#rakshabandhan2019 : तुमच्या लाडक्या भावाच्या राशीनुसार बांधा त्याला ‘या’ रंगाची राखी

#rakshabandhan2019 : तुमच्या लाडक्या भावाच्या राशीनुसार बांधा त्याला ‘या’ रंगाची राखी

राखीपौर्णिमा हा बहीण आणि भावाच्या अतूट नात्याची साक्ष देणारा एक पवित्र सण आहे. या वर्षी 15 ऑगस्टला रक्षाबंधन येत आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या भावाला राखी बांधण्यांसाठी बहिणींची लगबग सुरू झाली असेल. राखीपौर्णिमेला भावाला राखी बांधण्यासाठी कोणती राशी निवडावी हा सर्वच बहिणींना पडलेला महत्त्वाचा प्रश्न असतो. कारण आपल्या भावाच्या हातावर सर्वोत्तम राखी असावी अशीच प्रत्येकीची ईच्छा असते. राखी बांधताना  प्रत्येक बहीण देवाकडे आपल्या भावाला दिर्घायुष्य आणि यश मिळावं अशी प्रार्थना करत असते. 

असं म्हणतात की, राशीनुसार जर भावाला राखी बांधली तर ती त्याच्यासाठी लकी ठरू शकते. म्हणूनच यंदा #rakshabandhan2019 तुमच्या भावाच्या हातावर त्याच्या राशीनुसार येणाऱ्या रंगाची राखी बांधा. 

Instagram

मेष ( 21 मार्च - 19 एप्रिल)

मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. त्यामुळे या राशीच्या भावाला तुम्ही लाल अथवा पिवळ्या रंगाची राखी बांधू शकता. ज्यामुळे तुमच्या भावाला सकारात्मक ऊर्जा निर्माण मिळेल. या ऊर्जेचा परिणाम त्याच्या जीवनावर होईल  आणि त्याला धनसंपत्ती आणि यश भरभरून मिळेल. शिवाय यासोबतच त्याला लाल, केशरी रंगाचा टिळा आणि पिवळ्या रंगाचे वस्त्र दिल्यास नक्कीच चांगला फायदा होईल.

कुंभ (20 जानेवारी - 18 फेब्रुवारी)

कुंभ राशीचा स्वामी शनि आहे. यासाठी तुमच्या भावाच्या हातात रूद्राक्ष असलेली आणि निळे सूत असलेली राखी बांधा जी त्याच्यासाठी शुभकारक असेल. या राखीमुळे मुळे तुमच्या भावाच्या आयुष्यात आनंद भरूभरून येईल. 

मीन ( 19 फेब्रुवारी - 20 मार्च)

मीन राशीचा स्वामी बृहस्पती आहे. तुमच्या भावाला पिवळ्या रंगाची राखी बांधा. सफेद रंगाची भेटवस्तू त्याच्यासाठी शुभ आहे. ज्यामुळे त्याच्या जीवनात भाग्योदय होण्याची शक्यता आहे. 

वृषभ (20 एप्रिल - 21 मे)

वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. त्यामुळे जर तुमचा भाऊ वृषभ राशीचा असेल तर त्याला यंदा त्याला निळ्या रंगाची राखी बांधा. शक्य असल्यास तुम्ही तुमच्या भावाला यंदा चांदीची आणि निळ्या रंगाचा दोरा असलेली राखी घेऊ शकता. जी तुमच्या भावासाठी नक्कीच लकी ठरेल.

मिथुन (21 मे - 21 जून)

मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. म्हणूनच तुमच्या भावाला तुम्ही यावर्षी हिरव्या रंगाची आणि चंदनाचे लाकूड असलेली राखी बांधा. यासोबत भावाला एखादी हिरव्या रंगाची भेटवस्तू द्या. ज्यामुळे त्याच्याला प्रत्येक कामात यशच यश मिळेल.

कर्क (22 जून - 22 जुलै)

कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. जर तुमचा भाऊ कर्क राशीचा असेल तर त्याला मोती आणि पांढऱ्या अथवा चंदेरी रंगाची राखी बांधा. क्रीम अथवा पांढऱ्या रंगाची भेटवस्तू तुम्ही भावाला देऊ शकता. या रंगाच्या राखीमुळे तुमच्या भावाला मानसिक समाधान मिळू शकते.

सिंह (23 जुलै- 22 ऑगस्ट)

सिंह राशीचा स्वामी सुर्य आहे. तुमच्या सिंह राशीच्या भावाला तुम्ही केशरी, लाल अथवा गुलाबी रंगाची राखी बांधू शकता. गुलाबी रंगाची भेटवस्तू दिल्याने तुमचं भावा-बहीणीचं नातं आयुष्यभर टिकेल.

कन्या (23 ऑगस्ट - 22 सप्टेंबर)

कन्या राशीचा स्वामी बुध आहे. कन्या राशीच्या भावाला पांढऱ्या अथवा हिरव्या रंगाची राखी लकी ठरेल. याय राखीत मोती अथवा चंदनाचे लाकूड असेल तर फारच चांगले होईल. शिवाय भावाला भेटवस्तू देताना ती शक्य असल्यास हिरव्या रंगाची द्या.

तूळ (23 सप्टेंबर - 22 ऑक्टोबर)

तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. तुम्ही तुमच्या लाडक्या भावाला निळ्या, फिरोझी अथवा जांभळ्या रंगाची राखी बांधू शकता. भेटवस्तू देताना ती सफेद अथवा राखाडी रंगाची असेल याची काळजी घ्या.

वृश्चिक (23 ऑक्टोबर - 21 नोव्हेंबर)

वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. यासाठी तुमच्या भावाला लाल रंगाची आणि मोत्याची राखी बांधा. भेटवस्तू देताना ती सफेद रंगाची घ्या. ज्यामुळे तुमच्या भावाच्या जीवनातील आनंद द्विगुणित होईल.

धनु (22 नोव्हेंबर - 21 डिसेंबर)


धनु राशीचा स्वामी बृहस्पती आहे. तुमच्या धनु राशीच्या भावाला पिवळ्या रंगाची आणि चंदनाची राखी बांधा. भेटवस्तू मात्र लाल रंगाची द्या. ज्यामुळे तुमच्या भावाला करिअरमध्ये चांगले यश मिळेल.

मकर (22 डिसेंबर - 19 जानेवारी)

मकर राशीचा स्वामी शनि आहे. मकर राशीच्या भावाला निळ्या रंगाची राखी बांधा. लाल रंगाची भेटवस्तू द्या. भावाला औक्षण करताना त्याच्यावर सुखाची बरसात व्हावी अशी प्रार्थना करा. यावर्षी तुमच्या भावाच्या आयुष्यात अनेक सुखद घटना होणार आहेत. 

अधिक वाचा

राखीपौर्णिमेला बहीण आणि भावाला द्या 'या' भेटवस्तू

यंदाचा रक्षाबंधन करा खास.. पाठवा शुभेच्छासंदेश

तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा 'आई' आहात

राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम