लग्नासाठी वेस्टर्नचा पर्याय निवडला असेल तर या गोष्टी असू द्या लक्षात

लग्नासाठी वेस्टर्नचा पर्याय निवडला असेल तर या गोष्टी असू द्या लक्षात

लग्नासाठी काय घेऊ ? असा प्रश्न अनेकांना पडतो. काहींचे लग्न ठरण्याच्या आधीपासून निश्चित असते की, त्यांना काय घालायचे आहे. पण काहींना मात्र काय घेऊ हा प्रश्न कायम असतो. त्यातल्या त्यात जर तुम्ही नेहमीचा ट्रेडिशनल वेअर वगळून काहीतरी हटके वेस्टर्न वेअर घेण्याचा विचार करत असाल तर आजचा विषय तुमच्यासाठी खास आहे. वेस्टर्नवेअर निवडल्यानंतर त्यावर ज्वेलरी आणि मेकअप यांचा योग्य मेळ बसायला हवा. तसे झाले नाही तर तुम्ही ब्राईड म्हणून कितीही चांगला ड्रेस निवडला असेल तरी तो उठून दिसणार नाही. चला तर जाणून घेऊया वेस्टर्न ब्राईडलवेअरसाठी कशी करा तयारी 

नववधूसाठी परफेक्ट आहेत हे स्टायलिश 'ब्रायडल फुटवेअर' (Footwear For Bride In Marathi)

ज्वेलरीची निवड (Choosing jewelry )

Instagram

वेस्टर्न आऊटफिटवर तुमच्या ट्रेडिशनल ज्वेलरी फारच कमी वेळा उठून दिसतात. या वेअरवर मोठे मंगळसुत्र किंवा खूप दागिने घालण्याचा विचार करत असाल तर तसे अजिबात करु नका. कारण वेस्टर्नवेअरवर काही खास पद्धतीचे दागिने चांगले दिसतात. यावर सोन्याचे दागिने उठून दिसतीलच असे नाही. त्यामुळे तुमच्या कपड्यानुसार उदा. ऑफ शोल्डर, नेटेट गाऊन असेल तर त्यावर तुम्ही नाजूक खड्यांचे दागिने घाला. ते जास्त उठून दिसतात किंवा तुमच्या कपड्यांच्या शेड्सनुसार मिक्स मॅच करणारे दागिने तुम्ही त्यावर निवडा तर ते अधिक उठून दिसतात. 

मेकअप करताना

Instagram

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ‘मेकअप’. मेकअप हे तुमचे सौंदर्य जसे वाढवू शकते तसेच तुमचे सौंदर्य बिघडवू शकते. त्यामुळे मेकअप करताना तुम्ही काही गोष्टींचे भान ठेवणे फार गरजेचे आहे. तुमच्या वेस्टर्न आऊटफिटवर फार गडद मेकअप तुम्हाला चांगला दिसत नाही. अशावेळी तुमच्या आऊटफिटला साजेसा मेकअपच असायला हवा. बरेचदा वेस्टर्न आऊटफिट हे इंग्रजी रंगात असतात असे रंग गडद जरी असले तरी या कपड्यांवरील काम हे आपल्या इंडियन वेअरच्या तुलनेत फार कमी हलकं असतं. साडीप्रमाणे टिपिकल काठ किंवा वर्क असा प्रकार नसल्यामुळे तुम्हाला मेकअपची अत्यंत योग्य पद्धतीने काळजी घ्यावी. तुम्ही कपड्यांसकट मेकअपचे ट्रायल घ्यायला विसरु नका. 

लग्नसराईसाठी खास कानातले डिझाईन - Earring Designs For Wedding

हेअरस्टाईलही आहे महत्वाची

Instagram

आता पुढचा प्रश्न म्हणजे हेअरस्टाईलचा. एखादे ट्रेडिशनल वेअर असेल तर त्यावर करण्यासारखा भरपूर हेअरस्टाईल असतात. पण नेमके वेस्टर्नवेअर निवडल्यानंतर हेअरस्टाईल कसे करायचे ते कळत नाही. पण वेस्टर्नवेअर करण्यासारख्या खूप हेअरस्टाईल असतात. ब्राईडल हेअरस्टाईल निवडताना तुम्हाला तुमचा चेहरा, तुमची पर्सनॅलिटी, तुमचे केस या सगळ्याचा विचार करायला हवा. जर तुम्ही अपडु हेअरस्टाईल करणार असाल तर त्यावर खूप काही अॅसेसरीजचा वापर करणे टाळा. जर केस मोकळे सोडून किंवा फ्री हेअरची हेअरस्टाईल करणार असाल तर त्याबाबतीतही तसाच नियम लावा. आयत्यावेळी कोणतीही वेगळी हेअरस्टाईल करायला जाऊ नका. हेअरस्टाईलचा ट्रायलही आधी घ्या. 


वेस्टर्न असो वा इंडियन तुम्ही कोणतेही कपडे निवडल्यानंतर कायम पूर्वतयारी म्हणून ट्रायल घेऊन ठेवा. त्यामुळे तुम्हाला अंदाज येतो. आयत्यावेळी होणारी फसगत होणार नाही.

 लग्नाच्या एक महिन्याआधी करून घ्या ही कामं