आईसारखे दैवत साऱ्या जगतात नाही असं आपण नेहमीच म्हणतो आणि ते खरंही आहे. देवाला सर्व ठिकाणी पोहचणं शक्य नव्हतं म्हणून त्याने आई बनवली असं म्हटलं जातं. आज मदर्स डे (Mother’s Day) आहे. आपण आपल्या आईवर खूप प्रेम करतो पण सर्वात जास्त तिलाच गृहीत धरतो. त्यामुळे किमान आजच्या दिवशी तरी तिचा दिवस साजरा करून तिला आराम देण्याचा आपला विचार असतो. या दिवशी तिला वेगवेगळी गिफ्ट आपण द्यायचा विचार करत असतो. पण नक्की तिला काय द्यायचं. तर आईवर कविता केली तर. स्वतःला कविता येत नसतील तर आईच्या कविता आपल्याला गुगलवरही अनेक शोधून सापडतील. अशाच काही आईवरील मराठी कविता (marathi kavita aai) आम्ही तुम्हाला या लेखातून देणार आहोत. आईसाठी वेगवेगळ्या चारोळी, कविता मराठीमध्ये अनेक आहेत. आई म्हणजे आपले दैवत मग अशा दैवतावर आपण काही मनाला भावणाऱ्या कविता या लेखातून पाहणार आहोत. आईवर अनेक मोठ्या आणि अगदी लहान कविताही करण्यात आल्या आहेत. आम्हाला त्यापैकी काही आवडलेल्या कविता आम्ही इथे देत आहोत. तुम्हीही तुमच्या आईसाठी यातील कविता निवडून या मदर्स डे ला नक्की आपल्या आईला आनंदी करा. आईच्या कविता करून तिलाही द्या सुखद सरप्राईज.
आईसाठी भावनात्मक कविता (Heart Touching Poem On Mother In Marathi)
1. आई साठी काय लिहू
आई साठी कसे लिहू
आई साठी पुरतील एवढे
शब्द नाहीत कोठे
आई वरती लिहीण्याइतपत
नाही माझे व्यक्तिमत्व मोठे
जीवन हे शेत आई म्हणजे विहीर
जीवन ही नौका तर आई म्हणजे तीर
जीवन ही शाळा तर आई म्हणजे पाटी
जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी
आई तू उन्हामधली सावली
आई तू पावसातली छत्री
आई तू थंडीतली शाल
आता यावीत दु:खे खुशाल
आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं ठंडगार पाणी
2. कुणीच नाही माझे ..आई
करूणेचे तळहात पोरके ..आई
आकांत श्वासांत , शांतता कुजबुज टाळे माझे ..आई
ना शुन्य आसपास, काळोख मावळे माझे ..आई
असे जवळ – तसे दूर भाबडे अंतराळ माझे ..आई
कुणीच नाही माझे ..आई
करूणेचे तळहात पोरके ..आई
असेल – आहे – असणार, कुणी शब्द गाळले माझे ..आई
अपराध असा परमेशाचा, का? तेज लोपती माझे ..आई
अभेद्य चौकट अश्रुंची, चित्र पुराणे माझे ..आई
कुणीच नाही माझे ..आई
करूणेचे तळहात पोरके ..आई
3. माझं दैवत उभं माझ्याच घरात,
आयुष्यभरासाठी ‘आशीर्वाद’ देण्यास.
माझ्या मना काहीच कळेना,
विसर मनाला लागलो वारीला.
वारी-वारी करून झालो मी बारीक,
खर्चुनी घरचं धन लागली मनास सल.
सुखाच्या मी शोधात कपाळी बुक्का लावत
माझं दैवत घरात मी निघालो वारीत.
देहू-आळंदी झाले पंढरी झाली-काशीलाही गेलो
मिसळलो मी वारीत गुलाल खोबरे उधळत.
उशिराने कळुनी चुकले मनास
‘वैभवाचं मंदिर’ त्यावर कळस.
‘तुळशीसम’ प्रसन्न सगळीकडं सहभाग,
सुखदुखात सोबत “मना हिरवं रोपटं”.
आली दाटुनी नयनी आसवे,
मन माझे पोरके झाले.
होतं घरीच दैवत मी निघत वारीत, मी निघत वारीत माझं दैवत घरात.
4. जेव्हा मी पाऊसातून घरी आलोना, ………….
दादा बोलला :- अरे तुला छत्री नाही घेऊन
जाता आली का ?
ताई बोलली :- आजारी पडल्यावरच मग
ह्याला कळेल….
बाबा ओरडले :- पाऊस थांबेपर्यंत
तुला थांबता नाही आले का कुठे, भिजत
यायची काय गरज होती…. ?
पण ……. आई
आई माझे केस पुसत म्हणाली :- मूर्ख हा पाउस,
माझा मुलगा घरी येई पर्यंत थांबू
नाही शकला का……
वाचा – आई असते पहिले प्रेम..कधीही न सोडून जाणारे, मातृदिनासाठी शुभेच्छा संदेश
5. आई तुझे लेकरू आज खूप एकटे पडले
तुझ्या स्पर्शासाठी ते खूप आज रडले !!
तुझ्या मायेच्या सागराने मला
कधी वादळ तर कधी किनारे दाखवले !!
तुझ्याच छायेत माझे घर असू दे
असे नेहमीच वाटायचे
तू जवळ नसताना मनात काहूर माजायचे !!
आज तुला सोडून मी जगायला शिकतोय
एकटे पडलो इथे सगळेच मला डिवचतात !!
सांगायची तू कथा मी अर्थ आज जाणतोय
नसतो कुणी आपले हे मी खरचं पहातोय !!
जवळ करतात इथे आणि दरीमध्ये सोडतात
जीव कधी जाईल ह्याची ते वाटच पाहतात !!
आई मला घे जवळ मला सोबतच राहू दे
तुझ्याच डोळ्यांनी हे जग मज पाहू दे !!
धन्य झालो मी जी तू मला भेटलीस
असे वाटतं देवांशीच मैत्री मी गाठली …. !!
आई !! तू आहेस माझी आई !!
6. प्रेम तुझं हे एक मोठे आकाश
काळोखात आहे तू माझा प्रकाश
जमिनी एवढी तुझी माया
उन्हा मधली तू छाया दाखवले तू मला
जग हे रंगीन
नऊ महिने सांभाळले तू मला
सहून वेदना कठीण शिकवले तू जगायला मला
कशे फेडू मी तुझे उपकार
घेऊन जन्म हजारो सुद्धा
भेटणार नाही तुझ्यासारखी आई
तिन्ही त्रिकाळ केले असतील मी बरेच पुण्य
जे आलो जन्माला पोटी तुझ्या
जन्म घेऊन मी झालो धन्य
सदा चरणी राहीन मी आई तुझ्या
7. आई माझी अशी, खान अमृताची जशी…. 9
महिने 9 दिवस जपले कुशी मद्धे मला क्षण
क्षणा मद्धे ध्यास माझा फक्त
तिला कधी रडली, हसली नाही अश्रू दिले,
मला माझ्या रागातही तिने फक्त
माया दिली ,मला आई
माझी अशी जशी कल्परुक्षाची साउली….
जरी भुललो चुकलो सांभाळले तिने मला,
जरी दमलो थकलो विसावा तूच दिला,
मला वृक्ष घनदाट केला जोपासून
रोपट्याला वेळो वेळी धावलीस सावरण्या तू
ग मला आई
माझी अशी जशी धीराचा डोंगर…. पंख
आम्हाला तू दिले पार पहाड करण्या भर
उमेदीचा त्यात माळरान ओलांडण्या पंख
मिळाले ग मला आणि उमेदही तुझ्यामुळे कृतघ्न
होऊनिया दूर गेलो समृद्धीकडे आई
माझी अशी सहन शक्ती धरतीची…. परत येईल
घरटी माझ्या परी तुला ठाव मला भास
होतसे जरी चुकलो मी गाव आता अधीर
मी झालो कधी जाणारं परती कधी परत तू
मला मारशील माय-मिठी कधी परत तू
मला मारशील माय-मिठी….
8. आ म्हणजे आस्था,
ई म्हणजे ईश्वर !!
आई तू उन्हा मधली सावली…
आई तू पावसातली छत्री !!
आई तू थंडीतली शाल…
आता यावीत दु:खे खुशाल!!
आई म्हणजे मंदिराचा कळस…
आई म्हणजे
अंगणातली पवित्र तुळस !!
आई म्हणजे भजनात
गुणगुणावी अशी संतवाणी!!
आई म्हणजे तृष्णेने व्याकूळ
झाल्यानंतर प्यावं असं थंडगार
पाणी!!
आई म्हणजे वेदने नंतरची
सर्वात पहिली आरोळी -:
आ …………….ई…..
9. आई” एक नाव ..,
जगावेगळा भाव …
“आई” एक जीवन..,
प्रेमळ मायेच लक्षण…
“आई” एक श्वास..,
जिव्हाळ्याची रास…
“आई” एक आठवण..,
प्रेमाची साठवण…
“आई” एक वाट..,
आयुष्यातील सर्वात पहिली गाठ…
“आई” एक गोड नांत..,
बहरणारया जीवनाची हिरवी पात…
“आई” एक.. न संपणारी ठेव..,
जीवापाड जपणारी एकमेव…
“आई” एक घर..,
वात्सल्याची सर…
“आई”…नेहमी तुझ नाव घेताना
नेहमी येतो मला हुंदका..,,
तू दिलेल्या जिवनाच ऋण
फेडू शकेल मी का…
10. आई …वेगळीच असते.
डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी असते.
डोळे मिटल्यासारखे करते, ती मैत्रीण असते.
डोळे वटारून प्रेम करते, ती पत्नी असते.
आणि…
डोळे मिटेपर्यंत प्रेम करते, ती आई असते.
खरच… आई किती वेगळी असते.
आई तुला Thanks म्हणायचं राहूनच जातं…
आईसाठी प्रेमळ कविता (Lovable Marathi Kavita For Mother)
प्रत्येक महिला ही प्रत्येकाच्या आयुष्यात खरं तर महत्वाची असते. केवळ जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या की काम भागत नाही. त्यातही आई या स्त्री चे प्रत्येकाच्या आयुष्यात खास स्थान असते. अशाच आपल्या आईसाठी काही प्रेमळ कविता तुम्ही लिहून देऊ शकता.
1. आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी
2. आई बघते प्रतिबिंब तुझ्यात, मिळतो मला दिलासा
शोधू कुठे तुझ्यात मला, दिसे मज एक आरसा
पाहून सशक्त स्त्री ला आठवे मला मज माझा वारसा
3. पहिला शब्द जो मी उच्चारला
पहिला घास जिने मला भरवला
हाताचे बोट पकडून जिने मला चालवले
आजारी असताना जिने रात्रंदिवस काढले तीच माझी आई
4. तुझ्या अपरंपार कष्टाचं आज बीज होऊ दे
डोळे मिटून बसलेल्या नशिबाचे आज चीज होऊ दे
तू पार केलेस डोंगर आज दुःखाचे
पाखरांच्या पोटात आज जाळ होऊ दे
किती सहन केलेस आयुष्य यातनांचं
आज मला तुझं आभाळ होऊ दे
माझ्या जगण्याच सार होऊ दे
5. माझे हात हातात तुझ्या आई
मी चालतो ठायी ठायी
अशीच थाप तुझी राहू दे गं आई
मी जग जिंंकेन पायी पायी
6. आई ही आईच असते
तिच्यासारखी दुसरी कोणीच नसते
देव सगळीकडेच असतो म्हणून आईचे अस्तित्व असते
आई तुझ्या केल्या कविता
अर्पण करते तुजला
आशिर्वाद दे मजला
स्पर्श होऊ दे तुझ्या चरणा
आनंद हा दे मजला
7. आईच्या पदरात ती ताकद आहे
जी सूर्याला पण हरवते
खरोखरंच
आईची माया आपल्यासाठी एक छत्री असते
8. गोष्टी ऐकायला कोणी नाही
म्हणून आई माझी रूसली
माझ्याकडे पाहून अगदी तेव्हा
उदास कोरडं हसली
9. आई तुझा हात वात्सल्याची बरसात
आई तुझी माया जशी आभाळाची छाया
आई तुझे शब्द जसा साठलेला मध
आई तुझे ज्ञान जशी ग्रंथाची खाण
आई तुझे गाणे जिथे विश्व सारे येते
आई तुझी मूर्ती मिळे भक्ती आणि शांती
प्रज्ञा दाते, कोल्हापूर
10. सत्यातली एक दुनिया
त्यात अतूट प्रेमाच्या माळा
जोजवते आई लेकराला
निज निज माझ्या बाळा
वाचा – Aaji Aajoba Quotes In Marathi
आईची महती सांगणाऱ्या कविता (Aai Kavita In Marathi)
1. अतुलनीय तुझी माया, मनमोकळ्या स्वभावाचा तू नमुना
बडबड आणि कटकटीतही दडलेल्या असतात तुझ्या सद्भवना
तराजूत तू तोलत नाहीस व्यक्ती वा त्यांच्या संवेदना
कणभरही ठेवत नाहीस कधीच कुणाविषयी मनात घृणा
वर्षानुवर्ष निरोगी आयुष्य लाभू दे तुला
हीच आमुची ईश्वरचरणी प्रार्थना
– वेद बर्वे, विरार
2. कोठेही न मागता भरभरून मिळालेलं दान म्हणजे आई
विधात्याच्या कृपेचं निर्भेळ वरदान म्हणजे आई
3. प्रत्येक कलाकार आपण तयार केलेल्या कलेला स्वतःचे नाव देतो
पण आईसारखी कलाकार संपूर्ण जगात नाही
जी बाळाला स्वतः जन्म देऊनही
वडिलांचे नाव देते
4. जगी माऊली सारखे कोण आहे ।
जिचे जन्मजन्मांतरी ऋण आहे।।
असे ऋण हे की जया व्याज नाही।
ऋणाविन त्या जीवना साज नाही ।।
जिने सोसल्या यातना कोटी कोटी ।
तुला जन्म लाभे तिच्या पुण्य पोटी।।
जिच्या यातनाचे जगी मोल नाही ।
तिच्या सारखा लाघवी बोल नाही।।
जिने लाविला लेकरांना लळा या।
तिच्या दैवी लेखी उन्हाळी झळा या ।।
जिच्या पूजनाला जगी फूल नाही ।
अशा देवतेचे जगी नाव आई।।
5. माझ्या जीवनाची सावली
आई माझी माऊली
कष्ट करोनी अतोनात
भरवलास मज घास
केलीस माझ्यावर माया
जशी वृक्षाची छाया
जगण्यास मज दिशा तू दावली
माझ्या जीवनाची सावली
आई माझी माऊली
6. आई माझी,
लेकराची वाट, आंधळ्याची काठी
छप्पराची ताटी, भाकरीची पाटी
आई माझी
गाडीचं इंधन, कपाळाचं गोंदण
अमृताचं ताम्हण, चाकाचं वंगण
आई माझी
मळ्याची माती, गणाची आरती
दिव्याची वाती, संताची संगती
आई माझी
गव्हाची कुडी, पिकाची सुडी
सज्जना झोपडी, चंदनाची छडी
आई माझी
शिवाची जिजाई, जिजाची शिवाई
लेखणीची शाई, जगाची आई
आई माझी
– विठ्ठल जाधव, बीड
7. आई – हृदयाची हाक
आई – निःशब्द जाग
आई- गूढ अंतरीचे
आई – नाव परमात्म्याचे
आई – नसे केवळ काया
आई – ओंजळभर माया
आई – गगनभरारी
आई – पंढरीची वारी
आई – दुधाळ सावली
आई – आभाळ माऊली
आई – एक अक्षयगान
आई – कर्णाचे दान
सुमती वानखेडे
8. आई
एकमेव स्त्री
जी माझा चेहरा बघायच्या आधीपासून
माझ्यावर प्रेम करते
9. आई माझी मायेचा सागर
दिला तिने जीवना आकार
आई वडिल माझे थोर
काय सांगू त्यांचे उपकार
जीवनाच्या वाटेवरती
किती अस्तो त्यांचा उपकार
आई माझी मायेचा सागर ..
तडपत्या उन्हात अन रखरखत्या रानात
राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या गावात
कधी मिडेल मुठभर घास
कधी घड़े तुला उपवास
वोल्या मातीतून चालताना
सोडविले कट्याचेभास
आई माझी मायेचा सागर ..
रविची चांदनी तू ग चंदनाचा कोर
शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर
तुझ्या शीतल छाये मधे
उभा आयुष्य जगेल
आई देवापाशी मी ग
आई तुलाच ग मागेन
आई माझी मायेचा सागर ..
10. पूर्वजन्माची पुण्याई असावी
जन्म जो तुझ्या गर्भात घेतला,
जग पाहिलं नव्हतं तरी
नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला!
‘या’ आहेत आपल्या मुलांचा एकटीने सांभाळ करणाऱ्या बॉलीवूडच्या 11 सिंगल मदर्स
आईची आठवण करून देणाऱ्या कविता (Memories of Aai Poem In Marathi)
1. आई तुझी आठवण येते
सुखद स्मृतीच्या कल्लोळांनी काळीज काळजते
वात्सल्याचा कुठे उमाळा, तव हातांचा नसे जिव्हाळा
हृदयाचे मम होऊनी पाणी नयनी दाटून येते
तुजविण आई जगी एकटा, पोरकाच मज म्हणती करंटा
व्यथा मनीची कुणास सांगू काळीज तिळतिळ तुटते
हाक मारितो आई आई चुके लेकरू सुन्या दिशाही
तव बाळाची हाक माऊली, का नच कानी येती?
सुकल्या नयनीं नुरले पाणी, सुकल्या कंठीं उमटे वाणी
मुकें पाखरूं पहा मनाचें, जागीं तडफड करतें
नको जीव हा नकोच जगणें, आईवांचुन जीवन मरणें
एकदांच मज घेई जवळीं, पुसुनी लोचनें मातें
2. ठाऊन नाही मज काही ठाऊक आहे का तुज काही
कशी होती रे माझी आई?
मऊ जशी ती साय दुधाची
होती आई का तशी मायेची?
बागेतील ते कमळ मनोहर
आई होती का तशीच सुंदर?
देवाघरी का एकटी जाई?
आम्हासारखे शुभंकरोती
म्हणे रोज का देवापुढती
गात असे का ती अंगाई?
स्नेहल भाटकर
3. मिळाली तरीही नाही कळली, अशी कशी आई
जिची सावली प्रकाश होई, अशी कशी आई
जन्म देऊनी बाळाला जन्मते जगते आई
अश्रुंचाही करूनी पान्हा, प्रेम पाजते आई
आई खरी जाणवते तेव्हा, नसते जेव्हा आई
आशीर्वादरूपे सदैव कवेत ठेवते आई
मन मौनाची भाषा माझी समजते आई
काळीज पांघरूनी मजला जपते आई
नक्षनक्षत्रीचे महावस्त्रही नको मजला आई
नाही सर तुझ्या पदराची कशालाही आई
कधीच कुणा ना सुटले कोडे अशी कशी आई
वेडी माया प्रेम वेडे अशीच असते आई
4. आता सर्व काही आठवेल तुला
अगदी सर्व सर्व..
कदाचित रडशीलही
प्रेक्षकांच्या आग्रहास्तव..
तूला जन्म दिला होता
याची परतफेड करशील..
मान खाली घालशील
शरमेने..
खांद्यावर घेशील तेव्हा
तहान शमेल मस्तकातली..
किणार्यावर पोहोचवशील
पाचव्या ईसमाच्या मदतीने..
हे करतांना क्षणभर का होईनात
पण..
आठवेल का रे तुला
माझा खांदा..?
घामांच्या धारांतून वाहणारा माझाच अंश
तुझ्या डोळ्यांतील भावनेला कवटाळेल
नकळत..
तेव्हा तरी संवेदनांची जाणीव होईल का रे
तुला..?
सर्व काही रितसर पार पाडशील
उघडा-नागडा माझा देह, उकळून घेशील भाजण्याआधी..
जाळशील आणि जळशील
देखावा सजवशील, अखेरचा..
माझा आणि तुझाही
माझा आणि तुझाही
– तुझी प्रेमस्वरुप आई
5. जिवंत तुझ्यावर कधी आई,
चार ओळी नाही लिहिल्या
तू गेल्यावर, आठवणी तुझ्या
साऱ्या धावुन आल्या
तुझ्या डोळ्यांतल्या वेदना
नव्हत्या मला दिसल्या
उदास तुझ्या चेहऱ्यावर
खोटं होत्या हसल्या
तू नाहीस आणि आता
वेदना तुझ्या त्या शमल्या
तू गेल्यावर आठवणी तुझ्या
साऱ्या धावुन आल्या
लहानपणीच्या साऱ्या त्या
गोष्टी होत्या विसरल्या
तू गेलीस सोडून आणि
साऱ्या साऱ्या त्या आठवल्या
तुझ्या त्या आवडीच्या कविता
आज कानी गुणगुणल्या
तू गेल्यावर आठवणी तुझ्या
साऱ्या धावुन आल्या
अपुऱ्या तुझ्या सुप्त ईच्छा
मुक्याने होत्या रडल्या
विरहाच्या त्या भावना
नव्हत्या लपू शकल्या
कोरड्या जीवनाच्या छटा
तुझ्या डोळ्यात होत्या दिसल्या
तू गेल्यावर आठवणी तुझ्या
साऱ्या धावुन आल्या
बारीक सारीक सर्व नोंदी
होत्या तुला चिकटल्या
जुन्या आठवणींच्या गप्पा
नेहमी तुझ्याजवळ रमल्या
निरोपाच्या त्या संवेदना
नव्हत्या ग मला जाणवल्या
तू गेल्यावर आठवणी तुझ्या
साऱ्या धावुन आल्या
– डाॅ. सुभाष कटकदौंड – खोपोली
6. माझ्यापैक्षा जास्त तूच रडली होतीस ना आई….
आई थंडी वाजतेय ग,
मायेचे पांघरूण,आणि त्याची उब…
डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या…
केसांवरून फिरणारा तो प्रेमळ हात…
रात्रभर माझ्यासाठी जागलेले डोळे….
मी ठीक कसा नाही होणार?
पण मी आजारी पडल्यावर,
माझ्यापैीक्षा जास्त तूच रडली होतीस ना आई….
“झोप रे बाळा” शांत झोप,
नाही आई माझी परीक्षा आहे!
वर्षभर मी अभ्यास करावा,
म्हणून माझ्यावर ओरडलिस…
नाही बाळा परीक्षा नंतर देता येईल…
तू विचार नको करू शांत झोप…
मी परीक्षा देऊ शकलो नाही,
म्हणून माझ्या पैक्शा जास्त तूच रडली होतीस ना आई…..
खूप दिवस उलटले आहे आता ..
मी शिकून मोठा ही झालोय…
पैसा ,गाडी ,लपटोप सर्व आहे….
पण तू नाहीस…..एकट वाटत ग,
तू माज्या जवळ नाहीस,
म्हणू आता प्रत्येक दिवस माझ हृदय खूप रडत ग आई.
खूप रडत ग आई……
– रोहित
7. कदर करा त्या आईची जी तुमच्यासाठी जीवाचं रान करते
प्रेम करा त्या आईवर जी तुमच्या भल्यासाठी स्वतःचा विचार करत नाही
सेवा करा त्या आईची जिने नऊ महिने तुमच्या लाथा सोसल्या पण कधी तुमच्यावर रागावली नाही
थोडा विचार करा त्या आईचा जी स्वतः उपाशी राहते पण तुम्हाला कधी ऊपाशी ठेवलं नाही …..
8. एकटी एकटी घाबरलीस ना, वाटलचं होत आई..
म्हणुनच तर सोडून तुला लांब गेलो नाही…
“मोठी होतात मुलं, आई मोठी होत नाही..
कुशीत नसतं पिल्लू तेव्हा घाबरतेच रे आई..
9. आई! तू आहेस माझी आई…..
तू कधी ही,कसलीच चिंता करू नकोस
जोपर्यंत या जीवात श्वास आहे तोपर्यंत
एकवेळा मी उपाशीपोटी राहीन परंतु
हा घास कायम तुझाच असेल
केवळ तुझाच असेल…केवळ.तुझाच असेल….
केवळ तुझाच आई…..
10. ’आई !’ म्हणोनी कोणी ।
आईस हाक मारी ती हाक येइ कानी ।
मज होय शोककारी नोहेच हाक माते ।
मारी कुणी कुठारी
आई कुणा म्हणू मी ? । आई घरी न दारी !
ही न्यूनता सुखाची ।
चित्ता सदा विदारी ।
स्वामी तिन्ही जगाचा
आईविना भिकारी
आईसाठी कविता (Short Poem On Mother In Marathi)
1. आई आता कुशीची माती जरा मला दे
रक्तास पोसणारी नाती तर मला दे
व्हिवळत्या दगडास मोठी उसंत दे गं
आपटू नको मला थोडे तरी जगू दे
आई तुझ्याच उदरी येईन सदा मी गं
पण पोटात मजला यथार्थ वाढू दे
मुलगी म्हणून तुझी आली जरी मी इथे
होऊन काठी हाताची आता मला फिरू दे
कित्येकदा पाजला तू काढा नकोनकोसा
पोटास दाबणाऱ्या काकुस तू सजा दे
माया पाझरणारी छाती तुझी मला दे
आई आता कुशीची माती जरा मला दे
– संतोष वाटपाडे
2. मुंबईत घाई
शिर्डीत साई, फुलात जाई
गल्लीगल्लीत भाई
पण जगात भारी
केवळ आपली आई!
3. आई असते एक फुलाची कळी
सतत उमलत राहून सतत सुगंध दरवळत ठेवणारी
आई असते क्षमेची मूर्ती,
आपल्या मुलांचे अनेक अपराध पोटात घालणारी
आई असते एक सावली
सतत सोबत राहून मार्ग दाखवणारी
आई असते परोपकारी
स्वतःसाठी न जगता इतरांसाठीच जगत राहणारी
– प्रियांका पाटील, कोल्हापूर
4. आई कोणिच नाही ग येथे
आधार मनाला देणार
सर्व चुका माफ करुन
तुझ्यासारख प्रेमान जवळ घेणार
आई कोणीच नाही ग माझ
आसरा मनाला देणार
मायेन रोज
कुशित घेऊन झोपणार
5. ती फ़क्त आईच..! सकाळी दोन धपाटे घालुन
उठवते..ती आई !! उठवल्यावर
आवडता नाश्ता समोर …मांडते..
ती आई !! नाश्ता नाही होतो तोच
डब्याची चिंता सुरु करते.. ती आई !! काय
करीन ते
घेउन जा म्हणताना सगळ
आवडीचे करते.. ती आई !! पदराला हात
पुसत
सांभाळुन जा म्हणते..
ती आई !! परतीची आतुरतेने वाट बघत
असते..
ती आई !! आपण झोपत नाही तोवर
जागी असते..
ती आई !! आणि जिच्याशिवाय आपले
आयुष्य
अपूर्ण.. ती फ़क्त आईच..!
ती फ़क्त आईच..!!
6. आई म्हणजे देव पृथ्वीवरचा,
आई म्हणजे साठा सुखाचा..
आई म्हणजे मैत्रीण गोड,
आई म्हणजे मायेची ओढ..
आई म्हणजे प्रेमाची बाहूली,
आई म्हणजे दयेची सावली..
आई म्हणजे स्वतः उपाशी राहून,
आपल्याला भरवणारी..
आई म्हणजे जीवाचं रान करून,
आपल्यासाठी राबणारी..
आई म्हणजे जगण्याचा अर्थ
शिकवणारी,
जे कधी ओरडून समजावणारी..
आईचं बोट धरून,
चालायला शिकवणारी..
आईचं आपले,
अस्तित्व घडवणारी.
7. आई……
लेकराची माय असते,
वासराची गाय असते,
दुधाची साय असते,
लंगड्याचा पाय असते,
धरणीची ठाय असते,
आई असते जन्माची शिदोरी,
सरतही नाही उरतही नाही..!
8. दुखाचा डोंगर कोसळलेला असो
कि सुखाचा वर्षाव होत असो
मनाला चिंतेचे ग्रहण लागलेले असो
कि आठवणीचे तारे लुकलुकत असो
आठवते फक्त …..आई….
9. जीवन हेच शेत तर आई म्हणजे विहीर,
जीवन हिच
नौका तर आई म्हणजे तीर,
जीवन हिच शाळा तर
आई म्हणजे पाटी,
जीवन हे कामच काम तर आई
म्हणजे सुट्टी….!
10. डोळे मिटुन प्रेम करते ती प्रेयसी,
डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ती दोस्ती,
डोळे वटारुन प्रेम करते ती पत्नी,
आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ती फक्त आई
आईकरिता चारोळी (Marathi Charolya Aai)
आईवरचं प्रेम करण्यासाठी कोणतीही गोष्ट कमीच नाही का, पण खालील दिलेल्या आईकरिता चारोळ्या वापरून तुम्ही आईवरील प्रेम व्यक्त करू शकता. आई आपली पहिली मैत्रीण असते त्यामुळे मैत्रीच्या चारोळ्याही तिच्यासाठी आपण वापरू शकतो.
1. मीही ठरवले आहे आईला नेहमी खूष ठेवायचे
कितीही काही झाले तरी तिला नाही दुखवायचे
2. आईची महानता सांगायला शब्द कधीच पुरणार नाहीत
तिचे उपकार फेडणे सात जन्मातही शक्य नाही
3. देवाकडे एकच मागणे, भरपूर आयुष्य लाभो तिला
माझ्या प्रत्येक जन्मी तिचाच गर्भ दे मजला
4. आठवतंय मला चुकल्यावर मी धपाटा घातलेला
भूक लागली आहे म्हटल्यावर खाऊचा डब्बा पुढे केलेला
5. ठेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या हृदयी
तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ मला माझी आई
6. आई तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य असेच राहू दे
आणि माझ्या जीवनाला असाच अर्थ येऊ दे
7. आई तुझ्या चरणी वैकुंठ, तूच माझा पांडुरंग
आई उच्चारानेच होई, सगळया वेदनांचा अंत
8. नाही कळणार बाळा, आईचं हृदय तुला
आनंदात लहानाचा मोठा हो, हेच मागणं देवाला
9. माझी स्तुती करताना ती कधीच थांबत नाही
अन माझा मोठेपणा सांगताना तिच्या आनंदाला पारावर उरत नाही
10. या जीवनात आई माझी सर्वप्रथम गुरू
त्यानंतर झाले माझे अस्तित्व सुरू
You Might Also Like
मदर्स डे कोट्स और सुविचार
माँ पर कविता
‘फक्त लढ म्हणा!’… जाणून घ्या कुसुमाग्रज यांची माहिती