बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा कपूरचा एक स्पेशल चाहतावर्ग आहे. मीरा सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव्ह आहे. नुकताच तिने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर तिचं ब्युटी सिक्रेट चाहत्यांसाठी खुलं केलं आहे. दोन मुलांची आई असूनही तिची स्किन आजही तितकीच सुंदर दिसते. यामागचं कारण तिच्या या स्किन केअर रूटिनमध्ये दडलेलं आहे. जाणून घ्या मीरा राजपूतचं ब्युटी सिक्रेट
मीरा राजपूतचं ‘स्किन केअर रूटिन’
त्वचा निरोगी आणि नितळ ठेवण्यासाठी मीरा राजपूत एक घरगुती उपाय करते. मीरा राजपूतने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये हे सांगितलं आहे. तिने तिच्या एका नो मेकअप सेल्फीसोबत हे सिक्रेट चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. मीरा राजपूतच्या मते तिच्या चमकदार त्वचेचं रहस्य एका फ्रूट स्क्रब आणि ‘या’ ब्युटी टूलमध्ये दडलेलं आहे. ज्यामुळे तिची त्वचा नेहमी ब्राइट राहते शिवाय सैलही पडत नाही. या ब्युटी टूलने चेहऱ्यावर मसाज करणं हा एक मजेशीर आणि आरामदायक अनुभव असतो. ती दररोज संध्याकाळी स्वतःसाठी थोडा वेळ काढून त्चचेची काळजी घेते. संध्याकाळचा वर्कआऊट झाला की त्वचा स्वच्छ करण्यासाठी ती हा उपाय करते. हा उपाय केल्यामुळे लॉकडाऊनमध्येही तिची त्वचा सुंदर आणि चमकदार राहू शकली. मसाज करताना काय टेकनिक वापरावं हे ती एका व्हिडिओमधून शिकली आहे. त्यामुळे तुम्हाला हवं ते मसाज टेकनिक तुम्ही यासाठी वापरू शकता. मीरा राजपूतसाठी हे मसाज टेकनिक एखाद्या गेम चेंजर प्रमाणे ठरलं आहे. या मसाजसाठी मिरा राजपूत क्वांसा ब्युटी कॉईन (Kwansa beauty coin) हे ब्युटी टूल आणि फ्रूट स्क्रब वापरत आहे.
क्वांसा ब्युटी कॉईन (Kwansa beauty coin) म्हणजे नेमकं काय –
सध्या बाजारात फेस मसाज करण्यासाठी अनेक ब्युटी टूल्स विकत मिळतात. ज्यामध्ये गुआ शा स्टोन, जेड फेस रोलर आणि कोलेजीन रोलर महिलांमध्ये खूपच लोकप्रिय ठरत आहेत. आता या लिस्टमध्ये क्वांसा ब्युटी कॉईनची भर पडली आहे. हे एक मसाजिंग टूल आहे ज्यामध्ये कांस्य या शुद्ध धातूचा वापर करण्यात येतो. या ब्युटी टूलने चेहऱ्यावर मसाज केल्यास त्वचेमधील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात. ज्यामुळे त्वचा स्वच्छ आणि नितळ होते. डिटॉक्सिफिकेशनमुळे त्वचेवरील सूज कमी होते, त्वचेला पुरेशा ऑक्सिजनचा पूरवठा होतो आणि त्वचेवर नैसर्गिक चमक येते. जर तुम्ही एखादे फेस क्रिम, फेस स्क्रब, नैसर्गिक तेल, फेस सीरम लावून या मसाजरचा वापर केला तर हे प्रॉडक्ट त्वचेत खोलवर मुरण्यास अधिक मदत होते. या ब्युटी टूलमुळे तुमच्या जोलाईन आणि मानेकडील स्नायू शिथील होतात. ज्यामुळे तुम्हाला खूपच रिलॅक्स आणि फ्रेश वाटू लागते.
त्वचेवर कांस्य धातूचे होणारे परिणाम
आयुर्वेदामध्ये कांस्य(ब्रॉंझ) धातूला खूप महत्व आहे. कांस्य धातूपासून स्वयंपाकासाठी भांडी, मुर्ती, देवळातील घंटा तयार केल्या जातातच शिवाय याचा उपयोग आरोग्यासाठी एखादा औषधांप्रमाणेही करता येतो. कांस्य या धातूमुळे तुमच्या शरीरातील फॅट कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे अनेक त्वचा समस्या आपोआप कमी होऊ शकतात. अंगाचा दाह, पित्त उठणे अथवा अॅलर्जी झाल्यास त्वचेवर काशाच्या वाटीने मसाज करण्यात येत असे. बोली भाषेत कांस्य या धातूच्या भांड्यांना काशाची भांडी असेही म्हटले जाते. कांस्य या धातूमध्ये तांबे आणि जस्त एकत्र केलेले असते. ज्यामुळे अंगातील उष्णता कमी होण्यास मदत होते. यासाठीच या ब्युटी टूलमध्ये कास्य धातूचा वापर करण्यात आलेला आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
ऑक्सिजन फेशिअलचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का
क्लिनझर की फेसवॉस, जाणून घ्या दोघांमधील फरक (Cleanser Vs Face Wash In Marathi)