मासिक पाळीतील वेदना दूर करण्यासाठी घरगुती उपाय (How To Reduce Menstrual Pain In Marathi)

मासिक पाळीतील वेदना दूर करण्यासाठी घरगुती उपाय (How To Reduce Menstrual Pain In Marathi)

मासिक पाळी ही महिलांमधील एक नैसर्गिक शारीरिक क्रिया आहे. मात्र बऱ्याचदा अचानक घरी आलेल्या पाहुण्यांप्रमाणे मासिक पाळी देखील कोणत्याही क्षणी येते. दर महिन्याला महिलांना मासिक पाळीला सामोरं जावंच लागतं. काही महिलांमध्ये मासिक पाळीचा फ्लो हा साधारणपणे तीन-चार दिवस असतो. तर काही महिलांना अगदी पाच ते सात दिवस मासिक पाळी येते. प्रत्येक महिलांची शारीरिक रचना, आहार, जीवनशैली निरनिराळी असल्याने मासिक पाळीचा त्रासदेखील प्रत्येकीचा वेगवेगळा असू शकतो. मासिक पाळीत काहीच्या पोटात वेदना होतात. तर काहींची कंबर या दिवसांमध्ये खूप दुखते. कोणाच्या छातीमध्ये जडपणा येतो तर कुण्याच्या पायाच्या पोटऱ्या दुखतात. काही जणींना मासिक पाळी येण्याआधी काही दिवस डोकेदुखीचा त्रास होतो तर काहींना मासिक पाळी सुरू असताना पोटात असह्य वेदना होतात. थोडक्यात प्रत्येक महिलेला मासिक पाळी सुरू असताना वेदना, क्रॅम्प सहन करावेच लागतात. शिक्षण अथवा कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांसाठी हा त्रास सहन करणं फारच कठीण असतं. फार कमी  महिला असतील ज्यांना मासिक पाळी सुरू असताना काहीच त्रास होत नाही. यासाठीच प्रत्येक महिलेला मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी उपाययोजना माहीत असणं गरजेचं आहे. खरंतर मासिक पाळी ही महिलांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक क्रिया आहे. म्हणूनच या गोष्टींसाठी दर महिन्याला औषधोपचार अथवा वेदनाशामक गोळ्या घेण्यापेक्षा काही घरगुती उपचार करणं नक्कीच फायद्याचं ठरेल. म्हणूनच तुम्हाला मासिक पाळी पोट दुखणे उपाय माहित असणे आवश्यक आहे.

shutterstock

मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी उपाय (Remedies For Menstrual Pain In Marathi)

 • मासिक पाळी सुरू झाल्यावर होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी पोटदुखी सुरू झाल्यावर थोडावेळ आराम करा. जर तुम्ही घरी असाल तर बेडवर झोपा आणि शाळा, कॉलेज, ऑफिसमध्ये असाल तर काही मिनीटे खुर्ची, सोफा अशा ठिकाणी पाच-दहा मिनीटे बसून आराम करा.
 • मासिक पाळी सुरू होण्याआधी, मासिक पाळी सुरू झाल्यावर काही दिवस कोमट पाणी प्या. ज्यामुळे तुमचे पोट दुखणे कमी होईल
 • मासिक पाळी सुरू होण्याआधी एक ते दोन दिवस नारळाचे तेल अथवा तिळाचे तेल कोमट करून ओटीपोटावर त्याने मसाज करा.
 • आलं, काळीमिरी, वेलची घातलेला चहा घ्या ज्यामुळे तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.
 • मेथीचा लाडू अथवा मेथीचे दाणे टाकून उकळलेले कोमट पाणी प्या. 
 • मासिक पाळी सुरू असताना आरामदायक कपडे वापरा. अती तंग कपडे वापरल्यामुळे तुमचा त्रास अधिकच वाढू शकतो.
 • झोपण्यापूर्वी पोट आणि कंबरेवर कोमट तेल लावून गरम पाण्याच्या पिशवीचा शेक घ्या.
 • मासिक पाळी सुरू असताना सकाळी आणि संध्याकाळी कोमट पाण्याने अंघोळ करा. ज्यामुळे तुमच्या स्नायूंना आराम मिळेल. 
 • मासिक पाळीमध्ये नेहमी सात्विक आणि हलका आहार घ्या. 
 • मासिक पाळी सुरू असताना मांसाहार अथवा जड आहार खाणे टाळा
 • मासिक पाळी सुरू असताना पपई खाण्याने मासिक स्त्राव चांगला होतो ज्यामुळे वेदना कमी होतात.
 • मासिक पाळीमध्ये एखादं शांत संगीत ऐका ज्यामुळे तुमचं मन निवांत होईल आणि तुमचा त्रासदेखी कमी कमी होऊ शकेल. 
 • या काळात एखादे आवडते पुस्तक वाचल्याने तुमच्या वेदनांकडे तुमचे दुर्लक्ष होऊ शकेल.
 • गाजराचा रस घ्या ज्यामुळे मासिक पाळी सुरळीत होते आणि मासिक पाळीचा त्रास कमी होतो.
 • मासिक पाळी सुरू असताना तेलकट आणि मीठाचे पदार्थ कमी खा
 • मासिक पाळी सुरू असताना जड व्यायाम करू नका. मात्र तुम्ही या काळात योगासने अथवा प्राणायम करण्यास काहीच हरकत नाही.
 • पोटावर हिंगाचे पाणी लावल्याने देखील तुम्हाला आराम मिळू शकतो.
 • मासिक पाळीत डोकं दुखत असेल तर हेडमसाज करा ज्यामुळे तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.
 • मासिक पाळीच्या काळात आठ तास शांत झोप घ्या

अधिक वाचा

मासिक पाळी अनियमित होण्यामागची कारणं

मासिक पाळीच्या स्वच्छतेचे महत्त्व माहीत आहे का तुम्हाला

मासिक पाळीच्या समस्या आणि त्यावरील उपाय

Period Tracker वापरण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का

पीसीओडी समस्या आणि त्यावरील उपाय (What Is PCOD In Marathi)