लॉकडाऊनमुळे अनेकांमध्ये कुकींगची आवड निर्माण झाली आहे. त्यामुळे घरोघरी आज काय स्पेशल ? हा प्रश्न नकीच विचारला जात आहे. असं असलं तरी जेवणाची वेळ सोडली तर सकाळी आणि संध्याकाळी नाश्ता काय करायचा हे मात्र सध्या एक मोठं कठीण काम होऊन बसलं आहे. एकतर या लॉकडाऊनच्या काळात अगदी पारंपरिक डिशपासून जवळजवळ सर्वच डिश प्रत्येक घरी ट्राय करून झाल्या आहेत. त्यामुळे नेहमीपेक्षा काहीतरी नवीन करावं असं प्रत्येकाला वाटत आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अगदी नवीन आणि काहिशा स्पेशल डिश शेअर करण्याचा प्रयत्न करत आहोत.
स्वयंपाकाची आवड असली तरी सध्या जवळजवळ सर्वांनाच ऑफिसचं कामदेखील घरातून करावं लागत आहे. ज्यामुळे वर्क फ्रॉम होम करण्याऱ्या लोकांना आवड असूनही स्वयंपाक घरात फार वेळ घालवणं शक्य नाही.तुमची मधल्या वेळेची भुक भागवण्यासाठी या रेसिपीज तुम्हाला नक्कीच आवडतील कारण त्या मुळीच वेळकाढू नाहीत.
निरोगी जीवनासाठी दररोज मुठभर अक्रोड (California Walnuts) खा असं सर्व आरोग्यतज्ञ्ज सांगतात. पण अक्रोड नुसते खाणं कंटाळवाणं असतं. यासाठीच आज आम्ही तुमच्यासोबत अक्रोडापासून तयार करण्यात येणाऱ्या काही गोड आणि तिखट रेसिपीज शेअर करत आहोत. ज्या तुम्ही तुमच्या लागोपाठ होणाऱ्या व्हर्चुअल ऑफिस मिटींग्स, ऑफिस वर्क, ऑनलाईन कोर्सेस आणि अगदी घरातील जबाबदाऱ्यादेखील सांभाळून करू शकता. या स्नॅक्समुळे तुमची मधल्या वेळेची भुक तर भागेलच शिवाय अक्रोडमुळे तुमचं योग्य पोषणही होईल. या रेसिपिज आमच्यासोबत शेअर केल्या आहेत शेफ वरूण इनामदार आणि शेफ सब्यसाची गोराय यांनी तेव्हा पाहा आणि झटपट करा या अक्रोड रेसिपीज
कॅलिफोर्निया अक्रोड चौपाटी भेळ पुरी (शेफ वरूण इनामदार)
साहित्य –
चार कप लाह्या, दोन बारीक चिरलेले कांदे, दोन बारिक चिरलेला टोमॅटो, दोन चिरलेल्या मिरच्या, चार चमचे पुदिन्याची चटणी, चार चमचे चिंचेची गोड चटणी, एक चमचा चाट मसाला, पाव कप चणा डाळ, पाव कप भाजलेले चणे, मीठ चवीनुसार, अर्धा कप जाडसर चॉप केलेले कॅलिफोर्निया अक्रोड, पाव कप शेव आणि दहा ते पंधरा पापडी पुरी
भेळ करण्याची कृती –
- सर्व साहित्य प्रमाणानुसार एका मोठ्या भांडयात घ्या.
- सर्व घटक एकत्र करून तुम्हाला योग्य पद्धतीने फक्त मिसळून घ्यायचे आहे.
- तुमची चौपाटी स्टाईल भेळ तयार आहे.
- भेळेला शेव, अक्रोड आणि पापडीपुरीने सजवा.
- भेळ तयार केल्यावर लगेच खा आणि बाहेर पडणाऱ्या मुसळधार पावसाचा आनंद घ्या.
Chef Varun Inamdar
कॅलिफोर्निया अक्रोडचे इन्स्टंट लोणचे ( शेफ वरूण इनामदार)
साहित्य –
एक कप कॅलिफोर्निया अक्रोड, कडीपत्ता, मोहरीचे तेल
लोणचं मसाला –
एक चमचा मीठ, दोन चमचे व्हाईट व्हिनेगर, एक चमचा लाल तिखट, एक चमचा रेड चिली फ्लेक्स, अर्धा चमचा धना पावडर, एक चमचा मोहरीची पावडर, अर्धा चमचा काळीमिरी पावडर, पाऊण चमचा मेथी पावडर, अर्धा चमचा बडिशेप पावडर
लोणचं तयार करण्याची कृती –
- एका कोरड्या भांड्यात सर्व मसाले एकत्र करा आणि मिसळून ठेवा.
- एका पॅनमध्ये मोहरीचे तेल गरम करा.
- तेल गरम करून थंड करा आणि थंड होत असतानाच त्यात कडिपत्ता टाका.
- एका भांड्यात अक्रोड आणि लोणच्याचे मसाले एकत्र करा.
- मिश्रणावर मोहरीचे तेल टाका आणि मिसळून घ्या.
- हे इन्संट लोणचे तुमच्या जेवणाची लज्जत नक्कीच वाढवेल.
- लोंडाला चव येण्यासाठी तुम्ही ते मधल्या वेळेतही खाऊ शकता.
Chef Varun Inamdar
नो बेक वॉलनट कोका चेरी बार ( शेफ सब्यसाची गोराय)
साहित्य –
अर्धा कप ओल्ड फॅशन ओट्स,दहा बारा खजूर, अर्धा कप अक्रोड, अर्धा कप सुकलेल्या चेरीज, दोन चमचे कोका पावडर, अर्धा चमचा मीठ
केक करण्याची कृती –
- फुड प्रोसेसरच्या मोठ्या भांड्यात ओट्स, खजूर, अक्रोड, चेरीज, कोका पावडर आणि मीठ एकत्र करा. प्रोसेसर फक्त एक ते दोन मिनीटेच फिरवा, ज्यामुळे या मिश्रणाचा एक क्रम्बली डो तयार होईल.
- मिश्रण एका वॅक्सपेपरवर काढून घ्या आणि एक ते दोन इंचाचा चौकीनी शेपचा एक आकार थापून घ्या.
- हा बार एक तासासाठी फ्रीजमध्ये सेट करा
- त्यानंतर त्याचे वडीप्रमाणे छोटे छोटे तुकडे कापून घ्या.
- हा बार नंतर तुम्हााल फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही.
- भुक लागल्यावर कधीही खाण्यासाठी बेक न केलेला हा केक तयार आहे.
Chef Sabyasachi Gorai
या रेसिपीज तयार करा आणि कंमेट बॉक्समध्ये आमच्यासोबत त्याचे फोटोदेखील शेअर करा. या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या तेही आम्हाला कळवा.
अधिक वाचा –
दररोज काहीतरी नवीन स्वयंपाक करण्यासाठी ट्राय करा या ‘टॉप 25’ भारतीय डिनर रेसिपीज
तोंडाची चव बदलतील या 5 चटकदार रेसिपी,नक्की करुन पाहा