ADVERTISEMENT
home / सौंदर्य
Baking Soda In Marathi

बेकिंग सोड्याचे हे ‘25’ फायदे तुम्हाला माहीत आहेत का (Benefits Of Baking Soda In Marathi)

बेकिंग सोडा तुम्ही स्वयंपाक करताना वापरत असालच. काहीजण याला खाण्याचा सोडा असंही म्हणतात. इंग्रजीमध्ये याला sodium bicarbonate असं म्हटलं जातं. स्वयंपाक करताना भजी, केक, इडली,ढोकळा करण्यासाठी बेकिंग सोडा फायदेशीर ठरतो. कारण  त्यामुळे भजीसारखे तळण्यासारखे पदार्थ कुरकुरीत होतात तर स्टीम केलेले पदार्थ फुगून मस्त स्पॉंजी होतात. बेकिंग सोडा मध्ये अल्कली गुणधर्म असतात ज्यामुळे पदार्थ कुरकुरीत अथवा स्पॉंजी होतात. पांढऱ्या रंगाच्या पावडर स्वरूपाxत बेकिंग सोडा तुम्हाला किराणा मालाच्या दुकानात अथवा बाजारात मिळू शकतो. बेकिंग सोड्याचा वापर जसा स्वयंपाकात केला जातो तसाच तुम्ही तो तुमचं सौंदर्य वाढवण्यासाठीदेखील नक्कीच करू शकता. यासाठीच जाणून घ्या बेकिंग सोड्याचे आरोग्यदायी आणि सौंदर्यवर्धक फायदे.

Baking Soda In Marathi

Baking Soda In Marathi

सोड्याचे ‘5’ आरोग्यदायी फायदे (5 Healthy Benefits Of Baking Soda In Marathi)

बेकिंग सोड्याचा वापर स्वयंपाकात अगदी बेतानेच केला जातो. कारण बेकिंग सोडा अतीप्रमाणात वापरल्यास पदार्थ खराब होतो आणि आरोग्य बिघडते. मात्र या बेकिंग सोड्याचे अनेक आरोग्यदायी फायदेदेखील आहेत. 

1. अॅसिडिटीचा त्रास कमी होतो

बऱ्याचदा जड पदार्थ खाण्याने अथवा उशीरा जेवल्यामुळे तुम्हाला अॅसिडिटीचा त्रास होतो. ज्यामुळे ढेकर येतात आणि छातीत जळजळ होऊ लागते. मात्र असा त्रास सुरू झाल्यावर  तुम्हाला स्वयंपाकघरातील बेकिंग सोडा फायद्याचा ठरू शकतो. यासाठी एक टीस्पून सोडा एक ग्लास पाण्यात विरघळवून घ्या आणि हे मिश्रण हळूहळू प्या. ज्यामुळे तुमच्या गळ्याकडे आलेले आबंट ढेकर कमी होतील. 

ADVERTISEMENT

2. माऊथ अल्सरवर उपाय करण्यासाठी

तोंडात येणारे उष्णतेचे फोड फारच त्रासदायक असतात. कारण त्यामुळे तुम्हाला बोलणे अथवा जेवणे कठीण जाते. काही संशोधनानुसार बेकिंग सोड्याने चुळ भरल्यामुळे तुमच्या तोंडातील अल्सर कमी होऊ शकतात. यासाठी दिवसभरात एकदातरी बेकिंग सोडा टाकलेल्या पाण्याने चुळ भरा. यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात पाव चमचा बेकिंग सोडा मिसळा आणि त्या पाण्याने चुळ भरा. जोपर्यंत तुमच्या तोंडातील फोड कमी होत नाहीत तोपर्यंत नियमित हा उपाय करा. 

3. किडनी विकार कमी करण्यासाठी

ज्यांना गंभीर किडनी विकार होतात त्यांचे किडनीचे कार्य हळूहळू बिघडू लागते. किडनीमुळे शरीरातील मूत्रांचे योग्य पद्धतीने विसर्जन होत असते. किडनी रक्तातील अशुद्ध पाणी आणि घाण शरीराबाहेर टाकली जाते. त्यासोबतच किडनीमुळे तुमच्या शरीरातील पोटॅशियम, सोडीयम आणि कॅल्शियमचे प्रमाण संतुलित राहण्यास मदत होत असते. एका संशोधनानुसार हे किडनीचे कार्य सुरळीत पार पडण्यासाठी बेकिंग सोडा फायदेशीर ठरू शकतो. यासाठी आहारात प्रमाणात बेकिंग सोड्याचा वापर करण्यास काहीच हरकत नाही. यासाठी मुतखड्यावर करा घरगुती उपाय.

4. कॅन्सरवरील उपचारांना मदत करण्यासाठी

जगभरात कॅन्सरचे प्रमाण वाढतच आहे. यासाठी या रोगापासून बचाव करण्यासाठी वेळीच उपाययोजना करणं गरजेचं आहे. बऱ्याचदा कॅन्सर झाल्यावर रूग्णाला केमोथेरपी देण्यात येते. ज्यामुळे कॅन्सरची वाढ रोखली जाऊ शकते. कारण सामान्यत कॅन्सरच्या पेशींची वाढ झपाट्याने होत असते. त्यामुळे कॅन्सर झाल्यावर तो रोखून धरणे फार गरजेचे असते. काही संशोधनानूसार बेकिंग सोड्याचा आहारात वापर केल्यामुळे केमोथेरपीतील औषधांचा रूग्णावर चांगला परिणाम होऊ शकतो.

5. सांधेदुखी कमी करण्यासाठी

बऱ्याचदा वयोमानानुसार सांधेदुखी अथवा गुडघेदुखीचा त्रास जाणवू लागतो. मात्र आजकालच्या धावपळीच्या जगात कोणालाही सांधेदुखी जाणवू शकते. जर तुमच्या लघवी आणि रक्तात युरिक अॅसिडचे प्रमाण अधिक असेल तर तुम्हाला अंगदुखीचा त्रास होतो. याच्या परिणामामुळे भविष्यात आर्थ्राटिस आणि इतर गंभीर आजार होण्याची शक्यता वाढते. मात्र बेकिंग सोड्यामुळे तुमच्या शरीरातील युरिक अॅसिडचे प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते. 

ADVERTISEMENT

Healthy Benefits Of Baking Soda In Marathi

Healthy Benefits Of Baking Soda In Marathi

बेकिंग सोड्याचे ‘10’ सौंदर्य फायदे (10 Beauty Benefits Of Baking Soda In Marathi)

बेकिंग सोडा जसा स्वयंपाकात वापरला जातो. तसंच त्याच्या वापरामुळे तुम्ही तुमचं सौंदर्यदेखील खुलूवू शकता. यासाठीच जाणून घ्या बेकिंग सोड्याचे सौंदर्यावर होणारे हे फायदे.

1. पिंपल्सची समस्या होते दूर

बेकिंग सोडा त्वचेचं पीएच लेव्हल बॅलन्स ठेवण्यात मदत करतं. यासाठी एक चमचा सोडा थोड्याश्या पाण्यात मिक्स करून पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट पिंपल्स असलेल्या जागी एक दोन मिनिटांसाठी लावून ठेवा. दिवसातून 2-3 वेळा असं केल्यास फायदा नक्कीच होतो. सोड्यामधील अॅंटिबॅक्टेरिअल गुणधर्म तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्सची वाढ कमी करते

ADVERTISEMENT

2. सन टॅन कमी होते

वास्तविक निरोगी जीवनासाठी सुर्यप्रकाशात फिरणं फार गरजेचं आहे. कारण त्यातून आपल्याला व्हिटॅमिन डी मिळत असत. मात्र सुर्यप्रकाशात फिरण्याचा जसा फायदा आहे तसात तोटाही होतो. तुमची त्वचा यामुळे रापते आणि सनबर्न दिसू लागतं. सनबर्न दूर करण्यासाठीही तुम्ही बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. यासाठी बेकिंग सोडा थंड पाण्यात मिक्स करून त्याची पेस्ट बनवून घ्या. एका स्वच्छ कपड्यावर ही पेस्ट घेऊन ती सनबर्नने प्रभावित जागी लावा. लगेच फरक जाणवेल. 

3. त्वचा क्लिझिंगसाठी

चेहऱ्यावर सतत धुळ,माती,प्रदूषणामुळे धुळीचा थर बसत असतो ज्याला वेळच्या वेळी काढून टाकणं गरजेचं असतं. शिवाय आपल्या त्वचेतील डेड स्कीनमुळे त्वचेच्या आतील छिद्रे बंद होतात. ज्यामुळे त्चचेला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. यासाठी चेहऱ्यावरील डेडस्कीन काढण्यासाठी तुम्ही बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. बेकिंग सोड्यामुळे डेड सेल्स दूर होते आणि त्वचा उजळवते. बेकिंग सोडा गुलाब पाण्यात मिक्स करून काही मिनिटे चेहऱ्याला लावल्यास नक्कीच फायदा होईल.

4. नखे स्वच्छ करण्यासाठी

त्वचेप्रमाणेच तुम्ही नखांच्या स्वच्छतेसाठी बेकिंगसोडा वापरू शकता. वारंवार नेलपेंट आणि इतर सौंदर्यसाधनांचा वापर केल्यामुळे नखे पिवळी दिसू लागतात. नखांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी बेकिंग सोडा उपयोगी ठरू शकतो. यासाठी बेकिंग सोडा, पाणी आणि हायड्रोजन पेरॉक्साईडचं मिश्रण करून नखांना लावल्यास त्यांचा पिवळेपणा दूर होतो. हा उपाय तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा केल्यास तुम्हाला लगेच परिणाम दिसून येईल.

5. ओठांचे सौंदर्य वाढवण्यासाठी

बेकिंग सोडा हे एक उत्तम क्लिंझर आहे. ज्यामुळे तुम्ही तुमच्या ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी बेकिंग सोडा वापरू शकता. यासाठी बेकिंग सोडा, मध एकत्र करा. हे मिश्रण हळूवारपणे तुमच्या ओठांना लावा. दोन ते तीन मिनीटांनी ओठ थंड पाण्याने स्वच्छ धुवा. काही दिवसांमध्ये तुमच्या ओठांमध्ये चांगला बदल झालेला जाणवेल. 

ADVERTISEMENT

6. अंगाला येणारा दुर्गंध कमी करण्यासाठी

काही लोकांच्या घामाला अतिशय घाणेरडा वास येतो. हा वास त्यांना स्वतःलाही सहन होत नाही. शिवाय घामाला येणाऱ्या वासामुळे चारचौघांमध्ये उठणे, बसणे कठीण होते. तुमच्या अंगासा असा वास येत असेल तर मुळीच चिंता करू नका कारण बेकिंग सोडा घाम शोषून घेतो आणि दुर्गंधीही दूर करतो. बेकिंग सोडा पाण्यात मिक्स करून अंडरआर्म्सला लावा नक्कीच उपयोग होईल.

7. केसांमधील त्वचा स्वच्छ होते

काहीजणींचे केस अतिशय तेलकट असतात. त्यामुळे  तेलकटकेस स्वच्छ करणे हे अतिशय कठीण काम असते. अशा केसांच्या स्वच्छतेसाठी बेकिंग सोड्याचा वापर नक्कीच केला जाऊ शकतो. कारण बेकिंग सोडा हेअर केअरसाठी एक चांगला उपाय आहे. शिवाय तेलकट केसांसाठी बेकिंग सोडा वरदानच आहे. बेकिंग सोड्याच्या वापराने तुमचा स्कॅल्प निरोगी आणि स्वच्छ राहण्यास मदत होते.

8. कोंडा कमी होतो

जर तुमच्या केसांत डँड्रफ झाला असेल तर तो कमी करणे फार महत्वाचे आहे. कारण केसांच्या आरोग्यासाठी  कोंडा अतिशय हानिकारक असतो. शिवाय त्यामुळे तुमच्या त्वचेला सतत खाज येते. मात्र या समस्येवर बेकिंग सोडा फायदेशीर ठरू शकतो. ओल्या केसांवर एक चमचा बेकिंग सोडा हळूहळू चोळा आणि काही वेळाने धुवून टाका. असं केल्यास केसांतील डँड्रफ कमी करता येऊ शकतो.

9. दातांचा पिवळेपणा कमी होतो

पिवळे आणि दुर्गंध येणाऱ्या हिरड्या तुमच्या सौंदर्यात बाधा आणतात. मात्र दाताच्या पिवळेपणापासून सुटका होण्यासाठी बेकिंग सोडा अतिशय उपयुक्त आहे. पिवळेपणासोबतच चेहऱ्यावरील प्लाक दुर करण्यातही सोड्याची मदत होते. ब्रशवर थोड्या प्रमाणात बेकिंग सोडा घेऊन ब्रश केल्यास दातांचा पिवळेपणा निघून जातो. पण याचा जास्त वापर करू नका.

ADVERTISEMENT

10. तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासाठी

बऱ्याचदा मांसाहार अथवा कांदा-लसूणापासून तयार केलेले पदार्थ खाण्यामुळे तुमच्या तोंडाला वास येतो. अशा वेळी तोंडाला येणाऱ्या दुर्गंधामुळे तुम्हाला कोणाशीही बोलण्याची लाज वाटू लागते. मात्र बेकिंग सोड्याने तुम्ही तुमचा हा त्रास कमी करू शकता. यासाठी एक ग्लास पाण्यात बेकिंग सोडा  मिसळा आणि त्याने चुळ भरा. ज्यामुळे तुमच्या तोंडाला येणारा घाणेरडा वास कमी होईल.

Beauty Benefits Of Baking Soda In Marathi

Beauty Benefits Of Baking Soda In Marathi

बेकिंग सोड्याचा वापर करा या ‘10’ कारणांसाठी (10 Reasons Of Baking Soda Uses In Marathi)

स्वयंपाकाप्रमाणेच अनेक गोष्टींसाठी तुम्ही बेकिंग सोडा वापरू शकता. बेकिंग सोड्यामध्ये अल्कलीचे प्रमाण असल्यामुळे तुमच्या घरातील स्वच्छतेसाठी तुम्ही त्याचा असा वापर करू शकता.

ADVERTISEMENT

1. स्वयंपाकासाठी

तुम्ही स्वयंपाकात बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. भजी अथवा वड्या कुरकरीत करण्यासाठी त्याच्या बॅटरमध्ये तुम्ही अगदी चिमुटभर बेकिंग सोडा वापरू शकता. त्याचप्रमाणे ठोकळा, इडली आणि केक स्पॉंजी आणि हलका करण्यासाठी पाव टी स्पून बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. अशा प्रकारे तुम्ही बेकिंग सोड्याचा वापर करून अनेक चविष्ठ पदार्थ घरीच तयार करू शकता. 

2. फ्रीज स्वच्छ करण्यासाठी

कधी कधी फ्रीज उघडल्यावर अतिशय घाणेरडा वास येतो. कितीही स्वच्छ केला तरी तो कोंदट आणि घाणेरडा वास कमीच होत नाही. तुम्हीदेखील या समस्येने हैराण झाला असाल तर तुमच्यासाठी बेकिंग सोडा अगदी मस्त उपाय ठरेल. कारण सोड्यामुळे फ्रीजमधील जीवजंतू आणि दुर्गंध कमी होण्यास मदत होते. यासाठी एका भांड्यात बेकिंग सोडा घ्या आणि ते भांडे फ्रीजमध्ये आत ठेवून द्या. तुम्ही सोडा मिसळलेल्या पाण्याने फ्रीज धुवून तो स्वच्छ करू शकता. याचाही तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल.

3. एअर फ्रेशनर

पावसाळ्यात घरात एक प्रकारचा कोंदट वास येतो. बाजारात मिळणाऱ्या एअर फ्रेशनर्सचा वापर केल्यानंतर हवा तसा परिणाम मिळतोच असं नाही. उलट कधी कधी अशा फ्रेशनर्सच्या वासाने डोकं अधिकच दुखू लागतं. मात्र बेकिंग सोड्याचा वापर करून तुम्ही तुमच्या घरातील दुर्गंध नक्कीच कमी करू शकता. यासाठी एका बरणीत पाऊण कप बेकिंग सोडा, तुमच्या आवडीच्या वासाच्या इसेंशिअल ऑईलचे दहा ते पंधरा थेंब मिसळा आणि वरून एखाद्या कापड अथवा पेपरने ती बरणी झाकून ठेवा. खोलीच्या एखाद्या सुरक्षित ठिकाणी ती बरणी ठेवून द्या. ज्यामुळे तुमच्या घरातील घाणेरडा वास नक्कीच कमी झालेला दिसून येईल.

4. कपडे स्वच्छ करण्यासाठी

बेकिंग सोड्याचा वापर तुम्ही तुमचे कपडे धुण्यासाठीही करू शकता. कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात अल्कली असतं. ज्यामुळे तुमच्या कपड्यांवरील डाग आणि धुळ निघून जाते. यासाठी एका बादलीत अर्धा कप बेकिंग सोडा मिसळा आणि त्या पाण्यात तुमचे धुण्याचे कपडे बुडवून ठेवा. त्यानंतर तुमचे कपडे धुवून टाका. ज्यामुळे तुमचे कपडे स्वच्छ आणि चमकदार होतील.

ADVERTISEMENT

5. स्वयंपाकघर स्वच्छ करण्यासाठी

बेकिंग सोड्याचा वापर जसा तुम्ही स्वयंपाक करण्यासाठी करता तसाच तो तुमचे स्वंयपाकघर स्वच्छ करण्यासाठीदेखील करू शकता. तुमच्या स्वयंपाकघरातील फ्रीज, मायक्रोवेव्ह, किचन टाईल्स, सिंक, कप आणि बश्या, काचेची भांडी स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा फारच उत्तम ठरेल. यासाठी एका भांड्यात बेकिंग सोडा घ्या त्यात थोडंसं पाणी मिसळा आणि तुमचं किचन स्वच्छ करा.

6. बाथरूम स्वच्छ करण्यासाठी

बेकिंग सोड्याचा वापर तुम्ही तुमच्या बाथरूम आणि  टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी करू शकता. बाथरूम आणि टॉयलेटच्या टाईल्स, नळ,  शॉवर, बाथटब बेकिंग सोड्यामुळे अगदी स्वच्छ होतील. यासाठी बेकिंग सोड्याची पेस्ट तयार करा आणि एका जाडसर कापड अथवा ब्रशच्या सहाय्याने  ते बाथरूम आणि टॉयलेटच्या फरशीवर फिरवा. पंधरा ते वीस मिनीटांनी फरशी धुवून टाका ती चमकदार झालेली असेल.

7. भाज्या आणि फळे निंजतूक करण्यासाठी

भाज्या आणि फळांचा आहारात समावेश असणं फार गरजेचं आहे. कारण त्यामुळे तुमच्या शरीराला योग्य पोषण मिळत असतं. पण आजकाल भाज्या आणि फळांवरील मारण्यात येणाऱ्या किटकनाशकांमुळे ते खाण्यासाठी हितकारक नसतात. यासाठी अशा भाज्या आणि फळे खाण्यापूर्वी निंजतूक करणं आणि त्यावरील किटकनाशके पूर्णपणे काढून टाकणं गरजेचं आहे. यासाठी स्वयंपाक करताना भाज्या आणि फळे बेकिंग सोडा टाकलेल्या पाण्यातून धुवून घ्या. या पाण्यात दहा ते पंधरा मिनीटे बुडवून ठेवा.

8. चांदीची भांडी स्वच्छ करण्यासाठी

बेकिंग सोड्यामधील अल्कलीमुळे तुमची चांदीची भांडी अगदी स्वच्छ होतात. देवपुजेसाठी आणि सणसमारंभात चांदीची भांडी आवर्जून वापरली जातात. मात्र वातावरणातील बदलांमुळे आणि बऱ्याच दिवस वापर न केल्यामुळे ती काळी पडतात. अशी भांडी स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा फार उपयोगी पडू शकतो. यासाठी गरम पाण्यात व्हिनेगर आणि बेकिंग सोडा मिसळा आणि त्या मिश्रणाने तुमची चांदीची भांडी स्वच्छ करा. 

ADVERTISEMENT

9. कंगवा अथवा हेअरब्रश स्वच्छ करण्यासाठी

कंगवा आणि हेअरब्रशची गरज केस विंचरण्यासाठी तुम्हाला नेहमीच लागते. मात्र सततच्या वापरामुळे तुमचे कंगवे आणि ब्रश खराब होतात. जर ते वेळच्यावेळी स्वच्छ केले नाही तर त्यातून तुमच्या केसांच्या त्वचेवर इनफेक्शन होऊ शकतं. मात्र कंगवा अथवा हेअरब्रश स्वच्छ करणं नेहमीच एक कटकटीचं काम असतं. यासाठीच हे काम सोप करण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करा. पाण्यात बेकिंग सोडा  मिसळा आणि त्याने तुमचे कंगवे आणि ब्रश साफ करा. 

10. गाडी स्वच्छ करण्यासाठी

दुचाकी आणि चारचाकी ही आजकाल प्रत्येकाची गरज झाली आहे. मात्र आपली वाहने वेळच्या वेळी स्वच्छ करणंदेखील तितकंच गरजेचं आहे. जर तुम्हाला तुमच्या गाडी नेहमी चमकदार हवी असेल तर ती पुसताना बेकिंग सोडा वापरा. यासाठी एक कप बेकिंग सोड्याची पाणी टाकून पेस्ट तयार करा आणि त्याने तुमच्या गाडीचा बाह्यभाग आणि  काचा पुसून काढा. बघा तुमची गाडी अगदी नवीन असल्याप्रमाणे चमकू लागेल.  

Baking Soda Uses In Marathi

बेकिंग सोड्याबाबत मनात असलेले काही निवडक प्रश्न (FAQ’s)

1- स्वयंपाकात बेकींग सोडा वापरणे योग्य आहे का ?

बेकिंग सोडा स्वयंपाकात फार पूर्वीपासून वापरण्यात येतो.बेकिंग सोड्यामुळे पदार्थ चांगले होतात. मात्र अती प्रमाणात बेकिंग सोड्याचा वापर आहारात करू नका. कारण कोणताही पदार्थ अतीप्रमाणात खाणे आरोग्यासाठी हितकारक नसते.

ADVERTISEMENT

2- बेकींग सोडा त्वचेसाठी योग्य असतो का ?

बेकिंग सोडा हे अक उत्तम क्लिंझर आहे. त्यामुळे बेकिंग सोड्याचा वापर करून तुम्ही तुमची त्वचा स्वच्छ करू शकता. 

3- बेकींग सोडा खाण्याव्यतिरिक्त आणखी कुठे वापरता येतो ?

बेकिंग सोड्याचा वापर अनेक गोष्टींसाठी करता येतो. आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही स्वयंपाकासाठी, सौंदर्य वाढवण्यासाठी आणि इतर उपाय करण्यासाठी  बेकिंग सोडा वापरू शकता. 

अधिक  वाचा:

आरोग्यासाठी फायदेशीर ठरते बहुगुणी आळशी

ADVERTISEMENT

सतत अॅसिडीचा होतोय त्रास मग तुम्ही करा हे घरगुती उपाय

सिताफळाचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का

Baking Soda Benefits for Skin in Hindi

11 Sep 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT