तुम्हाला जर तुमची जीवनशैली उत्कृष्ट हवी असेल तर आपल्या आयुष्यात योगाचा समावेश करून घ्या. योगा केल्यामुळे आपलं शरीर नेहमी निरोगी आणि चांगलं राहातं. मात्र योगा करत असताना याच्या नियमांचं पालन करणंही आवश्यक आहे. निरोगी शरीर देणारा योगा आपण करण्यापूर्वी आणि करत असताना नक्की कोणत्या खासस गोष्टी करायला हव्यात याची माहिती करून घेणंही गरजेचं आहे. जाणून घेऊया योग करत असताना तुम्हाला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी.
1 – योगा करत असताना मध्येच अजिबात पाणी पिऊ नये. असं केल्यास, तुम्हाला अलर्जी, सर्दी, खोकला अथवा कफ अशा तऱ्हेच्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
2 – योगा हा नेहमी सकाळी रिकाम्या पोटी आणि पोट साफ झाल्यानंतरच करायला हवा. अन्यथा योगा केल्याचा कोणताही फायदा तुम्हाला होणार नाही.
3 – योग करत असताना तुम्ही शरीरावर कमीत कमी आणि सैलसर कपडे घाला. त्यामुळे तुम्हाला स्वतःला हलकं वाटेल. शरीरामध्ये कोणताही जडपणा आणि ताण तुम्हाला त्यामुळे जाणवत राहणार नाही.
4 – योगा नेहमी मोकळ्या आणि स्वच्छ जागीच करावा. उन्हाळ्यात तुम्ही तुमच्या बाल्कनी अथवा बागेमध्ये योगा करू शकता आणि हिवाळ्यात तुम्ही अशी रूम शोधा जिथे मोकळी हवा आणि चांगला उजेड येत असेल. पावसाळ्यातही तुम्ही अशाच रूमचा वापर करा.
5 – योगा करताना सर्वात पहिले सोप्या आसनाने सुरुवात करावी आणि मग कठीण आसन करावं हे नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला कधीही थकवा येणार नाही आणि शरीरालादेखील आराम मिळेल.
6 – योगा हा नेहमी एखाद्या तज्ज्ञांंच्या देखरेखीखालीच करावा किंवा तुम्हाला याचा पहिला अनुभव असेल तर तुम्ही योगा करा. चुकीचं आसन करण्यामुळे कंबरदुखी, गुडघेदुखी अथवा तुमच्या मसल्समध्ये दुखापत होण्याची शक्यता निर्माण होते.
7 – योगा नेहमी अशा जागी करावा जिथली जमीन सपाट असते. बेड अथवा सोफ्यावर बसून योगा करणं हे कधीही योग्य नाही.
8 – योगा केल्यामुळे शरीरामध्ये खूपच उष्णता निर्माण होते त्यामुळे योगा केल्यावर लगेच आंघोळ करू नये. त्यामुळे तुमच्या शरीरावर चुकीचा परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे योगा केल्यावर एक तासाने आंघोळ करावी हे नेहमी लक्षात ठेवा.
9 -नियमित स्वरूपात तुम्ही कोणतंही आसन करत असल्यास, तुम्हाला शरीरामध्ये कोणताही ताण अथवा दबाव निर्माण झाल्याचं जाणवत असेल तर हे आसन करू नका. तसंच याबाबत तुमच्या ट्रेनरला नक्की सांगा.
10 – तुम्हाला अंगात ताप असेल अथवा कोणत्याही दुसऱ्या एखाद्या आजाराने त्रस्त असाल तर तुम्ही त्या दिवशी योगा करू नये. तसंच मासिक पाळीदरम्यान तुम्हाला जास्त रक्तस्राव होत असल्यासही योगा करू नये.
फोटो सौजन्य – Shutterstock
हेदेखील वाचा –
वेटलॉससाठी करून पाहा ‘ही’ योगासनं
मालदीव्सच्या सुंदर किनाऱ्यावर मलायकाचा ‘हॉट’ योगा
प्रियांका चोप्राचा फिटनेस, डाएट आणि ब्युटी मंत्रा जाणून घ्या