणि बाळंतपण या अत्यंत नाजूक गोष्टी आहेत. त्यामुळे या संपूर्ण काळात डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा असतो. या काळात आपल्या गरोदर स्त्रीला डॉक्टरकडे नेणं आणि तिच्या आरोग्याचा तपशील ठेवणं हे पतीचं कर्तव्य आहे. त्यामुळे पतीने या काळात डॉक्टरांची अपाईंमेंट कधीच विसरू नये. शिवाय तिच्या आरोग्याची नेहमी काळजी घेणंही गरजेचं आहे.

कामाची जबाबदारी वाटून घेणे

एका स्त्रीला नेहमीच घर, मुलं, नोकरी आणि नातेसंबध अशा अनेक जबाबदाऱ्या एकहाती सांभाळाव्या लागतात. पण जर तुमची पत्नी गरोदर असेल तर तिच्या काही जबाबदाऱ्या आता कमी करण्याची गरज आहे. कारण कामाच्या ताणामुळे तिला मानसिक त्रास, अपुरी झोप अशा समस्या जाणवू शकतात. यासाठी गरोदरपण आणि बाळंतपणानंतर पतीने पत्नीला काम करताना पूर्ण पणे मदत आणि सहकार्य करावे.

भावनिक सहकार्य

मूड स्विंगमुळे, हॉर्मोनल बदलांमुळे या काळात स्त्रिया खूप चिडचिड करतात. अशा काळात जर त्यांना पतीची साथ आणि भावनिक सहकार्य मिळालं नाही, तर त्या नैराश्यात जाण्याची शक्यता जास्त असते. शिवाय या सर्व गोष्टींचा बाळावरही परिणाम होतो. यासाठीच या काळात पतीने आपल्या पतीला संपूर्ण भावनिक सहकार्य करावे. तिच्या मूड स्विंगला नियंत्रित ठेवण्यासाठी पत्नी सतत कशी आनंदी राहिल याची काळजी घ्यावी. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm  कडून एक मोफत लिपस्टिक

18 Apr 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT