प्रत्येक पुरुषाला वाटते महिलेला या 5 सेक्स ट्रिक्स माहीत असाव्यात

प्रत्येक पुरुषाला वाटते महिलेला या 5 सेक्स ट्रिक्स माहीत असाव्यात

प्रत्येक कपल आपली सेक्स लाईफ अत्यंत चांगली असावी म्हणून काही ना काही करत असते. पण बऱ्याचदा काही गोष्टी करूनही सेक्स लाईफ तितकी इंटरेस्टिंग नसते. बऱ्याचदा महिला या सेक्सच्या बाबतीत सर्व गोष्टी पुरूषांवर सोडून देतात. पण पुरूषांनाही वाटते की, आपल्या जोडीदाराने कधीतरी पहिल्यांदा पुढाकार घ्यावा.  त्यांच्यासाठी प्लॅन करावा, सरप्राईज द्यावे. पुरूषांना नक्की कोणत्या गोष्टी त्यांच्यासाठी जोडीदाराने केलेल्या आवडतात हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अशा 5 ट्रिक्स ज्या सेक्सच्या बाबतीत प्रत्येक महिलेला माहीत असायलाच हव्यात. यामुळे त्यांची सेक्स लाईफ अधिक इंटरेस्टिंग होऊ शकते. तुम्हालाही तुमची सेक्स लाईफ अधिक वाईल्ड बनवायची असेल तर या ट्रिक्स माहीत करून घेणं आवश्यक आहे. तुम्ही या ट्रिक्स जर सेक्स लाईफमध्ये अंमलात आणल्यात तर तुमची सेक्स लाईफ ही नक्कीच चांगली राहील. तसंच तुमचा जोडीदारही नेहमी आनंदी राहील. जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या प्रत्येक पुरूषाला वाटतात की महिलेला माहीत असायलाच हव्यात. 

1. सेक्शुअल परफॉर्मन्स करताना प्रशंसा चांगली वाटते

Shutterstock

जास्त पुरूषांना आपल्या जोडीदाराने सेक्स परफॉर्मन्स  केल्यानंतर त्यांची प्रशंसा करावी असे वाटते. पुरूषांना केलेल्या सेक्सबद्दल अधिक जाणून घ्यायला जास्त आवडतं. आपण आपल्या जोडीदाराला पुरेपूर आनंद देत आहोत की नाही हे त्यांना नेहमी जाणून घ्यायचे असते. त्यामुळे सेक्स करताना अथवा करून झाल्यानंतर तुम्हाला त्यांनी तुम्हाला दिलेल्या आनंदाबद्दल नक्की काय वाटतं आहे ते त्यांना सांगा. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणि तुमच्याबद्दल प्रेम अधिक वाढतं. आजचं सेशन खूप चांगलं होतं अथवा तू आज सेक्स करताना जी पोझिशन केलीस ती कशी वाटली याबद्दल सांगून तुम्ही प्रशंसा करू शकता. 

सेक्स करताना जोडीदार असेल बोअरिंग तर वापरा या ट्रिक्स

2. तुमचा स्पर्श त्यांना सुख देतो

Shutterstock

महिलांप्रमाणेच पुरूषांचेही कामोत्तेजक अंग असते. पण महिलांना याबाबत सांगायला बऱ्याचदा पुरूषांना संकोच वाटत असतो. मुलांना इनर थाईज, छाती आणि चेहऱ्यावर महिलांचा स्पर्श अधिक आवडतो. त्यामुळे त्यांना अधिक सेक्स चढतो. त्यामुळे सेक्स करताना महिलांना त्यांच्या या भागाला हात लावावा असं त्यांना वाटतं. त्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.  जर तुम्हाला सेक्सचा आनंद आपल्या पुरुष जोडीदाराकडून अधिक मिळवायचा असेल तर तुम्ही त्यांच्या छाती आणि चेहऱ्याला अधिक स्पर्श करा. 

रात्र बनवायची आहे अधिक रोमँटिक तर नक्की खेळा किसिंग गेम

3. पुरूषांच्याही असतात सेक्शुअल फँटसीज

महिलांना ज्याप्रमाणे सेक्शुअल फँटसीज असतात त्याचप्रमाणे पुरुषांच्याही असतात. पण आपण जर आपल्या महिला जोडीदाराला सांगितल्या तर त्या हसतील अथवा आपल्याबद्दल त्यांना काय वाटेल असं वाटून सहसा शेअर करत नाहीत. पण महिलांनी त्यांच्या फँटसीज जाणून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यामुळे त्यांना तुम्ही अधिक जवळच्या वाटता. सेक्स करताना एखादा गेम अथवा एखादी वेगळी पोझिशन ट्राय करावं वाटणं हे साहजिक आहे. त्यामुळे तुम्हाला दोघांनाही त्याचा आनंद घेता येईल. 

आपल्या बॉयफ्रेंडसह नक्की खेळा ‘हे’ सेक्सी ड्रिंक गेम्स (Drinking Games In Marathi)

4. सेक्शुअल अॅक्टिव्हिटी दरम्यान करा सेक्सी टॉक

Shutterstock

सेक्शुअल  अॅक्टिव्हिटी दरम्यान करा सेक्सी बोलणं जास्त पुरूषांना आवडतं. सेक्स दरम्यान त्यांच्या कानात हळूवारपणे बोलत राहणं त्यांना तुमच्याकडे  अधिक आकर्षित करतं. तुम्ही त्यांच्याबद्दल बोलून त्यांना अजून आपलंसं करू शकता. तुम्हाला त्यांनी सेक्समध्ये काय करायला हवंय हे अशावेळी सांगणं त्यांना अधिक आवडतं. तुम्हाला त्यांचा स्पर्श कसा वाटतोय हे त्यांना अधिक हळूवारपणे कानात सांगा. नुसतं सांगण्यापेक्षा सेक्शुअल  अॅक्टिव्हिटी दरम्यान असं बोलणं केल्यास, जोडीदाराचा सेक्स परफॉर्मन्स अधिक चांगला होतो आणि दोघांनाही समाधान मिळतं. 

सेक्स करताना सर्वात पहिले फिलिंग जाणवतं ते स्तनांना

5. डोळ्यात बघा

Shutterstock

सेक्स करताना बऱ्याचदा महिला डोळे बंद करून घेतात. पण पुरूष जोडीदारांना त्यांचे डोळे आणि  त्या डोळ्यात त्यांच्याविषयी असणारं आकर्षण पाहायचं असतं. त्यांनी आपल्या डोळ्यातील त्यांच्याबद्दल वाटणारी काळजी, प्रेम पाहावं असं त्यांना वाटतं. डोळ्यातूनच महिलांनी त्यांना समजून घ्यावं असंही त्यांना वाटतं. त्यामुळे सेक्स करताना त्यांच्या डोळ्यात बघा. त्यामुळे ते तुम्हाला अधिक जवळ करतील. 

या पाच ट्रिक्स तुम्ही ट्राय केल्यात तर तुमचे सेक्स लाईफ उत्तम राहील हे नक्की.