पायांची काळजी घेण्यासाठी महिन्यातून एकदा पेडिक्युअर करणे अनेकांना आवडते. पेडिक्युअरचे अनेक वेगळे प्रकार सध्या सलोन आणि स्पामध्ये उपलब्ध आहेत. एखाद्या साध्या सलोन किंवा पार्लरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पेडिक्युअरचे इतके पर्याय मिळत नाही. पण तुम्ही एखाद्या चांगल्या सलोनमध्ये गेलात तर मात्र पायांच्या त्वचेनुसार आणि तुमच्या गरजेनुसार तुम्हाला पेडिक्युअरची निवड करता आली पाहिजे. पण तुम्हाला कोणते पेडिक्युअर कशासाठी करतात हे माहीत नसेल तर जाणून घेऊया अशाच काही पेडिक्युअरची माहिती
चॉकलेट पेडिक्युअर हा प्रकार सर्रास पाहायला मिळत नाही. चॉकलेटमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म तुमच्या पायांना अधिक मॉश्चरायझर पुरवायचे काम करतात. चॉकलेट पेडिक्युअरमध्ये पाणी नाही तर चक्क गरम चॉकलेटमध्ये पाय भिजत ठेवले जाते. गरम चॉकलेटमध्ये पाय ठेवल्यानंतर पायांना रिलॅक्सेशन मिळते. त्यानंतर चॉकलेटचे स्क्रब आणि मास्क लावला जातो. या पेडिक्युअरमुळे तुमच्या पायांना आवश्यक असलेले मॉईश्चर तुम्हाला मिळते.
किंमत : 1500 रुपयांहून अधिक
मिठाचा उपयोग सौंदर्यामध्ये अगदी आवर्जून केले जातो. पेडिक्युअरसाठीही सॉल्ट मिठाचा उपयोग केला जातो. तुमच्या त्वचेवर फार डेट स्किन असेल आणि तुमच्या पायांच्या त्वचेवर टॅन असेल तर तुमच्यासाठी हे पेडिक्युअर फार चांगले आहे. मिठाला सुंगधी तेलासोबत मिसळून त्याचे सोक वॉटर आणि स्क्रब तयार केले जाते. त्यामुळे तुमचे पाय स्वच्छ होण्यास मदत मिळते.
किंमत : 1000 रुपयांहून अधिक
मुलायम आणि कोमल पायांसाठी झटपट घरगुती उपाय (Foot Care Tips In Marathi)
रोज जिम करत असाल किंवा व्यायाम करत असाल तर अशा लोकांचे पाय हे नेहमी कोमल किंवा नाजूक दिसत नाही तर अशा लोकांचे पाय हे नेहमी रुक्ष वाटतात. अशा अॅथलिट म्हणजे खेळणाऱ्या लोकांसाठी हे पेडिक्युअर उत्तम आहे. या पेडिक्युअरचे उद्दिष्टय तुमच्या पायांना मुलायम करणे असते. गरम पाण्यात पाय ठेवण्यापासून ते अगदी पायांना वेगवेगळे प्रोडक्ट लावेपर्यंत सगळ्या गोष्टी पेडिक्युअरसारख्या वाटत असल्या तरीदेखील तुमच्या पायांच्या तळ्यांकडे या पेडिक्युअरमध्ये जास्त लक्ष दिले जाते. या पेडिक्युअरनंतर तुमचे पाय सुंदर दिसतात.
किंमत: 1500 रुपयांहून अधिक
पेडिक्युअरमध्ये पाण्याचा उपयोग न करता केले जाणारे हे पेडिक्युअर हल्ली अनेक जण करतात. ज्यांना गरम पाण्यात पाय डुंबून ठेवायला आवडत नाही. अशांसाठी हे पेडिक्युअर एकदम बेस्ट आहे. यामध्ये नखं कापण्यापासून ते क्युटिकल क्रिम लावून क्युटिकल काढण्यापर्यंत सगळे काही केले जाते. तुमच्या पायांना विशेष मॉश्चरायझर क्रिम लावून ठेवले जाते. यामध्ये मसाज हा फार महत्वाचा असतो.
किंमत: 1200 रुपयांपासून
मार्गरेटा म्हटल्यावर तुम्हाला एखाद्या ड्रिंक्सची आठवण येईल. पण हा पेडिक्युअरचा एक प्रकार आहे. या नावाने नाही तर आणखी वेगळ्या नावाने हे पेडिक्युअर ओळखले जाते. हे पेडिक्युअर लिंबू आणि मीठ याचा वापर केला जातो. लिंबू आणि मिठाच्या गुणधर्मामुळे या पेडिक्युअरनंतर तुमच्या पायांची मृत त्वचा काढून लिंबाचे गुणधर्म तुमच्या त्वचेवरील टॅन घालवण्यास मदत करते. पायांची काळजी घेताना पायांची काळजी घेणारी उत्पादने ही वापरणे गरजेचे असते.
किंमत: 1000 रुपयांपासून पुढे
आता पेडिक्युअर करायला जाणार असाल तर तुम्ही नक्की पेडिक्युअरचे हे प्रकार करुन पाहा
नखं वाढवण्यासाठी नक्की वापरा ‘हे’ सोपे घरगुती उपाय (How to Grow Nails Faster in Marathi)