आजकाल दिवसेंदिवस पोटाच्या समस्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पोटाचे विकार होण्यामागची कारणे विविध असू शकतात. मात्र बदलेली जीवनशैली, वाढते प्रदूषण, खाण्याच्या चुकीच्या सवयी, व्यसन, अस्वच्छता, अपुरी झोप आणि मानसिक अस्वास्थ यामुळे तुमच्या पोटाचे स्वास्थ बिघडण्याची शक्यता अधिक असते. यासाठीच शांत झोप येण्याचे उपाय वेळीच करा. या सर्व गोष्टींमध्ये तुमच्या पचनक्रियेवर हळूहळू परिणाम होऊ लागतो. पचनक्रिया बिघडल्यास विविध आजारपणं पाठी लागतात. यासाठी नेहमी पोट नैसर्गिक पद्धतीने स्वच्छ करायला हवं. यासोबतच पोटाचे विकार आणि पोट फुगणे उपाय (pot fugane upay in marathi) जाणून घ्या.
पोटाच्या विकारांचे प्रकार (Types Of Bowel Disorders In Marathi)
1. अपचन (Indigestion)
अन्नाचे पचन नीट न झाल्यामुळे तुम्हाला अपचनाचा त्रास जाणवू लागतो. यामुळे पोट फुगते आणि ओटीपोटातून वेदना जाणवू लागतात. त्यासाठी अपचन उपाय जाणून घेणे गरजेचे आहे. अन्नाचे पचन नीट न झाल्याने ते आतड्यांमधून पुढे सरकण्यास त्रासदायक ठरते. ज्यामुळे आतड्यांमध्ये फुगवठा निर्माण होतो आणि पोट फुगते. या प्रक्रियेत अडथळा आल्यामुळे पोटात अडकले अन्न सडू लागते. सडलेल्या अन्नामुळे पोटात गॅस निर्माण होतो. ज्यामुळे पोटात वेदना जाणवू लागतात. यासाठीच पोट फुगणे उपाय (pot fugane upay in marathi) करणं गरजेचं आहे. जाणून घेऊया पोटाचे विकार आणि उपाय खालील प्रमाणे.
अपचन लक्षणे (Symptoms)
- पोट फुगणे
- पोटात गॅस होणे
- पोटदुखी
- मलावरोध
अपचन कारणे (Causes)
- चुकीची जीववशैली
- अयोग्य आहार
- अवेळी जेवणे
- अती खाणे
- रात्री उशीरा जेवण
- रात्रीची अपुरी झोप
- वेदनाशामक औषधे
अपचन घरगुती उपाय (Home Remedies For Indigestion)
- ओवा तव्यावर भाजून तो चावून खा आणि त्यावर कोमट पाणी प्या ज्यामुळे तुम्हाला लगेच आराम मिळेल. ओवा खाल्ल्याने फायदा होतो आणि त्वरीत आराम मिळतो.
- आल्याच्या रसामध्ये सैंधव आणि हिंग टाकून चाटण घ्यावे. हा पोट फुगणे उपाय (pot fugane upay in marathi) उत्तम आहे.
- आल्याचे छोटे तुकडे करा त्यावर मीठ टाकून ते चावून खा. आल्याच्या रसामुळे तुमच्या पोटातील गॅस बाहेर पडतो आणि पोटदुखी कमी होते.
- जेवणापूर्वी जिरेपूड आणि सुंठ एक चमचा लिंबाच्या रसासोबत घ्या. सुंठ आणि जिऱ्यामुळे जेवण पचण्यास मदत होईल.
- पाण्यात हिंग टाकून ते पाणी प्या आणि थोडेसे पोटावर लावा. हिंगाच्या वासामुळे अपचन (apachan upay in marathi) झाल्यामुळे होणारा अस्वस्थपणा कमी होईल. गॅस कमी झाल्यामुळे आराम मिळेल.
- दररोज सकाळी एक पिकलेले केळे खावे.
- आहारात फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करावे.
2. इरिटेबल बोवल सिंड्रोम अथवा आय.बी.एस (Irritable Bowel Syndrome)
जर एखाद्या व्यक्तीला सलग तीन ते चार महिने सतत पोटदुखी, गॅस, बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवत असेल तर अशा व्यक्तीला इरिटेबल बोवल सिंड्रोम झालेला असण्याची शक्यता अधिक असते. आयबीएस हा विकार पोट आणि आतड्यांशी संबधित असून त्यामुळे आतड्यांना सूज येते. आयबीएस विकारामुळे मलावरोध होतो ज्यामुळे शौचाला साफ होत नाही. एका संशोधनानुसार वृद्ध लोकांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवते. याचे प्रमुख कारण वयस्कर लोकांमध्ये असलेली व्हिटॅमिन डीची कमतरता असू शकते. व्हिटॅमिन डी युक्त सप्लीमेंट घेतल्यानंतर काही काळ मलावरोध आणि पोटाची सूज कमी झाल्याचे दिसून येते. यासोबतच या आजाराचा तुमच्या मानसिक अवस्थेशी देखील संबध असतो. अती ताणतणाव आणि नैराश्य यामुळे देखील हा आजार होऊ शकतो. म्हणून पोटाचे आजार व उपचार करणे गरजेचे आहे.
वाचा – हिपॅटायटिस संसर्गाचे प्रकार
लक्षणे (Irritable Bowel Symptoms)
- तीव्र पोटदुखी
- मलावरोध
- जुलाब
- पोट फुगणे
- गॅस होणे
कारण (Irritable Bowel Causes)
- अयोग्य आहार
- मैद्याचे पदार्थ खाणे
- निद्रानाश
- व्यसनांच्या आहारी जाणे
- बैठी कामे करणे
- ताणतणाव
- नैराश्य
- म्हातारपण
- व्हिटॅमिन डीची कमतरता
पोट गच्च होणे यावर उपाय (Pot Gaccha Hone Upay)
- कोमट पाणी प्या ज्यामुळे पोटाला आराम मिळेल. कोमट पाण्यामुळे पोटातील गॅस बाहेर पडण्यास मदत होते.
- एक ग्लास कोमट पाण्यासोबत एक चमचा त्रिफळा चुर्ण घ्या, त्रिफळा चुर्णामुळे पोट स्वच्छ होते आणि पोटदुखीपासून आराम मिळतो.
- ताणतणाव दूर करण्यासाठी आनंद वाटेल अशा गोष्टींमध्ये मन रमवा.
- तुळशीची पाने चावून खा. कारण तुळशीच्या पानांमध्ये अॅंटी अल्सर गुणधर्म असतात. ज्यामुळे तुम्हाला अपचन आणि अॅसिडिटीचा त्रास कमी होतो
- रात्री झोपण्यापूर्वी कोमट तेलात ओवा टाकून त्या तेलाने पोटाला मसाज करा
3. पित्ताशयातील खडे (Gallstones)
मानवी शरीरात यकृतामध्ये पित्त निर्माण होत असतं. यकृतात निर्माण झालेले पित्त पित्ताशयात साठवून ठेवलं जाते. अन्नपचनासाठी या पित्ताची शरीराला गरज असते. जेवणानंतर ठराविक काळानंतर अन्नपचन करण्यासाठी हे पित्त आतड्यांमध्ये सोडलं जातं. ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते. मात्र जर आहारात तिखट, तेलकट पदार्थ वाढले अथवा फायबर्स कमी झाले तर पित्ताचे प्रमाण असंतुलित होते. पित्ताचे प्रमाण अती प्रमाणात वाढल्यास त्याचे घनपदार्थात रूपांतर होते ज्यामुळे पित्ताशयाचे खडे तयार होतात. या खड्यांचा आकार कमी असेल तर ते आतड्यांमधून वाहून नेले जातात. मात्र जर या खड्यांचा आकार मोठा असेल तर ते पित्ताशयात अडकून राहतात आणि त्यामुळे पित्ताशयाला सूज येते. पित्ताशयातील खड्यांमुळे इनफेक्शन झाल्यास रूग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. जाणून घेऊया पित्ताशयातील खडे घरगुती उपाय, लक्षणे आणि कारणे.
लक्षणे (Gallstones Symptoms)
- पोटदुखी
- उलटी
- मळमळ
- ताप
- आंबट ढेकर
- छातीत जळजळ
कारणे (Gallstones Causes)
- मेटाबॉलिझम बिघडणे
- लठ्ठपणा
- चुकीचा आहार
- व्यायामाचा अभाव
- अपथ्यकारक पदार्थांचे सेवन
घरगुती उपाय (Home Remedies For Gallstones)
- रात्री झोपताना काळ्या मनुका आणि अंजीर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी ते पाणी प्या.
- पित्ताशयाच्या खड्यांचा त्रास होत असेल तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणेच योग्य ठरेल.
- पाणफुटीच्या पानांचा रस दिवसभरातून दोन वेळा घ्या. ज्यामुळे पित्ताशयातील खडे विरघळ्यास मदत होईल.
- गोखरू या आयुर्वेदिक चुर्णाचे सेवन करावे. कारण गोखरूमुळे तुमचे यकृत डिटॉक्स होण्यास मदत होते.
- रोजच्या जेवणात हळदीचा वापर करा. कारण हळदीमुळे पित्ताशयाचे खडे कमी होतात. याचबरोबर त्रास होत असल्यास हळद आणि मधाचे चाटण घ्या. ज्यामुळे तुम्हाला आराम मिळू शकतो.
जाणून घेऊया पित्ताशयातील खडे या संदर्भात महत्वपूर्ण माहिती
4. बद्धकोष्ठता (Constipation)
बद्धकोष्ठता या समस्येमुळे पोटातील मळ कठीण झाल्यामुळे मलावरोध निर्माण होतो. आहारात पुरेसे फायबर्स नसल्यास अथवा काही वेळा ठराविक औषधांमुळे मलावरोध निर्माण होतो. शारीरिक हालचाल कमी असलेली बैठी कामे केल्यामुळे देखील बद्धकोष्ठता होऊ शकते. पाणी आणि फायबरच्या कमतरतेमुळे मळ कठीण होतो ज्यामुळे तो शौचावाटे बाहर पडणं अशक्य होतं. बद्धकोष्ठता झाल्यास अस्वस्थ वाटतं.
वाचा – बाळाचे पोट साफ होण्यासाठी उपाय
लक्षणे (Constipation Symptoms)
- शौचाला त्रास होणे
- पोट स्वच्छ न होणे
- शौचावाटे रक्त पडणे
कारणे (Constipation Causes)
- अपथ्यकारक आहार
- पाणी कमी प्रमाणात पिणे
- फायबरयुक्त आहार न घेणे
- शौचाला जाण्याचा कंटाळा करणे
घरगुती उपाय (Home Remedies For Constipation)
- कोमट पाण्यामधून लिंबू आणि एरंडेल तेल घ्या. कारण एरंडेल तेलामुळे तुमचे पोट स्वच्छ होते आणि मलावरोधाचा त्रास कमी होतो.
- भिजवलेले अंजीर चावून खा. अंजीरमध्ये भरपूर फायबर असतात ज्यामुळे पोट स्वच्छ होण्यास मदत होते.
- जेवणासोबत ताक प्या. ताकामुळे खाल्लेल्या अन्नाचे चांगले पचन होते.
- आळशीच्या बिया भाजून त्याची पावडर खा. आळशीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात ज्यामुळे मलावरोध कमी होतो.
- दिवसभरात भरपूर पाणी प्या. कारण पाणी कमी पिण्यामुळेच तुम्हाला हा मलावरोधाचा त्रास होऊ शकतो. हे बद्धकोष्ठतेवरील घरगुती उपाय गरोदरपणातही करता येतील.
5. जुलाब (Diarrhea)
जुलाब अथवा अतिसार ही एक पोटाची भयंकर समस्या आहे. साधारणपणे अस्वच्छ अन्न अथवा अस्वच्छ पाणी यामुळे जुलाबाची समस्या निर्माण होते. पोटात इनफेक्शन झाल्यामुळे जुलाब होऊ लागतात. या समस्येमध्ये मळ पातळ होतो आणि रूग्णाला पाण्यासारखे जुलाब होतात. वारंवार जुलाब झाल्यामुळे रूग्णाच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. ज्यामुळे अशक्तपणा येऊन रुग्णाला चक्कर, मळमळ होऊ लागते. पोटातील इनफेक्शन कमी होईपर्यंत जुलाब होऊ शकतात. अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने अथवा जुलाबवर घरगुती उपाय करून पोटातील पाणी कमी होणार नाही याची काळजी घ्यावी.
लक्षणे (Diarrhea Symptoms)
- वारंवार शौचाला जाणे
- शौच पातळ आणि दुर्गंधीयुक्त असणे
- पोटात गॅस होणे
- पोटदुखी
कारणे (Diarrhea Causes)
- अस्वच्छ आहार खाणे
- दुषित पाणी पिणे
- नखे न कापणे
- उघड्यावरचे पदार्थ खाणे
घरगुती उपाय (Home Remedies For Diarrhea)
पोट बिघडणे घरगुती उपाय (potache ajar ani upay) खालीलप्रमाणे वाचा.
- कोमट पाण्यात तूप टाकून घ्यावे. सतत जुलाब झाल्यामुळे आतड्यांवर ताण आलेला असतो. मात्र तूपामुळे आतड्यांवर आलेल्या ताण कमी होतो आणि आव बांधली जाते.
- दही खा कारण दह्यामध्ये आव बांधण्याची क्षमता असते.
- तांदळाची पेज रूग्णाला द्यावी. कारण त्यामुळे रूग्णाच्या शरीरातील झालेली पाण्याची झीज भरून काढण्यास मदत होते.
- ओआरएसचे सोल्युशन द्यावे ज्यामुळे रुग्णाचे डिहायड्रेशन होत नाही. घरी हे सोल्युशन तयार करण्यासाठी पाण्यात मीठ आणि साखर टाकून ते प्यावे.
- डॉक्टरांकडून औषधोपचार घ्यावेत. कारण अतीसारामुळे रूग्णाला अशक्तपणा येतो. औषधोपचार करून जुलाब थांबण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते.
प्रतिबंधात्मक उपचार (Preventions)
पोटाचे विकार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आधीच योग्य ती काळजी घेतल्यास पोटाचे विकार होणारच नाहीत. यासाठी नियमित वेळेवर झोपणे आणि वेळेवर उठणे, अवेळी न खाणे, संतुलित आहार घेणे, दररोज कमीत कमी तीस मिनीटे व्यायाम करणे, दिवसभर भरपूर पाणी पिणे आणि पोट दुखत असल्यास वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
पोटात दुखत असल्यास तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची केव्हा गरज आहे (When To See A doctor)
जर तुम्हाला कधी तरी अपथ्यकारक पदार्थ खाण्यामुळे तुम्हाला अपचनाचा त्रास झाला असेल तर तुम्ही घरीच काही उपचार करू शकता. ज्यामुळे काही तासांनी तुम्हाला नक्कीच आराम मिळू शकतो. मात्र जर तुमच्या वारंवार पोटात दुखत असेल आणि पोटदुखी वाढतच असेल तर पोटाचे विकार आणि उपाय याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
पोटाच्या विकारांमधील कॉम्प्लिकेशन्स (Complications)
वेळीच पोटाचे विकार आणि उपाय न केल्यास मोठ्या आजारपणांना तोंड द्यावे लागू शकतं. पोटाचे विकार बळावल्यास शस्त्रक्रिया कराव्या लागतात ज्यामुळे खर्च आणि त्रास दोन्हीही वाढण्याची शक्यता असते. यासाठी आधीच काळजी घेणं गरजेचं आहे.
पोटाच्या विकारांवरील वैद्यकीय उपचार (Medical Treatment For Bowel Disorders)
पोट दुखत असल्यास डॉक्टर तुमची शारीरिक तपासणी करून काही औषधे आणि वेदनाशामक गोळ्या देतात ज्यामुळे तुमची पोटदुखी थोड्या वेळासाठी कमी होतात. त्या नंतरही जर तुमच्या पोटात दुखत असेल तर डॉक्टर प्राथमिक तपासणीसाठी सोनोग्राफी करतात. सोनोग्राफीत दाखवलेल्या निकालानुसार तुमच्यावर वैद्यकिय उपचार केले जातात. जर तुम्हाला पित्ताशयाच्या खड्यांचा त्रास असेल तर काही टेस्ट करून आधी त्याचे प्रमाण शोधले जाते. पित्ताशयातील खड्यांच्या आकारानुसार वैद्यकीय उपचार दिले जातात. बऱ्याचदा लेप्रोस्कोपी द्वारे पित्ताशयाचे खडे काढले जातात. मात्र वारंवार पित्ताशयाच्या खड्यांचा त्रास होत असेल तर रूग्णाचे पित्ताशय शस्त्रक्रिया करून काढले जाते.
पोटाच्या विकाराबाबत असलेले काही प्रश्न- FAQ’s
1. पचनसंस्था सुधारण्यासाठी काय उपाय करावे ?
पचनसंस्था सुधारण्यासाठी नियमित पोषक आहार घ्यावा, मुबलक पाणी प्यावे आणि जीवनशैलीमध्ये योग्य ते बदल करावेत. ज्यामुळे तुमची बिघडलेली पचनसंस्था पुन्हा पूर्ववत होऊ शकते.
2. पोटाच्या विकारांपासून दूर करण्यासाठी सोपी युक्ती कोणती ?
निरोगी जीवनशैली, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम हा पोटाचे विकार दूर ठेवण्याचा सोपा मार्ग आहे.
3. पोट दुखू लागल्यावर काय प्राथमिक उपचार करावे ?
पोट दुखत असल्यास सर्वात आधी पोटाला कोमट तेलाने मसाज करावा आणि गरम पाण्याच्या पिशवीने शेक द्यावा. ज्यामुळे पोटात अडकलेला वायू बाहेर पडण्यास मदत होऊ शकते. त्यानंतर पोट दुखी न थांबल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
4. पोट दुखण्याचा आणि मानसिक ताणाचा काही संबध असतो का ?
होय नक्कीच, अनेक संशोधनानुसार पोटदुखी आणि मानसिक ताण यांचा संबंध असल्याचं दिसून आलं आहे. कारण मानसिक आजार अथवा नैराश्यामुळे पाठदुखी, डोकेदुखी, पोटदुखी जाणवू शकते. अशा केसेसमध्ये पोट दुखण्यामागे कोणतेही वैद्यकीय कारण सापडत नाही. मात्र तरिही रूग्णाला पोटातून तीव्र वेदना जाणवतात. शारिरिक स्थास्थावर मानसिक स्थितीचा परिणाम होत असतो. जेव्हा तुमचं मन नैराश्य आणि नकारात्मक विचारांनी घेरलेलं असतं. त्यावेळी त्याचा परिणाम हळूहळू शरीरावर दिसू लागतं.
You Might Like These:
मधुमेहावर नियंत्रण मिळविण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय
या’ कारणांसाठी आहारात लसूण जरूर वापरा
मुळव्याधीचा त्रास होतोय, या घरगुती उपायांनी मिळेल लवकर आराम (Home Remedies For Piles)
Effective Diet For Kidney Stones In Marathi
How to Treat Constipation in Hindi
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक