ADVERTISEMENT
home / Care
हेअर स्ट्रेटनरचा वापर करताना ही काळजी घ्यायलाच हवी

हेअर स्ट्रेटनरचा वापर करताना ही काळजी घ्यायलाच हवी

हेअर स्ट्रेटनर्स नियमितपणे वापरल्याने तुमचे केस खराब होऊ शकतात, विशेषतः जर ते आधीच कोरडे किंवा नाजूक झाले असतील तर हेअर स्ट्रेटनर्स नियमितपणे वापरूच नयेत किंवा वापरले तर केसांची निगुतीने काळजी घ्यायला हवी. बहुतेक मुलींना नेमक्या महत्त्वाच्याच दिवशी बॅड हेअर डे चा सामना करावा लागतो व तेव्हा त्यांना छान दिसण्यासाठी हेअर स्ट्रेटनर किंवा ब्लो-ड्रायरची मदत घ्यावी लागते. पण हेअर स्ट्रेटनरने सुपर स्लीक केस किंवा कर्लिंग आयरनच्या मदतीने रिंगलेट्स केले तर आपल्या केसांचे नुकसान कसे होते हे आपल्याला लक्षात यायला फार उशीर होतो. आणि एकदा केस खराब झाले की मग ते पूर्ववत करण्यासाठी प्रचंड मेहतन घ्यावी लागते. म्हणूनच आधीच काळजी घेतली तर केसांचे कमी नुकसान होईल. हेअर स्ट्रेटनर वापरल्याने तुमचे केस जर निस्तेज दिसत असतील तर तुम्हाला तुमच्या केसांसाठी काहीतरी करण्याची प्रकर्षाने गरज आहे.

दररोज हेअर स्ट्रेटनर वापरणे 

हेअर स्ट्रेटनर तुमच्या केसांना स्लीक लुक देतात हे खरे आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही एखाद्या खास प्रसंगासाठी स्टाइल करत असाल तेव्हा हेअर स्ट्रेटनर वापरायला हरकत नाही. परंतु ज्या महिला दररोज हेअर स्ट्रेटनर वापरणे पसंत करतात, किंवा  कधी कधी दिवसातून दोनदा हेअर स्ट्रेटनर वापरतात त्यांच्या केसांवर याचा गंभीर परिणाम होतो. 

hair straightener

कोरडे व निस्तेज केस 

जेव्हा हेअर स्ट्रेटनर जास्त वापरले जाते तेव्हा त्याचा विपरीत परिणाम केसांवर दिसून येतो. ज्या महिलांना अतिरिक्त प्रमाणात  हेअर स्ट्रेटनर वापरण्याची सवय असते, त्यांचे केस उष्णतेमुळे खराब होतात. अशा महिलांचे केस कोरडे असतात व त्यांना केस गळणे आणि इतर अनेक प्रकारच्या केसांच्या समस्यांचा त्रास होतो. हेअर स्ट्रेटनर वापरताना तुम्ही पुढील काळजी घेतली तर तुमच्या केसांचे कमी नुकसान होईल. निस्तेज केसांना सिल्की करण्यासाठी घरगुती उपाय देखील करता येतील.

हीट प्रोटेक्टंट स्प्रे किंवा सीरम वापरा

तुम्ही तुमच्या केसांवर स्ट्रेटनर किंवा ब्लो-ड्रायर वापरण्यापूर्वी केस सुरक्षित ठेवण्यासाठी केसांवर एखादा संरक्षक स्प्रे किंवा सीरम लावणे आवश्यक आहे. यामुळे ते हेअर स्ट्रेटनरची उष्णता आणि तुमचे केस यांमध्ये अडथळा म्हणून काम करते आणि केसांचा रंग व पोत अबाधित ठेवते. या स्प्रे किंवा सीरममुळे तुमच्या केसांना चमक तर मिळेलच पण ते निरोगी देखील राहतील. केसांना सिल्की बनवण्यासाठी आणि स्टाईलिंगसाठी हेअर सीरम वापरा.

ADVERTISEMENT

ऍडजेस्टेबल टेम्परेचर सेटिंग असलेले स्ट्रेटनर वापरा 

तुम्हाला केस स्ट्रेट करताना जळाल्याचा वास येत असेल किंवा आवाज येत असेल तर कदाचित तुमच्या स्ट्रेटनरचे तापमान तुमच्या केसांना सहन होत नाहीये. बाजारात पॉकेट फ्रेंडली किमतीत भरपूर हेअर आयर्न आणि ब्लो ड्रायर्स उपलब्ध असताना, थोडे जास्त पैसे देऊन आणि सिरॅमिक प्लेट्स असलेल्या हेअर स्ट्रेटनर किंवा आयर्नमध्ये गुंतवणूक करा. हे स्टीलच्या तुलनेत कमी नुकसानकारक आहेत. केसांसाठी ऍडजेस्टेबल टेम्परेचर सेटिंग्ज असलेल्या साधनांची निवड करा. तुमचे केस पातळ किंवा नाजूक असल्यास केसांची स्टाईल करताना कमी तापमान निवडा.

खराब झालेल्या केसांवर उपचार करा 

damaged hair

केसांची उत्पादने किंवा साधने वापरून केसांवर अनेक प्रयोग होत आहेत हे लक्षात घेता केसांचे काही प्रमाण नुकसान होणे स्वाभाविक आहे. पण यासाठी केसांची नियमित काळजी घेतली पाहिजे.  महिन्यातून एकदा तुमच्‍या हेअर स्‍पा करा आणि दर वीकेंडला तुमच्या केसांसाठी योग्य असा हेअर मास्क लावा. यामुळे तुमचे केस मऊ आणि निरोगी होतील. आयुर्वेदिक पद्धतीने सुद्धा केसांची काळजी घेणे चांगले आहे.

तसेच शक्य तितक्या वेळा तुम्ही हीटलेस हेअरस्टाइल वापरून पहा. व प्रत्येक वेळी केस धुतल्यावर सुकवण्यासाठी हेअर ड्रायर वापरणे टाळा. त्यांना निरोगी ठेवण्यासाठी ते नैसर्गिकरित्या कोरडे होऊ द्या. 

Photo credit- istockphoto

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

14 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT