लग्नाचा मौसम हा अतिशय धामधुमीचा असतो. दिवाळीनंतर तुळशीचं लग्न लागलं की घरोघरी लग्नसमारंभांना सुरूवात होते. घरात मंगलकार्य ठरलं की त्यासाठी ठी हॉल अथवा मंगल कार्यालय शोधण्याची एकच धावाधाव सुरू होते. समारंभासाठी बॅंक्वेट हॉल बुक करणं ही सर्वात मोठी जबाबदारी असते. आपल्या कार्यक्रमाची वेळ आणि हव्या तशा हॉलची उपलब्धता या सर्व गोष्टी जुळून याव्या लागतात. लग्न, साखरपुडा, बारसं, मुंज, वाढदिवस अशा अनेक समारंभासाठी आपल्याला बॅंक्वेट हॉलची गरज असते. पण कधी कधी हे हॉल शोधणं खरंच खूप कठीण असतं. कारण बॅंक्वेट हॉल शोधताना तुम्हाला तुमच्या कार्यक्रमाची गरज, तुम्ही आमंत्रित केलेल्या लोकांच्या आवडीनिवडी, आमंत्रितांची संस्था, डेकोरेशन, पार्टी मेन्यू , कार्यक्रमाचे विधी अशा अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. पूर्वी समारंभासाठी हॉल शोधताना यासाठी फार वणवण भटकावं लागायचं. मॅनेजरसोबत मिटींग घेणं, जेवणाची चव पाहणं, हॉलच्या इतर अटी सांभाळणं या सर्व गोष्टी कराव्या लागायच्या. आता मात्र तुम्ही ऑनलाईन असे हॉल बूक करू शकता. जर तुम्ही पुण्यात राहत असाल अथवा तुम्हाला एखादा समारंभ पुण्यात करण्याचा तुमचा विचार असेल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.
Table of Contents
पुण्यातील ‘5’ बेस्ट बॅंक्वेट हॉल (Best Banquet Halls In Pune In Marathi)
पुण्यातील वातावरण अतिशय आल्हाददायक आहे. शिवाय पुणे शहराला ऐतिहासिक महत्त्व असल्यामुळे पुण्यात सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन नेहमीच केलं जातं. जर तुम्ही पुण्यात राहणारे असाल अथवा पुण्यात एखादं मंगल कार्य करण्याचा तुमचा विचार असेल तर हे नक्की वाचा. आम्ही तुमच्यासोबत पुण्यातील बेस्ट बॅंक्वेट हॉल शेअर करत आहोत.
1. पाशा जे. डब्लू. मॅरिएट (Pasha J.W. Marriott)
पुण्यातील पंचतारांकित जे. डब्लू. मॅरिएटच्या रूफटॉपवर चोविसाव्या मजल्यावरील पाशा हा एक बेस्ट बॅंक्वेट हॉल आहे. ज्यावरून तुम्ही संपूर्ण पुणे शहर पाहू शकता. इथलं वातावरण,हॉलची सजावट फारच सुंदर आहे. तुम्हाला या हॉलमधील जेवणंही फारच आवडेल. यांची उत्तर भारतीय खाद्यसंस्कृती ही खासीयत असली तरी त्यातील काही पदार्थ तर तुमच्या पाहूण्यांच्या कायम लक्षात राहतील असे आहेत. या हॉलचे सर्वच कर्मचारी अतिशय सेवाशील आणि नम्र आहेत.ज्यामुळे तुम्हाला तुमच्या पाहुण्यांचा पाहुणचार अगदी उत्तम पद्धताने करता येईल. शिवाय हॉलमध्ये 2500 लोकांची उत्तम सोय होऊ शकते. शिवाय तुमच्या पाहुण्यांची दिवसभर राहण्याची व्यवस्ठाही इथे केली जाते. यासाठीच जर तुम्ही एखादा ग्रॅंड समारंभ आयोजित करण्याचा विचार करत असाल तर हा बॅंक्वेट हॉल तुमच्यासाठी अगदी बेस्टच आहे.
पत्ता – जे. डब्लू. मॅरिएट, सेनापती बापट रोड, पुणे
वेळ – संध्याकाळी 5:30 ते रात्री 12:30, 1:30 पर्यंत
2. सिद्धी गार्डन आणि बॅक्वेट हॉल (Siddhi Garden And Banquet Hall)
पुण्यातील कर्वे नगरमधील सिद्धी गार्डन आणि बॅंक्वेट हॉल तुमच्या घरातील कोणत्याही समारंभासाठी अगदी परफेक्ट आहे. हॉलचा अॅम्बियंस अगदी मस्त आहे. शिवाय बाहेर प्रशस्त लॉन असल्यामुळे या ठिकाणी तुमचे आऊटडोअर कार्यक्रमही आयोजित केले जाऊ शकतात. इतर शहरांमधून येणाऱ्या पाहुण्यांसाठी या हॉलमध्ये राहण्याची उत्तम सोय होऊ शकते. राहण्यासाठी आठ रुमची व्यवस्था आहे. लॉनमध्ये 1500 तर हॉलमध्ये 900 पाहुण्यांची एकत्र बसण्याची व्यवस्था होऊ शकते. शिवाय इथलं जेवणंही फारच चांगलं आहे. व्हेज आणि नॉनव्हेज जेवण इथली स्पेशलिटी आहे.
पत्ता – सिद्धी गार्डन आणि बॅंक्वेट हॉल
डी. पी. रोड, म्हात्रे ब्रीज जवळ, राजामंत्री रोड, वकील नगर, एरंडवने, पु्णे
वेळ – सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत
Also Read: Designer Boutiques In Pune In Marathi
3. नक्षत्र क्रोम मॉल (Star Chrome Hall)
तुमच्या घरात कोणतंही मंगल कार्य असून दे हा हॉल तुम्हाला नक्कीच आवडू शकतो. क्रोम मॉलमध्ये नक्षत्रचे दोन पार्टी हॉल आहेत. सोलापूर रोडवर असलेल्या या मॉलमध्ये तुम्ही तुमचा एखादा शानदार कार्यक्रम आयोजित करू शकता. या ठिकाणी 500 च्या कॅपेसिटीचे दोन पार्टी हॉल आहेत. ज्या ठिकाणी तुमचा एखादा छोटेखानी पण ग्रॅंड कार्यक्रम नक्कीच होऊ शकतो.
पत्ता – क्रोम मॉल, पुणे सोलापूर रोड, बी. टी. कावडे जंक्शन पुणे
वेळ – दिवसभर कधीही
4 . राजयोग हॉल, शिवाजीनगर (Rajyoga Hall, Shivajinagar)
पुण्यातील शिवाजीनगरमधील राजयोग हॉल एक साधा पण रॉयल हॉल आहे. ज्या ठिकाणी तुम्ही तुमची लग्नगाठ बांधू शकता. शिवाजीनगर रेल्वेस्टेशनपासून जवळ असल्यामुळे तुमच्या पाहुण्यांसाठी हा अगदी परफेक्ट आणि सोयीचा हॉल आहे. लग्न, रिसेप्शन, पार्टीज, फॅमिली गेट-टू-गेदर, कॉर्पोरेट सेमिनार अशा अनेक गोष्टी तुम्ही या ठिकाणी आयोजित करू शकता. राजयोग हॉलचं वातावरण तुमच्या घरातील अथवा ऑफिसमधील कोणत्याही कार्यक्रमासाठी परफेक्ट आहे. इथलं जेवण, सोयीसुविधा, स्टाफ सर्वच तुमच्या कार्यक्रमासाठी सोयीचे ठरू शकतात. कार्यक्रमात राहण्यासाठी 6 रुम्स तुम्ही बूक करू शकता.
पत्ता – राजयोग हॉल, 11 बी, राजयोग बॅंक्वेट हॉल, भारत पेट्रोल पंप जवळ, शिवाजी नगर, पुणे
वेळ – दिवसभर
5. हयात बॅंक्वेट हॉल, कल्याणी नगर (Hyatt Banquet Hall, Kalyani Nagar)
अहमदनगर पुणे रोडवरील कल्याणी नगरमध्ये हा प्रशस्त बॅंक्वेट हॉल आहे. रोड कनेक्टिव्हीमुळे सर्वांच्या सोयीचा असा हा हॉल तुम्हाला नक्कीच आवडेल. तुमची पाहुणेमंडळी खाजगी वाहनाने या हॉलवर येऊ शकतात. पुलसाईड लॉनवर तुमचे 300 पाहुणे एकाचवेळी बसू शकतात तर पाचशे लोकांची एकत्र फिरण्याची व्यवस्था होऊ शकते. हॉल आणि लॉनमध्ये तुमच्या पाचशे ते सातशे लोक एकत्र येऊ शकतात. हयात हॉटेलचं जेवण तुमच्या पाहुण्यांना नक्कीच आवडेल.
पत्ता –
हयात पुणे, 88, नरग रोड, आगाखान पॅलेसजवळ, पॅलेस व्हिव्ह सोसायटी, कल्याणी नगर, पुणे
वेळ – दिवसभर
पुण्यातील ‘10’ कमी बजेटमधील बॅंक्वेट हॉल (Low Budget Banquet Hall In Pune)
लग्नसोहळ्यांसाठी आजकाल फारच खर्च करण्याची पद्धत रूजू होत आहे. पण वास्तविक याची मुळीच गरज नसते.जर तुमचं एखाद्या मंगल कार्याचं बजेट कमी असेल तर हे बॅंक्वेट हॉल आणि मंगलकार्यालयं नक्कीच बूक करू शकत. कारण या हॉलचे भाडे सर्वसामान्यांच्या खिषाला नक्कीच परवडतील असे आहेत.
1. हर्शल हॉल (Harshal Hall Pune)
पुण्यातील कोथरूडरोडवरील हर्शल हॉल सर्वसामान्यांच्या खिषाला परवडेल असा हॉल आहे. हा हॉल पुण्यातील आणि पुण्याबाहेरील सर्वच लोकांसाठी सोयीचा आहे. शिवाय या हॉलमधील सर्व सोयीसुविधा तुमच्या पाहुण्यांना नक्कीच आवडतील. या बॅंक्वेट हॉलमध्ये कमीत कमी 300 लोकांची एकत्र बसण्याची व्यवस्था होऊ शकते.
पत्ता – कोथरूड रोड, कर्वे रोड, पुणे
वेळ – सकाळी 10 ते रात्री 8:30
2. रॉयल बॅंक्वेट हॉल (Royal Banquet Hall)
पुण्यातील शिवाजी नगरमधील रॉयल हॉल तुम्ही तुमच्या या खास प्रसंगासाठी बूक करू शकता. या हॉलमध्ये एकाचवेळी 300 ते 400 लोकांची एकत्र बसण्याची व्यवस्था केली जाते. एसी आणि नॉन एसी अशा दोन्ही व्यवस्था तुम्हाला पुरवल्या जातात. शिवाय येण्या-जाण्यासाठी शिवाजी नगर सर्वांच्याच सोयीचे असल्याने तुम्हाला हा हॉल नक्कीच आवडू शकतो.
पत्ता – ज्ञानेश कॉम्पेक्स, ऑफ एफ. सी. रोड, मॉर्डन कॉलेज रोड, शिवाजी रोड, पुणे
वेळ – सकाळी 10 ते रात्री 8:30
3. मंत्र बॅक्वेट हॉल (Mantra Banquet Hall)
जर तुम्हाला तीनशे ते चारशे पाहुण्यांना आमंत्रित करून एखादा छोटेखानी समारंभ करायचा असेल तर तुम्ही मंत्र बॅंक्वेट हॉलची निवड नक्कीच करू शकता. हा हॉल कोथरूडमध्ये असल्यामुळे तुम्हाला आणि पाहुण्यांना नक्कीच सोयीचा पडू शकतो. या हॉलमध्ये तुम्हाला सर्व सोयीसुविधा मिळू शकतात.
पत्ता – साई सयाजी बिल्डिंग, पुणे रोड, कोथरूड, पुणे
वेळ – सकाळी 10 ते सायंकाळी 8:30
4. हॉटेल संकेत (Hotel Sanket)
पुण्याच्या वाकडमधील संकेत हॉटेलमधील हा बॅंक्वेट हॉल तुमच्या खिषाला तर पडणारा तर आहेच पण तुमच्या सोयीचाही आहे. कॅटरिंगमध्ये तुम्हाला खूप ऑप्शन मिळू शकतात. शिवाय या हॉलचा स्टाफ तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतो. त्यामुळे तुमचा मंगलविधी इथे कोणत्याही चिंतेशिवाय सहज पार पडेल. या ठिकाणी तुमच्या 200 ते 300 लोकांची एकाचवेळी बसण्याची सुंदर व्यवस्था झाल्याने तुमचा एखादा छोटेखानी कार्यक्रम अगदी शांततेत होईल.
पत्ता – एस, नं. 130/2, मुंबई बॅंगलोर हायवे, वाकड, पुणे
वेळ – तुमच्यासाठी 24 तास सेवा
5. ब्रम्ह प्युअर व्हेज बॅंक्वेट (Brahm Pure Veg Banquet)
एखाद्या घरगुती कार्यक्रमासाठी पुण्याच्या माणिक बागेजवळील ब्रम्ह प्युअर व्हेज बॅंक्वेट चा विचार करण्यास काहीच हरकत नाही. जर तुमची पाहुणेमंडळी शाकाहारी असतील तर तुमच्यासाठी हा हॉल अगदी परफेक्ट आहे. कारण या ठिकाणी तुम्हाला फक्त शुद्ध शाकाहारी जेवणंच मिळू शकतं. 100 ते 200 लोकांना आमंत्रित करून तुमचा कार्यक्रम तुम्ही शांतपणे तुमचा कार्यक्रम तुम्ही करू शकता.
पत्ता – विशाल हाईट सर्वे नं. 39/2, सिंहगड रोड. माणिक बाग, पुणे
वेळ – 8:30 ते 11:30
6. मनाली रिसॉर्ट, मंजिरी फार्म (Manali Resort, Manjiri Farm)
पुण्यातील मंजिरी फार्मवरील मनाली रिसॉर्टमध्ये हा बॅंक्वेट हॉल आहे. निसर्गरम्य वातावरण, पारंपरिक सजावट, वुडन प्लोरिंग, सोयीसुविधा यामुळे तुमच्या कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढेल. या ठिकाणी शंभर माणसं एकत्र जेवतील असा डायनिंग हॉल आहे. शिवाय पाहुण्यांसाठी राहण्याची व्यवस्था केली जाते.
पत्ता –
पुणे सोलापूर हायवे, मंजिरी फार्म, पुणे
वेळ – सकाळी 11 ते सायंकाळी 5
7. यश लॉन (Yash Lawn)
यश लॉन हे पुण्यातील एक बेस्ट मंगल कार्यालय आहे. नऊ एकर मध्ये पसरलेलं हे लॉन तुमच्या घरातील कार्यक्रमाची शोभा नक्कीच वाढवेल. या ठिकाणी मॅजेस्टिक पाम ट्री, चमचमणारी कारंजी, विटांनी तयार केलेले रस्ते, दगडांची सजावट असं मस्त वातावरण आहे. ज्यामुळे तुमच्या लग्नसोहळ्यात अधिकच रंगत येईल.
पत्ता – नंबर 573, बिबवेवाडी, पुणे
वेळ – शनिवार ते रविवार 24 तास
8. संस्कृती हॉल (Sanskriti Hall)
पुण्यातील चिंचवडमधील संस्कती हॉलही तुमच्या घरगुती कार्यक्रमांसाठी सोयीचा आहे. तुमच्या घरातील कमीत कमी 200 लोकांची सोय या ठिकाणी होऊ शकते. चविष्ठ जेवण ही इथली खासियत आहे. शिवाय इथे तुम्हाला तुमची फेव्हेरट महाराष्ट्रीयन थाळीही मिळू शकते. त्यामुळे जर तुम्हाला पारंपरिक पद्धतीने विवाह करायचा असेल तर हा हॉल खूपच मस्त आहे.
पत्ता – जी.पी. 77, ओमकार प्लाझा, संभाजी नगर, चिंचवड, पुणे
वेळ – सकाळी 8 ते सायंकाळी 10
9. गुरूकृपा मंगल कार्यालय (Gurukripa Mangal Office)
पुण्यातील आळंदीमधील गुरूकृपा मंगल कार्यालय तुम्ही तुमच्या कार्यक्रमासाठी नक्कीच निवडू शकता. या ठिकाणी तुमच्या पन्नास ते शंभर लोकांची सुंदर सोय होऊ शकते. शिवाय दिवसा आणि रात्रीदेखील तुम्ही या ठिकाणी तुमचा कार्यक्रम करू शकता. एखादा छोटेखानी कार्यक्रम अगदी पारंपरिक पद्धतीने करण्यासाठी हा हॉल परफेक्ट आहे.
पत्ता – काळेगाव पोस्ट, आळंदी देवाची, पुणे
वेळ – दिवसाचे 24 तास
10. गिताई लॉन मंगल कार्यालय (Gitai Lawn Mangal Office)
पुण्यातील लोहगडजवळ हे मंगल कार्यालय आहे. आजकाल सर्वांच्या सोयीसाठी संध्याकाळी मंगल कार्यालयात लग्नाचे विधी करण्याचा ट्रेंड आहे. कारण अशा ठिकाणचं वातावरण तर परफेक्ट असतंच शिवाय भरपूर लोकांसाठी अशी मोकळी मंगल कार्यालयं सोयीची ठरतात. दोनशे लोकांना तुम्ही या मंगल कार्यालयात आमंत्रित करू शकता. शिवाय इथलं जेवणही अप्रतिम आहे. तुमच्या घरातील मंगल कार्य उत्तम पद्धतीने पार पडू शकतं.
पत्ता – सर्वे नं 280/1/1/1, साठे वस्ती, लोहगड धानोरी रोड, पुणे
वेळ – सकाळी 9 ते सायंकाळी 6
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
हे ही वाचा –
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
अधिक वाचा –
मुंबईतील हे बेस्ट वेडिंग फोटोग्राफर्स तुम्हाला माहीत आहेत का