Engagement Quotes In Marathi - सोशल मिडियावर आपल्या गुंतवणूकीची घोषणा करण्यासाठी कोट | POPxo

साखरपुड्याची सोशल मीडियावर अशी करा घोषणा ( Engagement Quotes In Marathi)

साखरपुड्याची सोशल मीडियावर अशी करा घोषणा ( Engagement Quotes In Marathi)

लव्ह मॅरेज असो वा अरेंज मॅरेज असो साखरपुडा झाला म्हणजे ऑफिशयली एकत्र फिरायची फुल परमिशन. मग तुम्हा दोघांनाही खूप खूप अभिनंदन. आयुष्यातील हा महत्त्वाचा क्षण सगळ्यांसोबत शेअर तर करायलाच हवा आणि त्यासाठी सर्वात सोपं ठिकाण म्हणजे सोशल मीडिया. त्यातही सुपरफास्ट म्हणजे फेसबुक. फेसबुकवर असं स्टेटस शेअर होताच तुमची वॉल पूर्णतः भरून जाते ती शुभेच्छांनी. त्यामुळे आपल्या स्टेटस चेंजची घोषणा करण्याचं हे उत्तम माध्यम आहे. मग ही अनाउन्समेंटही तेवढीच हटके आणि क्रिएटीव्ह असायलाच हवी. त्याचसाठी आम्ही तुमच्यासाठी खास लिस्ट आणली आहे बेस्ट कोट्स आणि स्टेटसची. मग साखरपुडा झाला की, लगेच या लिस्टमधील कोट्स वापरून तुमचं स्टेटस चेंज करा.

Table of Contents

  फेसबुक स्टेट्स फोर इंगेज्ड कपल (Got Engaged Status for Facebook)

  इंगेजमेंटची बातमी अशी द्या की, सगळ्यांच्या लक्षात राहील. मग चांगला आणि मस्त स्टेटस ठेवा आणि होऊ द्या फेसबुकवर चर्चा.

  1. या संपूर्ण जगात जे कोणी करू शकलं नाही ते तू केलंस. माझ्या हृदयाला जिंकलंस आणि कुटुंबालाही. मी तयार आहे love forever साठी!
  2. एकेकाळी आपण अनोळखी होतो. पण आज आपण परफेक्ट जोडी आहोत. Proudly Engaged!
  3. हे सेलिब्रेशन फक्त आज किंवा उद्यासाठी नाहीतर नेहमी आणि फोर एव्हरसाठी.
  4. हा मेसेज त्या खास व्यक्तीसाठी जी आता माझ्या आयुष्याची जोडीदार झाली आहे. ना फक्त माझ्या सुखदुःखात तर माझ्या वडापावमध्येही….
  5. सातव्या आस्मानात असण्याचा आनंद म्हणजे Just engaged!
  6. आयुष्यातील इच्छा पूर्णही होतात. ज्याची पहिली पायरी त्या व्यक्तीसोबत इंगेज होणं. खरंय ना…
  7. आपल्या सुंदर प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. लक्षात ठेव मी वयाने कितीही म्हातारा झालो तरी माझं प्रेम तुझ्यासाठी नेहमीच चिरतरूण राहील.
  8. माझ्या आयुष्यात घडलेली सर्वात सुंदर गोष्ट आहेस तू...लव्ह यू फोरएव्हर.
  9. माझी आयटम ते माझी मिसेस हा प्रवास अखेर तू पूर्ण केलास. Proudly Engaged!
  10. माझ्या प्रेमात पडल्यावर पतंग त्याची कटली. आता प्रेमाच्या मांज्यातून आयुष्यभर सुटका नाही. Just engaged!

  इंगेज्ड लव्हबर्ड्ससाठी खास रोमँटिक ( Engagement Quotes)

  Instagram
  Instagram

  तो असो ती...दोघांसाठी साखरपुड्याचा दिवस असतो खास. आयुष्याला नवीन कलाटणी देणारा हा दिवस तुमच्यासाठी आणि तुमच्या घरच्यांसाठीही तितकाच महत्त्वाचा असतो. तुमच्या प्रेमाच्या गाडीला मिळालेला हा हिरवा सिग्नल तुम्हाला तुमच्या इच्छित स्थळी पोचवतो. मग साखरपुड्यानंतर आकंठ प्रेमात बुडालेल्या ऑफिशियल लव्हबर्ड्ससाठी खास रोमँटिक इंगेजमेंट कोट्स

  1. “चला फायनली साखरपुडा झाला. आता आयुष्यभरासाठी तुझी सुटका नाही.”

  2. “मी तुला निवडलं आहे आणि …... तुलाच सदैव निवडेन. पुन्हा.. पुन्हा..न थांबता...न शंका घेता. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत. सो हॅपी टू इंगेज्ड टू यू.”

  3. “ज्याने माझं हृदय चोरलं आणि त्याचं मला दिलं त्या प्रिन्स चार्मिंगशी अखेर इंगेज झाले.”

  4. “साखरपुड्यापर्यंतचा प्रवासही काही सोपा नाही. चला अखेर हिरवा कंदील मिळाला आणि आता ऑफिशियली आम्ही मिरवणार. आयुष्यातील नव्या चॅप्टरला सुरूवात. ही खूषखबर तुमच्यासोबत शेअर करायला खूपच आनंद होत आहे.”

  5. “उडत्या रोमान्सचा चॅप्टर संपला आणि फॉरेव्हर लव्ह स्टोरीला सुरूवात झाली.”

  6. “किती छान ना. आयुष्यभर पिडण्यासाठी मला स्पेशल व्यक्ती मिळाली.”

  7. “ही आहे आमची स्वीट लिटील स्टोरी, ज्यामध्ये माझं पान आणि त्याचं पान आता एक झालं आहे. उद्या आमची कथा कुठे जाईल माहीत नाही. पण वाचली तर नक्कीच जाईल.”

  8. “साखरपुडा झाला आणि ती माझी झाली. आयुष्यभराच्या प्रवासाला तिची साथ मिळाली. आता उत्सुकता आहे त्या सोनेरी भविष्याची ज्यात ती माझी आणि मी तिचा आहे.”

  9. “यापुढे नसेल एकट्याने चालणं कारण आता हातात असेल तिचा हात आणि डोक्यावर प्रेमाचं छप्पर.”

  10. “तुझ्या हातात माझा हात आहे. सुख अजून काय हवं. साखरपुड्याच्या आपल्या दोघांना खूप खूप शुभेच्छा.”

  क्युट कपल्ससाठी (Cute Engagement Quotes)

  Instagram
  Instagram

  साखरपुडा हा तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक आहे. मग या गोष्टीच्या प्रेमात पडणं साहजिक आहे. म्हणूनच साखरपुड्यानंतर एकमेकांच्या प्रेमात बुडालेल्या क्युट कपल्ससाठी क्युट इंगेजमेंट कोट्स - 


  1. “आम्ही दोन्ही वर्षांपासून एकत्र आहोत. पण तेवढी पुरेशी वाटली नाहीत. म्हणून मग म्हटलं जन्मभरच एकत्र राहूया. ” 

  2. तुमच्या क्युट पेटबरोबर तुम्ही इंगेज्ड असं प्लाकार्ड धरून क्युट फोटो शेअर करू शकता आणि त्याला कॅप्शन द्या “माझे मालक मालकीण लग्न करत आहेत.”

  3. “आयुष्यभरासाठी एका व्यक्तीला त्रास देण्याचं मी ठरवलं आहे. Happy and engaged!”

  4. तुमच्या होणाऱ्या नवऱ्याचा फोटो हूलाहुपसोबत काढा आणि त्याला पुढील कॅप्शन द्या. “ते म्हणतात ना, तुम्हाला आवडेल त्या वस्तूभोवती रिंग टाका. मीही तसंच केलं.’ *Wink*”

  5. “प्रत्येकवेळी मला असंच वाटायचं की तूच तो आहेस ज्याची मी वाट पाहत होते. मग काय केलं त्याला forever माझं. ”

  6. “अखेर आम्ही झालो आहे engaged! तयार आहोत भविष्यातील सुंदर आयुष्याच्या प्रवासाला.”

  7. “यशस्वी लग्न करण्यासाठी एकाच माणसाच्या अनेक वेळा प्रेमात पडणं आवश्यक आहे. मग तुझ्याशी इंगेजमेंट करून माझी ती एक इच्छा तर मी पूर्ण केलीच आहे.“

  8. “मी तुझ्या परफेक्शनच्या प्रेमात पडले नाहीतर तुझ्या चुकांच्या प्रेमात पडले आणि झाली आयुष्यभराची मोठी चूक.”

  9. “प्रेम ही आनंदी जगाची मास्टर किल्ली आहे. माझ्या लव्ह ऑफ लाईफशी इंगेज होताच ती मला मिळाली आहे.”

  10. “जर माझं हृदय आकाश असेल तर मला माझा ध्रुवतारा मिळाला आहे.”

  कूल पार्टनर्ससाठी Cool Engagement Quotes

  Shutterstock
  Shutterstock

  जर तुम्ही तुमच्या आयुष्याबाबत आणि तुमच्या पार्टनरबाबत कूल आहात तर मग कॅप्शन्सही तसेच हवेत ना. मग तुमच्या engagement announcement साठी नक्की ठेवा हे कोट्स 

  1. “या सिम्रनला मिळाला आहे तिचा राज, आता फक्त लग्न होणं बाकी आहे #JustEngaged’

  2. “तो म्हणाला, ‘ माझी बायको होशील का, आपण दोघं करू rock ’. मीही मग म्हटलं काय भाव खायचा. बोलून टाकलं हो...

  3. “आत्ताच आयुष्यातल्या एका महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि आत्तापासूनच टेन्शन येतंय.”

  4. “सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या बरं !!!!!! I am engaged!”

  5. “आयुष्यातील ध्येय : लग्नासाठी चांगला मुलगा शोधणे आणि त्याचा होकार मिळवणे. चेक.”

  6. “आता माझ्या बोटात आहे चमचणारं काही खास.”

  7. “तुझ्याशिवाय मी काहीच नाही. तू आहेस म्हणून मी आहे. पण एकत्र आल्यावर आपलं जग पूर्ण आहे.”

  8. “मी सगळ्या जगाशी एका हाताने लढू शकते फक्त माझा दुसरा हात तुझ्या हातात असावा.”

  9. “मला त्याचं आडनाव खूपच आवडलं होतं मग तेच लावायचं ठरवलं.”

  10. “सहजीवनाची पहिली पायरी म्हणजे साखरपुडा. थँक्स मला तुझ्या सहजीवनाची साथी केल्याबद्दल.”

  तुमच्या इंगेजमेंट अनाउन्समेंटसाठी खास कोटस (Engagement Quotes For Pictures )

  Shutterstock
  Shutterstock

  तुम्ही साखरपुड्याची पोस्ट शेअर करताना सुंदर फोटोज तर नक्कीच टाकणार असाल. पण त्यासोबतच जर तुमच्या फोटोच कॅप्शनही छान असेल तर ती पोस्ट परफेक्ट वाटेल. कारण फेसबुकप्रमाणेच तुम्हाला ही पोस्ट इन्स्टावर शेअर करणंही मग सोपं जाईल. मग पाहा फोटोजसोबत टाकण्यासाठी खास कोट्स.

  1. “He asked. I said 'about damn time'.”

  2. “Miss to Mrs चा प्रवास.”

  3. “ही रिंग पाहून वाटतंय का मी इंगेज झालीयं?”

  4. “मला तुझ्याबरोबर forever मेमरीज बनवायच्या आहेत.”

  5. “ओह खरंच आता रिअलमध्ये real diamond घालायचाय.”

  6. “सदैव, सातत्याने, फक्त तुझ्यासोबत.”

  7. “सॉरी आता मी available नाही. आयुष्याभराचं डील झालं.”

  8. “माझी जागा आणि पार्टनरचं रिजर्व्हेशन झालं... सर्वात लांबच्या आयुष्य नावाच्या प्रवासासाठी”.

  9. “सुरूवात तर फक्त क्रश म्हणून झाली होती...पण आता तर बोटात रिंगही आली.”

  10. “दोन विरूद्ध लोकं आकर्षित होतात पण युनिक लोकं आयुष्यभरासाठी एकत्र येतात.”

  FAQ's

  1. Engagement ची announcement Facebookवर करावी की नाही?

  Shutterstock
  Shutterstock

  हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. जर तुमचं मित्रमंडळ बरंच मोठं असेल आणि प्रत्येकाला सांगणं शक्य नसेल तर सोशल मीडियावर अनाउन्स करणं सर्वात सोपं आहे. यामुळे तुमचा वेळही वाचेल आणि सगळ्यांना एकाच वेळी कळवताही येईल. 

  2. हे स्टेटस टाकण्याआधी काय लक्षात घ्याल?

  Shutterstock
  Shutterstock

  हे स्टेटस टाकण्याआधी तुम्ही तुमच्या फियान्सेलाही एकदा विचारून घ्या की, तिला किंवा त्याला हे चालणार आहे का? कारण काही वेळा आपण जरी सोशल मीडियावर एक्टीव्ह असलो तरी आपला पार्टनर असेलच असं नाही. याशिवाय तुम्ही दोघं मिळूनही सेम इंगेजमेंट स्टोरी फेसबुकवर शेअर करू शकता.

  3. फेसबुकशिवाय इंगेजमेंट स्टेटस शेअर करता येईल का?

  Shutterstock
  Shutterstock

  नेहमीच्या फोटो आणि कॅप्शनची पद्धत टाळून तुम्ही खास व्हिडिओ टाकूनही ही अनाउन्समेंट करू शकता. मस्तपैकी तुम्ही किंवा दोघंजण मिळून व्हिडिओ मेसेज रेकॉर्ड करा आणि ऑनलाईन ब्रोडकास्ट करा किंवा त्या दिवशीही तुम्ही तुमच्या फियान्सेसोबत याचं खास शूटिंग किंवा शॉर्ट व्हिडिओ करू शकता.

  4. साखरपुड्याची स्टेटस तर टाकलं पण पुढे काय?

  Shutterstock
  Shutterstock

  • आता तुम्ही एकदा सोशल मीडियावर तुमच्या इंगेजमेंटचं स्टेटस टाकलं की, शुभेच्छांचा पाऊस तर पडेलच पण त्यासोबतच प्रश्नांची लिस्ट येईल. काहीजण तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी कॉल करतील. काहीजण तर तुम्हाला भेटायलाही येतील. मुख्यतः तयार राहा त्याच त्याच प्रश्नाला उत्तर द्यायला आणि तुम्हाला ते सांगावंही लागेलच. पण त्यातही एक वेगळा आनंद आहे आणि हो पार्टीचीही जबरदस्त मागणी होईल. 
  • इंगेजमेंट स्टेटस टाकलं म्हणून सगळ्याच डिटेल्स लगेच सगळ्यांना सांगू नका. लग्नाची तारीख लगेच जाहीर करू नका. सध्याच्या गोष्टीचा पूरेपूर आनंद घ्या. कारण हे स्टेटससुद्धा फार महत्त्वाचं आहे आयुष्यात.