आजकाल बदललेली जीवनशैली, प्रदूषण, धुळ, माती, अती मेकअप यामुळे महिलांना त्वचेच्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. पण यासोबतच अनेक महिलांना जाणवणारी एक गंभीर त्वचा समस्या म्हणजे चेहऱ्यावर वांग येणे. पंचविस ते साठ या वयोगटातील अनेक महिलांना आजकाल चेहऱ्यावर वांगचे डाग दिसू लागतात. यामागे त्यांच्या शरीरात होणारे हॉर्मोनल बदलही बऱ्याचदा कारणीभूत असतात. वांगचे डांग चेहऱ्यावरून समूळ जाऊ शकत नाहीत मात्र ते विरळ नक्कीच होऊ शकतात. इतर सौंदर्यविषयक माहिती वाचल्यावर आमच्याकडे बऱ्याचदा वांग जाण्यासाठी क्रीम सांगा अशी मागणी नेहमी केली जाते. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी क्रीम (vang janyasathi cream) चे काही प्रकार शेअर करत आहोत. ज्या क्रीमचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. यासोबतच वाचा चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी घरगुती उपाय (Home Remedies For Pigmentation In Marathi) आणि चेहऱ्यावर असतील वांग तर असा करा मेकअप (Face Makeup For Freckles In Marathi)
Table of Contents
- चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी क्रीम पुढीलप्रमाणे
- Myglamm Anti – Defying Serum – मायग्लॅम अॅंटी डिफाईंग सीरम
- St Botanica Anti Aging Face Cream – सेंट बोटॅनिका अॅंटी एजिंग फेस क्रीम
- Organic Harvest Anti Pigmentation Face Cream – ऑर्गेनिक हारवेस्ट अॅंटी पिंगमेंटेशन फेस क्रीम
- Sirona Depigmentation Face Serum – सिरोना डिपिगमेंटेशन फेस सीरम
- Kama Ayurveda Rejuvenating And Brightening Night Cream – कामा आर्युवेदा रिजुव्हनेइटिंग नाईट क्रीम
- Oriflame Replenishing Night Cream – ओरिफ्लेम रिप्लेनिशनिंग नाईट क्रीम
- St Botanica Depigmentation Cream – सेंट बोटॅनिका डीपिगमेंटेशन क्रीम
- Vaadi Herbals Anti Pigmentation Massage Cream – वादी हर्बल अॅंटी पिगमेंटेशन मसाज क्रीम
- Kaya Clinic Pigmentation Reducing Complex – काया क्लिनिक पिगमेंटेशन रिड्युसिंग कॉम्प्लॅक्स
- Lotus Herbals Anti-Blemish Cream – लोटस हर्बल अॅंटि ब्लेमिश क्रीम
- RE’ EQUIL Skin Radiance Cream – रिक्विल स्किन रेडिअन्स क्रीम
- Jovees Anti Blemish Pigmentation Cream – जोविस अॅंटि ब्लेमिश पिगमेंटेशन क्रीम
- VLCC De-Pigmentation Day Cream – व्हिएलसीसी डिपिगमेंटेशन डे क्रीम
- Olay Total Effect 7 In 1 Anti Ageing Skin Cream – ओले टोटल इफेक्ट 7 टू 1 अॅंटी एजिंग स्कीन क्रीम
- चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी क्रीम बाबत निवडक प्रश्न – FAQs
चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी क्रीम पुढीलप्रमाणे
Myglamm Anti – Defying Serum – मायग्लॅम अॅंटी डिफाईंग सीरम
चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी क्रीमप्रमाणेच आजकाल काही सीरमचे प्रकारही खूप प्रभावी ठरत आहेत. त्यामुळे आपण याची सुरुवात मायग्लॅमच्या 1 % रेटिनॉल एज – डिफायनिंग सीरमने करू या.
त्वचेला दुरूस्त, टवटवीत आणि तरूण करण्यासाठी यामध्ये कॅफेन आणि कोरफडांच्या पानांचा अर्क वापरण्यात आलेला आहे. नवीन त्वचापेशी निर्माण करण्यासाठी आणि तुमच्या त्वचेला एकसमान करण्यासाठी हे उत्तम सीरम आहे. या सीरमचे टेक्श्चर नॉन स्टिकी असल्यामुळे तुम्ही ते कधीही वापरू शकता. मुळातच यामुळे एजिंगचे मार्क्स कमी होतातच पण तुमची त्वचा यामुळे एकसमान टोनची होते. ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील पिगमेंटेशन कमी होण्यास मदत होते.
फायदे –
- फाईन लाईन्स आणि सुरकुत्या कमी होतात
- त्वचेचा टोन आणि टेक्श्चर सुधारते
- त्वचा मऊ राहते
- लाईटवेट आणि नॉन स्टिकी
- क्रुअल्टी फ्री आहे
तोटे –
- पिगमेंटेशन विरळ होते पूर्ण जात नाही
वाचा – चेहऱ्यावर असतील वांग तर असा करा मेकअप
St Botanica Anti Aging Face Cream – सेंट बोटॅनिका अॅंटी एजिंग फेस क्रीम
चेहऱ्यावर वांग निर्माण होण्याचा महत्त्वाचा टप्पा हा उतारवयातील असतो. त्यामुळे चेहऱ्यावरील एजिंग मार्क्स कमी केल्यास वांग विरळ होण्याची शक्यता असते. एजिंगचे मार्क्स कमी करण्यासाठी तुम्ही नियमित हे अॅटि एजिंग डे क्रीम वापरू शकता. ज्यामुळे तुमची त्वचा उजळ तर होईलच शिवाय त्वचा सैल पडणार नाही, हायड्रेट राहिल आणि त्वचेचा पोतही सुधारेल. यामध्ये व्हिटॅमिन सी, ई, बी 3, रेटिनॉल अशा अनेक गोष्टींचा वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील एजिंग मार्क्स कमी होतील.
फायदे
- त्वचा घट्ट होते
- हायपरपिगमेंटेशन आणि एजिंग मार्क्स कमी होतात
- त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते
- क्रुअल्टी फ्री आहे
तोटे –
- कोणतेही दुष्परिणाम अथवा तोटे नाहीत
Organic Harvest Anti Pigmentation Face Cream – ऑर्गेनिक हारवेस्ट अॅंटी पिंगमेंटेशन फेस क्रीम
ऑर्गेनिक हारवेस्टचे हे अॅंटि पिगमेंटेशन क्रीम तुमच्या चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी अतिशय परफेक्ट आहे. कारण यामुळे तुमच्या त्वचेमधील मॅलानिनची निर्मिती कमी होते आणि त्वचेला ग्लो येतो. वांग दूर करण्यासोबत या क्रीममुळे तुमच्या त्वचेचं सूर्यकिरणांपासून होणारे नुकसान कमी होते. तसंच सुरकुत्या, फाईन लाईन्स सारखे एजिंग मार्क्सही कमी होतात.
फायदे
- लाल पेरू, काळ्या मनुका, बिअरबेरीच्या अर्काचा वापर
- नैसर्गिक पद्धतीने वांग कमी होते
- त्वचेवर दुष्परिणाम होत नाहीत
- वेगन आणि क्रुअल्टी फ्री
- शंभर टक्के नैसर्गिक
तोटे –
- कोणतेही दुष्परिणाम अथवा तोटे नाहीत
Sirona Depigmentation Face Serum – सिरोना डिपिगमेंटेशन फेस सीरम
चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी क्रीमसोबतच हे आणखी एक फेस सीरम तुम्ही नक्कीच वापरू शकता. ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील काळे डाग, पिगमेंटेशन कमी होते. या सीरममध्ये तुमच्या त्वचेमधील मेलॅनिनची निर्मिती कमी करणारे घटक असतात. ज्यामुळे तुमची त्वचा उजळ होते आणि त्वचेवरील डाग कमी होतात.
फायदे
- पाण्यासारखं आहे चिकट नाही
- सहज त्वचेत मुरतं
- त्वचेला एकसमान करतं
- त्वचा हायड्रेट ठेवण्यास मदत
तोटे –
- कोणतेही दुष्परिणाम अथवा तोटे नाहीत
Kama Ayurveda Rejuvenating And Brightening Night Cream – कामा आर्युवेदा रिजुव्हनेइटिंग नाईट क्रीम
वांग साठी क्रीम शोधताय मग कामा ब्रॅंडचं हे असं आयुर्वेदिक क्रीम आहे ज्यामध्ये खास केशराचा वापर करण्यात आलेला आहे. केशरामध्ये त्वचा उजळ करणारे आणि त्वचेवरील पिगमेंटेशन कमी करणारे गुणधर्म असतात. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील वांगचे काळे आणि जुनाट डाग विरह होऊ शकतात. ज्यामुळे वांग साठी क्रीमचा वापर केल्यावर हळूहळू तुमच्या चेहऱ्यावरील वांगचे डाग दिसेनासे होतात. शिवाय या क्रीममध्ये केशरासोबतच कोरफड आणि त्वचेची निगा राखण्यारे इतर नैसर्गिक घटकही आहेत. या क्रिमच्या नियमित वापरामुळे तुमच्या त्वचेचा स्किन टोन सुधारतो, त्वचेवरील फाईन लाईन्स कमी होतात, सुरकुत्या येणं कमी होतं. हे एक नाईट क्रीम असल्यामुळे तुम्ही या क्रीमचा वापर दररोज रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या चेहऱ्यावर करू शकता.
फायदे –
- नैसर्गिक घटक आहेत
- पॅराबेन फ्री आहे
- मिनरल ऑईलचा वापर नाही
- क्रुअल्टी फ्री आहे
तोटे –
- कोणतेही दुष्परिणाम अथवा तोटे नाहीत
Oriflame Replenishing Night Cream – ओरिफ्लेम रिप्लेनिशनिंग नाईट क्रीम
ओरिफ्लेम कंपनीची ही नाईट क्रीमदेखील तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी क्रीम म्हणून वापरू शकता. कारण ओरिफ्लेमचे प्रॉडक्ट नैसर्गिक घटकांपासून बनलेले असतात. या क्रीममध्ये तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग आणि व्रण घालवणारे गुणधर्म आहेत. सहाजिकच त्यामुळे तुमच्या त्वचेवरील वांगचे डाग देखील कमी होतात. त्वचेवरील काळे डाग, व्रण, पिगमेंटेशन कमी करून त्वचेला उजळ करण्यासाठी तुम्ही ओरिफ्लेमची ही नाईट क्रिम दररोज रात्री झोपण्यापूर्वी वापरू शकता. सुंदर त्वचेसाठी नाईट क्रिमचे फायदे मिळतात. कारण नाईट क्रीम वापरण्याचे इतरही अनेक फायदे असतात.
फायदे –
- डर्मेटॉलिजिकली टेस्टेड आहे
- सर्व प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर
- हायड्रेटिंग फॉर्म्युला वापरण्यात आला आहे
तोटे –
- विशेष तोटे नाहीत
St Botanica Depigmentation Cream – सेंट बोटॅनिका डीपिगमेंटेशन क्रीम
हे एक व्हिटॅमिन सी, ई आणि हायल्युनिक अॅसिड असलेलं डी पिगमेंटेशन क्रीम आहे ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग आणि वांगचे डाग कमी होऊ शकतात. यातील व्हिटॅमिन्स आणि इतर नैसर्गिक घटक तुमच्या त्वचेला एजिंग मार्क्स पासून दूर ठेवतं. यातील सनस्क्रीनचे घटक तुमच्या त्वचेचं नुकसान होण्यापासून संरक्षण करतं. या डीपिगमेटेंशन क्रीममुळे तुमची त्वचा नैसर्गिक पद्धतीने उजळ होते. ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील वांगचे डाग, टॅनिंग आणि इतर काळे डाग कमी होतात. यामुळे तुमच्या त्वचेचा स्किन टोन बदलतो आणि उजळ होतो. यासाठी या क्रीममध्ये इसेंशिअल ऑईल आणि बोटॅनिकल अर्कांचा वापर करण्यात आलेला आहे.
फायदे –
- त्वचा उजळ होते
- टॅन कमी होते
- वांगचे डाग विरळ होतात
- सनबर्न होत नाही
- पॅराबेन फ्री आहे
- सर्व प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे
तोटे –
- त्वचा तेलकट होण्याची शक्यता
Vaadi Herbals Anti Pigmentation Massage Cream – वादी हर्बल अॅंटी पिगमेंटेशन मसाज क्रीम
वादी हर्बल्सचं चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी क्रीम उत्तम आहे. ज्यामध्ये अॅस्ट्रिंजट आणि अॅंटि बॅक्टेरिअल घटकांचा भरपूर वापर करण्यात आलेला आहे. हे घटक तुमच्या त्वचेच्या मुळाशी जाऊन त्वचापेशींवर परिणाम करतात. या क्रिममुळे तुमच्या त्वचेवरील वांगचे डाग, काळे व्रण तर कमी होतातच शिवाय यामुळे तुमची त्वचा उजळ होते, स्किन टोन सुधारतो आणि त्वचेवर नैसर्गिक ग्लो दिसू लागतो. या क्रीमसोबतच चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी घरगुती उपाय देखील तुम्ही करू शकता.
फायदे –
- नैसर्गिक घटक आहेत
- जीएमपी सर्टिफाईड
- प्राण्यांवर टेस्ट केलेलं नाही
- शंभर टक्के केमिकल फ्री
- पॅराबेन फ्री आहे
- सेंद्रिय असल्याचे प्रमाणित आहे
तोटे –
- तोटे नाहीत
Kaya Clinic Pigmentation Reducing Complex – काया क्लिनिक पिगमेंटेशन रिड्युसिंग कॉम्प्लॅक्स
वांग साठी क्रीम घेण्यासाठी तुम्ही काया कंपनीचं हे एक नाईट क्रीम नक्कीच वापरू शकता. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील वांगचे काळे डाग कमी होतात. या क्रीममुळे चेहऱ्यावरील काळे व्रण, सनटॅन, एजिंगच्या खुणा आणि वांगचे डाग अशा सर्व समस्या कमी होऊ शकतात. यासाठीच हे क्रीम रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून चेहऱ्यावर लावायला हवं. कायाचं हे नाईट क्रीम त्वचेत पटकन मुरतं आणि त्वचेवर परिणाम करतं. कंपनी या क्रीमचा परिणाम दोन आठवड्यात दिसेल असा दावा करते. त्यामुळे वांग घालवण्यासाठी क्रीमच्या शोधात असाल तर हे क्रीम अवश्य ट्राय करा.
फायदे –
- वांगचे डाग कमी होतात
- त्वचेवर पटकन मुरते
- त्वचा हायड्रेट राहते
- सर्व प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर
तोटे –
- परिणामांसाठी नियमित वापरावं लागते
Lotus Herbals Anti-Blemish Cream – लोटस हर्बल अॅंटि ब्लेमिश क्रीम
लोटस हर्बल्सची अनेक उत्पादने ही नैसर्गिक घटकांपासून तयार करण्यात आलेली आहेत. या क्रीममध्ये लिंबाच्या सालींचा अर्क, अक्रोड तेल, व्हिटॅमिन ई आणि लवंग तेल वापरण्यात आलं आहे. अक्रोड तेलामुळे तुमच्या त्वचेला मऊपणा मिळतो. व्हिटॅमिन ईमुळे तुमची त्वचा कंडिशनर होते, लवंग तेलामुळे त्वचेवरील डाग कमी होतात. विशेष म्हणजे यामध्ये पपईचा अर्क वापरण्यात आला आहे ज्यामुळे त्वचेवरील काळे आणि वांगचे डाग कमी होण्यास मदत होते.
फायदे –
- वांगचे डाग कमी होतात
- सर्व प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर
- त्वचेवर लवकर परिणाम दिसतो
- काळे डाग टॅन कमी होते
तोटे –
- लवंग तेलाची अॅलर्जी असल्यास त्वचेवर दुष्परिणाम होऊ शकतो
RE’ EQUIL Skin Radiance Cream – रिक्विल स्किन रेडिअन्स क्रीम
या क्रीममध्ये वापरण्यात आलेल्या घटकांचा त्वचेत निर्माण होणाऱ्या मॅलेनिनवर परिणाम होतो. यातील सक्रिय घटकांमुळे मॅलेनिनची अती निर्मिती रोखली जाते. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील वांगचे डाग कमी होतात. यासोबत या क्रीममुळे चेहऱ्यावरील काळे डाग, एजिंगच्या खुणा कमी होतात आणि त्वचा उजळ दिसते. या क्रीममध्ये असलेले अॅंटि एजिंग घटक तुम्हाला कायम तरूण आणि फ्रेश ठेवतात. यासाठीच स्किन केअर रूटिनमध्ये या क्रीमचा वापर जरूर करा. यासोबतच जाणून घ्या चेहऱ्यावर असतील वांग तर कसा करावा मेकअप
फायदे –
- सल्फेट फ्री
- पॅराबेन फ्री
- मिनरल ऑईलचा वापर नाही
- चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतात
- सर्व प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर
तोटे –
- तोटे नाहीत
Jovees Anti Blemish Pigmentation Cream – जोविस अॅंटि ब्लेमिश पिगमेंटेशन क्रीम
जोविस कंपनीचं हे अॅंटि ब्लेमिश क्रीम तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील वांगचे डाग कमी करण्यासाठीव वापरू शकता. कारण यामध्ये काही औषधी अर्क आहेत ज्यामुळे तुमच्या चेहऱ्याचा स्किन टोन बदलतो. या क्रीमचा नियमित वापर केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील वांगचे डाग कमी होत जातात. ज्याचा परिणाम तुमच्या स्किन टोनवर होतो. हे क्रीम पाण्यासारखं आणि वेलवेट टेक्चरचं आहे. ज्यामुळे ते तुमच्या त्वचेत लगेच मुरतं.
फायदे –
- सर्व प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर
- लाईटवेट
- स्वस्त आणि खिशाला परवडणारे
- पॅराबेन फ्री
तोटे –
- परिणाम दिसण्यास वेळ लागतो
VLCC De-Pigmentation Day Cream – व्हिएलसीसी डिपिगमेंटेशन डे क्रीम
चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी क्रीम हवं असेल तर व्हि एल सी सीचं हे डी पिगमेटेंशन डे क्रीम तुमच्या नक्कीच फायद्याचं आहे. यातील सक्रिय घटक तुमच्या त्वचेचं वातावरणातील प्रदूषणाचे घटक आणि सुर्य प्रकाशामुळे होणारे नुकसान टाळतात. यामध्ये असे नैसर्गिक घटक आहेत ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील वांगचे काळे डागही हळू हळू कमी होत जातात.
फायदे –
- नैसर्गिक घटक
- पॅराबेन फ्री
- हानिकारक केमिकल्स नाहीत
- सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त
तोटे –
- तीव्र सुंगध आहे
- परिणाम दिसण्यास वेळ लागतो
Olay Total Effect 7 In 1 Anti Ageing Skin Cream – ओले टोटल इफेक्ट 7 टू 1 अॅंटी एजिंग स्कीन क्रीम
ओले कंपनीचं हे सेव्हन इन वन अॅंटि एजिंग क्रीम तुम्ही चेहऱ्यावरील वांग घालवण्याचे क्रीम म्हणून नक्कीच वापरू शकता. कारण हे एजिंगचे मार्क्स कमी करण्यासाठी वापरण्यास उपयुक्त असं डे क्रीम आहे. ज्यामुळे एजिंगच्या मुख्य सात त्वचेच्या समस्या कमी होतात. या क्रीममुळे तुमच्या चेहऱ्यावरील समस्या कमी होऊन त्वचा उजळ होते अशी कंपनी दावा करते. मेकअप केल्यावरही या क्रीममुळे तुमची त्वचा फ्रेश आणि हायड्रेट राहते. शिवाय यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग आणि वांगचे डाग कमी होतात. या क्रीममुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि फाईन लाईन्सची कमी होऊ शकतात. थोडक्यात एजिंग मार्क्स घालवण्यासाठी हे क्रीम वापरणं नक्कीच फायद्याचं आहे.
फायदे –
- SPF 15 देखील आहे
- अॅंटि ऑक्सिडंट आहेत
- चिकटपणा नाही
तोटे –
- पॅराबेनचे घटक आहेत
- आर्टिफिशिअल सुंगधित घटक आहेत
चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी क्रीम बाबत निवडक प्रश्न – FAQs
चेहऱ्यावरील वांग घालवण्याचा जलद उपाय कोणता ?
वांग जाण्यासाठी क्रीम वापरणं हा चेहऱ्यावरील वांग कमी करण्याचा सोपा मार्ग आहे. त्याव्यतिरिक्त तुम्ही काही नैसर्गिक आणि घरगुती उपायही यासाठी करू शकता. अॅपल सायडर व्हिनेगर लावण्यामुळे वांगचे डाग कमी होऊ शकतात.
चेहऱ्यावरील वांग पूर्णपणे निघून जाते का ?
तुमच्या चेहऱ्यावर वांग कशामुळे आलं आहे आणि त्याचा प्रकार कोणता यावर वांग किती कमी होणार हे ठरू शकते. हायपरपिगमेटेंशन या प्रकारात त्वचेवर काळे डाग येतात. हे डाग पूर्ण नाहीशे झाले नाही तरी वांग जाण्यासाठी क्रीम वापरून आणि घरगुती उपाय करून ते कमी होऊ शकतात.
वांग आलेल्या त्वचेवर कोणते मॉईस्चराईझर वापरावे ?
वांग आलेल्या त्वचेला नियमित मॉईस्चराईझर आणि सनस्क्रिन लावणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही बाजारात मिळणाऱ्या चांगल्या मॉईस्चराईझरचा वापर करू शकता. वादी, काया, जोविस या कंपन्या खास पिगमेंटेड त्वचेसाठी मॉईस्चराईझर तयार करतात.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक