भूक ही अशी संवेदना आहे जी जाणवू लागल्यानंतर समोर आलेल्या ताटातील अन्न कधी ग्रहण करतो असे आपल्या सगळ्यांना होऊ लागते. भूकेच्यावेळी आपल्याला जेवणाची इतकी घाई असते की, आपण जेवण्याकडे अधिक लक्ष देतो पण ते अन्न नीट चावून खात आहोत की, नाही याकडे मात्र आपण मुळीच लक्ष देत नाही. जेवताना अन्न नीट न जेवता तसेच गिळायची काही जणांना सवय असते. असे म्हणतात एक घास 32 वेळा चावून खावा. कारण अन्न चावताना त्यासोबत तयार होणारी लाळ जेवण पचायला मदत करते. पण जर तुम्ही अन्नाचे कण बारीक होईपर्यंत ते चावून खाल्ले नाही तर मात्र काही शारिरीक व्याधी आपोआपच डोकवायला लागतात. अन्न चावून खाल्ले नाही तर काय त्रास होतील ते आता आपण जाणून घेऊया.
मातीच्या भांड्यात शिजवा जेवण आणि मिळतील आरोग्याला फायदे
अपचन
जर तुम्ही अन्न घाईघाईत आणि न चावता खाल्ले तर तुम्हाला सगळ्यात आधी जो त्रास जाणवू लागेल तो आहे अपचनाचा. कामाच्या ठिकाणी, गडबडीत किंवा अनेकांना अन्न चावायची सवयच नसते. ते अन्नाचा प्रत्येक घास न चावता तसाच गिळत राहतात.जर तुम्ही अन्न नीट चावले नाही तर मात्र तुम्हाला अपचन होऊ सकते. तुम्हाला तुमचे पोट सतत भरल्यासारखे आणि तुम्हाला सतत ढेकर येत राहतात. जर हा त्रास तुम्हाला होत असेल तर तुम्ही आताच घाईघाईने अन्नाचे सेवन करण्याची सवय कमी करायला हवी.
बद्धकोष्ठता
पोटासंदर्भातील आणखी एक विकार म्हणजे बद्धकोष्ठता. अन्न नीट चावले नाही तर ते पचण्यास जड होते. जर ते अन्न पचलेले नसेल तर ते पोटातून बाहेर जाण्यासही अडथळा निर्माण करते. बद्धकोष्ठतेचा त्रास तुम्हाला सातत्याने होत असेल तर तुम्ही तुमचे अन्न नीट चावत आहात की नाही याकडे लक्ष द्या. जर तुम्ही घाईघाईत अन्न 10 ते 15 वेळाच चावत असाल तर तुम्ही तुमची ही सवय आताच बदला. विशेषतः गरोदरपणातील बद्धकोष्ठतेवर घरगुती उपाय करावे लागतात.
गरोदरपणात चुकूनही खाऊ नका हे पदार्थ
पचनशक्ती कमी करते
पोटाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी पचनशक्ती चांगली राहणे गरजेचे असते. जर तुम्ही योग्य पद्धतीने अन्न ग्रहण केले नाही तर तुमच्या पचनशक्तीवर ताण येतो. एकदा पचनशक्तीवर ताण आला तर मात्र तुम्हाला ती पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि त्यानंतर तुम्हाला पचनशक्तीचे त्रास होऊ लागतात. त्यामुळे तुम्ही अन्न चावून चावून खा.
मुलाने हे खायलाच हवं हा हट्ट वाढवू शकतो तुमच्या मुलांमधील लठ्ठपणा
अन्न चावून खाण्याचे फायदे
अन्न चावून खाण्याचे काही फायदे आहेत. अन्न चावल्यामुळे तुमच्या तोंडाचा व्यायाम होतो. दात मजबूत होण्यास मदत मिळते. शिवाय अन्न चावल्यामुळे तुमच्या कॅलरीजही वापरल्या जातात. ज्यामुळे शरीराला उर्जा मिळण्यास ही मदत मिळते. गायी अन्न कितीतरी वेळा चावून खातात. तुम्हीही अन्नाचे सेवन किमान 32 वेळा तरी करायला हवे.
आता जर तुम्ही अन् चावून खात नसाल तर आतापासूनच अन्न चावून खायला सुरुवात करा. म्हणजे तुम्हाला पोटाचे विकार होणार नाहीत.
शास्त्र सांगतं की, रात्री खाऊ नका हे पदार्थ