ई जीवनसत्व असलेल्या पदार्थ खाणे फार गरजेचे आहे. व्हिटॅमिन ई मध्ये भरपूर प्रमाणात अॅंटि ऑक्सिडंट घटक असतात. ज्यामुळे व्हिटॅमिन ई तुमच्या त्वचेचं वातावरणातील फ्री रेडिकल्सपासून संरक्षण करतं. आजकाल व्हिटॅमिन ई कॅप्सुल सप्लीमेंटच्या स्वरूपात बाजारात सहज उपलब्ध आहे. एवढंच नाही तर अनेक सौंदर्य प्रसाधन कंपन्यांनी व्हिटॅमिन ई चा वापर त्यांच्या ब्युटी प्रोडक्टमध्ये करण्यास सुरूवात केली आहे. त्वचा समस्या, एजिंगच्या खुणा, त्वचेचा दाह आणि सनबर्न कमी करण्यासाठी पूर्वीपासून व्हिटॅमिन ईचा वापर त्वचेवर लावण्यात येणाऱ्या अनेक औषध, मलमांमध्ये करण्यात येत होता. अनेक संशोधनात व्हिटॅमिन ई केसांसाठीदेखील फायदेशीर असल्याचं आढळून येत आहे. व्हिटॅमिन ई मुळे तुमचे फ्रिझी अथवा निस्तेज केस पुन्हा चमकदार आणि मजबूत होऊ शकतात. यासाठीच जाणून घेऊ या विटामिन ई चे फायदे (vitamin e benefits in marathi) आणि त्याचा त्वचेवर आणि केसांसाठी कसा वापर करावा.
त्वचेवर होणारे व्हिटॅमिन ई चे फायदे (Vitamin E Benefits In Marathi For Skin)
त्वचेवर होणारे व्हिटॅमिन ई चे फायदे माहीत असल्यामुळे आजकाल अनेक सौंदर्योपचारांमध्ये याचा वापर हमखास केला जातो. यासाठीच जाणून घ्या व्हिटॅमिन ई त्वचेसाठी कसे फायदेशीर आहे.
वाचा – व्हिटॅमिन बी 6 चे फायदे
त्वचा मऊ आणि मुलायम होते (Softens The Skin)
हवामानातील बदलांमुळे आजकाल त्वचेत कोरडेपणा निर्माण होतो ज्यामुळे त्वचा कोरडी होते. व्हिटॅमिन ईमध्ये नैसर्गिक तैलघटक असल्यामुळे याचा वापरामुळे मात्र तुमची त्वचा मऊ आणि मुलायम होते. व्हिटॅमिन ईच्या परिणामामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहते आणि चिरतरूण दिसते.
कसा कराल वापर –
व्हिटॅमिन ई ऑईल तुम्हाला कॅप्सुल अथवा तेलाच्या माध्यमात बाजारात मिळु शकते. दोन थेंब व्हिटॅमिन ई एक चमचा ऑलिव्ह ऑईलमध्ये मिक्स करा आणि चेहरा आणि इतर भागाच्या त्वचेवर त्याचा मसाज करा. आठवड्यातून दोनदा रात्री झोपताना नेहमी तुम्ही या तेलाचा मसाज तुमच्या त्वचेवर करू शकता.
त्वचेवरील एजिंगच्या खुणा कमी होतात (Reduces The Sign Of Aging On The Skin)
आजकाल कामाचा ताण आणि प्रदूषण यामुळे वयाच्या आधीच चेहऱ्यावर एजिंगच्या खुणा दिसू लागतात. सुरकुत्या, डार्क सर्कल्स, निस्तेज त्वचा, सैलसर त्वचा या एजिंगच्या खुणा चेहऱ्यावर दिसल्यामुळे तुमचे सौंदर्य झाकाळले जाते. यासाठीच वेळीच व्हिटॅमिन ईचा वापर त्वचेवर करण्यास सुरू करा. ज्यामुळे त्वचेवरील या एजिंगच्या खुणा नक्कीच कमी होतील. व्हिटॅमिन ई चे फायदे जाणून घेताना त्याचा वापर कसा करायचा हे तुम्हाला माहीत असायलाच हवं.
कसा कराल वापर –
आहारात व्हिटॅमिन ई युक्त खाद्यपदार्थांचा समावेश करा. त्यासोबतच व्हिटॅमिन ईयुक्त सौंदर्यप्रसाधने वापरा. ज्यामुळे तुमची त्वचा पुन्हा चिरतरूण दिसेल.
सनबर्नचे व्रण कमी होतात (Reduces Sunburn On Skin)
प्रखर सुर्यप्रकाशाच्या सानिध्यात असताना सनस्क्रीनचा वापर न केल्यास त्वचेवर सनबर्नच्या खुणा दिसू लागतात. एकदा सर्नबर्नचे व्रण अंगावर दिसू लागले की ते कमी होण्यास फार दिवस लागतात. हे डाग कमी करण्यासाठी तुम्ही व्हिटॅमिन ईचा वापर करू शकता.
कसा वापर कराल –
यासाठी एक व्हिटॅमिन ईची कॅप्सुल घ्या आणि ती तोडून त्यातील तेलाने तुमच्या सनबर्न झालेल्या भागावर हलक्या हाताने मसाज करा. नियमित व्हिटॅमिन ईच्या तेलाच्या मसाजमुळे तुमच्या सनबर्नच्या खुणा विरळ होतील. मात्र लक्षात ठेवा व्हिटॅमिन ई ऑईल थेट त्वचेवर लावू नका. तुमच्या वापरातील एखाद्या नैसर्गिक तेलात ते मिसळून मगच त्वचेवर लावा.
चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतात (Reduces Black Heads On Face)
बऱ्याचदा चेहऱ्यावर फ्री रेडिकल्समुळे हायपर पिंगमेंटेशनचा परिणाम दिसून येतो. ज्यामुळे चेहऱ्यावर काळे डाग अथवा वांगच्या खुणा निर्माण होतात. यावर तुम्ही व्हिटॅमिन ईच्या वापराने उपचार करू शकता. हे व्हिटॅमिन ई चे फायदे जाणून घेतल्यावर तुम्हाला चेहऱ्यावरील वांग पासून नक्कीच सुटका मिळेल.
कसा कराल वापर –
ऑलिव्ह ऑईलमध्ये एक व्हिटॅमिन ई कॅप्सुल तोडून मिसळा. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करा आणि तुमच्या चेहऱ्यावरील वांग अथवा काळ्या डागांवर लावा. दिवसभरातून एकदा हा उपचार जरूर करा ज्यामुळे हे काळे डाग नक्कीच कमी होतील.
त्वचा मुळापासून स्वच्छ होते (Cleans The Skin From Roots)
त्वचेची काळजी घेण्यासाठी सर्वात आधी त्वचा नियमित स्वच्छ करणं फार गरजेचं आहे. मात्र चेहरा फक्त धुण्यामुळे तुमची त्वचा मुळापासून स्वच्छ होईलच असं नाही. कारण त्वचेच्या रोमछिद्रांमध्ये धुळ, माती, प्रदूषण अडकून राहते. ज्यामुळे त्वचेला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. मात्र व्हिटॅमिन ईचा वापर करून तुम्ही तुमची त्वचा मुळापासून स्वच्छ करू शकता. मेकअप काढण्यासाठी हा उपाय अगदी बेस्ट आहे.
कसा कराल वापर –
यासाठी काही थेंब व्हिटॅमिन ईचे नारळाच्या तेलात मिक्स करा. एका कापसाच्या तुकड्यावर अथवा कॉटन पॅडवर हे तेल घ्या आणि त्याने तुमचा चेहरा स्वच्छ करा.
नखांचे क्युटिकल्स मऊ होतात (Nail Cuticles Become Soft)
बदलेले वातावरण अथवा थंडावा यामुळे तुमच्या नखांचे क्युटिकल्स कोरडे होतात. ज्यामुळे तुमच्या हाताचा मऊपणा कमी होतो. मात्र व्हिटॅमिन ईचा वापर करून तुम्ही पुन्हा तुमच्या हाताची बोटे आणि नखे पूर्ववत करू शकता.
कसा कराल वापर –
यासाठी दररोज तुमच्या हाताच्या बोटांना आणि नखांना व्हिटॅमिन ई ऑईलने मसाज करा. ज्यामुळे तुमचे संपूर्ण हाच मऊ आणि मुलायम राहतील.
Shutterstock
स्ट्रेच मार्क्स विरळ होतात (Treat Stretch Marks)
बाळंतपणानंतर महिलांच्या शरीरावर स्ट्रेच मार्क्स दिसू लागतात. पोट, मांड्या आणि कंबरेवरी या स्ट्रेच मार्क्समुळे फॅशनेबल कपडे घालणं कठीण होतं. कधी कधी वजन खूप प्रमाणात कमी केल्यामुळेदेखील शरीरावर स्ट्रेच मार्क्स दिसतात. यावर तुम्ही व्हिटॅमिन ईने उपाय करू शकतात.
कसा कराल वापर –
यासाठी नारळाच्या तेलामध्ये एक व्हिटॅमिन ई कॅप्सुल तोडून त्यातील तेल मिसळा. हे मिश्रण नियमित तुमच्या स्ट्रेच मार्क्सवर लावा. हलक्या हाताने या भागावर थोडावेळ मजास करा.
केसांवर होणारे व्हिटॅमिन ई चे फायदे (Vitamin E Benefits In Marathi For Hair)
काही संशोधनानुसार व्हिटॅमिन ईमुळे तुमच्या केसांची त्वचेचे आरोग्य सुधारते ज्यामुळे केस मजबूत होतात. यासाठी जाणून घ्या व्हिटॅमिन ईचे तुमच्या केसांवर काय फायदे होतात.
Shutterstock
केस गळणे थांबते आणि केस मजबूत होतात (Prevents Hair Loss And Makes Hair Stronger)
सध्या केस गळणे ही एक खूप मोठी समस्या अनेकांना जाणवत आहे. धुळ, माती, प्रदूषण, चुकीची जीवनशैली यामुळे केस गळण्याची समस्या निर्माण होते. मात्रएका संशोधनानुसार व्हिटॅमिन ईच्या सप्लीमेंटचा वापर केल्यामुळे तुमचे केस गळणे कमी होऊ शकते. एवढंच नाही तर यामुळे तुमचे केस मजबूत आणि लांबसडक होऊ शकतात.
कसा कराल वापर –
नारळाच्या तेल कोमट करा आणि त्यात एक अथवा दोन व्हिटॅमिन ईच्या कॅप्सुलमधील तेल मिसळा आणि मिश्रण एकजीव करा. या तेलाने तुमच्या केसांना हलक्या हाताने मजास करा. आठवड्यातून दोन वेळा असा मसाज केल्यास तुमच्या केसांची वाढ नक्कीच सुधारेल.
केसांच्या त्वचेमधील रक्ताभिसरण सुधारते (Improves Blood Circulation In The Hair Follicles)
व्हिटॅमिन ईमुळे तुमच्या त्वचेखालील रक्ताभिसरण सुधारते ज्यामुळे तुमच्या केसांची वाढ चांगली होते. केसांच्या योग्य वाढीसाठी त्वचेला व्हिटॅमिन ईचा योग्य प्रमाणात पुरवठा होणं गरजेचं आहे. मात्र लक्षात ठेवा व्हिटॅमिन ईचा ओव्हर डोस घेतल्यास त्याचे दुष्परिणामदेखील भोगावे लागू शकतात.
कसा कराल वापर –
कोणत्याही हेअर ऑईलमध्ये व्हिटॅमिन ईची एक कॅप्सुल मिसळा. या तेलाने केसांच्या मुळांना हळूवार मसाज करा. गरम पाण्यात बुडवला टॉवेल केसांवर पंधरा ते वीस मिनीटे गुंडाळून ठेवा. ज्यामुळे हे तेल केसांमध्ये व्यवस्थित मुरेल आणि केसांच्या मुळांमधील रक्ताभिसरण सुधारेल. वीस मिनीटांनी शॅंपू करून केस स्वच्छ धुवा.
Shutterstock
केसांमधील नैसर्गिक तेलाचे प्रमाण नियंत्रित राहते (Control Oil In Hair)
केसांच्या योग्य वाढीसाठी केसांची मुळं आणि स्काल्पवर नैसर्गिक तेलाचे प्रमाण नियंत्रित असणं गरजेचं आहे. ज्यामुळे केस कोरडे आणि निस्तेज होत नाहीत. व्हिटॅमिन ईच्या वापरामुळे हे नियंत्रण राखण्यास मदत होते.
कसा कराल वापर –
केसांंसाठी व्हिटॅमिन ई युक्त तेल अथवा हेअर प्रोडक्ट वापरण्यास सुरूवात करा. व्हिटॅमिन ई युक्त तेल आणि शॅंपू केल्यामुळे केसांमधील नैसर्गिक तेलाचा बॅलंस राखणे सोपे जाईल.
केस चमकदार होतात (Add Shin To The Hair)
केस निस्तेज आणि कोरडे असतील तर केसांची नैसर्गिक चमक कमी होते. केसांवरील नैसर्गिक तेलाचे आवरण निघून गेल्यामुळे केसांच्या क्युटिकल्सचे नुकसान होते. बऱ्याचदा वारंवार हेअरस्टाईल्स आणि ब्युटी ट्रिटमेंट केल्यामुळे देखील केसांचे नुकसान होते. अशावेळी व्हिटॅमिन ईच्या वापरामुळे तुमच्या केसांची नैसर्गिक चमक पुन्हा परत मिळू शकते.
कसा कराल वापर –
केसांसाठी व्हिटॅमिन ई युक्त नैसर्गिक गोष्टींच्या हेअर मास्क वापरून तुम्ही केसांना नैसर्गिक चमक देऊ शकता.
हेअर मास्क कसा कराल –
एक अॅव्होकॅडो, एक केळं, एक चमता अॅव्होकॅडो तेल, एक चमचा नारळाचे तेल आणि एक चमचा तेल घ्या.
हे सर्व मिश्रण एकजीव करून त्याचा हेअरमास्क तयार करा. हा पॅक केसांना लावा. हलक्या हाताने केसांना मसाज द्या आणि वीस मिनीटांनी केस स्वच्छ पाण्याने धुवून टाका.
केस पांढरे होणे रोखता येते (Stop Premature Greying Of Hair)
आज चुकीच्या जीवनशैलीमुळे वयाआधीच केस पांढरे होतात. तरूणवयात केस पांढरे होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. मात्र जर तुम्ही व्हिटॅमिन ई सप्लीमेंटचा वापर केला तर तुम्हाला या समस्येपासून सुटका मिळू शकते.
कसा कराल वापर –
केसांसाठी नियमित नारळाच्या तेलातून व्हिटॅमिन ई कॅप्सुलच्या तेलाचा मसाज करा. आठवड्यातून दोनदा असा मसाज केल्यामुळे तुमचे केस पांढरे होणं नक्कीच कमी होईल.
केसांना फाटे फुटत नाहीत (Prevent Split Ends)
केस कोरडे आणि निस्तेज असतील तर नैसर्गिक तेलाच्या अभावामुळे केसांना फाटे फुटतात. फाटे फुटलेल्या केसांची वाढ खुंटते आणि केसांच्या अनेक समस्या यातून निर्माण होतात. पण या समस्येवर मुळापासूनच घाव घालण्यासाठी तुम्हाला व्हिटॅमिन ईचा चांगला फायदा होऊ शकतो.
कसा कराल वापर –
बदामाच्या तेलातदेखील व्हिटॅमिन ईचे प्रमाण असते. ज्यामुळे तुम्ही नियमित या तेलाने केसांना मसाज करून तुमचे केस अधिक मजबूत करू शकता.
व्हिटॅमिन ई युक्त आहार (Vitamin E Foods In Marathi)
व्हिटॅमिन ई कॅप्सुल अथवा तेलाचा वापर करणं सोयीचं असलं तरी ते धोकादायक सुद्धा आहे. कारण अती प्रमाणात या कॅप्सुलचा वापर केल्यास तुमच्या त्वचेवर आणि केसांवर त्याचे दुष्परिणाम दिसू शकतात. यासाठीच आहारात व्हिटॅमिन ईचा समावेश करणं नेहमीच चांगलं ठरेल. शिवाय आपल्याकडे असे अनेक खाद्यपदार्थ आहेत ज्यातून तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने व्हिटॅमिन ई मिळू शकतं.
Shutterstock
सुर्यफुलाच्या बिया (Sunflower Seeds)
आपल्या देशात सुर्यफुलाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. ज्यामुळे सुर्यफुलाच्या बिया सहज कुठेही उपलब्ध होऊ शकतात. या बियांमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व आणि व्हिटॅमिन ई असतं. म्हणूनच या बियांचा वापर तुमच्या आहारात करा. योगर्ट, ओटमील, सलाडमधून तुम्ही या बिया खाऊ शकता.
बदाम (Almond)
बदामाच्या तेलात सर्वात जास्त प्रमाणात व्हिटॅमिन ई असतं. एका शंभर ग्रॅम बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ईचे प्रमाण कमीत कमी पंचवीस मिलीग्रॅमपेक्षा जास्त असते. त्यामुळे केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी आहारात बदामाचा समावेश जरूर करा.
शेंगदाणे (Peanuts)
भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये स्वयंपाकात शेंगदाण्याचा वापर मुक्तहस्ते केला जातो. त्यामुळे अनेकांच्या आहारात शेंगदाणे असतातच. शेंगदाण्यांमधून तुम्हाला पुरेसं व्हिटॅमिन ई नक्कीच मिळू शकतं. त्यामुळे दोन जेवणांच्या मधल्या वेळेत मुठभर शेंगदाणे खाणं तुमच्या केस आणि त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकतं.
अॅव्होकॅडो (Avacado)
अॅव्होकॅडो एक पूर्णअन्न असलेलं फळ आहे. कारण यातून तुमच्या शरीराला अनेक पोषक घटक मिळू शकतात. शिवाय यामध्ये साखरेचे प्रमाण अतिशय कमी असते. ज्यामुळे मधुमेहीदेखील अॅव्होकॅडो खाऊ शकतात. एवढंच नाही तर यामुळे तुमच्या शरीराला पुरेसं व्हिटॅमिन ईदेखील मिळू शकतं.
पालक (Spinach)
पालकाचा वापर आपण सतत भाजी, भजी, डाळ करण्यासाठी करतो. महिलांच्या शरीराराठी पालक अतिशय उपयुक्त अशी भाजी आहे. अनेक पोषक घटकांनी भरलेल्या पालकामध्ये व्हिटॅमिन ईदेखील पुरेसं असल्यामुळे नियमित आहारात पालकचा समावेश करायलाच हवा.
व्हिटॅमिन ई युक्त खाद्यतेल (Vegetable Oils)
आपण आहारासाठी वापरत असलेल्या अनेक खाद्यतेलांमध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतं हे तुम्हाला माहीत आहे का ? राईसब्रान ऑईल, सुर्यफुलाचं तेल, बदामाचं तेल, ग्रेप्ससीड्स ऑईल अशा अनेक खाद्यतेलांमधून तुम्हाला व्हिटॅमिन ई मिळू शकतं.
हेजल नट (Hazel Nuts)
हेजल नट हे व्हिटॅमिन ईचा पुरवठा करणारा एक उत्तम असा सुकामेवा आहे. बऱ्याचदा चॉकलेट्स अथवा डेझर्टमध्ये हेजल नट वापरले जातात. थोडासा महागडा सुकामेवा असला तरी त्यामुळे तुमच्या केस आणि त्वचेवर नैसर्गिक चमक नक्कीच येऊ शकते.
ब्रोकोली (Brocolli)
आजकाल भारतातदेखील ब्रोकोली सहज उपलब्ध होऊ शकते. ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन ईचे प्रमाण मुबलक आहे. तुमच्या केसांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी तुम्ही आहारात नियमित ब्रोकोलीचा समावेश करू शकता. सलाड, स्मुदी आणि इतर खाद्यपदार्थांत ब्रोकोलीचा वापर केला जातो.
किवी (Kiwi)
किवी फळामध्येदेखील व्हिटॅमिन ईचे प्रमाण भरपूर असतं. ज्यामुळे किवीचा आहारात वापर करून तुम्ही तुमच्या केस आणि त्वचेची काळजी घेऊ शकता. शिवाय या फळात आणखी इतर अनेक पोषक घटक असल्यामुळे त्याचा तुमच्या शरीरावर चांगलाच परिणाम होतो.
वाचा – गुलाबपाणी… त्वचा आणि केसांचं सौदर्य खुलवणारा नैसर्गिक उपाय!
व्हिटॅमिन ई युक्त आहार
व्हिटॅमिन ई चे फायदे आणि त्याच्या वापराबाबत असलेले काही प्रश्न – FAQs
1. व्हिटॅमिन ईच्या अती वापरामुळे काय दुष्परिणाम होऊ शकतात ?
व्हिटॅमिन ईच्या अति वापरामुळे तुम्हाला मळमळ, उलटी, जुलाब, पोटात दुखणे, चक्कर, अशक्तपणा, डोकेदुखी, धुरकट दिसणे, पुरळ, रक्तस्त्राव अशा समस्या होऊ शकतात. त्यामुळे व्हिटॅमिन ई सप्लीमेंट अथवा कॅप्सुलचा वापर करताना तज्ञ्जांचा सल्ला अवश्य घ्या.
2. व्हिटॅमिन ई घेण्याची योग्य वेळ कोणती ?
व्हिटॅमिन ईचे फायदे असे अनेक आहेत तसेच याचे दुष्परिणामदेखील अनेक आहेत. त्यामुळे तुमच्या शरीरप्रकृतीप्रमाणे व्हिटॅमिन ईचा वापर नेमका कधी करावा हे ठरवावे लागेल. यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टर अथवा तज्ञ्जांचा सल्लानुसार याचा वापर करावा.
3. दररोज व्हिटॅमिन ई घेणं योग्य आहे का ?
व्हिटॅमिन ईचा वापर प्रमाणात करण्याचा तज्ञ्ज नेहमीच सल्ला देतात. दिवसातून कमीत कमी 15 मिलीग्रॅम व्हिटॅमिन ई घेण्यास काहीच हरकत नाही. मात्र जर हे प्रमाण वाढले तर त्याचे दुष्परिणामदेखील भोगावे लागू शकतात. म्हणूनच याबाबत तज्ञ्जांचा सल्ला घ्या.
4. चेहऱ्यासाठी व्हिटॅमिन ईचा वापर करावा का ?
वर दिलेल्या माहितीप्रमाणे व्हिटॅमिन ई चा तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेसाठी नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. त्यामुळे व्हिटॅमिन ई तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच वापरू शकता. मात्र ते प्रमाणात असेल याची काळजी अवश्य घ्या. शिवाय व्हिटॅमिन ई इतर तेलांमध्ये मिक्स करून मगच चेहऱ्यावर लावा.
5. व्हिटॅमिन ई की सी चेहऱ्यासाठी नेमके कोणते व्हिटॅमिन घ्यावे ?
व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सी हे दोन्ही अॅंटि ऑक्सिडंट आहेत. ज्यामुळे तुमच्या त्वचेची आणि केसांची योग्य निगा राखली जाते. त्यामुळे तुमच्या समस्या ओळखा आणि त्यानुसार या व्हिटॅमिनचा वापर करा.
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
अधिक वाचा –
इन्स्टंट व्हिटॅमिन C चे सेवन करा आणि मिळवा सुंदर त्वचा
त्वचेच्या गंभीर समस्या होतील दूर, प्या हे ‘व्हिटॅमिन सी’युक्त 5 ज्यूस