हाताच्या रेषा दर्शवतात तुमचं करिअर

हाताच्या रेषा दर्शवतात तुमचं करिअर

प्रत्येक जण हल्ली आपण नक्की कोणतं करिअर निवडायचं या द्विधा मनस्थितीत असतो. असं कोणतं करिअर आहे ज्यामुळे आपलं आयुष्य योग्य मार्गावर येईल. आपलं येणारं भविष्य कसं असेल आणि आपलं करिअर कसं असेल हे जाणून घेणं खरं तर कठीण आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? तुमच्या हातावरील रेषा तुमचं भविष्य अर्थात तुम्हाला कोणत्या करिअरमध्ये यश मिळेल हे दर्शवतात. अर्थात हे मानायचं की नाही हा नेहमीच वादाचा विषय ठरला आहे. पण तरीही हा एक अभ्यास आहे. ज्याप्रमाणे इतर विषयांचा अभ्यास असतो त्याचप्रमाणे हस्तरेषा हादेखील एक अभ्यास आहे आणि हा अभ्यास ज्या व्यक्तींनी योग्यरित्या केला आहे, त्यांना याबाबत योग्य ज्ञान असतं. हस्तरेषा विज्ञानाबाबत आपण काही माहिती घेऊ.


hastresha


- हाताच्या अंगठ्यावरून जी रेषा हाताच्या बाजूला खाली येते त्या रेषेला जीवनरेषा अर्थात लाईफलाईन असं म्हटलं जातं


- मध्यमा अर्थात मिडल फिंगरच्या दिशेने जी रेषा जाते त्याला भाग्यरेषा असं म्हणतात, ही हाताच्या बेसपासून सुरु होते


- हाताचं पहिलं बोट हे गुरू, दुसरं बोट शनी, तर तिसरं बोट हे रवी आणि चौथं अर्थात सर्वात लहान बोट तर्जनी हे बुध ग्रहाशीसंबंधित असल्याचं सूचक आहे.


- हाताच्या तळव्यावर अगदी खाली अर्थात तर्जनीच्या समोर चंद्राचं स्थान असतं


- जीवनरेषेच्या एकदम वर अर्थात तीन रेषांच्या मध्ये जी रेषा असते ती मतिष्क रेषा असते. या रेषेच्या वर मुख्य असणारी रेषा म्हणजे हृदयरेषा आहे.


जाणून घ्या, कशा प्रकारे हस्तरेषा दर्शवते करिअर


hastresha 1


1 - तुमच्या जीवनरेषेपासून जर एखादी रेष गुरू अर्थात पहिल्या बोटाच्या दिशेने जात असेल तर तुमचं लिखाण कौशल्य उत्तम असून तुमच्यामध्ये लीडरशीपचे गुणही असतात. तुम्हाला परदेशात जायची संधी असून शिक्षण, बँकिंग आणि कोर्टकचेरी क्षेत्रातही तुम्हाला चांगला वाव मिळण्याची संधी असते. पण या रेषेवर जर मध्ये मध्ये कटमार्क्स असतील तर याचा परिणाम कमी होतो. तुम्हाला या क्षेत्रांमध्ये म्हणावं तसं यश लाभत नाही. तग धरण्यापुरतं तुम्ही या क्षेत्रांमध्ये कार्यरत होऊ शकता.


2 - तुमच्या जीवनरेषेपासून एखादी रेषा निघून शनी अर्थात मोठ्या बोटाच्या दिशेने जात असेल तर तुम्ही ज्योतिषी अथवा चांगले तांत्रिक होऊ शकता. कोळशाची खाण, रिअल इस्टेट, लोखंड, तेल अथवा मशीनरी व्यवसायातही तुम्ही तुमचं नशीब आजमवू शकता.


3 - तुमच्या जीवनरेषेपासून जी रेषा रवीच्या दिशेने अर्थात तुमच्या अनिमिका बोटाच्या दिशेने येत असेल तर तुम्ही एक कलाकार असल्याचं हे चिन्ह आहे. तुम्ही एक चांगले गायक अथवा डान्सर होऊ शकता. तसंच तुम्ही सरकारी अधिकारी अथवा मोठ्या पदावर अधिकारी म्हणून काम करू शकता. तुम्हाला खूपच प्रसिद्धी मिळू शकते.


4 - जीवनरेषेपासून निघणारी रेषा जर बुध अर्थात तर्जनीच्या दिशेने  जात असेल तर तुम्ही अतिशय बुद्धीमान व्यक्ती म्हणून ओळखले जाता. अशा व्यक्ती गणितज्ञ, वैज्ञानिक, वक्ता, खेळाडू आणि पत्रकारितेसारख्या क्षेत्रामध्ये चांगलं नाव कमावतात.


5 - तुमच्या जीवनरेषेपासून रेषा निघून जर चंद्राच्या दिशेने जात असेल तर तुम्ही परदेशात शिक्षणासाठी जाऊ शकता आणि त्याचबरोबर शिपिंग, इम्पोर्ट-एक्सपोर्ट आणि फूड बिझनेसमध्ये तुम्ही चांगलं काम करू शकता.


6 -  तुमची भाग्यरेषा गुरू अर्थात पहिल्या बोटाच्या दिशेने जात असेल तर तुम्हाला सरकारी नोकरीमध्ये उच्च पद मिळण्याची संधी चालून येते. तसंच या व्यक्ती अतिशय नशीबवान असल्याचंही म्हटलं जातं.


7 - तुमच्या भाग्यरेषेपासून निघणारी रेषा ही तुमच्या अनामिका अर्थात रिंग फिंगरच्या दिशेने जात असल्यास, तुम्ही अतिशय धनवान व्यक्तींपैकी एक असता. तसंच तुमचं तुमच्या करिअरमध्ये खूपच चांगलं नाव असून तुम्ही प्रसिद्ध व्यक्ती म्हणून गणले जाता.


8 - तुमच्या भाग्यरेषेपासून निघणारी रेषा ही बुध अर्थात तर्जनीच्या दिशेने जात असल्यास, तुमच्यासाठी विज्ञान अथवा व्यवसाय करणं हा चांगला पर्याय आहे. तुम्ही व्यवसायाच चांगलं नाव कमावू शकता. तसंच तुम्ही अतिशय बुद्धिमान म्हणूनही ओळखले जाता.


हेदेखील वाचा - 


राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली


जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम'


राशीनुसार निवडा तुमचे करिअर