ADVERTISEMENT
home / Friends
मैत्रिणीचं लग्न ठरलंय ? मग तुमच्या मनात हे विचार हमखास येणार

मैत्रिणीचं लग्न ठरलंय ? मग तुमच्या मनात हे विचार हमखास येणार

सध्या लग्नाचा मौसम सुरु झाला आहे. मौसमच म्हणायला हवं कारण या कालावधीत कित्येकांची लग्ने होत असतात. त्यातच जर तुमच्या मैत्रिणीचे लग्न ठरले असेल तर मग काही विचारालाच नको. अरे म्हणजे किती तयारी करायची असते आपल्याला. ग्रुपमधील इतर मैत्रिणींना  लगेच फोन लावायचा असतो आणि पुढचे प्लॅनिंग करायला घ्यायचे असते. तुमच्याही कोणत्या मैत्रिणींचे लग्न येत्या काही दिवसात किंवा महिन्यात आहे का? मग तुमच्या मनात या गोष्टी हमखास येणार.. हा आता हे प्रश्न, विचार मनात आले तरी टेन्शन घेऊ नका. कारण विचार काय येतच असतात. आम्ही असेच मनात येणारे विचार, प्रश्न मांडण्याचा प्रयत्न इथे केला आहे. तुम्हाला पटतो का बघा?

exited  friends

चेहऱ्यावर नैसर्गिक पद्धतीने आणा ग्लो

काय करु आणि काय नको

ADVERTISEMENT

 जर तुमची ही मैत्रीण शाळेपासूनची असेल. तर ही मैत्री खूप घट्ट असते. शाळेत कितीतरी वेळा मधल्या सुट्टीत असे विषय डबे खाता खाता आपण चघळलेले असतात. (तेव्हा लग्न म्हणजे काय? याची माहितीही नसते). त्यावर इतक्या चर्चा केलेल्या असतात की, आपण काय करणार? काय नाही या सगळ्याचा विचार पहिल्यांदा मनात येतो आणि तुम्ही To do ची लिस्ट तयार करायला सुरुवात करता.हल्ली टू डू लीस्ट पेपरवर करावी लागत नाही. फोनमध्ये नोट्स असतात. त्यामुळे जसं आठवेल तसं त्या लीस्टध्ये लिहलं जातं.

to do list

 ऑनलाईन सर्फिंग

आता मैत्रिणीचे लग्न ठरले म्हणजे तुम्ही पूर्ण वेळ घरी असाल असे होत नाही. लग्नात काय घालायचे काय  नाही हे सगळ्यात आधी मनात येते. मैत्रिणीचे लग्न म्हणजे कसं एकदम ‘झक्कास’ दिसायला हवे. सकाळी लग्नासाठी आणि रिसेप्शनला काय घालायचे? कोणत्या रंगाचे कपडे घ्यायचे? कपड्यांची काही थीम ठरवायची का? असे लाखो विचार मनात घोळायला लागतात. काही क्षणासाठी मस्त काम टाकून कोणत्या तरी ऑनलाईन वेबसाईवर तुम्ही भटकत राहता.

ADVERTISEMENT

online surfing

झटपट केस वाढवायचे आहेत? मग हे वाचाच

बॅचलर पार्टी करायची का?

जर शाळेतल्या मैत्रिणींचा ग्रुप असेल तर नंतर अनेकांचे मार्ग शाळेनंतर करीअरमुळे अनेकांचे मार्ग वेगळे होतात. करीअर,नोकरी, कामाचे ठिकाण सगळेच बदलल्यामुळे मैत्रिणींना फार कमी वेळ भेटता येते. आता ग्रुपमधील एका मैत्रिणीचे लग्न ठरले म्हटल्यावर लग्नाआधी भेटायला काहीतरी निमित्त हवे ना? मग काय मुलांप्रमाणे धिंगाणा घालणारी बॅचलर पार्टी करायची का? असा विचार मनात येतो. मग त्याचे प्लॅनिंग सुरु होते. नेमकी बॅचलर पार्टी कुठे करायची.बॅचलर पार्टीला काय कपडे घालायचे. हल्ली नाही का  ‘ब्राईट टू बी’ असे लिहिलेले टिशर्ट वगैरे बरेच काही मिळतात. ते विकत घेऊन झक्कास फोटोशूट करण्याचे बेत आखण्याचे विचार मनात येतात. त्यातच ‘फोर मोअर शॉटस’ सारख्या तुम्ही मैत्रिणी असाल तर पार्टी तो बनती है बॉस! कारण मनपसंत कपडे घालून मैत्रिणींसोबत एन्जॉय करण्याची हिच तर वेळ असते. कारण एकदा सगळ्यांची लग्न झाली की, मग तुमच्या भेटण्यावर नाही म्हटलं तरी थोडीफार बंधने येतात. 

ADVERTISEMENT

party girls 1

जुन्या साडीपासून तुम्हाला बनवता येतील असे मस्त ड्रेस

कुठे करायची पार्टी ?

पार्टी तो बस बहाना है,खरंतरं त्या निमित्ताने गॉसिप एक बहाना है… मुलींना गॉसिप करायला आवडते असा आरोप समस्त पुरुष प्रजाती करत असली तरी त्यात वाईट वाटण्यासारखे असे काहीच नाही. लग्नाआधी तर भन्नाट गॉसिप व्हायला हव्यात. कारण लग्नाच्या टेन्शन पासून तेवढाच तर एक विरंगुळा असतो. आत भन्नाट गॉसिप करण्यासाठी जागा पण चांगली हवी ना? थोडा वेळ काढायचाच ठरवला असेल तर मग लगेच अलिबाग,खंडाळा- लोणावळा, गोवा?अशा जागांवरील रिसोर्ट, छान हॉटेल्स सर्च केली जातात.

ADVERTISEMENT

party 3

थोडा वेटलॉस करु का? 

सगळ्या चर्चेमध्ये आणखी एक विचार डोकावतो तो वेटलॉसचा… कारण कसं असतं ना झक्कास दिसायचं असतं. पोट दिसेल असं काही घालयचं ठरवलं. तर मग एकदा आरशात पाहतोच. त्यातच जर पोट थोडसं सुटल आहे असं वाटायला लागलं की, मग उद्यापासून वर्कआऊट करायला घेऊ का? की डाएट करु असे विचार मनात यायला लागतात. वर्कआऊटचे माहीत नाही. पण त्या आधी कपडे मात्र नक्कीच मागवले जातात.  

workout

ADVERTISEMENT

‘मै चमकना चाहती हूँ’

मुलींसाठी मेकअप जितका महत्वाचा असतो. तितकेच त्यांना लग्नातही परफेक्ट दिसायचे असते. म्हणूनच चांगल्या त्वचेसाठी विशेष काळजी घ्यायला सुरुवात करतात. हल्ली तर फोनवर इतके अॅप आहेत की, तुमच्या चांगल्या त्वचेसाठी फुकट टिप्स देत असतात. मग अशा टीप्स देणारे अॅप लगेच डाऊनलोड केले जातात. तुम्हालाही अशा चांगल्या हेल्दी टीप्स हव्या असतील तर थोडे गुगल सर्च नक्की करा.

faical

शोध परफेक्ट गिफ्टसचा 

ADVERTISEMENT

मैत्रीमध्ये सहसा गिफ्ट येत नाही. पण आता तिचे लग्न होणार म्हटल्यावर तिला परफेक्ट गिफ्ट द्यायला हवे ना? तिला परफेक्ट गिफ्ट देण्याचा अट्टहास असतो.त्यासाठी मग सगळी दुकाने पालथी घातली जातात. कारण इतरवेळी काय देतो काय नाही यापेक्षा लग्नाला काय परफेक्ट देता येईल याचा शोध सुरु होतो.तुम्हाला असे परफेक्ट गिफ्टस हवे असते. जे पाहून तिच्या चेहऱ्यावर तुम्हाला आनंद दिसायला हवा असतो. 

आणखी एक मैत्रिणीचा ‘पत्ता कट’

आता याचा शब्दश:अर्थ घेऊ नका. कारण ग्रुपमधील एक मैत्रीण तिच्या आयुष्याची एक वेगळी सुरुवात करणार असते. तिच्या आयुष्यात अनेक नव्या व्यक्ती येणार म्हटल्यावर तिला आपल्यासाठी वेळ मिळेल का? असा प्रश्न पडतो. जिवाभावाच्या मैत्रिणीशी आता काही शेअर करायचे म्हणजे विचार करावा लागणार असा विचार मनात येतो आणि तुम्हाला हळवे करुन जातो. म्हणजे मैत्रिणीचे लग्न ही आनंदाची बातमी असली तरी तिने आपल्यापासून दूर जाऊ नये अशी इच्छा असते.

senti friends 

ADVERTISEMENT

आईला काय उत्तर देऊ?

आता तुमची चांगली मैत्रीण म्हटल्यावर तिच्या लग्नाची बातमी आईपासून थोडीच लपून राहणार आहे.. साधारण पंचविशी उलटायला लागली की, आया लग्नाच्या अगदी मागेच लागतात. म्हणे तुला घोडनवरी व्हायचे आहे का? आता तर तुझ्या आणखी एक मैत्रिणीचे लग्न ठरले.आता लग्न न करण्याची काय सबब देणार आहेस तू? असा एक प्रश्न तर आई विचारतेच शिवाय इतर प्रश्नांनीही भांडावून सोडते.त्यामुळे तिच्या प्रश्नांची रोखठोक उत्तरे देऊन तिला ‘लग्न’ या विषयावर कसे थांबवायचे या संदर्भातील विचार येऊ लागतात.

lily as mom

 ‘मेरा नंबर कब आयेगा’

ADVERTISEMENT

कधी कधी लग्न करायची इच्छा नसते. पण आजूबाजुला इतकं काही सुरु असते की, उगाच आपल्या मनातही ‘मेरा नंंबर कब आयेगा’ असे विचार यायला लागतात. अरे आता हिचे पण लग्न झाले. माझे काय? कोणी मुलगा मला पसंद करणार की मी अशीच आजन्म अविवाहित राहणार? आणि लग्न झाले नाही तर मी काय करणार? आई समजतेय त्या समजाला काय उत्तरे देणार? असे थोडे मेलेड्रामॅटिक विचार यायला लागतात.

anuska mera no kab aayega

 

(सौजन्य- GIPHY, Instagram)

ADVERTISEMENT

 

 

 

18 Feb 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT