आपली त्वचा स्वच्छ आणि नितळ असावी असं प्रत्येकाला वाटणं स्वाभाविक आहे. मात्र प्रत्येकाची त्वचा ही निरनिराळ्या प्रकारची असते. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुमच्या त्वचेला विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कारण तेलकटपणा जास्त असल्यास त्वचेवर सतत तेलाचा थर जमा होत असतो. ज्यावर धुळ, माती, प्रदूषण चिकटण्याची शक्यता जास्त असते. वास्तविक त्वचेवरील नैसर्गिक तेल तुमच्या त्वचेच्या पोषणासाठी गरजेचं असतं. मात्र असं असलं तरी कोणतीही गोष्ट अति प्रमाणात असेल तर ती हानिकारक ठरू शकते. चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी करण्यासाठी तुम्ही तुमचा चेहरा सतत धुता. ज्यामुळे चेहऱ्यावरील हे नैसर्गिक तेल निघून जाते आणि त्वचेवर याचा चुकीचा परिणाम होतो. जेव्हा तुमची त्वचा तेलकट असते तेव्हा तुम्हाला यासाठी योग्य क्लिंझर वापरण्याची गरज असते. ज्यामुळे तुमच्या त्वचेतील Sebum च्या निर्मितीवर नियंत्रण राहतं आणि तुमची त्वचा दीर्घ काळासाठी मऊसर राहते. तुमच्या तेलकट त्वचेची काळजी घेण्यासाठी आम्ही तुम्हाला काही खास क्लिंझर सूचवत आहोत जे तुमच्या नक्कीच फायद्याचे ठरू शकतात. कोरड्या त्वचेसाठी उत्तम क्लिंन्झर (Best Cleanser For Dry Skin In Marathi), क्लिनझर की फेसवॉस, जाणून घ्या दोघांमधील फरक (Cleanser Vs Face Wash In Marathi), तेलकट त्वचेसाठी बेस्ट वाईप्स | Best Wipes For Oily Skin In Marathi
Table of Contents
- मायग्लॅम युथफूल हायड्रेटिंग फोम क्लिंझर – Myglamm Youthful Hydrating Foam Cleanser With Water Bank Technology
- ऑर्गेनिक हार्वेस्ट ऑइल कंट्रोल फेस वॉश – Organic Harvest Oil Control Face Wash
- सेंट बोटॅनिका ऑस्ट्रेलियन टीट्री अँटी एक्ने फोमिंग फेस वॉश – St Botanica Australian Tea Tree Anti Acne Foaming Face Wash
- सिटाफिल प्रो डर्मा कंट्रोल ऑईल रिमूव्हिंग फोम वॉश – Cetaphil Pro DermaControl Oil Removing Foam Wash
- युथ टू दी पीपल सूपरफूड क्लिझंर – Youth To The People Superfood Cleanser
- न्युओट्रोजिना ऑइल फ्री अॅक्ने फेस वॉश – Neutrogena Oil-Free Acne Face Wash
- अॅव्हेन्यू इ्यू थर्मल क्लिंझिंग फोम – Avene Eau Thermale Cleansing Foam
- ओलेहेनरिक्सन फाइंड युवर बॅलन्स ऑइल कंट्रोल क्लिंझर – Olehenriksen Find Your Balance Oil Control Cleanser
- पॉला चॉइस स्किन बॅलेन्सिंग ऑइल रिड्यूसिंग क्लिंझर – Paula’s Choice Skin Balancing Oil-Reducing Cleanser
- न्युओक्युटीस न्युओ- क्लिंसे स्किन क्लिंझर – Neocutis Neo-Cleanse Exfoliating Skin Cleanser
- तेलकट त्वचेसाठी वापरण्यात येणाऱ्या क्लिंझर्सविषयी काही निवडक प्रश्न – FAQs
मायग्लॅम युथफूल हायड्रेटिंग फोम क्लिंझर – Myglamm Youthful Hydrating Foam Cleanser With Water Bank Technology
तुमच्या मऊसूत त्वचेला कोणतेही नुकसान न होता स्वच्छ करायचं असेल तर तुम्ही वापरायला हवं मायग्लॅमचं हे युथफूल हायड्रेटिंग फोम क्लिंझर. कारण यामध्ये तुमच्या तेलकट त्वचेला कोरडं पडू नये यासाठी तसंच हायड्रेट ठेवण्यासाठी अक्वा इलॅस्टिक नेटवर्क सिस्टिमचा वापर करण्यात आला आहे. सोप फ्री असले तरी याचे छान बबल्स तयार होतात. ज्यामुळे तुमची त्वचा खोलवर स्वच्छ होण्यास मदत होते. या क्लिंझरमुळे त्वचेवरील धुळ, माती, मेकअपचे कण तर निघून जातातच शिवाय त्वचा पटकन टवटवीत होते. संवेदनशील त्वचेसाठी हे अतिशय उत्तम आहे.
ऑर्गेनिक हार्वेस्ट ऑइल कंट्रोल फेस वॉश – Organic Harvest Oil Control Face Wash
तेलकट त्वचेसाठी तुम्ही एखादं ऑर्गेनिक क्लिंझर शोधत असाल तर वापरा ऑर्गेनिक हारवेस्टचं ऑइल कंट्रोल फेस वॉश. ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील अतिरिक्त तेल निघून जाते आणि त्वचा मऊ आणि मुलायम होते. जर तुम्ही नियमित हा फेस वॉश वापरला तर तुमच्या त्वचेचे पोअर्स तेलकटपणामुळे ब्लॉक होणार नाहीत. ज्यामुळे त्वचेवर पुरळ अथवा पिंपल्स येणार नाहीत आणि त्वचा कायम नितळ आणि चमकदार दिसेल. विशेष म्हणजे हे प्रॉडक्ट शंभर टक्के नैसर्गिक आणि क्रुअल्टी फ्री आहे.
सेंट बोटॅनिका ऑस्ट्रेलियन टीट्री अँटी एक्ने फोमिंग फेस वॉश – St Botanica Australian Tea Tree Anti Acne Foaming Face Wash
तुमच्या त्वचेच्या सर्व गरजा भागवणारं हे आहे सेंट बोटानिकाचे ऑस्ट्रेलियन टी ट्री अॅंटि अॅक्ने फोमिंग फेस वॉश. या प्रॉडक्टची खासियत ही की या बॉटलसोबत एक छान सॉफ्ट ब्रश जोडलेला आहे. ज्यामुळे तुमच्या त्वचेचे बंद झालेले पोअर्स उघडे होतात. त्वचेचा लवचिकपणा टिकवून ठेवण्यासाठीही याचा चांगला फायदा होतो. यामध्ये तुमच्या नाजूक त्वचेसाठी कडूलिंब, कोरफड, टी ट्री, हेझल अर्क, ग्लिसरिन, ग्रीन टी, काकडी अशा नैसर्गिक घटकांचा वापर करण्यात आलेला आहे. ज्यामुळे तुमची त्वचा बराच काळ फ्रेश आणि नितळ राहते.
सिटाफिल प्रो डर्मा कंट्रोल ऑईल रिमूव्हिंग फोम वॉश – Cetaphil Pro DermaControl Oil Removing Foam Wash
तुम्हाला तुमच्या तेलकट त्वचेची योग्य निगा राखायची असेल तर या क्लिंझरने चेहरा धुण्यास काहीच हरकत नाही. ज्यामुळे तुमच्या त्वचेतील अतिरिक्त Sebum नियंत्रित राहते आणि चेहरा स्वच्छदेखील होतो. या क्लिंझरने चेहरा धुतल्यामुळे तुमच्या चेहरा लवकर तेलकट होत नाही. ज्यामुळे तुम्ही केलेला मेकअप लवकर खराब होत नाही. शिवाय या क्लिंझरच्या वापरामुळे दिवसभर तुमच्या चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी जाणवतो. या क्लिंझरमध्ये क्लिनिकल प्रूव्हन फॉर्म्युला आणि पी.एच. बॅलंस फॉर्म्युला वापरण्यात आला आहे. शिवाय हे नॉन कॉमेडोजेनिक, हायपोअॅलर्जिक, पेराबन फ्री, सुंगधविरहीत आहे.
युथ टू दी पीपल सूपरफूड क्लिझंर – Youth To The People Superfood Cleanser
तेलकट त्वचेच्या समस्यांसाठी खास हे क्लिंझर तयार करण्यात आलेलं आहे. हे क्लिंझर जेलबेस असून त्यामुळे तुमच्या त्वचेची चांगली काळजी घेतली जाते. ज्यामुळे त्वचेवरील तेलकटपणा, सुरकुत्या, निस्तेजपणा, फाईन लाईन्स कमी होऊ शकतात. हे क्लिंझर इतकं सौम्य आहे की तुम्ही चेहरा धुण्यासाठी त्याचा दोनवेळा वापर करू शकता. शिवाय ते पॅराबेन फ्री, सल्फेट फ्री, अल्कोहोल फ्री, वेगन आहे.
न्युओट्रोजिना ऑइल फ्री अॅक्ने फेस वॉश – Neutrogena Oil-Free Acne Face Wash
जर तुमची त्वचा फारच तेलकट असेल आणि तुम्हाला सतत अॅक्नेची समस्या होत असेल तर हे क्लिंझर अतिशय उत्तम आहे. कारण यात ऑईल फ्री फॉर्म्युलाचा वापर करण्यात आलेला आहे. ज्यामुळे तुमच्या त्वचेवर ते सौम्यपणे काम करतं. या क्लिंझरमुळे तुमच्या त्वचेतील अतिरिक्त तेल निघून जातं आणि एक्ने कमी होतात.
अॅव्हेन्यू इ्यू थर्मल क्लिंझिंग फोम – Avene Eau Thermale Cleansing Foam
या क्लिंझरचा वापर केल्यामुळे तुमच्या त्वचेवर एक प्रकारचा मॅट इफेक्ट दिसतो. तेलकट त्वचेप्रमाणेच हे क्लिंझर संवेदनशील त्वचेसाठी देखील उपयुक्त आहे. यातील सौम्य क्लिंझर घटकांमुळे तुमच्या त्वचेतील धुळ, माती, मेकअप निघून जातो. या सर्वोत्तम साबण मुक्त, पॅराबेन फ्री क्लिंझरमुळे तुमची त्वचा स्वच्छ तर होतेच शिवाय मऊ आणि मुलायमदेखील होते.
ओलेहेनरिक्सन फाइंड युवर बॅलन्स ऑइल कंट्रोल क्लिंझर – Olehenriksen Find Your Balance Oil Control Cleanser
या सल्फेट फ्री, पॅराबेन फ्री क्लिंझरमुळे तुमच्या त्वचेतील अतिरिक्त Sebum त्वचेतून निघून जाते शिवाय त्वचेचा पी. एच.बॅलंस राखण्यास मदत होते. या क्लिंझरमुळे त्वचा स्वच्छ तर होतेच शिवाय तुमच्या त्वचेला आलेला सैलपणादेखील कमी होतो, त्वचेवरील डेडस्कीन कमी होतात, त्वचेची छिद्रे मोकळी होतात. ज्यामुळे तुम्हाला मऊ आणि मुलायम त्वचा मिळते. जर तुम्हाला सुर्यप्रकाशात जायचं असेल तर सनस्क्रीन लावण्याआधी क्लिंझरचा वापर करा.
पॉला चॉइस स्किन बॅलेन्सिंग ऑइल रिड्यूसिंग क्लिंझर – Paula’s Choice Skin Balancing Oil-Reducing Cleanser
कोणत्याही रंग आणि सुंगधाचा वापर न केलेल्या या क्लिंझरमुळे तुमची त्वचा कोरडी न होता स्वच्छ होते. त्वचेचा तेलकटपणा कमी होतो. त्वचेवरील मेकअप, धुळ, माती, प्रदूषण, अतिरिक्त Sebum, तेलकटपणा कमी होतो. ज्यामुळे त्वचेची छिद्रे मोकळी होतात आणि त्वचेचा पी एच बॅलंस राखण्यास मदत होते. या क्लिंझरचा नियमित वापर केल्यामुळे तुमच्या त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते.
न्युओक्युटीस न्युओ- क्लिंसे स्किन क्लिंझर – Neocutis Neo-Cleanse Exfoliating Skin Cleanser
या सल्फेट फ्री क्लिंझरमुळे तुमच्या त्वचेचा पोत सुधारतो. हे क्लिंजर सौम्य असून नॉर्मल आणि तेलकट त्वचेसाठी वापरता येतं. या क्लिंझरमधील ग्लिसरिन तुमच्या त्वचेतील नैसर्गिक तेलाचा नाश करत नाही. सुर्यप्रकाशात जाताना तुम्ही या क्लिंझरचा वापर करून नंतर सनस्क्रीन लावू शकता. कारण या क्लिंझरमुळे तुमचे सुर्यप्रकाशातील घातक किरणांपासून संरक्षण होते. हे डर्माटोलॉजिस्ट टेस्टेड असून यात कोणत्याही कृत्रिम रंग, सुंगध, चरबीचा वापर केलेला नाही.
तेलकट त्वचेसाठी वापरण्यात येणाऱ्या क्लिंझर्सविषयी काही निवडक प्रश्न – FAQs
प्रश्न -नियमित क्लिंझरचा वापर केल्यामुळे त्वचा मुळापासून स्वच्छ होते का ?
उत्तर- तेलकट त्वचेची काळजी घेताना तुमच्या डेली स्किन केअर रूटीनमध्ये नियमित या क्लिंझरचा वापर केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो. तेलकट त्वचेवरील अतिरिक्त Sebum मुळे तुमची त्वचा तेलकट दिसत असते. या क्लिंझर्स मुळे तुमच्या त्वचेतील धुळ, माती, प्रदुषण आणि तेलकटपणा कमी होतो यासाठी नियमित या क्लिंझर्सचा वापर करा. मात्र जर तुमची त्वचा फार तेलकट नसेल तर तुम्ही कोरड्या त्वचेसाठी बेस्ट असलेल्या क्लिंझरचा वापर करू शकता.
प्रश्न – तेलकट आणि सतच एक्नेची समस्या असलेल्या त्वचेसाठी बेस्ट क्लिंझर कोणते ?
उत्तर -जर तुमची त्वचा तेलकट असेल शिवाय तुमच्या त्वचेवर सतत एक्नेची समस्या जाणवत असेल तर वर दिलेली हे क्लिंझर्स तुमच्यासाठी योग्य आहेत. La Roche-Posay Effaclar Purifying Foaming Gel Cleanser for Oily Skin आणि Neutrogena Oil-Free Acne Face Wash या दोन क्लिंझर्सचा तुम्हाला चांगला फायदा होईल.
प्रश्न – तेलकट त्वचेसाठी क्लिंझिंग मिल्क वापरणं योग्य आहे का ?
उत्तर -चेहरा स्वच्छ करण्यासाठी क्लिझिंग मिल्कचा वापर केला जातो. दुध साफ करणे तेलकट त्वचेसाठी इतर चेहरा साबणइतके किंवा क्लीन्झर तीव्र नाही. क्लिंझिंग मिल्क हे सौम्य असल्यामुळे कोरड्या त्वचेप्रमाणेच तेलकट त्वचेला स्वच्छ करण्यासाठी तुम्ही त्याचा वापर नक्कीच करू शकता. क्लिंझिंग मिल्क हे क्लिंझर्स नसल्यामुळे तुम्हाला हळुवारपणे तुमच्या त्वचेवर लावावे लागतं शिवाय त्यामुळे तुमच्या त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी होईलच असे नाही.