ADVERTISEMENT
home / Fitness
पोटासह हिप्सची चरबी कमी करण्यासाठी उत्तम योगासन

पोटासह हिप्सची चरबी कमी करण्यासाठी उत्तम योगासन

सध्या घरातूनच काम  केल्यामुळे लाईफस्टाईल खूपच बदलली आहे. जास्तीत जास्त वेळ घरात बसून जात आहे आणि त्यामुळे पोटासह हिप्सची चरबी वाढण्याचे प्रमाणही वाढले आहे. जास्तीच जास्त वेळ बसून काम केल्यामुळे हा परिणाम दिसून  येत आहे. पण तुम्हाला यामुळे त्रास करून घ्यायची गरज नाही.  तुम्हाला पोटासह हिप्सची चरबी कमी करायची असेल तर त्यासाठी काही योगासनं करणं हा उत्तम उपाय आहे. आम्ही सांगितलेली ही तीन योगासने तुम्ही नियमित केलीत तर तुम्हाला पोटासह हिप्सची चरबी वाढण्याच्या समस्येला सामोरं जावं लागणार नाही. यासाठी नक्की कोणती योगासनं करायला हवीत आणि कशाप्रकारे करायला हवीत याची इत्यंभूत माहिती  आम्ही तुम्हाला देत आहोत. अशा प्रकारे तुम्ही नियमित योगासनं केलीत तर तुम्हाला नक्कीच या समस्येपासून सुटका मिळेल आणि तुम्ही तुमच्या तब्बेतीला व्यवस्थित जपू शकाल. द्विचक्रिय आसन,  उत्तानपादासन आणि नौकासन हे तीन योगाचे प्रकार आहेत जे तुम्हाला हिप्स आणि पोटाच्या चरबीपासून सुटका मिळवून देऊ शकतात. कारण हे पोटाचे क्षेत्र टारगेट करते आणि त्याशिवाय शरीरातील रक्तप्रवाह वाढविण्यासही मदत करते.  तसंच आपल्या शरीरातील चरबी कमी करून फॅट बर्न करण्यासाठी याचा उपयोग होतो. याशिवाय एनर्जी वाढते आणि टिश्यूज सहजतेने बर्न होतात. योगासन करताना येणाऱ्या घामापासून सुटका हवी असेल तर वापरा MyGlamm चे वाईपआऊट.  जाणून घेऊया कसे करायचे हे योगासन. 

द्विचक्रिय आसन

जाडेपणा कमी करण्यासाठी अर्थात हिप्स आणि पोटावरील चरबी कमी करण्यासाठी हा सर्वात सोपा उपाय आहे. नियमित स्वरुपात तुम्ही 5-10 मिनिट्स हे आसन केल्यास, पोट आणि हिप्सवरील चरबी कमी होण्यास मदत मिळते. याशिवाय तुम्हाला तुमच्या मांडीवरील चरबी कमी करता येते आणि पोटाच्या समस्येवरील हा रामबाण उपाय आहे. 

करण्याची पद्धत 

  • द्विचक्रिय आसन करण्याच्या आधी तुम्हाला एक चक्रिय आसन करावे लागते 
  • त्यासाठी तुम्ही कमरेवर झोपा 
  • दोन्ही पाय एकमेकांच्या जवळ घ्या आणि हात हिप्सखाली जमिनीवर टेकवा 
  • त्यानंतर हळूहळू डावा पाय वर घ्या आणि पाय गोलाकार चक्रामध्ये क्लॉकवाईज आणि मग अँटिक्लॉकवाईज फिरवा 
  • सतत 8-10 वेळा असं करा आणि मग उजव्या पायाने तशीच प्रक्रिया करा 
  • आता द्विचक्रिय आसन करण्यासाठी तुम्ही दोन्ही पायांना फिरवून गोल गोल झिरो बनविल्याप्रमाणे फिरवा 
  • 5 वेळा क्लॉकवाईज आणि मग 5 वेळा अँटिक्लॉकवाईज फिरवा

चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय (How To Reduce Face Fat In Marathi)

ADVERTISEMENT

उत्तानपादासन

हे नियमित केल्याने तुम्हाला पोटाची आणि हिप्सच्या चरबीसह मांडीची चरबी कमी करण्यासही फायदा मिळतो. तसंच पाठीचा त्रास असेल तर तुम्ही हा योगप्रकार नक्की करावा. बद्धकोष्ठ, अॅसिडिटीसारख्या पोटाच्या समस्यांमधूनही यामुळे सुटका मिळते. 

करण्याची पद्धत 

  • हे करण्यासाठी आधी चटई घालून पाठीवर झोपा
  • दोन्ही हात हिप्सच्या खाली जमिनीवर ठेवा 
  • त्यानंतर पाय जमिनीपासून 45-90 डिग्रीच्या रेषेत उचला आणि हळूहळू श्वास घ्या 
  • लोअर अॅब्सवर प्रेशर येईपर्यंत 15-20 सेकंद होल्ड करा 
  • श्वास सोडताना पाय जमिनीच्या दिशेने पुन्हा खाली घ्या 

पोटातील चरबी आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे पपई

नौकासन

रोज काही मिनिट्स नौकासन केल्याने पोटाच्या आसपास असणारी आणि हिप्सजवळ साचलेली अनावश्यक चरबी घटविण्यासाठी फायदा मिळतो.  तसंच नौकासन तुमच्या पोट आणि हिप्सना लवचिक बनवते. हाडं मजबूत करून तुमच्या पचनक्रियेमध्ये सुधारणा होते.  तसंच मांसपेशीही मजबूत होतात. 

ADVERTISEMENT

करण्याची पद्धत 

  • हे करण्यासाठी पाठीवर झोपा
  • मग पाय आणि हात दोन्ही एकत्र वर उचला
  • हात सरळ ठेवा आणि बोटं सरळ करून पायाला लावण्याचा प्रयत्न करा
  • श्वास घ्या आणि शरीराचा वरचा भाग आणि पाय जमिनीपासून 45 डिग्री वर उचला
  • पोटाचा खालचा भाग स्ट्रेच होईल
  • शरीराचा भार आपल्या हिप्सवर टाका आणि लक्षात ठेवा की, वाकल्यानंतर तुम्ही  पायाचा अंगठा आणि हातावर नसाल
  • या पोझिशनमध्ये थोडा वेळ थांबा आणि मग पायाचा आणि शरीराचा  वरचा भाग हा खालच्या बाजूला ठेवा आणि आराम करा 
  • हे आसन तुम्ही 3-4 वेळा करा

पोटावरील चरबी घटवण्यासाठी करा 4 सोपे उपाय

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

05 Nov 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT