ब्रेकअप हा असा फेज असतो की ज्यावेळी कोणाशीच बोलावेसे वाटत नाही. फक्त सोशल मीडियावर भावनांना ब्रेकअप कोट्सद्वारे वाट मोकळी करून दिली जाते. काही काळ तरी एकांतात राहण्यालाच अनेक जण पसंती देतात. या एकांतात रडणे, स्वत:च्या मनाला समजावणे, चूक कोणाची याचा विचार करणे, झाले ते ठिक झाले असे मनाशी पुटपुटणे अशा बऱ्याच गोष्टी एकाचवेळी मनात येतात. यातून बाहेर पडायचे असेल तर संगीत हे असे माध्यम आहे की, ते तुम्हाला रडवू ही शकते आणि क्षणार्धात तुमचा मूडही चांगला करु शकते. प्रेमात असताना प्रेमाची गाणी लागली तरी आपल्याला आपण अगदी मला वेड लागले प्रेमाचे या गाण्यासारखी फिलिंग येते. पण जर तुमच्या ब्रेकअपनंतर जर आजुबाजूला कोणीही ब्रेकअपची किंवा दुखात बुडवणारी गाणी ऐकवली की, लगेच डोळे पाण्याने भरुन येतात. तुमचाही ब्रेकअप झालाय?तुम्हालाही तुमच्या भावनांना वाट करुन द्यायची आहे? मग आज आम्ही तुमच्यासाठी मराठीतील ११ ब्रेकअप गाण्यांची यादी केली आहे. ही गाणी तुम्हाला नक्कीच रडवतील. पण ही गाणी ऐकून तुम्हाला दु:खाच्या गर्तेत जायचे नाही तर तुम्हाला ही गाणी ऐकून संपलेल्या नात्यातून कायमचे बाहेर पडायचे आहे. मग सुरुवात करायची का?
11 सर्वोत्तम मराठी चित्रपटातील गाणी आपण आपल्या तुटलेले हृदय बरे करण्यासाठी (Best Marathi Breakup Songs)
देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही
मराठीत मल्टीस्टार असलेल्या ‘दुनियादारी’ (2013)या चित्रपटातील हे गाणे आहे. हे गाणे आदर्श शिंदेच्या आवाजातील आहे. जर तुम्ही चित्रपट नसेल तर हा चित्रपट मित्रांची कथा आहे. कांदबरीवर आधारीत हा चित्रपट असून यात श्रेयस तळवळकर (स्वप्निल जोशी) आणि शिरीन घाटगे(सई ताम्हणकर) यांचे एकमेकांवर प्रेम असते. पण शिरीन तिचे लग्न दुसरीकडे ठरले असे सांगते. पण आयुष्यात मला तुझा सुखात पाहायचे आहे त्यामुळे तू मिनाक्षी ईनामदार(उर्मिला कानिटकर) याचे प्रेम स्वीकार असे सांगते. दुखावलेला श्रेयस थेट मिनाक्षीकडे जातो आणि तिला शिरीनसमोर i love you म्हणत प्रेम जाहीर करतो. त्यावेळी शिरीनला धक्का बसतो. त्यावेळी हे गाणे आहे.
नात्यात तुमच्यासोबतही होत असेल असे काही तर आताच करा ब्रेकअप
*तुमच्या बॉयफ्रेंडने जर तुम्हाला असेच दुखावले असेल तर तुम्ही या गाण्यामुळे तुम्हाला नक्कीच रडू येईल.
प्रेम की यातना
कधी वाटे मन का हरवते… आसू लपवून का मिरवते.. हे प्रेम की यातना….. टाईमपास (२०१४) या चित्रपटातील हे गाणे आहे. आता रवी जाधवचा हा चित्रपट पाहिला नसेल असे फार कमीच लोक असतील. शाळेतील त्या पहिल्या प्रेमाची आठवण करुन देणारे हे गाणे आहे. सुशिक्षित घरात वाढलेली प्राजक्ता (केतकी माटेगावकर) आणि कित्येक वेळा एकाच इयत्तेत नापास होणाऱ्या दगडूचे (प्रथमेश परब) यांचे सूत जुळून येते. पण हर लव्हस्टोरीमध्ये एक तरी विलन असतो. तसे या दोघांच्या लव्हस्टोरीमध्ये शाकाल (वैभव मांगले) म्हणजेच प्राजक्ताचे वडील विलन म्हणून ते येतात. न कळत्या वयात एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या या दोघांना वेगळे केले जाते. त्यावेळी त्यांच्या मनात दाटून आलेली ही भावना या गाण्यात दाखवण्यात आली आहे. हे गाणे इतके शांत आहे की, आपसुकच डोळ्यात पाणी येते. म्हणजे ब्रेकअप झाला नाही तरी
डेटवर अशा चुका करणे तुम्हाला पडू शकते महागात
संया
TTMM ‘म्हणजेच तुझं तू माझं मी’ या चित्रपटातील हे गाणे हा चित्रपट २०१७ साली रिलीज झाला. ललित प्रभाकर आणि नेहा महाजन ही जोडी पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर आली. जय (ललित प्रभाकर) आणि राजश्री (नेहा महाजन) …एका प्रवासात ते एकमेकांना भेटतात. प्रेमात न पडता ते एकमेकांशी लग्न करतात. त्यांच्या लग्नामुळे त्यांच्या दोन्ही घरातील माणसे खूश असतात. पण हे नाते निभावताना राजश्रीला कठीण जाते कारण तिला आपण पालकांशी खोटे बोलून या नात्यात राहत आहोत असे वाटत राहते आणि ती जयशी वेगळे होण्याचा निर्णय घेते. पण त्यानंतर तिचे आयुष्य पूर्ववत होत नाही. जयच्या सहवासाची तिला इतकी सवय झालेली असते की, तो विरह ती सहन करु शकत नाही. हा दुरावा दाखवणारे हे गाणे आहे. जर तुम्हीही आयुष्यात असा काही निर्णय केवळ तुमच्या स्वार्थासाठी घेतला असेल तर हे गाणे तुम्हाला रडवू लागते.
वाचा – चिंब पावसानं रान झालं आबादानी (Lata Mangeshkar Marathi Songs)
जहाँ तुझे पाऊ
‘प्यारवाली लव्हस्टोरी’मधील हे गाणे आहे. २०१४ साली हा चित्रपट आला. ही लव्हस्टोरी पुन्हा एकदा लव्ह ट्रँगल असणारी होती. त्यामुळे लव्ह ट्रँगल आला म्हटल्यावर नात्यात तणाव आलाच अगदी तशीच या चित्रपटाची स्टोरी आहे. पण यात ट्विस्ट आहे तो म्हणजे हिंदू मुलगा आणि मुस्लिम मुलगी अशी ही प्रेम कहाणी दाखवण्यात आली आहे. अमर (स्वप्निल जोशी) आणि आलिया (सई ताम्हणकर) यांचे एकमेकांवर प्रेम असते. पण त्यांचे ते प्रेम पूर्ण होऊ शकत नाही. अमरचे लग्न त्यांच्या चाळीतील मिनाक्षी (उर्मिला कानिटकर) सोबत होते.अशी एकंदर या चित्रपटाची कथा आहे. आता ‘जहाँ तुझे पाऊ’ म्हल्यावर तुम्हाला हे गाणे हिंदी आहे असे वाटेल. तर हो हे गाणे हिंदीत आहे. पण मराठीत सुफी गाणे ट्राय करण्याचा हा पहिलाच प्रयत्न करण्यात आला आहे. हे गाणेही तुम्हाला तुमच्या भावनांना वाट करुन देण्यासाठी हे गाण मस्त आहे.
ब्रेकअपवर मात कशी करावी हे देखील वाचा
दूर दूर
२०१५ साली आलेल्या ‘मितवा’ या चित्रपटातील हे गाणे आहे. हे गाणे स्वप्निल बांदोडकर आणि बेला शेंडे यांच्या आवाजातील आहे. पेटल आभाळ सार.. पेटला हा प्राण रे अशी या गाण्याची सुरुवात होते आणि रडूच कोसळते. शिवम (स्वप्निल जोशी), अवनी (प्रार्थना बेहरे), नंदिनी (सोनाली कुलकर्णी) यांची कथा आहे. शिवम हा श्रीमंत आणि प्रेमावर विश्वास न ठेवणारा बॅचलर पण नंदिनीच्या प्रेमात पडतो. पण नंदिनीसमोर जेव्हा तो प्रेमाची कबुली देतो तेव्हा मात्र ती त्याचे प्रेम नाकारते. चित्रपटातील स्टोरी जरी क्रिटीकल असली तरी या चित्रपटातील हे हार्ट ब्रेक करणार हे गाणं मात्र रडवणारं आहे.
Also Read Breakup Movies In Marathi
सिंगल स्टेटस असण्याचेही असतात भरपूर फायदे
उसवले धागे
‘मंगलाष्टक वनस्मोर’ या चित्रपटातील हे गाणे आहे. २०१३ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला. मुक्ता बर्वे आणि स्वप्निल जोशी ही जोडी पुन्हा एकदा या चित्रपटातून पाहायला मिळाली. या चित्रपटाची लव्हस्टोरी थोडी वेगळी आहे असे म्हणायला हवे. कारण आरती (मुक्ता बर्वे) आणि सत्यजीत (स्वप्निल जोशी) यांचे लग्न झालेले आहे. लग्नाच्या काही वर्षानंतर आरतीची काळजी सत्याला नकोशी होते आणि ते दोघे वेगळे होतात. पण आरतीला तरीही सत्याची काळजी असते पण ही काळजी घेताना ती पार्टनरला काय हवे त्याचा विचार करत नाही. त्यामुळेच त्यांच्या नात्यात कटुता आलेली असते. एखादी व्यक्ती आयुष्यातून निघून गेल्यानंतर मग त्याची पोकळी जाणवून देणारे हे गाणे आहे. एखाद्यावर खूप प्रेम केल्यानंतर त्याने अचानक सोडून जाणे मनाला चटका लावून जाते.
*तुम्हीही तुमच्या पार्टनरबाबत फार पझेसिव्ह असाल तर तुम्ही या चित्रपटातून दुसऱ्याला काय हवे ते जाणून घेणे किती महत्वाचे असते हे कळेल. कदाचित तुम्हाला तुमचे उसवलेले धागे पुन्हा शिवता देखील येतील.
खेळ मांडला
‘नटरंग’ या चित्रपटातील हे गाणे आहे. हे गाणं तसे थेट ब्रेकअपचे आहे असे म्हणता येणार नाही. पण या चित्रपटात काय चित्रित करण्यात आलेला भाग वगळता या गाण्याचे बोल थेट तुमच्या ह्रदयाला जाऊन भिडतात. हे गाणे अतुल कुलकर्णीवर चित्रित करण्यात आले आहे. नटरंग चित्रपटाची कथा तुम्हाला माहीत असेल तर लावणीच्या फडात नाच्या म्हणून काम करण्यासाठी अतुल कुलकर्णी सगळ्यांच्या, समाजाच्या विरोधात जातो. पण असे करत असताना तो त्याच्या कुटुंबापासून दूर जातो. स्वत:च्या बायका मुलांपासून दुरावतो. चित्रपटात ही परिस्थिती दाखवली असली तर त्याचे बोल नात्यात आलेल्या दुराव्याला इतके चांगले टिपतात की, तुमच्या नात्यात दुरावा आला की हे गाणे रडवून जातो.
ब्रेकअप के बाद
SAY या बँडचे हे गाणे तर कॉलेज विश्वात चांगलेच गाजले. अजूनही ब्रेकअप म्हटले की, हे गाणे आठवतेच. एकटी तू एकटा मी… ना घेतले कोणी समजूनी…. असे या गाण्याचे बोल आहेत. आता ब्रेकअप तेव्हाच होते. जेव्हा तुम्ही एकमेकांना समजून घेत नाही. हे गाणे मुंबईतील रुईया महाविद्यालयात शूट करण्यात आले आहे. या गाण्यात अनिकेत विश्वासराव आणि पल्लवी पाटील आहेत. पण त्या गाण्यातही ब्रेकअपनंतर त्यातून बाहेर आलेला अनिकेत दाखवला आहे. पण गाण्याच्या सुरुवातीच्या काही ओळी तुम्हाला रडायला भाग पाडतात. तर या गाण्याचे बोल असे आहेत.
एकटी तू एकटा मी
ना घेतले कोणी समजूनी…..
फिके वाटे जग सारे जेव्हा येती साऱ्या आठवणी…..ब्रेकअपनंतर हीच भावना आपल्या मनात असते.
जीव हा सांग ना
कसा सांग उरातला घाव विसरावा
वनवा हा जिव्हारी चा सांग विझवावा
कशापाई जडवावा
गुंतवावा सोडवावा
कितीदा नि कुणासाठी
आसवात भिजवावा
जीव हा… सांग ना
‘तुही रे’ या चित्रपटातील हे गाणे आहे. सिद्धार्थ (स्वप्निल जोशी) आणि भैरवी (तेजस्विनी पंडीत) यांचे एकमेकांवर प्रेम असते. पण त्यांचे ब्रेकअप होते आणि स्वप्निलचे लग्न नंदिनी (सई ताम्हणकर)शी होते. जेव्हा नंदिनीला सिद्धार्थच्या आयुष्यातील ही गोष्ट कळते तेव्हा ती सगळी परिस्थिती समजून घेते आणि सिद्धार्थला भैरवीला भेटण्याची परवानगी देते. ज्यावेळी तुमच्या नवऱ्याचे कोणाशी अफेअर आहे असे कळाल्यावर काय परिस्थिती ओढावते या बाबत काहीच सांगायला नको. (पण त्यानंतर दाखववलेला नंदिनीचा समजुतदारपणा देखील तितकाच महत्वाचा आहे.) त्या क्षणी तुमच्या मनात दाटलेल्या भावना याच गाण्यातून व्यक्त होतात.
सुन्या सुन्या
आता तुम्हाला जुने गाणे आठवले असेल. पण थांबा हे गाणे टाईमपास २ मधील आहे.
सुन्या सुन्या…. मनामध्ये सूर हलके
नव्या जुन्या आठवणी…. भास परके
असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यामध्ये पुन्हा एकदा प्राजक्ता आणि दगडूमध्ये येणाऱ्या विरहाचे हे गाणे आहे. हे गाणे केतकी माटेगावकर आणि आदर्श शिंदे यांनी गायले आहे. एकदा वेगळे होऊन पुन्हा एकत्र येणे आनंद देणारे असते. पण त्यानंतर पुन्हा विरह येणे दु:खाच्या गर्तेत ढकल्यासारखे असते. या गाण्यातही प्राजक्ताचे लग्न दुसऱ्यासोबत होण्याचा प्रसंग दाखवण्यात आला.
का जीव गुंततो
का हा जीव गुंततो… का लागते ओढ मनाला…. ब्रेकअप झाल्यानंतर परफेक्ट गाणे असेल तर स्लॅमबुक चित्रपटातील हे गाणे. २०१५ साली हा चित्रपट रिलीज झाला होता. शांतनु रांगणेकर आणि रितिका श्रोत्री यांनी हे गाणे ऐकले आहे. हे गाणे नव्या काळातील असल्यामुळे या गाण्यातील बीट्स मनाचा ठाव घेतात. खऱ्या प्रेमाच्या शोधात सगळीच जण असतात. पण आयुष्याच्या वळणावर असे काही झाले की, मग प्रेमावरचा आपला विश्वास उडून जातो.
*तर ही झाली ब्रेकअपची गाणी. पण ब्रेकअपची गाणी जितकी रडवणारी असतात तितकीच ती शिकवणारी असतात आणि ती तुम्हाला शिकवणारी वाटत नसली तरी त्यातून काहीतरी शिका. कारण आयुष्य एकदाच मिळते. प्रेम अनेकवेळा होऊ शकते. पण कोणाच्या मनाला दुखावण्यासारख्या गोष्टी कधीच करु नका.
*ब्रेकअपनंतर थोडावेळ स्वत:ला सावरण्यासाठी घ्या. तुम्हाला तुमची फसवणूक झाली असे वाटत असेल तरी शांत राहा. समोरच्याला त्याची चूक कळू ्द्या.
*सारखे फोन, मेसेज करुन एकमेकांना त्रास देऊ नका.
*आम्ही सांगितलेली मस्त ब्रेकअपची गाणी ऐका आणि भावनांना वाट करुन द्या. तुम्हाला खरेच बरे वाटेल. तुमचे रडून झाले की, मस्त अशी रॉकिंग गाणी लावून मनसोक्त नाचा.
सौजन्य- Youtube
You Might Also Like