ADVERTISEMENT
home / लग्नसराई
अशी निवडा परफेक्ट साखरपुड्याची अंगठी

अशी निवडा परफेक्ट साखरपुड्याची अंगठी

साखरपुडा म्हणजे लग्नाआधीचा एक महत्त्वाचा विधी. या दिवशी एकमेकांना अंगठी घालून एंगेज केलं जातं. त्यामुळे लग्नाआधी केला जाणारा हा सोहळ्याचा थाटमाटही शाहीच असतो. या सोहळ्याचं आकर्षण असतं ते म्हणजे नववधू आणि वर एकमेकांना घालत असलेली अंगठी. म्हणूनच साखरपुड्याची अंगठी खास असायला हवी. शिवाय ती निवडताना काही गोष्टी दोघांनाही माहीत असायला हव्या. नाहीतर ऐन कार्यक्रमाच्या वेळी पंचाईत होऊ शकते.

जोडीदारासाठी परफेक्ट अंगठी कशी निवडावी –

जर तुमचं लव्ह मॅरेज असेल अथवा तुमच्या पार्टनरचा आधीपासूनच तुमच्या निवडीवर विश्वास असेल तर सरप्राईझ देण्यासाठी तुम्ही त्याला न दाखवता डायमंड रिंग खरेदी करू शकता. मात्र त्यासाठी तुम्हाला तुमच्या पार्टनरच्या बोटांचे माप अगदी अचूक माहीत असायला हवे. नाहीतर ऐन कार्यक्रमाच्या वेळी तुमची फजिती होऊ शकते.

जर अरेंज मॅरेज करत असाल तर दोघांनी एकमेकांसोबत खरेदी जाऊन साखरपुड्याची अंगठी निवडणं हा एक सोपा आणि चांगला पर्याय आहे. कारण त्यामुळे तुम्हाला एकमेकांच्या आवडीची आणि परफेक्ट साईझची अंगठी घेता येईल. 

लक्षात ठेवा माप न घेता साखरपुड्यासाठी अंगठी निवडणं खूप रिस्की असू शकतं.  शिवाय साखरपुड्याची अंगठी आयुष्यभर तुमच्या पार्टनरच्या बोटांमध्ये असणार त्यामुळे त्याचं डिझाईन दोघांच्याही आवडीप्रमाणे असायला हवं. 

ADVERTISEMENT

Instagram

सोन्याची अंगठी घेताना लक्षात ठेवा या गोष्टी –

सोन्याची अंगठी खरेदी  करताना तुम्हाला सोन्याचे भाव आणि शुद्धता या विषयी व्यवस्थित माहिती असायला हवी. सोनं नेहमी 18, 22 कॅरेटमध्ये मिळतं. हॉलमार्क असलेलं सोनं हे शुद्धतेचं प्रमाण असतं. त्यामुळे सोन्याची अंगठी घेताना या गोष्टी नीट पडताळून पाहा. त्याचप्रमाणे तुमचं बजेट किती आहे आहे त्यानुसार आधीच किती वजनाची अंगठी घ्यायची याचं प्लॅनिंग करा. न्युजपेपर आणि न्युज चॅनेलवर तुम्हाला दररोज असणारे सोन्याचे भाव समजतात. सोन्याचे भाव सतत चढत आणि उतरत असतात. जर तुम्हाला सोन्याचे भाव कमी असताना दागिने करायचे असतील तर त्या भावानुसार सोन्याचं वळं अथवा नाणी खरेदी करून ठेवा. ज्यामुळे साखरपुडा ठरल्यावर जरी सोन्याचा भाव जास्त असला तरी तुम्हाला हवी तशी अंगठी तुम्ही जोडीदारासाठी खरेदी करू शकता. 

डायमंड रिंग खरेदी करताना काय पाहाल –

आजकाल साखरपु्ड्याची अंगठी रिअल डायमंडमध्ये करण्याची फॅशन आहे. कारण हिऱ्याचा संबध रोमॅन्ससोबत जोडला जातो. म्हणूनच जर तुम्ही जोडीदारासाठी डायमंड रिंग खरेदी करणार असाल तर ती ब्रॅंडेड दुकानातूनच खरेदी करा. डायमंडची किंमत ही त्यावर असणाऱ्या कटवर म्हणजेच पैलूंवर आधारित असते. जितके कमी कट तितकी  डायमंडची किंमत जास्त असते. डायमंडच्या अंगठ्या या 18 कॅरेट सोन्यातच बनवल्या जातात. कारण त्या 22 कॅरेटमध्ये तयार होत नाहीत. शिवाय प्रत्येक ब्रॅंडनुसार मेकिंग चार्जेसमध्ये फरक पडत असतो. यासाठीच अंगठी खरेदी करताना सोबत दिल्या जाणाऱ्या कार्डवर असलेली सर्व माहिती वाचून मगच खरेदी करा.

ADVERTISEMENT

आम्ही तुम्हाला दिलेल्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला कंंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा.

 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

प्रत्येक महाराष्ट्रीयन मुलीकडे असायलाच हवेत हे 5 दागिने

या दिवाळीसाठी वापरा खास आकर्षक दागिने, निवड करा अशी

अशी घ्या मोत्यांच्या दागिन्यांची काळजी How to take care of Pearl Jewellery

23 Dec 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT