ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
अंडरआर्म्समध्ये येत असेल खाज तर करा सोपे उपाय, जाणून घ्या कारणे

अंडरआर्म्समध्ये येत असेल खाज तर करा सोपे उपाय, जाणून घ्या कारणे

 

हिवाळा असो अथवा उन्हाळा असो आपल्या अंडरआर्म्स (underarms) मध्ये घाम तर येतच असतो आणि अति घाम आल्याने खाजही येते. ही समस्या सर्वांनाच त्रासदायक ठरत असते. त्यातही तुम्हाला स्लिव्हलेस घालायची जास्त सवय असेल तर तुम्हाला ही समस्या अधिक त्रासदायक ठरत असते. थोड्या थोड्या वेळाने घाम न पुसल्यास, तुम्हाला अंडरआर्म्समध्ये खाज येणं ही समस्या होतेच. जास्त घाम आला की आपोआपच चिडचिड वाढते आणि मग कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही. पण याची नक्की कारणं काय आहेत आणि यावर काय सोपे उपाय आहेत आपण पाहूया.

अंडरआर्म्समध्ये खाज येण्याची कारणे

 

अंडरआर्म्समध्ये वेगवेगळ्या कारणांनी खाज येते. त्यापैकी काही खाज महत्त्वाची कारणे आपण जाणून घेऊया. यावर आपण त्वरीत इलाज केला तर खाज येणे बंद होऊ शकते. 

1. वॅक्सिंग

Shutterstock

 

बऱ्याचदा काही जणांना वॅक्स करण्यामुळे अलर्जी येते,  ज्यामुळे त्वचेवर लालपणा, खाज, पुरळ आणि सूजदेखील अंडरआर्म्समध्ये येते.  पण तुम्हाला अशी समस्या असेल तर तुम्ही वॅक्सिंग करणं सहसा टाळा. यामुळे तुमची त्वचा अधिक खराब होऊ शकते.  कारण खाजवत राहिल्यास अंडरआर्म्सचा भाग काळा पडायला सुरूवात होते. 

ADVERTISEMENT

काखेतून येतोय घामाचा दुर्गंध, करा सोपे घरगुती उपाय

2. साबण आणि डिटर्जंटचा वापर

Shutterstock

 

बऱ्याचदा आपण सुगंधी साबणाचा वापर हा शरीर सुगंधी राहावं आणि स्वच्छ राहावं यासाठी करत असतो. पण हा सुगंधी साबण आणि  कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणारी सुगंधी डिटर्जंट पावडर तुमच्या त्वचेला नुकसान पोहचवू शकते. यामध्ये सर्वात पहिला नंबर लागतो तो अंडरआर्म्सचा. यामुळे खाज तर येतेच त्याशिवाय जळजळ, त्वचा फाटणे अशा समस्याही निर्माण होतात. त्यामुळे सहसा सुगंधी साबणाचा वापर अंडरआर्म्सवर करू नये. 

3. यीस्ट इन्फेक्शन

 

साबणामध्ये मिसळलेल्या केमिकल्समुळे तुम्हाला यीस्ट इन्फेक्शनचा धोकादेखील आहे. या इन्फेक्नशमुळे अंडरआर्म्समध्ये खाज निर्माण होते. यापासून सुटका मिळविण्यासाठी अँटि फंगल क्रिम तुम्ही लावू शकता. यामुळे तुम्हाला लवकर या समस्येपासून सुटका मिळेल. पण हे इन्फेक्शन तुम्हाला पाच दिवसापेक्षा अधिक असेल तर तुम्ही डॉक्टरांकडे जाणं योग्य आहे. 

ADVERTISEMENT

अंडरआर्म्समधील Dark Patches घालवण्यासाठी 7 सोप्या टिप्स

4. जास्त घाम येणे

Shutterstock

 

त्वचेममध्ये घाम जास्त असल्यास, खाज जास्त येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे तुम्हाला घाम जास्त येत असेल तर अशावेळी तुम्ही अँटिपर्सपिरेंटचा वापर करायला हवा. तसंच तुम्ही जास्तीत जास्त कपडे हे कॉटनचे वापरायला हवेत. सिंथेटिक कपडेही वापरू शकता. 

अंडरआर्म्समध्ये येत असेल खाज तर करा उपाय

 

कोणत्याही गोष्टीवर उपाय तर असतातच. अंडरआर्म्स हा आपला नाजूक भाग असतो. त्यामुळे त्यावर लवकरात लवकर उपाय होणे गरजेचे आहे. खाज न येण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय नक्कीच करू शकता. 

ADVERTISEMENT

1. सतत घाम पुसत राहणे

Shutterstock

 

तुम्हाला जर सतत घाम येत असेल. तर तासाच्या अंतरावर तुम्ही काखेतला अर्थात अंडरआर्म्समधील घाम हा कपड्याने अथवा टिश्यू पेपरने पुसत राहावा. जेणेकरून तुमची त्वचा संरक्षित राहील. पुसताना हलक्या हाताने पुसा. अंडरआर्म्स खसाखसा चोळू नका. नाहीतर त्याचा उलटा परिणाम होऊ शकतो. 

#DIY: अंडरआर्म्सचा काळेपणा कमी करण्यासाठी झटपट घरगुती उपाय

2. तुळस आणि कडूलिंबाची पेस्ट

Shutterstock

ADVERTISEMENT

 

तुळशीची आणि कडूलिंबाच्या पानांची एक पेस्ट तयार करून घ्या आणि ही पेस्ट अंडरआर्म्सला लावा. काही वेळ ही पेस्ट तशीच ठेवा आणि मग थंड पाण्याने धुवा. यामुळे तुम्हाला खाजेपासून सुटका मिळेल. यात असणारे अँटिबॅक्टेरियल आणि अँटिफंगल गुण खाजेपासून तुम्हाला वाचवतात आणि त्वचेवर संक्रमण होऊ देत नाही. तुम्ही ही पद्धत साधारण 3 – 4 वेळा आठवड्यातून करू शकता.  तुमची त्वचादेखील चांगली राहील आणि घामही अधिक येणार नाही. 

3. मॉईस्चराईजर लावा

Shutterstock

 

आंघोळ झाल्यानंतर तुम्ही चेहऱ्याला मॉईस्चराईज करता त्याचप्रमाणे अंडरआर्म्समध्ये खाज येऊ नये यासाठी  तुम्ही नियमित मॉईस्चराईज लावा. यामुळे त्वचा अधिक मऊ आणि मुलायम राहील आणि खाजही येणार नाही. याचा नियमित वापर करा. आंघोळ झाल्याझाल्या  तुम्ही याठिकाणी मॉईस्चराईजर लावा. 

अंडरआर्म्स स्वच्छ ठेवण्यासाठी वॅक्सिंग आणि शेव्हिंग क्रीमपैकी कोणता प्रकार योग्य, जाणून घ्या (How To Clean Underarms In Marathi)

ADVERTISEMENT

4. बेकिंग सोडा

Shutterstock

 

आंघोळीसाडी जे पाणी घ्याल त्या गरम पाण्यात साधारण पाव कप बेकिंग सोडा घाला. यामुळे तुम्हाला त्वचा अधिक चांगली ठेवण्यासाठी बेकिंग सोड्याची मदत होईल. बेकिंग सोड्यात असणारे अँटिफंगल गुण हे तुमच्या अंडरआर्म्समध्ये येणारी खाज थांबविण्याचे काम करते. तुम्हाला हवं तर तुम्ही आंघोळीच्या आधी बेकिंग सोड्याची पेस्ट बनवूनही काही वेळ अंडरआर्म्सला लावून ठेऊ शकता. याचा नक्कीच चांगला परिणाम होऊ खाज कमी होते.

16 Feb 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT