तुमचे फाऊंडेशन तेलकट आहे का?, जाणून घ्या असे

तुमचे फाऊंडेशन तेलकट आहे का?

मेकअप करायचा म्हणजे फाऊंडेशन लावणे आलेच. फाऊंडेशनच्या शेड्च्या बाबतीत अनेकांच्या तक्रारी सर्वसाधारणपणे असतात. स्वत:च्या चेहऱ्यासाठी परफेक्ट फाऊंडेशन निवडणे तसे कठीणच काम असते. त्यातल्या त्यात त्वचेच्या प्रकारानुसारही फाऊंडेश निवडणे गरजेचे असते. त्वचेच्या प्रकारानुसार फाऊंडेशन निवडले तर तुम्हाला ते लावल्यानंतर त्याचे कोणत्याही प्रकारे नुकसान होत नाही. कोरडी, तेलकट आणि नाजूक त्वचा या सगळ्या त्वचेसाठी फाऊंडेशन हे हायड्रेटिंग हवे असले तरी त्यामध्ये तेल अधिक असावे असे कोणालाही वाटत नाही. तुम्ही आणलेले फाऊंडेशन तेलकट आहे की नाही हे तुम्हाला ओळखता येते का? जर तुम्हाला तुमचे फाऊंडेशन तेलकट आहे हे कळत नसेल तर असे ओळखा तुमचे फाऊंडेशन तेलकट आहे की नाही.

या टिप्सने ओळखा तुमचे जेड रोलर खरे आहे की ड्युप्लिकेट

तेलकट फाऊंडेशन ओळखण्याची पद्धत

Instagram

  • फाऊंडेशन तेलकट असेल तर त्याचे टेक्शचर फार वेगळे असते. त्वचा मॉश्चराईज ठेवण्यासाठी त्यामुळे जास्त प्रमाणात मॉश्चरायझर घातले जाते. त्यामुळे असे फाऊंडेशन हाताला फार पातळ आणि गुळगुळीत लागते. 
  •  फाऊंडेशन तेलकट असेल तर त्यामधून त्याचे तैलीय घटक नक्कीच वेगळे होतात. तुमची फाऊंडेशची बॉटल थोड्या कालावधीसाठी एका ठिकाणी स्तब्ध ठेवून द्या. जर त्यावर एक तेलाचा तवंग आला तर समजून जा की, तुमचे फाऊंडेशन तेलकट प्रकारातील आहे. त्यामुळे तुमची त्वचा चिकट होण्याची शक्यता अधिक असते. 
  • एक जाड पुठ्ठा किंवा पेपर घेऊन त्यावर फाऊंडेशन पसरवा. पुठ्ठा द्रव्य शोषून घेतो. त्यामुळे जर फाऊंडेशनमध्ये जास्तीच तेल असेल तर पुठ्ठा ते शोषून घेतो. 
  • फाऊंडेशन लावल्यानंतर ते तुमच्या त्वचेवर एक काळपट चमक आणत असेल तर तुम्ही घेतलेले फाऊंडेशन हे ऑईली आहे हे समजून जावे.असे फाऊंडेशन तुमचा सगळा मेकअप खराब करु शकते. 

DIY : फक्त तीन गोष्टींपासून असा तयार करा होममेड हेअर स्प्रे

या त्वचेने अजिबात लावू नये तेलकट फाऊंडेशन

Instagram

  • ज्यांची त्वचा कोरडी असते त्यांची त्वचा मॉश्चराईज राहावी यासाठी कायम ऑईली फाऊंडेशन वापरण्याचा सल्ला दिला जातो.या फाऊंडेशनच्या वापरामुळे त्यांच्या त्वचेवर एक आवश्यक असलेली चमक येते. 
  • पण ज्यांची त्वचा मुळातच तेलकट आहे. अशा लोकांनी याचा वापर केल्यास त्यांचा मेकअप मुळीच उठून दिसत नाही. अशा लोकांचे मेकअप हे लवकर काळे पडतात. अगदी तासाभरातच त्यांच्या मेकअपचा ग्लो निघून जातो. त्यामुळे अशांनी तेलकट फाऊंडेशन वापरु नये. 
  • तुमची त्वचा नाजूक असेल तर तुम्हीही तेलकट त्वचेचे फाऊंडेशन वापरु नका. कारण असे फाऊंडेशन तुमच्या पोअर्सच्या आत जाऊन तुमची त्वचा अधिक नाजूक करतात. 


आता फाऊंडेशन आणले असेल आणि ते कोणत्या प्रकारचे आहे  हे कळत नसेल तर तुम्हाला ही गोष्ट माहीत हवी.

फाऊंडेशन लावताना या चुका केल्यामुळे चेहऱ्यावर येतील पिंपल्स

Beauty

Total Makeover FF Cream Foundation Palette - Cappuccino

INR 1,450 AT MyGlamm