लॉकडाऊन संपला तरी अजूनही कोरोनाची दशहत संपलेली नाही. कोरोनापासून स्वतःचे आणि इतरांचे संरक्षण करण्यासाठी हात सतत आणि स्वच्छ धुणे फार गरजेचं आहे. आरोग्य मंत्रालयानुसार हात संपूर्ण निर्जंतूक करण्यासाठी कमीत कमी वीस सेंकद हातावर साबण अथवा हॅंडवॉश लावून ते धुतले पाहिजेत. मात्र हातावर असा सतत साबणाचा मारा केल्यामुळे हाताची त्वचा कोरडी आणि निस्तेज होऊ शकते. कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी हात सतत धुणं आवश्यक असलं तरी त्वचेची काळजी घेण्यासाठी इतरही काही उपाययोजना करायला हव्यात. यासाठीच तुमच्या ब्युटी केअर रूटीनमध्ये या गोष्टींचा समावेश करा. काही नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले हे हॅंडमास्क लावून तुम्ही तुमच्या हातांचा मऊपणा कायम ठेवू शकता. यासाठी जाणून घ्या कोणते हॅंड मास्क अथवा हॅंड पॅक हातांवर नियमित लावायला हवेत.
हात मऊ आणि मुलायम करण्यासाठी करा हे नैसर्गिक उपाय –
तुमच्या स्वयंपाक घरातील काही गोष्टी वापरून तुम्ही तुमच्या हाताची अशी काळजी घेऊ शकता.
बटाटा-
बटाट्याचा रस तुमच्या त्वचेवर नक्कीच चांगला परिणाम करू शकतो. प्रत्येकाच्या घरी स्वयंपाकघरात बटाटा असतोच. तेव्हा बटाट्याची भाजी आणि भजी करण्यासोबतच त्याचा हातावरही असा करा वापर
बटाट्याचा हॅंड मास्क करण्यासाठी साहित्य –
दोन बटाटे आणि दोन चमचे दूध
कसा कराल वापर –
- बटाटे उकडून घ्या आणि थंड झाल्यावर सोलून व्यवस्थित कुस्करून घ्या.
- या मिश्रणात दोन चमचे दूध मिसळा आणि मिश्रण व्यवस्थित एकत्र करा.
- मिश्रणाची जाडसर पेस्ट तयार करेपर्यंत दूध अॅड करा. त्यामुळे यासाठी तुमच्या गरजेनुसार दूध वापरा.
- तयार मिश्रण तुमच्या हात आणि तळहातावर लावा.
- पॅक सुकल्यावर पंधरा मिनीटांनी हात स्वच्छ धुवा.
- एखादी हॅंड क्रीम हातावर लावा ज्यामुळे हात मऊ राहतील.
Shutterstock
कोरफड-
कोरफडाचा वापर आपल्या चेहऱ्यावर लावण्यासाठी नियमित करत असतो. मात्र तुम्ही तुमच्या हाताच्या त्वचेला मऊ करण्यासाठीदेखील कोरफड वापरू शकता.
कोरफडाचा हॅंडमास्क करण्यासाठी साहित्य –
कोरफडाचा गर आणि एखादा नैसर्गिक स्क्रब
कसा कराल वापर –
- अक्रोड अथवा कॉफीपासून तयार केलेल्या नैसर्गिक स्क्रब हातावर लावा.
- स्क्रबरमुळे तुमच्या हाताची त्वचा मुळापासून स्वच्छ होईल. त्यानंतर हात कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.
- हात पुसून कोरडे करा.
- कोरफडाचा गर हात, कोपर आणि तळहातावर लावा.
- दहा मिनीटांनी पॅक सुकल्यावर हात पुन्हा धुवून टाका.
- कोरफडीच्या गरामुळे तुमच्या हातांना मऊपणा आणि त्वचेला नैसर्गिक चमक मिळेल.
Shutterstock
ओट्स-
दररोज नाश्त्याला तुम्ही ओट्सचा वापर करत असालच पण तुमचे सौंदर्य खुलवण्यासाठीही ओट्स उपयुक्त आहेत.
ओट्सचा हॅंडमास्क तयार करण्यासाठी साहित्य –
दोन चमचे ओट्स, टी बॅग आणि कॉर्नप्लॉअर
कसा कराल वापर –
- टी बॅग पाण्यात उकळून थंड करा या पाण्याचा वापर तुम्हाला या पॅकसाठी करायचा आहे.
- टी बॅग काढून टाका आणि त्या पाण्यात ओट्स आणि कॉर्नफ्लॉवर मिस्क करा.
- या मिक्षणाचा एक जाडसर पॅक तयार करा.
- हातांवर हा मास्क लावा आणि पंधरा मिनीटांनी हात धुवून टाका.
Shutterstock
अॅव्होकॅडो –
अॅव्होकॅडोचा वापर आहारात ज्यूस, स्मूदी किंवा सलाडसाठी केला जातो. मात्र यापासून तुम्ही तुमच्या हातासाठी छान हॅंडमास्कदेखील तयार करू शकता.
अॅव्होकॅडो हॅंडमास्कसाठी साहित्य –
एक पिकलेले अॅव्होकॅडो, मध, ऑलिव्ह ऑईल, दही आणि चंदनतेल
कसा कराल वापर –
- अॅव्होकॅडो सोलून त्याचा गर काढून घ्या.
- सर्व मिश्रण एकत्र करून त्यात हा गर मिसळा.
- या मिश्रणाचा एका जाडसर पॅक तयार करा.
- हा पॅक हातावर लावा आणि अर्धा तासाने हात स्वच्छ धुवा.
आम्ही दिलेले हे हातावर लावण्याचे पॅक तुम्हाला कसे वाटले आणि त्याचा तुम्हाला किती फायदा झाला हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये नक्की कळवा.
Shutterstock
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
अधिक वाचा –
घरगुती उपायांनी घालवता येईल शरीरावरील टॅन