पूर्वीच्या काळी त्वचेची काळजी घेण्यासाठी स्वयंपाकघरातील गोष्टींचा उपयोग केला जायचा. आजही अनेकांना ऑरगॅनिक आणि नैसर्गिक गोष्टींवर सगळ्यात जास्त विश्वास आहे. लोकांची ही आवड लक्षात घेता अनेक ब्युटी प्रोडक्टमध्ये अशाच ऑरगॅनिक गोष्टींचा उपयोग केला जातो. हळद, बेसन, मसुर डाळ, कडीपत्ता, कोथिंबीर, पुदीना अशा गोष्टींचा वापर केला. हळद हा त्यातील असा घटक आहे. ज्याचे अनेक फायदे आहेत. हळद ही अँटीसेप्टीक असून हळदीच्या आणि हळदीच्या दुधाच्या वापरामुळे त्वचेला अनेक फायदे होतात.. हळद ही कांती सुधारण्यासाठ, मुरुमं, पुरळ यांचा त्रास कमी होण्यासाठी मदत होते. त्वचेच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार हळदीचा उपयोग केला जातो. हळदीपासून वेगवेगळे फेस पॅक बनवता येतात ते कसे बनवायचे आणि त्याचे फायदे काय ?हे देखील जाणून घेऊया.
नाजूक त्वचेसाठी हळदीचे फेसपॅक (Haldi Face Pack For Sensitive Skin In Marathi)
नाजूक त्वचेची काळजी घेण्यासाठी उपयोग करताना थोडी काळजी घेण्याची गरज असते. हळदीसोबत तुम्ही नेमका कशाचा वापर करायला हवा हे देखील तुम्हाला माहीत हवे. जाणून घेऊया असे काही फेसपॅक.
हळद, अॅलोवेरा आणि गुलाबपाणी फेसपॅक (Haldi, Aloe Vera & Rose Water Face Pack)
तुमची त्वचा नाजूक त्वचेच्या प्रकारातील असेल तर हा घरगुती फेसपॅक तुमच्यासाठी फारच चांगला आहे. यामुळे तुमच्या त्वचेच्या अनेक समस्या कमी होतील. हा फेसपॅक त्वचा हायड्रेट करणारा असा आहे. गुलाबपाणी आणि हळद त्वचेच्या इतर समस्याही दूर करण्यास मदत करतात.
असा तयार करा फेसपॅक
- एक चमचा हळद, दोन चमचे अॅलोवेरा जेल आणि आवश्यकतेनुसार गुलाबपाणी घ्या.
- अॅलोवेरा जेलमुळे हा फेस पॅक थोडा जाड वाटतो. बोटांच्या मदतीने किंवा ब्रशने हा फेसपॅक लावा. साधारण 10 मिनिटे हा फेस पॅक ठेवून चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या.
हळद-कलिगंड फेस पॅक (Haldi & Watermelon Face Pack)
फळांचा उपयोग हा कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी अगदी योग्य असतो. हळदीसोबत त्याचा उपयोग केल्यामुळे त्याचे अधिक फायदे त्वचेला मिळतात. कलिगंडामुळे त्वचेला थंडावा मिळतो. तर हळद अँटी सेप्टीक पद्धतीने काम करतात. त्वचेवरील रॅशेश कमी करण्यास हा फेस पॅक मदत करते.
असा तयार करा फेसपॅक
- कलिंगडाचा गर काढून घ्या. त्यामध्ये एक चमचा हळद घेऊन पॅक एकजीव करुन घ्या.
- हा फेसपॅक चेहऱ्याला लावा. साधारण 10 मिनिटं हा चेहऱ्यावर ठेवा. 10 मिनिटांनी चेहरा हा पॅक चेहऱ्यावर थोडा मसाज करुन थंड पाण्याने काढून टाका.
ओट्स- हळद फेस पॅक (Oats and Haldi Face Pack In Marathi)
त्वचेवर आवश्यक असलेला तजेला आणि ग्लो देण्याचे काम ओट्स आणि हळद करते. ओट्समध्ये असलेले स्मुथिंग इफेक्ट त्वचेा आवश्यक असलेला ग्लो देतात.
असा तयार करा फेसपॅक
- एका भांड्यात एक चमचा ओट्स आणि अर्धा चमचा हळद घ्या.
- त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घ्या. ओट्स भिजायला थोडासा वेळ लागतो. त्यामुळे थोड्या वेळासाठी ते तसेच ठेऊन द्या.
- ज्या दिवशी तुम्ही या फेसपॅकचा उपयोग करणार असाल त्यावेळी तो ब्रशने चेहऱ्याला लावा. साधारण 15 मिनिटांसाठी तुम्ही हा फेसपॅक ठेवून द्या.
- कोमट पाण्याचा उपयोग करुन हा फेसपॅक स्क्रब करुन काढून टाका.
हळद- बेकिंग सोडा फेसपॅक (Haldi & Baking Soda Face Pack)
बेकिंग सोडा पोअर्स क्लिन करण्याचे काम करतो. पोअर्सची स्वच्छता करत पोअर्सचा आकार लहान करण्याचे काम हळद- बेकिंग सोडा करते. त्यामुळे जर तुमच्या चेहऱ्याव पोअर्स असतील तर तुम्ही हा फेसपॅक वापरु शकता.
असा तयार करा फेसपॅक
- एका भांड्यात एक चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा हळद घेऊन त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घाला.
- पाणी घातल्यानंतर बेकिंग सोडा फसफसतो त्यामुळे ते असतानाच तुम्ही तो चेहऱ्याला लावा. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील पोअर्स स्वच्छ होण्यास मदत मिळते.
- साधारण 10 मिनिटं हा फेसपॅक चेहऱ्यावर ठेवा. तुम्हाला तुमच्या चेहरा अधिक स्वच्छ दिसेल.
हळद-बेसन फेस पॅक (Haldi & Chickpea Face Pack)
त्वचेसाठी बेसन हे फारच फायद्याचे असते. टॅन दूर करणे, त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी करणे यासाठी बेसन हे उत्तम आहे. त्यासोबत हळदीचा उपयोग केला तर तुम्हाला हळद – बेसन फारच फायदेशीर आहे.
असा तयार करा फेसपॅक
- एक मोठा चमचा बेसन आणि अर्धा चमचा हळद घालून एकजीव करा.पाणी घालून त्याचा फेसपॅक तयार करा.
- ब्रशच्या मदतीने हा फेसपॅक लावा. साधारण 15 मिनिटांनी हा फेसपॅक काढून टाका.
- फेसपॅक काढून झाल्यानंतर तुम्ही त्यामध्ये मॉश्चरायझर लावा
तेलकट त्वचेसाठी हळदीचे फेसपॅक (Haldi Face Pack For Oily Skin In Marathi)
तेलकट त्वचेसाठी हळदीचा उपयोग करतानाही काही विशेष काळजी घ्यावी लागते. हे फेसपॅक तयार करताना तुम्ही हळदीसोबत काय वापरायला हवे आणि हे फेसपॅक कसे वापरायला हवे ते देखील जाणून घेऊया.
संत्रा रस आणि हळद फेसपॅक (Orange Juice And Haldi Facepack)
तेलकट त्वचेला उत्तम व्हिटॅमिन C देत त्वचा अधिक चांगले करण्याचे काम हा हळदीचा फेसपॅक करतो. हे बनवणे फार सोपे तर आहेच शिवाय त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील अतिरिक्त तेलही कमी होते.
असा तयार करा फेसपॅक
- एका भांड्यात दोन मोठे चमचे संत्र्याचा रस आणि अर्धा चमचा हळद घ्या.
- हा एक पातळ फेस पॅक आहे. त्यामुळे तो पटकन सुकतो. त्यामुळे हा पातळ मास्क तुम्ही साधारण 15 ते 20 मिनटं लावून ठेवा.
- थंड किंवा कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या आणि मग त्यानंतर चेहऱ्याला माॉश्चरायइझर लावा.
वाचा – चेहऱ्यावरील खड्डे जाण्यासाठी उपाय
हळद- लिंबू फेसपॅक (Haldi & Lemon Facepack)
लिंबू हे व्हिटॅमिन C ने युक्त असूनल लिंबाचे अनेक फायदे आहेत. लिंबामुळे त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी होते. त्वचेवरील डलपणा कमी होतो. त्वचेवरील पोअर्स कमी होऊन पिंपल्सशी निगडीत असलेला त्रासही कमी होण्यास मदत मिळते.
असा तयार करा फेसपॅक
- एका भांड्यात अर्धा चमचा लिंबाचा रस, अर्धा चमचा हळद आणि लिंबाच्या रसाच्या तुलनेत थोडे जास्त पाणी घ्या.
- लिंबाचा रस थेट चेहऱ्याला लावणे चांगले नाही. त्यामुळे त्वचेची जळजळही होऊ शकते. तयार पॅक त्वचेवर लावून 10 मिनिटे ठेवा. लिंबाचा रस जर जास्त जळजळ करत असेल तर तुम्ही तो पॅक लगेच धुवून घ्या.
चंदन- टोमॅटो- हळद फेसपॅक (Sandalwood, Tomato, Haldi Facepack)
टोमॅटो- चंदन आणि हळद हे कॉम्बिनेशही त्वचेसाठी फारच उत्तम आहे. चंदन- टोमॅटो त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी करुन चंदन त्वचेची कांती सुधारण्यास मदत करते.
असा तयार करा फेसपॅक
- एक चमचा चंदन, अर्धा चमचा हळद आणि एका टोमॅटोचा गर घेऊन त्याचा एक छान पॅक तयार करुन घ्या.
- हा पॅक थोडा घट्ट आणि जाड असेल पण असाच मास्क आपल्याला हवा आहे.
- तयार फेसपॅक चेहऱ्याला लावून 15 मिनिटांसाठी ठेवा आणि मग चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
अंड्याचा पांढरा बलक आणि हळद फेसपॅक (Lemon and Haldi Facepack)
तेलकट त्वचेसाठी अंड्याचा बलक हा देखील चांगले काम करतो. अंड्याचा पांढरा बलक हा त्वचेवरील अतिरिक्त तेल काढून त्वचेला एक वेगळा ग्लो देतो. सोबत अससेली हळद या पॅकला अधिक चांगले बनवते.
असा तयार करा फेसपॅक
- एका अंड्याचा पांढरा बलक घ्या. त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून हा पॅक चेहऱ्याला लावा.
- अंड्याचा पांढरा हा चेहऱ्यावर सुकतो. त्यामुळे त्वचा ही ताणली जाते. त्यामुळे हा फेसपॅक लावल्यावर बोलू नका. त्यामुळे तुमच्या त्वचेवर सुरकुत्या येतील .
हळद आणि मुलतानी माती फेसपॅक (Haldi & Multani Mitti FacePack)
मुलतानी माती ही देखील त्वचेसाठी वरदान आहे. त्याच्या वापरामुळेही त्वचेवरील अतिरिक्त तेल नियंत्रणात येते. हळद- मुलतानी माती हे कॉम्बिनेशनही उत्तम आहे. त्यामुळे तुमच्या त्वचेला तजेला मिळण्याही मदत होते.
असा तयार करा फेसपॅक
- एक चमचा मुलतानी माती आणि अर्धा चमचा हळद घेऊन त्यात आवश्यकतेनुसार पाणी घाला.
- तयार फेसपॅक चेहऱ्याला लावून तो 5 ते 10 मिनिटं चेहऱ्यावर ठेवा. नंतर चेहरा धुवून घ्या.
- हा फेसपॅक चेहरा कोरडा करु शकतो. त्यामुळे तुम्ही मॉश्चरायझर लावायला विसरु नका.
कोरड्या त्वचेसाठी हळदीचे फेसपॅक (Haldi FacePack For Dry Skin In Marathi)
कोरड्या त्वचेला हायड्रेट ठेवणे हे फार गरजेचे असते. कोरड्या त्वचेसाठी हळदीचा उपयोग करताना फेसपॅक हे वेगळ्या पद्धतीने बनवणे गरजेचे असते. कोरड्या त्वचेसाठी फेसपॅक बनवताना तुम्ही नेमकं काय करायला हवं ते जाणून घेऊया.
दुधाची मलई आणि हळद फेसपॅक (Malai & Haldi Face Pack)
दुधाच्या मलईमध्ये असलेला स्निग्धपणा तुमच्या त्वचेचा कोरडेपणा कमी करतो. तर हळद तुमच्या त्वचेचा रंग उजळवण्याचे काम करते.
असा तयार करा फेसपॅक
- एका भांड्यात दुधाची ताजी मलई घ्या. त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून एकजीव करुन घ्या.
- आता हा तयार मास्क संपूर्ण चेहऱ्याला लावा. वाळल्यानंतर कोमट पाण्याने धुवून टाका.
- याचा सतत वापर करु नका. कारण त्यामुळे तुमचा चेहरा अधिक तेलकट होऊ शकतो.
दुधाची मलई, मध आणि हळद फेसपॅक (Milk Cream, Honey & Haldi Face Pack )
दुधाची मलई- मध आणि हळद एकत्र करुनही तुम्ही एक उत्तम फेसपॅक बनवू शकता. यामुळेही तुमच्या कोरड्या त्वचेवर एक चांगला तजेला येतो.
असा तयार करा फेसपॅक
- दुधाची मलई, मध आणि हळद एकत्र करुन त्याचा एक छान जाडसर फेसपॅक बनवून घ्या.
- 10 मिनिटे चेहऱ्यावर ठेवून हा पॅक काढून टाका.
बेसन आणि हळद फेसपॅक (GramFlour And Haldi Facepack)
घरात असलेले बेसन अर्थात चण्याचे पीठ कोरड्या त्वचेला तजेला देण्याचे काम करते. बेसन हे त्वचा कोरडी करत असेल असे तुम्हाला वाटत असले तरीदेखील बेसनाच्या वापराने तुमची त्वचा अधिक चांगली आणि चमकदार दिसते
असा तयार करा फेसपॅक
- एक चमचा बेसन आणि अर्धा चमचा हळद घेऊन त्याची एक जाडसर पेस्ट तयार करुन घ्या.
- तयार फेसपॅक चेहऱ्याला लावा. दहा मिनिटांनी काढून टाका. हा पॅक काढून टाकल्यावर तुम्ही मॉश्चरायझर लावायला विसरु नका.
हळद आणि आरगन ऑईल फेसपॅक (Haldi & Argan Oil Facepack)
जर तुमचा चेहरा फारच कोरडा असेल तर तुम्ही हा फेसपॅक वापरुन पाहायला हवा. या फेसपॅकमुळे तुमच्या त्वचेला एक वेगळी चमक येईल शिवाय तुमची त्वचा अधिक चांगली दिसेल.
असा तयार करा फेसपॅक
- अर्धा चमचा हळद आणि आरगन ऑईल घेऊन एकत्र करा. जर तुम्हाला हा पॅक खूप तेलकट वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडे पाणी घालून घ्या.
- तयार फेसपॅक चेहऱ्याला लावून चांगला मसाज करा. वाळल्यानंतर हा पॅक धुवून टाका.
दही आणि हळद फेसपॅक (Curd Haldi FacePack)
दही हे जसे आरोग्यासाठी चांगले असते अगदी तसेच ते त्वचेसाठीही चांगले असते. त्वचेसाठी आवश्यक असलेला स्नि्गधपणा तुम्हाला यामुळे मिळू शकतो. हळद – दही एकत्रितपणे टाकल्यामुळे तुम्हाला त्याचा अधिक फायदा मिळू शकतो.
असा तयार करा फेसपॅक
- एक चमचा दही घेऊन ते छान फेटून घ्या. त्यामध्ये एक चमचा हळद घालून हा पॅक चेहऱ्याला लावा.
- दही वाळण्यास थोडा वेळ जातो. त्यामुळे तुम्ही थोडा जास्त वेळ ठेवा. काढताना ते चोळून चोळून काढा. म्हणजे तुमच्या त्वचेवरील केसही नैसर्गिकपद्धतीने निघून जातात.
तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)
हळदीचा रंग हा पिवळा असला तरी हळद शुद्ध असल्यास ती कालांतराने फिकी पडते. तुम्ही ती कितीही फोडणीत वापरली तरी त्याचा म्हणावा तसा पिवळा धम्मक रंग येत नाही. जर हळदीमध्ये कृत्रिम रंगाचा वापर केला असेल तर अशी हळद ही पिवळी धम्मक दिसत राहते. तिचा रंग खूपच गडद असतो. हळदीमध्येही भेसळ होते हे अनेकदा निदर्शनास आलेले आहे. हळदीमध्ये कृत्रिम रंग घातल्यामुळे त्याचा पिवळा जर्द असा रंग येतो. तुम्ही वापरत असलेली रंग अशी विचित्र पिवळी धम्मक दिसत असेल तर ती भेसळयुक्त आहे असे समजा. याशिवाय तुम्ही काही चाचण्या करुनही हळद भेसळयुक्त आहे की नाही ते ओळखू शकता.
त्वचेसाठी हळद हा सगळ्यात चांगला नैसर्गिक असा पर्याय आहे. त्याचे दुष्परिणाम नाहीत. पण काही जणांना हळदीचाही त्रास होतो. त्यांच्यासाठी हळद ही उष्ण किंवा अधिक त्रास देणारी ठरु शकते. त्यामुळे हळदीचा त्रास होणे न होणे हे प्रत्येकावर अललंबून आहे. त्यामुळे हळदीचा वापर करताना तुम्ही थोडा जपून करणेच गरजेचे आहे.
हळदीमध्ये अँटी सेप्टिक गुणधर्म असतात.जे तुमच्या जखमा भरुन काढतात. जखमा भरुन काढण्यासोबतच तुमच्या त्वचेवरील डागही काढून टाकण्यास मदत करते. पण हळदीच्या एका वापरात तुम्हाला हा निकाल मिळत नाही. तर तुम्हाला त्याचा काही काळासाठी योग्य पद्धतीने वापर करणे गरजेचे असते. त्यानंतर तुम्हाला इच्छित असलेला परिणाम त्वचेवर दिसून येतो.
हळदीचा उपयोग करुन तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार तयार करा हे फेसपॅक आणि त्वचेला मिळवा नवी झळाळी!
You Might Also Like